Home Blog Page 72

दैनिक जनमत १५ सप्टेंबर २०२३ E paper

 

दैनिक जनमत १४ सप्टेंबर २०२३ E paper

दैनिक जनमत १३ सप्टेंबर २०२३ E paper

 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात स्वागत

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात स्वागत


माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट


पंकजाताई मुंडे यांनी उस्मानाबाद लोकसभी निवडणूक लढवावी- संजयकुमार बनसोडे


परंडा (भजनदास गुडे) भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचे “शिव-शक्ती परिक्रमा” प्रवासाच्या निमित्ताने शनिवार दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले.

      पंकजाताई मुंडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगमन होताच भारतीय जनता पक्षाचे

 वतीने माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

     यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्याना भेटी द्या आसा हजारो कार्यकर्त्याचा आग्रह होता त्या आग्रहाखातर शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचे राज्यात आयोजन करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे प्रतिपादन परंडा येथे बोलताना पकंजाताई मुंडे यांनी केले.

    छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वागता नंतर 

पंकजाताई मुंडे यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या ‘संवाद’ निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मा.आ.सुजितसिह ठाकूर व कार्यकर्त्यासी संवाद साधून त्यांचा ताफा करमाळ्याकडे मार्गस्थ झाला.

       यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,नितीन काळे,दत्ता कुलकर्णी,अनिल काळे,विकास कुलकर्णी,सुबोधसिह ठाकूर, ॲड.जहिर चौधरी, हनुमंत पाटील,ॲड भालचंद्र अवसरे, सुरेश कवडे,हनुमंत पाटील, अदम शेख,भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड.संदीप शेळके.राजेद्र चौधरी, उमाकांत गोरे,चंद्रकांत काकडे, निशिकांत क्षिरसागर,तानाजी पाटील,विठठल तिपाले,दादा गुडे, अजित पाटील,अशोक भांडवलकर, सुजित परदेशी, सुखदेव इंगळे यांच्यासह भाजपाचे पदाधीकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.


चौकट… 

पंकजाताई तुम्ही उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लढवा आरपीआयची मुंडे यांना विनंती

      पंकजाताई मुडे यांचे परंडा शहरात आगमन होताच आरपीआयचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य सत्कार करून ताई तुम्ही उस्मानाबाद लोकसभेची 

निवडनुक लढवा आशी विनंती केली व आपीआय पक्ष तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील आशी ग्वाही बनसोडे यांनी दिली.

    यावेळी आरपीआयचे ताललुकाध्यक्ष फकीरा सुरवसे, दादासाहेब सरोदे,उत्तम ओव्हाळ,बाबा गायकवाड,जयराम साळवे, हनुमंत शिंदे, हरिभाऊ अडाळे,आण्णासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या सलगऱ्यात रास्ता रोको

 जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या सलगऱ्यात रास्ता रोको


सलगरा,दि.८- (प्रतिक भोसले) 

आरक्षणाच्या मागणीसाठी जालना, अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महिलांच्या पुढाकाराने सलगरा (दि.) आणि पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातर्फे उद्या शनिवार, (दि.९ सप्टेंबर) रोजी सकाळी ०८ वा.सु. श्री शंभू महादेव मदिरातून सुरूवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सलगरा (दि.) येथे पोलीस बंदोबस्तात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी, लहान मुले, वृद्ध महिला यांना तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा कोणत्याच सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. तेव्हा आता तरी यासंदर्भात सरकारने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

दुध भेसळ प्रकरणी ९ ठिकाणी कारवाई,१९ नमुने पाठविले प्रयोगशाळेत

 दुध भेसळ प्रकरणी ९ ठिकाणी कारवाई,१९ नमुने पाठविले प्रयोगशाळेत 

उस्मानाबाद,दि.७ (प्रतिनिधी)

ग्राहकांना स्वच्छ,ताजे,निर्भेळ,दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयात दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे  अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव),वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्हातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत असून आजपर्यंत ९ आस्थापनामधून दुध, खवा,पनीर,रबडीचे एकूण १९ नमुने विश्लेषणासाठी घेतले.हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.त्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

          मे.दत्तसाई मल्टीस्टेट को. ऑप.लि. उस्मानाबाद या आस्थापनामध्ये अस्वच्छ ठिकाणी अन्न पदार्थ उत्पादन/साठा करीत असल्यामुळे तपासणीवेळी या पेढीस उत्पादन व विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.आढळून आलेल्या अस्वच्छतेबाबत या पेढीविरुद्ध न्यायनिर्णयसाठी खटला दाखल करण्यात येत आहे.ही पेढी बंद करण्यात आली आहे.

         ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी श्री.शिंदे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री.ठोंबरे,सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी  न.त.मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे.

          दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास  कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.