Home Blog Page 86

केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर



धाराशिव – आम आदमी पार्टीच्या वतीने धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार यांच्यादरम्यान प्रशासकीय अधिकार ताब्यात घेण्यावरून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलासा दिल्यानंतरही केंद्र सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय बदलला. याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी विरोधीपक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.

दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी  क्लिक करा

कुलूपबंद ऑक्सिजन प्लॅन्ट मध्ये आढळला अनोळखी मृतदेह

 



धाराशिव – धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील ऑक्सिजन युनिट मध्ये सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह आढळून आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.



सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर?


 हा ऑक्सिजन प्लॅन्ट नेहमी कुलूपबंद असतो, या परिसरात सुरक्षारक्षक देखील असतात मात्र हा व्यक्ती तिथे कसा गेला याचा शोध तर घ्यावाच लागेल मात्र वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना वैद्यकीय महाविद्यायाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.



दैनिक जनमत च्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी लिंक वर क्लिक करा


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

दैनिक जनमत १० जून २०२३ E paper

 

तथाकथित जिल्हा परिषद सदस्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल

 



धाराशिव – जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण समितीवर अशासकीय सदस्य राहिलेल्या मात्र बाहेर जिल्हा परिषद सदस्य सांगणाऱ्या तथाकथित जिल्हा परिषद सदस्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

संतोष निकम यांनी मुरूम पोलीस ठाण्यात  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आमचे कंपनिचे काम बंद पाडण्याचे उद्देशाने आनंद सतिशराव पाटील, लखन गायकवाड यांनी मला वारंवार फोनवरून धमकी व शिवीगाळी देवून दि. ०६ जून २०२३  रोजी सायंकाळी ०६.०० वा सुमारास सोबत इतर अनोळखी १४ लोकांसह येवुन आमचे यार्डमधिल सनवन कंपनिचे कार्यालयात घुसून तोडफोड करून तेथिल कामगाराना मारहाण व शिवीगाळी करुन सँनवन कंपनिचे साईट इन्चार्ज अरजित बासु व त्याचे गाडीचा चालक यांना जबरदस्तीने गाडीत घालुन नेवुन त्यांनाही मारहाण व शिवीगाळ केली. यावरून कलम ४५२,३६५, ३२३,४२७,१४३,१४७, १४९, ५०४, ५०६,५०७ अन्वये गुन्हा नोंद झाला असून पोलिस तपास करीत आहेत.

आनंद पाटील हे सावंत गटाचे निकटवर्तीय आहेत. पालकमंत्र्यांच्या प्रत्येक दौऱ्याच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर त्यांचे स्वागताचे बॅनर बैठकीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी असतात त्यातूनच अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. तसेच मागील काळात जिल्हा परिषदेच्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या, फर्निचरच्या कामात असाच दबाव तयार केल्याची चर्चा आहे. नेमका हा दबाव कसा तयार होत होता याचा तपास करण्याचे काम पारदर्शक पणे केल्यास अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धाराशिव शहरात किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा व तंबाखु जप्त

धाराशिव,दि,०७ (प्रतिनिधी):- अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांना प्राप्त माहितीच्या आधारे आज दि.07 जून 2023 रोजी उस्मानाबाद शहरातील मे.सफा किराणा व जनरल स्टोअर्स , विजय चौक, दर्गा रोड,  उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद या पेढीची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी  न.त.मुजावर यांनी केली असता त्यामध्ये विविध प्रतिबंधित अन्न पदार्थाचा (हिरवा गोवा 1000, बादशाह गुटखा, विमल पान मसाला, माणिकचंद पान मसाला, आरएमडी पान मसाला, आरएमडी सुगंधित तंबाखू, राजनिवास पान मसाला, चंदन सुगंधित सुपारी , राजू इलायची, रत्ना ३०० तंबाखु, रॉयल 220 सुगंधित तंबाखू, XL जाफरानी जर्दा, एम सेंटेड टोबॅको) एकूण किंमत रु 40 हजार 903/- किमतीचा साठा आढळून आला. जप्त साठ्यामधून प्रत्येकी 1 असा एकूण 15 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. किराणा मालाबरोबर प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करत असल्यामुळे मा.आयुक्तांच्या आदेशानुसार पेढी सील करण्यात आलेली आहे. हजरव्यक्ती/पेढीमालक श्री.उमर फारुख खलील शेख यांच्याविरुद्ध भादवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद येथे फिर्याद दाखल करण्यात आले असून एफआयआरक्र. २०२/२०२३ असा आहे.

सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न.त.मुजावर यांच्या पथकातील तावरे,काझी,अकोसकर यांनी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

शालेय साहित्य विक्री दुकानांचे ऑडिट करण्याची मागणी

 


धाराशिव दि ६ (प्रतिनिधी) -जागृती फाउंडेशनच्या वतीने पाठ्य पुस्तके दुकाने यांचे ऑडिट करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शहरातील पाठ्य पुस्तके दुकानदार शालेय साहित्य विक्रीमध्ये ग्राहकांना अवाजवी किंमती घेऊन आर्थिक पिळवणूक करत आहेत ग्राहकांना जीएसटी व सीजीएसटी युक्त देयके दिली जात नाहीत. ग्राहकांना बील मागितले तर थातुर मातूर बीले दिली जातात. यातून हे पाठ्य पुस्तके (होलसेल) दुकानदार ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करतात आणि पैशाचा अपहार करून आयकर विभागास ही चुना लावतात. त्यामुळे या दुकानांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थाची व पालकांची ही आर्थिक पिळवणूक होणार नाही. अगदी काल परवाच इयत्ता दहावीची आणि बारावीची निकाल लागला असून लवकरच पुढील शिक्षणासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी आहे यात आपल्या शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेते प्रिंटेड किमतीवर आणणे मनाला वाटेल तसे खुल्या साहित्यावर किमती लावून सर्वसामान्य ग्राहकांची लूट करतात यामुळे याकडे गांभीर्याने पाहून शहरातील सर्व दुकानदारांची बिलबुके, आयकर परतावा, जीएसटी, सीएसटी भरणा इत्यादी तपासण्या करण्यात येऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी असे निवेदनात नमूद केलेले आहे. या निवेदनावर विजय बनसोडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे, कुंदन वाघमारे, इन्नुस पटेल, बाबा वाघमारे, सोमनाथ नागटिळक, विद्यानंद वाघमारे ,बाळासाहेब जानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत