Home Blog Page 73

दैनिक जनमत ०१ सप्टेंबर २०२३ E paper

 

पावसाने दिली ओढ, शेतकरी हतबल #कोरडा_दुष्काळ ट्रेण्ड चालवून शेतकरी, सामजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी केल्या भावना व्यक्त


धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडे मदतीची याचना करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात #कोरडा_दुष्काळ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला असून सामजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी देखील यात सहभाग नोंदवला आहे.किमान या ट्रेंड ची तरी शासन दखल घेईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे



















दैनिक जनमत ३१ ऑगस्ट २०२३ E paper

मा.आ.राहूल मोटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयान-बाणगंगा शुगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

आयोजित रक्तदान शिबिरामध्ये  २०१ रक्तदात्यानी केले रक्तदान

 परंडा प्रतिनिधी  -मा.आ. राहूल (भैय्या) मोटे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून आयान- बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा यांच्या वतीने कारखाना स्थळी दि. २६ऑगष्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१रक्तदात्यांनीर क्तदान केले.

         आज विज्ञान एवढे पुढे सरसावले आहे की,आपल्याला विज्ञानामुळे बरेच चमत्कार पाहायला मिळत आहेत. पृथ्वीच्या उत्पतीपासून चे वेगवेगळ्या ग्रहापर्यंत आणि समुद्रातल्या तळापर्यत असे विविध बाबी विज्ञानाने शोधून काढल्या आहेत.परंतु अजूनही मानवाला कृत्रीम रक्त तयार करण्यात यश आले नाही हे एक सत्य आव्हान आहे मानवासाठी. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो.अन ते पांग फेडण्यासा ठीची संधी म्हणजे रक्तदान होय. सध्याची परिस्थितीचा विचार करून रक्तपेटीमध्ये रक्ताची कमतरता भासू नये म्हणून आयान बाणगंगा कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांच्या मार्गदर्शनाने मा.आ.राहुल (भैय्या) मोटे यांचे वाढदिवसानिमित्त   “आयान-बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा” येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        रक्तदान शिबिराचा शुभारंभ बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन महादेव (आबा) खैरे,संचालक  तात्यासाहेब (भाऊ) गोरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर मा. संतोष तोडले, मुख्य शेतिधिकरी  विठ्ठल मोरे,डिस्लरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनिअर बंडगर,स्टोअर कीपर नानासाहेब जाधव यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख यांचे हस्ते संपन्न झाला. 

        या रक्तदान शिबीराचे योग्य नियोजन कारखान्यातील कर्मचार्‍यांनी केले होते.ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे. त्या रक्तदात्यास कारखान्याच्या वतीने हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी भगवंत रक्तपेढी, व श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी तसेच कारखान्यातील सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदविला.

जातीय सलोखा अबाधीत राहुन समाज कंटकांना जरब रहावी यासाठी परंडा येथे जलद कृती दल व पोलिसांचे परंडा शहरात पथसंचलन



पथ संचालनात हैद्राबाद येथिल रॅपीडक्शन फोर्स चा सहभाग


परंडा ( दि २६ )आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव शांततेत पार पडावे व समाज कंटकांना जरब रहावी यासाठी  शनिवार दि २६ ऑगस्ट रोजी परंडा येथे हैदाबाद येथिल रॅपीड अक्शन फोर्स व परंडा पोलिसांच्या वतीने परंडा शहरात पथसंचलन करण्यात आले.

      आगामी काळात साजरे होणारे गणेश उत्सव,नवरात्र उत्सव,ईद मिलाद,आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत,या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये.सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत.दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडूने

या साठी हैद्राबाद येथील जलद कृती दलाचे ६० जवान व परंडा   पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्याच्या वतीने  शहरात पथसंचलन करण्यात आले. 

            समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत.येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये,त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी,या उद्देशाने परंडा शहरातील विविध भागांतुन  पथसंचलन करण्यात आले.

          पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली काढलेल्या पथ संचलनात  हैदाबाद येथिल रॅपीड अक्शन फोर्स चे डीसी विरेंद्र कुमार यादव, निरिक्षक के.के चंद्रा,उप विभागीय पोलिस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ,पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक कवीता मुसळे यांच्या सह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.