वाशी ( प्रतिनिधी):
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात माहिती मिळालेल्या कथित वेश्याव्यवसायावर धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) अक्षरशः धडक कारवाई केली. पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकत पोलिसांनी परराज्यातील ८ महिलांची सुटका केली असून, लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोपनीय माहिती अन् पोलिसांचा ‘ऑपरेशन’ मोड!
पारगाव परिसरातील सदर लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांना मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी AHTUचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती शेळके यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाईची तयारी केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती माधुरी मारकड, PSI श्री. सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी, जाधव, दूधभाते, पोलीस नाईक श्री. माने, चालक तसेच डमी ग्राहक यांच्या मदतीने संपूर्ण कारवाईचे नियोजन करण्यात आले.
रात्री साडेआठ वाजता धाड!
नियोजनानुसार AHTU पथकाने शुक्रवारी दि.14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकला. पोलिसांच्या कारवाईने लॉजमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणीदरम्यान वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक कारवाईत आढळून आलेल्या परराज्यातील ८ महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणत असल्याचा आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक फायदा करून घेत असल्याचा संशय तपासात समोर आला आहे. या सर्व बाबींचा पुढील तपास सुरू आहे.
ITP Act आणि BNS अंतर्गत गुन्हा
या प्रकरणी PSI श्री. सोनटक्के यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून Immoral Traffic (Prevention) Act (ITP Act) तसेच BNS मधील संबंधित कलमांनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या ८ महिलांच्या प्रकरणातही आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाणे करीत आहे.
‘ग्राहक’ कोण? परिसरात चर्चेला उधाण!
या ठिकाणी प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून ग्राहक येत असल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त
- परंड्यात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी केला लक्ष्य; ६० किलो कॉपर तार आणि ऑईल चोरीला
