Home Blog Page 80

दैनिक जनमत ०६ जुलै २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०५ जुलै २०२३ E paper

आजच्या ( दि ०४ जुलै) मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 #मंत्रिमंडळ_निर्णय…

✅  राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन.

✅  मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती.

✅  दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता.

✅  नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार.

✅  सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ.

✅  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.

✅  नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र.

✅  मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे.

प्रणिती कॉम्प्युटर सेंटर मराठवाड्यातील व धाराशिव जिल्ह्यतील बेस्ट परफॉरमिंग सेंटर म्हणून एमकेसीएल कडून पुरस्काराने सन्मानित

 


परंडा (प्रतिनिधी) परंडा येथील प्रणिती कॅम्प्युटर सेंटरला मराठवाड्यातील व धाराशिव जिल्ह्यतिल बेस्ट परफॉर्मिग सेंटर म्हणूण एमकेसीएल कडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.    

          प्रणिती कम्प्युटर सेंटरची सुरुवात परंडा तालुक्यात २००८ या साली प्रा. अमोल सोनवणे सर यांनी केली. आजपर्यंत प्रणिती कॉम्प्युटर सेंटरने जवळपास ५००० विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर साक्षर केले आहे.

          प्रणिती कॉम्प्युटर सेंटरचे नाव अगदी तळागाळा पर्यंत अल्पावधीतच पोहोचवले. अमोल सोनवने सर यांची जिद्द,चिकाटी,मितभाषी स्वभाव,

दांडगा जनसंपर्क या मुळेच प्रणिती कम्पूटर सेंटरची यशोगाथा तयार झाली व सेंटर नावारूपास आले. कॅम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून अमोल सोनवने सर यांचा प्रेरणादायी प्रवास सुरू असतानाच २०२१ मध्ये अचानक काळाने घालाघातला व अमोल सोनवने सरांचे अपघाती निधन झाले.

       मात्र २०१२ पासून कम्प्युटर सेंटरच्या प्रेरणादाई प्रवासात अमोल सोनवने सर यांच्या पत्नी प्रा.निशा सोनवणे यांची त्यांना भक्कम साथ होती.सरांच्या निधनानंतर निशा सोनवने मॅडम यांचा एकटीचा प्रवास सुरू झाला. पतीच्या निधनाचे डोंगराएवढे दु:ख असताना त्याला बगल देऊन त्यांनी न डगमगता अतिशय उत्तम रीतीने प्रणिती कॅम्प्युटर सेंटर नावारूपास आणले आहे. MKCL कडून अवॉर्ड मिळाल्या मुळे हे आपल्या लक्षात आले आहे. 

     अमोल सोनवने यांच्या नंतरही निशा सोनवने मॅडम यांनी २०२२ या साली ५३० एडमिशन करून मराठवाड्यातील व धाराशिव जिल्ह्यातील बेस्ट परफॉर्मिंग सेंटर म्हणून अवॉर्ड संपादन केला आहे. 

        प्रणिती कम्प्युटर सेंटरमध्ये MS-CIT, TALLY, DIPLOMA व TYPING असे विविध कम्प्युटर कोर्स चालवले जातात. व प्रणिती कॉम्प्युटर सेंटर हे परंडा तालुक्यातील शासनमान्य व नामांकित कंप्यूटर सेंटर आहे. 


प्रणिती कॅम्प्युटर सेंटर ला मिळालेल्या पुस्कार व यशाचे खरे मानकरी MKCL चे सर्व पदाधिकारी,विद्यार्थी,पालक, शिक्षक व माझे सहकारी आहेत.

     निशा सोनवणे 

प्रणिती कॅम्प्युटर सेटर परंडा .

गर्भपाताच्या गोळ्या अवैध विक्रीचा गोरख धंदा उघडकीस बार्शी येथील आरोपीस परंडा येथे अटक

 


परंडा पोलिस पथकाने टोळीचा पर्दाफाश,लाखो रुपये किंमतीच्या गोळ्या जप्त



परंडा ( दि १ जुलै )गर्भपात व सेक्सच्या गोळयांची अवैध खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा परंडा पोलिस पथकानी पर्दाफाश करून आरोपीच्या ताब्यातून लाखो रुपये किंमीतीच्या गोळ्या जप्त करून दोन आरोपी विरूध्द दि ३० रोजी परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करुन बार्शी येथिल आकाश ढोबळे या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

         पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परंडा शहरात भृणहत्या व गर्भपातच्या गोळ्या एमटीपी किट व सेक्सच्या गोळ्याची अवैध विक्री करण्यासाठी बार्शी येथील लोक येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने परंडा पोलिस पथकाने व अन्न व औषध विभागाचे निरिक्षक श्रीकांत पाटील यांनी परंडा बस स्थानक रोड वरील रमाई चौकात सापळा लावला होता.

     या प्रकरणातील आरोपी कार मधून औषध साठा घेऊन विक्री करण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास परंडा येथिल एस.टी स्टॅन्ड रोडच्या रमाई चौकात येताच पोलिस पथकाने छापा मारून कारची तपासणी केली असता औषधसाठा दिसुन आला.

         आरोपीकडे औषधे खरीदीच्या पावत्या नसल्यामुळे आरोपीस ताब्यात घेऊन कार मधील गर्भपात करणारे एमटीपी किट व सेक्सच्या लाखो रुपये किमतीच्या गोळ्यां पोलिस पथकानी जप्त केल्या आहेत.

      यातील आरोपी चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट विक्रीच्या आडून औषधाची अवैध विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.अन्न व औषध विभागाचे निरिक्षक श्रीकांत पाटील यांच्या फिर्यादी वरून दोन आरोपी विरूध्द विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन बार्शी येथिल सुभाष नगर येथिल अकाश अविनाश ढोबळे यास अटक करण्यात आली आहे.

      यातील आरोपी उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील अनेक गावात गर्भपाताची व सेक्सच्या औषधाची अवैध विक्री करत असल्याचे समजते.परंडा शहरात गेल्या अनेक वर्षा पासून हा गोरख धंदा सुरू असुन परंडा येथे या औषधाची खरेदी कोणते दुकानदार खरेदी करत होते याचा देखील तपास करण्यात येणार आहे. पोलिस निरिक्षक अमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे,पोकॉ योगेश यादव,चालक पोकॉ कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.    या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे करीत असुन तपास कामी त्यांना पो.ना बी.आर काकडे,पोकॉ एस एम कोळेकर, पोकॉ रफीक मुलाणी, पोकॉ योगेश यादव सहकार्य करीत आहे.

काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान



आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
“बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यावरची सगळी संकटं, आरिष्ट दूर होऊ दे, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व समाजघटक सुखी, समाधानी झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे” अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूराया चरणी केली.
यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. श्री. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात.
महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण आणि वारी संदर्भात छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘भू वैकुंठ’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.