मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा

0
85
लोहारा/प्रतिनिधी
कोपर्डी घटनेसह महिलावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना 6 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे,अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरूपयोग टाळण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी,स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागु कराव्या अशा विविध मागण्यांसाठी दि.4 जानेवारी 2017 रोजी लोहारा तालुका मराठा समाजाच्यावतीने शहरात भव्य महा मुक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव,महिला,युवक,मुली हातात भगवे ध्वज घेवुन व काळ्या फीती लावुन,व हातात विविध मागण्यांचे फलक,व बँनर घेवुन सहभागी झाले होते. या मोर्च्यामुळे संपुर्ण शहर भगवामय व मोर्चामय दिसत होते.या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना घेवुन शहरातील बसस्थानकापासुन करण्यात आली.हा मुक मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने छञपती शिवाजी महाराज चौक,आंबेडकर चौक,आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला.या मोर्चास पाठींबा देत शहरातील मुस्लीम समाजाने आझाद चौक येथे व लोहारा तालुका केमिस्ट्री अँण्ड डृगीस्ट असोसिशन यांच्यावतीने शिवाजी चौक येथे पाण्याचे वाटप  करण्यात आले.
हा मोर्चा तहसील कार्यलयावर पोहचल्यानंतर शकंरराव जावळे पाटील महाविध्यालयाच्या प्रांगणात  मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले.हा परिसर समाजबांधवानी मोठ्या प्रमाणात भरला होता.यावेळी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन ज्ञुतुजा राखुंडे यांनी केले.यानंतर पुढील मागण्यांचे निवेदन नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावी मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार व अनन्वित छळ करुन तिला ठार मारल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.जागतिक स्तरावर बलात्कारासारख्या गुन्ह्याचा विचार केला तर या गुन्ह्यातील आरोपींना इस्लामीक राष्टृामध्ये आठ दिवसात सजा होते.इतर पाश्चात राष्टृामध्ये दोन ते तीन महिन्यात गुन्हेगारांना सजा होते.परंतु आपल्या देशात या भयंकर अपराधांची प्रकरणे अनेक वर्ष चालतात.तरी आपल्या देशाच्या कायध्यामध्ये बदल करुन या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना आपल्या देशामध्ये तीन ते चार महिण्यात सजा होण्याबाबत कायध्यात बदल करण्यात यावा,केंद्रीय सामाजिक न्यायमंञी गहलोत याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार महाराष्टृात अँटृासिटीच्या गुन्ह्यात 8 व्या क्रंमाकावर आहे.100 अँटृासिटी गुन्ह्यापैकी 92.4% गुन्हे हे बोगस असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.तसेच देशभरामध्ये 92 ते 96% गुन्हे बोगस असल्याचे समितीने सांगीतले आहे.तरी अँटृासिटीच्या कायध्याचा गैरवापर होऊ नये म्हणुन त्यात आवश्यक ते बदल करुन नविन तरतुदी कराव्यात,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे, लोहारा शहरातील शिवाजी चौकात शिवछञपतींच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबीची पुर्तता करुन शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याची उभारणी करावी,अशा विविध मागण्यांचे निवेदन निकीता हंडीभाग,सत्यभागा जाधव,बबीता शिंदे,रेणुका  चिंचोळ्,प्रतिक्षा मोरे,या मुलीनी प्रभारी तहसीलदार डॉ.रोहन काळे यांना दिले आहे.या मोर्चाची सांगता राष्टगीताने करण्यात आली.या मोर्चात तालुक्यातील मराठा समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,वकील मंडळी,महिला,नागरीक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी व प्रभारी पो.नि.फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हा मोर्चा लोहारा शहरात प्रथमच न भुतो न भविष्यतो असा निघाला होता.या मोर्चात अलोट गर्दि उसळली होती.या मोर्चात अतिशय शिस्तता दिसुन आली. यावेळी निर्माण झालेला कचरा शेवटी संवयसेवकांनी व मराठा समाजाने काढुन शहराची स्वच्छता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here