Home Blog Page 307

मुख्यमंञी ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत बांधण्यात आलेली टाकी धुळखात पडून

                               कनगरा-

अमोल गायकवाड
                    उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे’मुख्यमंञी ग्रामीण पेयजल कार्यक्रमा’ अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली पाणी टाकी, विहिर पाडून, पाईप जोडणी करुनही धुळखात पडून आहे.
               सविस्तर वृत्त असे,की राज्यातील नागरिकांना पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मुख्यमंञी ग्रामीण पेयजल योजने या अंतर्गत सर्वंकष योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.त्याप्रमाणे शहरालगतच्या वाड्या-वस्त्या मधील नागरिकांना दरडोई प्रतिदिन ७० लिटर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ४० लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याची योजना होती.या माध्यमातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न होता.
             त्यानुसार कनगरा येथे सन 2018-19 या वर्षात मुख्यमंञी ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत लाखो रुपये खर्च करुन शासनानेही योजना राबवली.या योजने अंतर्गत गावात पाण्याची टाकी व गावापासून दोन-अडीच हजार मीटर अंतरावर विहीर पाडून पाईप जोडणी केली. तसेच गावातील काही भागात पाईप जोडणी केली.तसेच ग्रामपंचायतीने नळ जोडणीसीठी अनामत रक्कम म्हणून नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे गेल्या वर्षभरात २०० नागरिकांकडून वसूली केली असून उर्वरीत राहिलेल्या भागातील पाईप जोडणी व नळजोडणी चालू असून ५०० रुपये प्रमाणे  वसूलीही चालू आहे तरीही पाणी माञ नळाला येत नसल्याने कनगरा येथे येणार्‍या काळात पाणी प्रश्न पेटणार एवढ माञ नक्की.
          तसेच येणार्‍या उन्हाळ्यात तरी पाणी प्रश्न मिटेल? या आपेक्षेत नागरिक असून उर्वरित भागातही पाईप जोडणी करुन नळ जोडणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्हावी या आशेवर नागरिक असल्याचे चिञ सध्या तरी दिसत आहे.

                ट्रान्सफार्मरची समस्या असून पाणी पुरवठा विभागाकडे नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली आहे.सध्या हरभरा पिक शेतात असल्याने शेतकर्‍यांच्या शेतातून विद्युत पोल घेवून जाण्यासही अडचण असून हरभरा पिक निघाल्यास नवीन ट्रान्सफार्मर बसवून गावाला तात्काळ पाणी देण्यात येईल.
                         –  संजय दळवे
                    उपसरपंच – कनगरा

दैनिक जनमत २५ फेब्रुवारी E पेपर

टाकळी(बें) येथे शिवजन्मोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न

पाडोळी-उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव पाच दिवस समितीने ठरविलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांने काल(दि२३) महाराजांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढून संपन्न करण्यात आला.
टाकळी(बें) येथील शिवगर्जना ग्रुपच्यावतीने प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन आणि व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रतिमेचे पूजन बेंबळी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. गोरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण आणि शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे,दत्तात्रय सोनटक्के, चेअरमन तानाजी गायकवाड, माजी सरपंच काकासाहेब पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.पूजनानंतर नंतर शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे यांनी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन केले. सायंकाळी ८ वाजता तुळजापूर आणि टाकळी(बें) कलाकारानी मिळून *सौभाग्य नाही नशिबी* हा तीन अंकी नाटक आयोजित केला होता.त्यानंतर (दि२०) सायंकाळी जेजुरी येथील महिला कीर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले यांचे कीर्तन झाले तत्पूर्वी प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि कीर्तनकार नेहाताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर (दि२१)शुक्रवार आणि शनिवारी (दि२२) मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन कळंब -उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऍड.निलेश बारखडे पाटील, संचालक सुजित बाकले, दादा सुरवसे, विजयकुमार पवार, भारत गुंड, विकास ढवळे, अमर गुंड, भारत सोनटक्के, रमेश सूर्यवंशी यांनी केले. तर दुसऱ्या दिवशीच्या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, सरपंच आशाताई सोनटक्के,ग्रामपंचायत सदस्य प्रताप गायकवाड, महादेव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक रायगड येथील साई प्रेरणा ग्रुपने पटकाविला,तर द्वितीय क्रमांक तनुजा शिंदे (लातूर) लहान गट प्रथम क्रमांक जगदंब ग्रुप तुळजापूर, द्वितीय यश क्लॉसेस उजनी याने पटकाविला.यावेळी टाकळी(बें) येथील माजी सैनिक मोतीलाल थोरे आणि जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक हणमंत जगताप सर यांचा शिवगर्जना ग्रुपच्यावतीने सहपत्नी सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी रविवारी(दि२३) सायंकाळी पाडोळी(आ) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस पी.एम. आलुरे, व्ही.आर.पेठे, आणि श्री तांबे साहेब  पोलीस बंदोबस्त मध्ये भव्य अशी गावातून मिरवणूक काढून सहकार्य केले..यावेळी शिवगर्जना ग्रुप अनिल पवार,ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, मंगेश दळवे, दीपक तौर, काकासाहेब सोनटक्के, श्रीधर नरवडे, राम खटके, सागर सूर्यवंशी,संतोष बर्डे, संदीप सूर्यवंशी , इम्रान पठाण,अनिल सूर्यवंशी, गणेश गायकवाड, दयानंद सोनटक्के, बळीराम खटके, धनाजी कुंभार, आण्णा तौर, पांडुरंग मोरे, दत्ता सूर्यवंशी, भैरू सूर्यवंशी, सूरज पाटील, अमोल मोरे, विशाल ठवरे, सुरज नरवडे, रामा सोनटक्के, अमोल सूर्यवंशी,चंद्रकांत नरवडे, दादा जाधव, श्रीकांत सूर्यवंशी, नामदेव काकडे,नितीन गायकवाड, रोहन कणसे, तानाजी शेंद्रे, दीपक चव्हाण यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उदघाटन

उस्मानाबाद-उस्मानाबाद येथे वकील व्हॉलीबॉल संघातर्फे आयोजित नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रुपाली भोसले व खा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आ कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मा जीवनराव गोरे,सिने दिग्दर्शक निलेश पटवर्धन, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,विधिज्ञ मंडळ अध्यक्ष अँड राघवेंद्र बोधले,अँड नितीन भोसले,अँड राम गरड,संपतराव डोके,नगरसेवक युवराज नळे, प्रदीप घोने,माणिक बनसोडे,सोमनाथ गुरव,विजय सस्ते ,दिलीपराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सिनेअभिनेत्री रुपाली भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
व्हॉलीबॉल सारख्या ग्रामीण भागातील खेळांच्या स्पर्धा उस्मानाबाद येथे भरवीत असल्याने त्यांनी वकील संघ व नगराध्यक्ष यांचे कौतुक केले व आभार मानले.या स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघ आलेले आहेत.
आज रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रम साठी आ. राणा जगजितसिंह पाटील,जनता बँक चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, दत्ताभाऊ कुलकर्णी,अनिलजी खोचरे,नितीनजी काळे ये उपस्थित असणार आहेत.

दैनिक जनमत १९ फेब्रुवारी E पेपर

शिवजयंती विशेषांक

श्री.हणमंतराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

कनगरा-प्रतिनिधी
                उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील श्री हणमंतराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
                 प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याद्यापक पाटील जी.एम.म्हणाले,चंदना प्रमाणे झिजून विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतःचा व शाळेचा नावलौकिक करावा.शाळा ही रोपवाटिका असून त्यातील छोटी रोपटी हे विद्यार्थी असतात.रोपवाटिकेतील रोपटी आता मोठी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीला जास्त वाव मिळावा म्हणून हा निरोप आहे.
                 तसेच शाळेबद्दलच्या भावना व्यक्त करताना श्रृष्टी जगताप विद्यार्थीनी म्हणाली,भव्य अशा वटवृक्षरुपी शिक्षकांच्या सावली खाली आम्ही वाढलो असून सर्वोत्तम शाळा व शिक्षक आम्हाला लाभले याचा कायम अभिमान राहिल.
                विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लातूर माध्य.विभागाचे मा.उपाध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,स्वतःच्या क्षमता ओळखून मेहनत घेतल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही.मुली सर्वच क्षेञात अव्वल असून घरातून चालना मिळाल्यास त्या भविष्यात नाव करतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
                   कार्यक्रमाचे सुञसंचालन ढोणे जी.बी.यांनी,तर आभार श्रीम.पवार ए.एस यांनी मांडले.यावेळी संस्थेचे सचिव विजय पाटील,श्रीम.गवाड ए.एस.,बनसोडे व्ही.बी.,काळे.ए.एस.,श्रीम.मुटकुळे के.बी.,भांगे बी.एम.,घाढगे डी.एल.आदि शिक्षकांसह गायकवाड एन.जी.,बंडगर एम.डी.आदि शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.