धाराशिव – उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे दोनवेळा खासदार राहिलेले शिवाजी बापु कांबळे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा स्वृगही परतले आहेत. मागील काळात त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या कार्यप्रणाली कंटाळुन त्यानी उध्दव ठाकरे यांच्याकडे येण्याचा निर्णय घेतला. नांदेड येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने शिवाजी बापु कांबळे यानी पक्षप्रमुखाच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आहे. ते 1996 च्या निवडणुकीत धाराशिवमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर 1998 ला ते पुन्हा खासदार राहिले होते. पक्षाच्या अत्यंत संघर्षाच्या काळात ते पुन्हा एकदा त्याच उमेदीने कामाला लागले आहेत.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिवाजी बापु कांबळे स्वगृहि परतले.
परंडा शहरात भगवान महाविर स्वामीच्या प्रतिमेची शोभा यात्रा उत्साहात संपन्न
परंडा ( प्रतिनिधी)-जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक निमीत्त दि२१ एप्रिल रोजी सकल जैन समाज परंडा दिगंबर आणि श्वेताम्बर दोन्ही पंथाच्या जैन धर्मियांनी परंपरागत एकत्रीतपणे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभ यात्रा शहरात गाजत काढली.
सदरील मिरवणुकिस मंडई पेठ येथील श्री अजितनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी ९ वाजता सुरु होवून कुऱ्हाड गल्ली येथील श्री जैन श्र्वेतांबर मल्लिनाथ मंदिर येथे १०.३० वा. विसर्जित झाली.
सदरील मिरवणुकीदरम्यान भगवान महावीर स्वामी यांच्या घोषणा देत समाजातील सर्व अबाल वृद्ध आणि युवक युवतींनी सहभाग नोंदविला.तद्नंतर भगवान महाविरांच्या जन्म कल्याणक उत्सव निमीत्त १४ स्वप्न आणि महाविरांच्या पाळन्याचे पूजन तसेच आरती, स्नात्र पुजा आदी धार्मिक विधी श्री जैन श्र्वेतांबर मल्लिनाथ मंदिर येथे आनंदाच्या वातावरणात साजरे करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुहास शाहा,उपाध्यक्ष सुयोग शाहा,
राहुल शहा,धन्यकुमार मोदी, प्रमोद एखंडे,पांडुरंग कासार, सौरभ शहा प्रभात शाह,रतिलाल शाह,किरण शाह,बिपिन मेहता, महेश मेहता,पराग बेदमुथा,अभय देसाई,अमोल देसाई,जितेंद्र जैन, प्रवीण मुनोत,जवाहरलाल परांडकर,धनंजय परांडकर, उज्वल बेदमुथा,राकेश बेदमुथा, पंकज बेदमुथा,रोहित बेदमुथा, राहुल बेदमुथा,यश शहा,कमलेश शाह,शरद पोरवाल,मोतीलाल बेदमुथा,यश मुनोत,रमनलाल बेदमुथा,समीर बेदमुथा,सचिन बेदमुथा,संतोष बेदमुथा,सुरेश कात्रेला,मोहनलाल देसाई यांच्यासह समाजातील महिला, पुरुष,युवक,युवती मोठया
संख्याने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्रीरामनवमी मध्ये डीजे वाजवल्यामुळे 24 मंडळावर धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल
पोलीस ठाणे धाराशिव शहर हददीत दि. 14/04/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या 20 मिरवणुका व दि. 17/04/2024 रोजी श्रीरामनवमी जयंती निमित्त निघालेल्या 04 मिरवणुका दरम्यान मंडाळाचे आयोजक यांना पोलीस प्रशासनकडुन मिरवणुकी दरम्यान डिजे न लावता पारंपारिक वाद्य लावणे बाबत सुचना देवुन सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देवुन आदेशित करुन देखील सदर मंडाळांनी डिजे लावुन नोटीसचे जाणिवपुर्वक उल्लघंन केले म्हणुन मंडाळाचे अध्यक्ष व डीजे मालक यांच्यावर पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे कलम 188 व इतर भादवीप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे धाराशिव शहरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सपोनि कुकलारे, सपोनि अंभोरे, सपोनि जाधव, पोउपनि ओहोळ, प्रोपोउपनि डिघोळे व पोस्टेचे पोलीस अंमलदार यांनी केली.
भूम च्या शिंदेंनी घेतला पहिला अर्ज लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात
धाराशिव – लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पहिला अर्ज भूम च्या आर्यनराजे शिंदे यांनी घेतला आहे.
राष्ट्रीय समाज दल (आर) या पक्षाच्या वतीने त्यांनी हा अर्ज घेतला असून ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या तासात सहा अर्जांची विक्री झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी संख्या वाढू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त असून गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीसोबत मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
- रामाच्या आणि कृष्णाच्या आशीर्वादानं चालणाऱ्या महाविद्यालयात छेडछाडीच्या प्रकरणात प्रभारी प्राचार्य पुतण्याने वाचवलं काकाला!
अर्चना पाटील यांच्या कळंब, औसा भागातील दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव : राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदार संघातील उमेदवार अर्चना पाटील यांनी नुकताच कळंब आणि औसा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला यावेळी भाजप आमदार अभिमन्यु पवार यांच्यासह महायुती च्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. अर्चना पाटील यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
औसा विधानसभा मतदार संघातील हासुरी, हरी जवळगा, मदनसुरी, भूतमुगळी, सरवडी, एकोजी मुदगड या गावांना भेटी देऊन प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.. येत्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करावे, असे आवाहन यानिमित्ताने केले.. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, शोभाताई पवार, महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सत्कार केला व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
कळंब तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी लकडे, राष्ट्रवादी वक्ता प्रवक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुशील शेळके, किसान सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावणे, तालुका उपाध्यक्ष आगतराव कापसे, कार्याध्यक्ष गणेश भोसले, तालुका सचिव आबासाहेब अडसूळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मी शिफारस केलेला उमेदवार महायुतीने दिल्याचा आनंद असल्याचे सांगत अर्चना पाटील यांचा विजय होईल असा विश्वास आमदार अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला.
“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आलीय. यातच आता दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर टिका केली. त्यावर आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जवळपास २२ ते २५ उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातील सगळेच लोकप्रतिनिधींनी अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. राजकारणात ज्यावेळी शरद पवारांनी मोठी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी त्यांची पाठराखण करण्याचं काम पद्मसिंह पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख भूमिका घेण्याचंही काम पाटील यांनी केलं आहे.
त्यामुळे ज्यांच्याकडून काम होतंय, त्यांच्या नावाची शिफारस पुढे आली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखाली आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीने आमच्या मतदारसंघात खुप निधी आला. तो आम्ही आतापर्यंत स्वप्ननातही पाहिला नाही. यातच आता समोरून जे काही बोलबच्चून सुरू आहे. त्यांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही आतापर्यंत मतदारसंघात किती निधी आणला ? ते जाहीर करा. असेही आवाहन त्यांनी केलंय.
आपल्या मतदारसंघात नवीन रोजगार निर्माण करणं, रोजगार आणणं, योजना आणणं हे काम खासदाराचं आहे. एसटीत जागा देणं हे त्यांचं काम आहे का ? असा सवालही राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांना विचारलं. बार्शी तालुक्यात आतापर्यंत २ कोटीपेक्षा निधी आणला असल्याचाही त्यांनी दावा केला. मोदींच्या नावावर मत मागितली. मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच माझ्याविरोधात उभं राहा म्हणायचं. ही कृतघ्न झाली. अर्चनापाटील यांनी असा टोलाही त्यांनी लगावला.
अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेल व लॉजवर छापा लॉज मालकावर गुन्हा नोंद
धाराशिव -आरोपी नामे- किरण महादेव गुरव, वय 33 वर्षे, व्यवसाय (हॉटेल/लॉज मालक) रा. तांबरी विभाग गणपती मंदीर जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.08.04.2024 रोजी 15.00 वा सु जुनोणी रोड अंबेहोळ रोडच्या लगत हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअरबार रेस्टॉरंट ॲड लॉज धाराशिव येथे दोन महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पंचा समक्ष मिळून आला. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत दोन महिलेंची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 370, सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4, 5, 6, 7 अन्वये धाराशिव शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
परंड्याचे सुपुत्र प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना मलेशिया विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर
परंडा,(प्रतिनिधी) परंडा शहरातील प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना नुकतीच मलेशिया येथील इनटी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर झाली.ही फेलोशिप त्यांना दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.
पुणे येथील एम.आय.टी. विद्यापीठकडून मागील वर्षी पानगावकर यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या संशोधनातील उत्कृष्ट कामाच्या आधारे व अध्यापनाच्या अनुभवाच्या अनुषंगाने त्यांना पुढील संशोधनासाठी ही फेलोशिप फायदेशीर ठरणार आहे.आर्टिफिशीअल इंटेलेजन्स आणि मशीन लर्निंग या विषयाशी निगडित त्यांचे संशोधन आहे. तसेच ते सध्या उज्जैन,मध्यप्रदेश येथिल अवंतिका विश्वविद्यालय येथे अभियांत्रीकीच्या संगणक विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत व विविध संशोधनपर प्रोजेक्ट वर काम करत आहेत.
प्रा.डॉ.सत्यजित पानगावकर या फेलोशिप च्या माध्यमातून मलेशियात रिसर्च प्रोजेक्ट,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिसर्च पब्लिकेशन्स आणि विविध ग्रँट्स साठी काम करतील. त्यांनी आता पर्यंत ०१ पेटंट,८ कॉपीराईट,०१ रिसर्च ट्रेडमार्क तसेच ३५ संशोधनपर पेपर्स लिहिलेले आहेत.आपल्या संशोधनाचा उपयोग जगातील सर्व सामान्यच्यासाठी व्हावा अशी त्यांची तळमळ आहे.
प्रा. डॉ.सत्यजित पानगांवकर हे मूळचे परंडा शहरातील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी विविध क्षेञातील मान्यवरांनी, मिञपरिवारांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
बुजवडे येथे मद्य वाहनासह १० लाखाचा मद्देमाल जप्त
कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क
कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील बुजवडे येथील गोवा बनावटीच्या मद्य साठ्यावर कारवाई केली असून, यावेळी ३ लाख ६० हजार ४८० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ असा अंदाजे १० लाख १० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
काळया रंगाच्या स्कॉपिओ नं. GA-01-R-9022 या वाहनाची तपासणी केली असता, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले विविध बँडचे ७५० मिली व १८० मिलीचे ५९ बॉक्स मिळून आले. वाहन व मुद्देमाल संशयित शिवाजी गावडे व दशरथ सावंत यांचा असल्याचे समजते. त्यांना फरार घोषीत करुन या गुन्हयामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास चालू आहे. विदेशी मद्य मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे ७५० मिलीचे १२ बॉक्स, डीएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ७५० मिलीचे ३ बॉक्स, गोल्डन एस ब्ल्यू व्हिस्कीचे ७५० मि.ली.चे २५ बॉक्स, गोल्डन एस
ब्ल्यु व्हिस्कीचे १८० मिलीचे २५ बॉक्स, किंगफिंशर स्ट्रांग बिअर चे ५०० मि.ली. ४ बॉक्स असे एकूण ५३४ ब.लि. वाहनासह जप्त करण्यात आले. मुद्देमाल १०,१०, ४८० चा असून मद्याची किंमत ३,६०,४८० आहे. आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे करत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे, दु. निरीक्षक अभयकुमार साबळे, जवान राजेंद्र कोळी, विशाल भोई, सचिन लोंढे, मारुती पोवार, साजिद मुल्ला यांनी केली.
आरोग्य मित्र डॉ.राहूल घुले यांच्या वतीने बंगाळवाडी येथील २०० रुग्णांची मोफत तपासणी
परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील बंगाळवाडी येथे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता सप्ताच्या शेवटच्या दिवशी दि६ एप्रिल रोजी आरोग्य मित्र डाॅ.राहुल घुले मित्र परिवार परंडा यांच्या वतीने सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य तपसणी नंतर रुग्णांनानवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
तपासनी दरम्यान ज्या रूग्णाचे ऑपरेशन करणे अवश्यक आहे अश्या रुग्णाचे ऑपरेशन डाॅ.राहुल घुले यांच्या मार्फत मोफत करण्यात येणार आहेत.या शिबीरामध्ये एकुन २०० रुग्णांची तपसणी करुन मोफत औषध उपचार करण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी डाॅ.राहुल घुले मित्र परिवाराचे कार्यकर्ते मैनुद्दीन शेख,मिनाक्षी काळे मॅडम,गायत्री चोबे,तसेच डोंजा सर्कल प्रमुख सुहास पाटील, डाॅ मुंडे सर,फारमासीस्ट सुरज बांगर,भुम परंडा वाशी तालुका संघटक दादा मुंडे,सुयाज शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.
बंगाळवाडीचे दादा गोडसे, कानीफनाथ सुर्यवंशी,पांडुरंग सुर्यवंशी,सतीश सुर्यवंशी,प्रतिक्षा सुर्यवंशी,रोहीणी सुर्यवंशी, आदीनी शिबीर यशस्वीतेसाठी डॉ राहुल घुले यांच्या आरोग्य टिमला सहकार्य केले.


