Home Blog Page 75

दैनिक जनमत ११ ऑगस्ट २०२३ E paper

 

दैनिक जनमत १० ऑगस्ट २०२३ E paper

दैनिक जनमत ०९ ऑगस्ट २०२३ E paper

हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात निधन

 


धाराशिव – 

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे  कॅन्सर झाल्याने पुण्यात निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. शशिकांत अहंकारी यांचे मूळ गाव खुदावाडी आहे. तेथूनच जवळ असलेल्या अणदूरमध्ये डॉक्टर अहंकारी यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे पती पत्नी जानकी हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते. खेड्यात प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी, यासाठी हॅलो फाऊंडेशनची स्थापना केली. समाजातल्या तळागाळातील लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून डॉ. अहंकारी यांनी शहरातील डॉक्टर म्हणून फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित टीमसह १९९३ मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची सुरुवात केली. हॅलो मेडिकल फाऊंडेशनचं काम पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु होतं. डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जातात ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

हॅलो मेडिकल फाउंडेशनमधील त्यांच्या कामामुळे अहंकारी यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय चार समित्यांचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंत पंधरा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे कार्य सादर केलं होते. याशिवाय, डॉ. अहंकारी आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनने महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सर्वोत्कृष्ट एनजीओसाठी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

दोन चोरांनी सोने चांदी दागिन्यांची बॅग लुटली,एकाला अटक दुसरा फरार

 

आरोपी विरूद्ध परंडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल,आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी

गर्दीच्या ठिकाणी चोरीची घटना  व्यापारी वर्गात भितीचे वातावरण

चोरांना पकडून देणारे नागरिक



परंडा ( दि ५ ऑगस्ट) दुकान बंद करून घराकडे निघालेल्या गणेश ज्वेलर्सचे व्यापारी यांची सोने चांदी दागिन्याची बॅग लुटल्याची घटणा दि.४ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास परंडा बस स्थानक समोर घडली आहे.यातील आरोपी पळून जात असताना नागरीकांनी एका आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर दुसरा आरोपी पळून जान्यात यशस्वी ठरला आहे.

      या बाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की गणेश ज्वेलर्स दुकानाचे मालक गणेश कवटे राहणार रुई ता. परंडा हे दि ४ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ६-३० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून गावातील ग्राहकाना दाखवीण्या साठी बॅग मध्ये सोने व चांदीचे काही दागीने घेऊन मोटार सायकल वरून जात असताना एस.टी स्टॅन्ड समोर आल्यावर एका चोराने कवटे यांच्या मोटार सायकल ला धक्का मारून खाली पाडले व दागीन्याची बॅग घेऊन पळू लागला व त्याच्या  साथीदाराच्या मोटार सायकलवर पाठीमागे बसला.कवठे यांनी चोर चोर म्हणून ओरडल्याने जवळच असलेल्या नागरीकांनी धाव घेऊन एका चोराला पकडले तर दुसरा चोर मोटार सायकल सोडून पळून जान्यात यशस्वी झाला आहे.पोलिसांनी मोटार सायकल जप्त केली आहे.पकडलेल्या आरोपीने बॅगमधील ६२ हजार रूपये किमतीचे दागिने काडून त्याच्या जोडीदाराला दिले अशी फिर्याद गणेश कवठे याने दिल्याने आरोपी प्रदिप बंकट शिंदे रा.येडशी ता. जि.उस्मानाबाद व एका अज्ञात चोर असे दोघा विरूद्ध रात्री उशीरा परंडा पोलीस स्टेशनला कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अटक करण्यात आलेला आरोपी प्रदिप शिंदे यास दि ५ ऑगष्ट रोजी न्यायालया समोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरिक्षक कवीता मुसळे करीत आहेत.