Home Blog Page 74

दैनिक जनमत २४ ऑगस्ट २०२३ E paper

 

प्रदीप माने यांच्या समर्थनार्थ तासगाव तहसील ऑफिसवर विराट मोर्चा

तासगाव येथे भ्रष्ट प्रशासनाविरोधात हंटरफोड आंदोलन उभारू  सर्वपक्षीयांचा इशारा


मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू जयंतदादा पाटील यांची टीका


तासगाव प्रतिनिधी


   तासगाव  येथील भूमी अभिलेख कार्यालयातील बेधुंद कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे गटाचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने,  विशाल भोसले व शेतकरी असलेल्या सुनील घेवारी यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविरोधात आज सर्वपक्षीयांनी तासगाव तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चासमोर बोलताना अनेक वक्त्यांनी भ्रष्ट प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. तर भूमी अभिलेखच्या चंद्रकांत शिरढोणे या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढले.


       येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. गणपती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल तासगाव आगार मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत हजारो आंदोलनकर्ते मोर्चात दाखल झाले होते. प्रदीप माने, विशाल भोसले यांच्याविरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. भूमी अभिलेख कार्यालयातील मस्तवाल बनलेल्या चंद्रकांत शिरढोणे याच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्याला निलंबित करावे, अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या.


      हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात येऊन धडकल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जयंतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, गुंठेवारी संघटनेचे चंदनदादा चव्हाण, काँग्रेसचे राजीव मोरे, शिवसेनेचे शंभोराजे काटकर,  राज्य ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजीव पाटील, विशालसिंह रजपूत, भाजपचे नितीन पाटील, अर्जुन थोरात,रास्ते,यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.

यावेळी राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतदादा पाटील म्हणाले भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची व प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रातील २८हजार सरपंचांचे प्रदीप माने यांना जाहीर पाठिंबा आहे तासगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सदरच्या घटनेचे दखल घेतली नाही. सदरच्या घटनेबद्दल ब्र अक्षर काढले नाही त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून सामान्य कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन केले तसे केले नाही तर घोडा मैदान जवळ आले आहे  लोकप्रतिनिधींचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो, असे करण्यास आम्हास भाग पाडू नये खरा शत्रू नोकरशाही असून भ्रष्टाचार केल्यास आपल्या सहकारीची स्वतः चौकशी करतात सहा महिने निलंबित ठेवतात पुन्हा कामावर घेतात अ कारभारात पारदर्शकता नाही त्याला वेळीच लगाम घालण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

        भाषणादरम्यान सर्वच वक्त्यांनी भ्रष्ट प्रशासनाविरोधात आगपाखड केली. प्रदीप माने हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. लोकांच्या अडीडचणींना ते धावून जातात. सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्षे उल्लेखनीय काम केले आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जलक्रांती केली. सावर्डे या गावाची पाणी फाउंडेशनमधील कामाची दखल घेऊन अमीर खान या गावात येऊन गेले. याशिवाय गावात दारूबंदी करण्यासाठी माने यांनी आक्रमक पाऊले उचलली होती. 

       तालुक्यातील काळे धंदे मोडीत काढावेत, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. अखंड पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे काम आहे. तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात ते शोषित, वंचित घटकांची कामे घेऊन जात असतात. मात्र, ज्यावेळी ‘भूमी अभिलेख’मधील चंद्रकांत शिरढोणे यांच्यासारखे अधिकारी लोकांची दाद घेत नाहीत त्यावेळी माने यांनी आक्रमक होत त्याचे थोबाड रंगवले होते. कायदेशीरदृष्ट्या हे जरी चुकीचे असले तरी ती सामान्य लोकांची प्रतिक्रिया होती. मात्र या घटनेनंतर जी फिर्याद रंगवण्यात आली त्यामध्ये जे घडलं नाही तेही दाखल करण्यात आले आहे. प्रदीप माने यांनी कोणालाही पैशांची मागणी केली नाही. कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला ते काहीही बोलले नाहीत. याशिवाय विशाल भोसले यांनी खुर्ची मोडल्याचा दावाही खोटा आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

      तर मा. सरपंच  प्रदीप माने भूमी अभिलेखमध्ये गेल्यानंतर शिरढोणे यांनी बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीच्या हातात मूळ नकाशे दिल्याचे व त्याने तयार केलेल्या नकाशावर आपण सही करत असल्याचे मान्य केले आहे. तसे पुरावेही आहेत. मग शासकीय कागदपत्रे खासगी व्यक्तीच्या हातात देणे गुन्हा नाही का, असा सवाल करीत आंदोलनकर्त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील शिरढोणे याच्या निलंबनाची मागणी केली.

      त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन दिले. तर भूमी उपअधीक्षक वाय. सी. कांबळे  यांचीही भेट घेऊन झालेली घटना दुर्दैवी आहे. प्रशासनाने सामोपचाराने मार्ग काढावा. जर तुम्ही काम बंद आंदोलनावरती ठाम राहिलात तर आम्ही गावे बंद ठेवू. आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व लोकयुक्तांची भेट घेऊ, अशी भूमिका मांडली.

      यावेळी सरपंच परिषदेचे तासगाव तालुकाध्यक्ष विकास डावरे, शिवसेनेचे तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चवदार, राष्ट्रवादीचे  बाजार समिती सदस्य खंडू पवार, निशिकांत पाटील, सचिन पाटील, , शे.का.प.चे बाबुराव जाधव  प्रा. लगारे सर,शिवाजी गुळवे, काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. विवेक गुरव, भास्कर सदाकळे, अजिंक्य पाटील, शशिकांत डांगे भाग्येश भाट,अमोल कदम, बी आर एस पक्षाचे ज्योतीराम जाधव राजू वाटकर संजय काटे,इत्यादी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, सामान्य नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

 मतदार संघामध्ये सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व नेतेमंडळी मोर्चामध्ये सामील होऊन माजी सरपंच प्रदीप माने यांना पाठिंबा न दिल्याने संताप व्यक्त करीत  मोर्च्याच्या ठिकाणी उघडपणे चर्चा करीत होते.

दैनिक जनमत २३ ऑगस्ट २०२३ E paper

आयन-बाणगंगा साखर कारखान्याचे “मिलरोलर” पूजन



परंडा (प्रतिनिधी) – आयान मल्टीट्रेड एल एल पी संचलित बाणगंगा सहकरी साखर कारखाना ईडा जवळा या कारखान्यांचे गळीत हंगाम सन २०२३-२०२४करीता ” मिल रोलर”पूजन दि.१८रोजी सकाळी ११ वाजता अत्यंत उत्साहात पार पडले. या वेळी बाणगंगा कारखान्याचे व्हा.चेअरमन साहेब महादेव (आबा) खैरे,संचालक तात्याभाऊ गोरे तसेच कारखान्यांचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले,चिफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे,मुख्य शेतकी अधिकारी विठ्ठल मोरे,डिस्टलरी मॅनेजर जगताप साहेब,चिफ अकौंटंट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनिअर,बंडगर साहेब,स्टोअर किपर नानासाहेब जाधव यांच्या  कारखान्यांचे सर्व अधिकारी, कामगार वर्ग तसेच शेतकरी सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमरेगव्हाण येथे एसटी बसच्या फेऱ्या गावात सुरळीत न केल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन



राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव (उस्मानाबाद)आगारातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे उमरेगव्हाण गावात एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले असून बसच्या फेऱ्या गावात होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला. विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत गावापासून १.५ किलोमीटर वर जाऊन थांबावे लागते. त्यामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला.तसेच ज्येष्ठ नागरिक यांना चालत जाणे खूप दूर होत आहे ,गाव असून नसल्यासारखे भावना तयार झाली आहे.सिताई सामाजिक संस्था तर्फे ३_४ वेळा निवेदन देऊन देखील महामंडळ दखल घेत नसून त्यामुळे या भागातील बसेसच्या फेऱ्या गावात सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा  कै.सिताबाई लक्ष्मण बनसोडे बहुउददेशिय सेवाभावी सामाजिक संस्था उमरेगव्हाण तर्फे जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ कार्यालय यांना  देण्यात आला आहे.

शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहर तसेच इतर ग्रामीण भागात मूल मुली जातात. त्यासाठी त्यांना एसटी बस शिवाय दुसरा पर्याय नाही. एसटी बस न आल्यास या विद्यार्थ्यांना एक तर शाळा बुडवावी लागते किंवा जे खाजगी वाहन भेटेल त्या वाहनाने जावे लागते. यात मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

शेतकऱ्यांना विमा कंपनीकडुन 25 टक्के अग्रीम देण्याबाबत कार्यवाही करावी



आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

धाराशिव – जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होणार असल्याने चालु हंगामाच्या (२०२३) पिकांची नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना २५ टक्के

आगाऊ रक्कम देण्याबाबत जिल्हास्तरीय तक्रारी निवारण समिती बैठकीचे तातडीने आयोजन करुन पीक विमा कंपनीला आदेश करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.                

पाटील यानी पत्रात म्हटले की, जिल्हयात मान्सुन पावसाची सुरुवात जुन अखेर झाली. समाधान कारक पाऊस झालेला नाही.जुन महिन्यात फक्त पाच दिवस पाऊस पडला तर जुलै महिन्यात १५ दिवस, १८ ऑगस्टपर्यंत फक्त दोन दिवस असा आतापर्यंत २२ दिवस पाऊस झाला. आतापर्यंत १७.०४ टक्के पावसाची नोंद आहे. जुन महिनाअखेर पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सात लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी पाच लाख ९९ हजार ४११ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केली आहेत. पाच लाख ६० हजार ४६८ शेतकऱ्यांनी पाच लाख २३ हजार ४०६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाची अपेक्षा होती मात्र आता एक महिना पावसाने उघडीप दिल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सात मंडळात २० पेक्षा जास्त दिवस पाऊस झाला नाही तर इतर मंडळात १७ ते १८ दिवस पाऊस झाला नाही. दोन ते तीन दिवसात याला २१ दिवस पुर्ण होतील. उशिरा झालेली पेरणी व पावसाची उघडीप यामुळे शेतकऱ्यांच्या महसुली उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या शासन निर्णयामधील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सरासरी ५० टक्केपेक्षा जास्त घट दिसत असल्याने भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आयोजीत करुन विमा कंपनीला शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी आमदार पाटील यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.