आजोबांनी केला अल्पवयीन नातीवर वारंवार बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना
करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील एका गावात 65 वर्षे आजोबांनी नातीवर घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे करमाळा तालुक्यात या घटनेने माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबतची हकीकत अशी की आजोबाने आपल्या सख्ख्या चुलत भावाच्या एका अल्पवयीन नातीवर घरात एकटे असताना प्रवेश करून जबरदस्तीने बलात्कार केला आहे त्यानंतर घरात आई-वडिलांना सांगू नकोस नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे नातीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितलं नाही ही घटना उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेला सुट्टी असल्याने ती घरात असताना घडली आहे दरम्यान मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईला आलेल्या संशयावरून पीडित मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने आजोबांनी जबरदस्तीने अनेक वेळा बलात्कार केल्याचे सांगितले यावेळी मुलीच्या आईने पती सह पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना सर्व प्रकार सांगितला दरम्यान पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे.आजोबा नातीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने मात्र करमाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आमदार कैलास पाटील दिवसभर विधानभवनातचं, रात्री १० वाजता मिळाली संधी
रात्री 10 वाजता विधान भवनात थांबून लोकांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्यात याव्या या मागणीसाठी आमदार कैलास पाटील हे दिवसभर विधानभवनात थांबले. मात्र, त्यांना 10 वाजता बोलण्याची संधी मिळाली. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी बोलताना म्हटलं की, 30 ते 40 वर्षांपूर्वी इनामी आणि देवस्थानच्या जमिनी नजराणा भरून वर्ग एक करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी घर बांधून आणि लोकांनी त्या जमिनी कसायला सुरुवात केली. मागच्या एक वर्षांपूर्वी त्याच जमिनी पुन्हा महसूल विभागाने वर्ग दोन केल्या असून, महसूल मंत्र्याना याअगोदर यासंदर्भात धाराशिव जिल्ह्यातील काही लोक भेटले आहेत. यावर महसूल मंत्र्यांनी त्यांना आश्वासन देखील दिले होते की, लवकरात लवकर या प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल. मात्र हा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. विदर्भामध्ये कायदा करून जसा वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोन केल्या त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यासाठी देखील कायदा करून वर्ग दोनच्या जमिनी पुन्हा एक कराव्या अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. दरम्यान, पुढे बोलताना आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील हासेगाव – इटकुर आणि कळंब – मोहा – येडशी या रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून या विषयी प्रश्न मांडत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती मात्र शिंदे फडणवीस सरकारमध्ये या रस्त्यांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच धाराशिवच्या तालुका क्रीडा संकुलसाठी उद्योग विभागाने 19 हजार स्कवेअर फूट जमीन दिली होती. परंतु एमएमसी ने याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देखील उदय सामंत यांनी उठवावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर कळंब तालुक्याच्या क्रीडा संकुल विषयी देखील आमदार कैलास पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
विद्यार्थ्यांनो सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका – सपोनि सिद्धेश्वर गोरे
सलगरा,दि.२२(प्रतिनिधी)
‘तुम्ही सोशल मीडियाचा की, सोशल मीडिया तुमचा’ वापर करून घेतय हे पण बघण तितकच महत्वाचं आहे. शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे नावलौकिक करावे. शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करावी. होता होईल तितका सोशल मीडियाचा वापर कमी करावा. सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्यावरील ताण कमी करण्यासाठी करावा, तो वाढवण्यासाठी नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनो! ‘तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका’ असे प्रतिपादन बोलताना नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील सतिश पवार आणि खानापूर येथील विश्वजित गायकवाड या दोघांची २०२० च्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सलगरा (दि.) येथील कै.अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयात (दि.२०जुलै) रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबुमाता आणि संतराम लोमटे या दोन्ही महाविद्यालयांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि ‘सोशल मीडिया संदर्भात मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. मात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यूपीएससी – एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, या परीक्षांचं स्वरुप कसं असतं, वयोमर्यादा काय असते, अभ्यासाचं नियोजन कसं असाव, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. यांसारख्या विषयांवर कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सतीश पवार आणि विश्वजित गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व सकारात्मक गोष्टी जरी सोशल मीडियाद्वारे घडून येत असल्या तरी याची एक दुसरी बाजू पाहायला मिळते. ती म्हणजे या सर्व गोष्टींचा भडीमार एकाच वेळी एका अभ्यास विषयासाठी उपलब्ध असणार्या विविध वेबसाईट्स, ऑनलाईन लेक्चर सोबतचे हजारो लेख, व्हिडिओ यामध्ये अभ्यासकांची वेगवेगळी मते विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करतात. यामध्ये कोणते सत्य याचा संभ्रम निर्माण होतो. माहिती मिळते पण ज्ञान मिळते का..? पुस्तक डाऊनलोड करण्याची संख्या वाढत आहे, पण ते वाचलं जातं का..? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे. फक्त संग्रहासाठी आणि शेअर करण्यासाठी विविध शैक्षणिक अॅप्स मोबाईलमध्ये दिसत आहेत. हे नाकारून चालणार नाही, यामध्ये अलीकडे आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. ती म्हणजे स्मार्टफोनचा वापर करून, परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाबाहेर पाठवणे. त्याद्वारे कॉपी करणे. हे सर्व पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्या परीक्षार्थ्यावर गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर पुन्हा त्या विषयाचा पेपर घ्यावा लागतो. नवीन यंत्रणा राबवावी लागते. जे विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. स्मार्ट वापराबरोबरच त्याचा स्मार्ट दुरुपयोग करणारा वापरकर्ता दिसत आहे. यालासुद्धा आळा बसला पाहिजे. शाळेपासून मुलांना मोबाईलद्वारे शिक्षण दिलं गेलं तर त्याच्या अतिवापरामुळे मानसिक ताणतणाव वाढून आरोग्य धोक्यात येऊ शकतं. याचा परिणाम घातक आहे. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. शेवटी कोणत्याही गोष्टींचा अतिवापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईटच असतो, असे मत बोलताना काही जणांनी व्यक्त केले.
या वेळी सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, उत्तमराव लोमटे, पोलीस नाईक एस.आर.सगर, ग्रा.पं. सदस्य जीवन लोमटे, प्राचार्य ज्ञानेश्वर लोमटे, प्रा.प्रताप मोरे, प्रा.किरण लोमटे, प्रा.अनिल लोमटे, प्रा.बालाजी फुलमाळी, प्रा.फयाज पटेल, प्रा.महादेव लोमटे, प्रा.सिताराम चव्हाण, प्रा.सुरेश सोमवंशी, प्रा.मारूती सुर्यवंशी, प्रा.विक्रम कांबळे, प्रा.महेश ढेकणे, जि.प.शाळेचे शिक्षक सुरेश वाघमोडे, अजित लोमटे, राहुल काटवटे, सुनील अंदगावकर, सागर मुळे, तात्या केदार, राहुल बोधणे आणि रमेश कांबळे आदी उपस्थित होते.







































































