“गाव कृती आराखडा” गावाची पाण्याची गरज पूर्ण करणारा बनवावा – जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे
शिवजयंती निमित्त रोहित पवार यांची हजेरी
पाडोळी-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील शिवगर्जना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या ३९० व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज(दि.१८) कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली.
तत्पूर्वी पाडोळी(आ) येथील तीर्थक्षेत्र अकुबाई देवीच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाडोळी(आ) येथील नागरिकांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला, त्यानंतर येथील युवक शेतकऱ्यांनी सुरू केलेली जरबेरा शेती, आणि दुग्ध व्यवसायाला भेट दिली. त्यानंतर टाकळी(बें) ता.उस्मानाबाद येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रताप पाटील,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रशांत कवडे, पंकज बोराडे,सुशील शेळके, शंतनु खंदारे, धीरज घुटे, चित्राव गोरे, निलेश बारखडे,वामन गाते, बाबुराव पुजारी, सतीश एकंडे, सतीश देटे,अजित पवार, व्यंकट गुंड,प्रशांत सोनटक्के, ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, दिगंबर गायकवाड, मंगेश दळवे, काकासाहेब सोनटक्के,बळीराम खटके, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सूरज देटे, अमोल सुर्यवंशी, श्रीधर नरवडे,अमोल मोरे, रवी मोरे, रोहित मदने, अभिषेक लोमटे, सूरज नरवडे, रोहन कणसे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बेंबळी परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कनगरा(अमोल गायकवाड)
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो.परंतू सध्या समाज माध्यमातून ब्राॅयलर कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची अफवा फिरत असल्याने अशा चुकीच्या माहितीमुळे पाॅल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच कनगर्यात चार,बेंबळीत सहा,महाळंगी आठ,टाकळीत चार,केशेगांव तीन,नांदुर्गा दोन,धुत्ता एक आदि गावात पाॅल्ट्री फार्म असून एकट्या बेंबळीत ५०० किलो पर्यंत चिकनची दिवसाला विक्री होत असे परंतू सध्या समाज माध्यमातून फिरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे या व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री घटली असून चिकनच्या किंमतीही कमी झाल्या असल्याने हा व्यावसाय निव्वळ तोट्यात आला आहे.यामुळे शेतकर्यांच्या मका मालावरही याचा परिणाम झाला असून मका पुर्वी २८-३० रुपये किलो प्रमाणे विकायची तर सध्या ती १५-१६ रुपये किलो प्रमाणे विकत असून शेतकर्याने तर कोणता जोडधंदा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकेतून कर्ज काढून पाॅल्ट्रीची उभारणी केली असून बॅंकेच्या हप्त्याची परतफेड कशी करावी?हा प्रश्नही पाॅल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.या विषयावर बोलत असताना अॅड.अजय पाटील म्हणाले,समाज माध्यमातून पोस्ट टाकणार्या विरोधात कायदेशीर कारवाईची गरज आहे.तसेच कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची नोंद कोठेही झाली नसून अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
































































