आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय( दि १९ एप्रिल संक्षिप्त स्वरूपात)
मुंबई – शिंदे फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ निर्णय
👉 राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू.
👉पुणे महापालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय
👉शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविणार. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करणार.
👉आता बी.एससी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थांना विद्यावेतन मिळणार
👉पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणार.
👉महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार.
👉खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षण पदावरील निवडीकरिता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही.
👉राज्यातील अकृषि विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार.
👉ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
👉पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता.
👉अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता.
👉मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता.
९० हजाराची लाच घेताना पोलिस दलातील दोघांना अटक लाचलुचपत विभागाची कारवाई
धाराशिव – वाशी तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान भारत नाईकवाडे हे दहशतवादी विरोधी पथक धाराशिव येथे सन 2019 मध्ये नेमणुकीस असताना त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून या प्रकरणातील तक्रारदार व इतरांना आरोपींना केले तसेच त्या दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील इतर लोकांविरुद्ध कलम 353 357 चा गुन्हा दाखल केला होता परंतु 353 307 च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते दिनांक 14 4 रोजी यातील आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडे व आरोपी सागर कांबळे पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जो घराच्या गुन्ह्यात मदत केल्याने कलम 353 307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून पाच लाख रुपये किंवा सेकंड हॅन्ड गाडी अशा लाचेची मागणी करून तडजोडीअंती 90 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले परंतु यातील आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही सदरील गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
विद्युत मोटार काढण्यासाठी गेलेल्या शेतमजूराचा सिना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
परंडा तालूक्यातील लोहारा येथील दुर्देवी घटना
आपत्ती व्यवस्थापन टिम च्या प्रयत्नाला यश दुसऱ्या दिवशी गव्हाणे यांचा मृतदेह सापडला
परंडा ( दि १६ एप्रिल ) परंडा तालूक्यातील लोहारा येथिल सिना नदी पात्रातील विद्यूत मोटार काढण्या साठी गेलेले शेत मजूर अंगद सोपान गव्हाणे वय वर्ष ५५ यांचा पाण्यात बुडून मत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि १५ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास लोहारा येथे घडली.
दि १५ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी गव्हाणे यांचा नदी पात्रात शोध घेतला मात्र गव्हाणे सापडले नाहीत नदी पात्रा तील पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांचा पहिल्या दिवशी शोध लागला नाही.
आंगद गव्हाणे हे विद्युत मोटारला रस्सी बांधून काढण्या साठी नदीत पात्रात त्यांनी बुडी मारून रस्सी घेऊन पाण्यात गेले होते ते वर आले नसल्याने यावेळी तेथे हजर असलेले गौतम दबडे, दादा दबडे,बापू दबडे,दशरथ दबडे यांनी पाण्यात उडया मारून गव्हाणे यांचा शोध घेतला मात्र पाणी खोल असल्याने अंगद गव्हाणे सापडले नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व नावेद्वारे नदीच्या पात्रात बुडालेल्या अंगद गव्हाणे यांचा शोध घेणे सुरू केले मात्र त्यांना शोध लागला नाही.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी परंडा तहसिल कार्यालय व पोलिस स्टेशनला दिली मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी २४ तासा नंतर दि १६ रोजी ११च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन ची टीम लोहारा येथे घटना स्थळी दाखल झाली व शोध मोहिम सुरू केली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या अथक प्रयत्नाने अंगद गव्हाणे यांचा ३० तासा नंतर दुपारी ३च्या दरम्यान मृत अवस्थेत शोध लागला आहे.
अंगद गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी,तीन विवाहीत मुली व एक अविवाहीत मुलगा आहे.घरातील कर्त्या अंगद चा दुर्देवी मुत्यु झाल्याने गव्हाणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
अंगद गव्हाणे यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थीमदत करावी
या घटणेची माहिती मिळ्ताच बळीराजा शेतकरी संघटने चे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली व शासनाने गव्हाणे यांच्या कुंटूबाला त्वरीत आर्थीक मदत करावी आशी मागणी केली आहे.







































































