Home Blog Page 96

दैनिक जनमत १४ एप्रिल २०२३ E paper

 

दैनिक जनमत १३ एप्रिल २०२३ E paper

दैनिक जनमत १२ एप्रिल २०२३ E paper

धाराशिव जिह्याकरिता दिनांक १२ ते १६ एप्रिल, २०२३- साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

धाराशिव -प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक १३ ते १५ एप्रिल, २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.



अंगणवाडीचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी लाच स्वीकारणारा जिल्हा परिषदेचा अभियंता जेरबंद

 


धाराशिव – अंगणवाडीचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी ७५०० रुपये लाचेची मागणी करून ६००० रुपये लाच  स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद अभियंतास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून या कारवाईनंतर मिनिमंत्रालयासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे मौजे शेकापूर ग्रामपंचायतचे सदस्य असून त्यांच्या  पत्नी या सरपंच आहेत. मौजे शेकापूर येथे तीन मिनी अंगणवाड्या मंजूर झालेल्या असून त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्र ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे तक्रारदार यांनी दाखल केली होती. सदर कामाचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी कासिम उस्मान सय्यद, वय 55 वर्ष,  शाखा अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,  यांनी  तक्रारदार यांच्याकडे आज  दिनांक 10.04.2023 रोजी 7,500/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 6,000/- रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून  दिनांक 10.04.2023  रोजी 6,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने आलोसे  यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा-धाराशिव  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्हा दौरा

 



धाराशिव  – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

सकाळी ०९.५० वा. वर्षा निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने राजभवन हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण

सकाळी १०.०० वा.राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व हेलिकॉप्टरने वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगरकडे प्रयाण.

सकाळी ११.०० वा. वनकुटे, ता. पारनेर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने नुकसानग्रस्त परिसराकडे प्रयाण.

सकाळी ११.०५ वा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद.


दुपारी १२.०५ वा. मोटारीने वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर हेलिपॅडकडे प्रयाण.


दुपारी १२.१० वा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने तुळजापूर, जि. धाराशीवकडे प्रयाण.


दुपारी ०१.३० वा.

तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने धारूर, ता. जि. धाराशिवकडे प्रयाण.

दुपारी ०१.५० वा. धारूर, ता. जि. धाराशिव येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.

दुपारी ०२.४० वा. वाडीबामणी, ता. जि. धाराशीव येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.

दुपारी ०३.१० वा. मोटारीने तुळजापूर, जि. धाराशीव हेलिपॅडकडे प्रयाण.

दुपारी ३.२० वा. तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण.

सायं. ०५.२० वा. राजभवन हेलिपॅड, मुंबई येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण.

सायं. ०५.३० वा. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे आगमन व राखीव.

परंडा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर

ज्वारी,गहू,हरभरा,कांदा अंबा, द्राक्षे पीकांचे मोठे नुकसान 

शेतकरी आर्थीक संकटात, शासनाने आर्थीक मदत करावी रमेश गणगे यांची मागणी

परंडा भजनदास गुडे ( दि ९ एप्रिल) 

८ एप्रील रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसा मुळे परंडा तालूक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वारी,गहू,हरभरा, कांदा,मका या सह अंबा,द्राक्षे, पपई,कलीगड फळ पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसाने मळणीसाठी काढून ठेवलेला  हरभरा,गहू,ज्वारीचा कडबा  भिजून शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.   परंडा तालूक्यातील आसू, जवळा,सोनारी,अनाळा,परंडा या पाचीही महसुली मंडळात ८ एप्रिल रोजी सरासरी २६.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली असुन रात्रन दिवस काबाड कष्ठ करून   व हाजारो रूपायाचा आर्थीक खर्च करून जोपालेली पीके हाता तोंडाशी आली आसतानाच अवकाळी पावसाने भूईसपाट झाली आहेत.   सरकार शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव देत नाही आणी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही शेतकऱ्यांनी आर्थीक खर्च करुन व रात्रन दिवस काबाड कष्ट करून पिकवलेले धान्य कवडी मोल दराने विकावे लागत असल्याने शेतकरी सतत आर्थीक संकटाचा सामना करत आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी केली व झालेल्या नुकसानीची प्रशानाने त्वरित पाहानी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत करावी आशी मागणी केली आहे.

मळणीसाठी काढून ठेवलेला लाखो रूपयाचा हरभरा पाण्यात

   शेती मशागत,बीयाने,खते या साठी हाजारो रुपये खर्च करून व रात्र दिवस कष्ठ करुन दोन एक्क क्षेत्रावर हरभरा पीकाची जोपासना कली होती.पीक जोमात आले होते.हरभरा पीक मळणी साठी शेतात काढून ठेवले होते.दि.८एप्रिल रोजी सायंकाळी अचानक सुसाटवारा,विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली या पावसात माझे हभरा पीक पूर्ण भिजून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.

      शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थीक मदत द्यावी .

    राजाभाऊ गायकवाड – शेतकरी ब्रम्हगाव.