Home Blog Page 305

उस्मानाबाद कळंब मतदारसंघात रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून 26 कोटी रूपयाचा निधी मंजुर- आ . कैलास पाटील




उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघातील 10 रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 2020—21 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 26 कोटी रूपयाचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या मंजुरीसाठी सततच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने 2020—21 च्या अर्थसंकल्पात खालील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला आहे.
1. देवधानोरा एकुरगा शिराढोण रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा. 18) 3 कोटी 10 लक्ष
2. पिंपळगाव गोजवडा बावी परतापूर तडवळा रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा. 14) 2 कोटी 50 लक्ष
3. मांडवा गोविंदपूर वाटवडा रस्त्याची सुधारणा करणे (रामा 57) 5 कोटी 
4. शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी
5. बावी खामसवाडी केशेगाव बावी ते खामसवाडी रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी
6. मुरूड ते जागजी रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी 50 लक्ष
7. जागजी ते कोंड रस्त्याची सुधारणा करणे -1 कोटी 10 लक्ष
8. चिलवडी ते राघूचीवाडी रस्त्याची सुधारणा करणे- 1 कोटी 60 लक्ष
9. खेड खामगाव तडवळा रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा 25) 1 कोटी 20 लक्ष
10. कावळेवाडी बुकनवाडी मोहतरवाडी रस्त्याची सुधारणा करणे (प्रजिमा 35) 3 कोटी

एक्स-ट्रिम फिटनेसकडून स्त्री कर्तृत्वाचा सन्मान..

उस्मानाबाद : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि पुढील पिढीसमोर आदर्श ठेवणा-या कर्तृत्ववान स्रीयांचा सन्मान एक्स-ट्रिम फिटनेस कडून करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला व विद्यार्थ्यीनींच्या समस्या निराकरणासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माया दामोदरे (पानसे), सामान्य मुलगी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खो खो संघाला अनेक वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारी कर्णधार क्रीडाधिकारी सारिका काळे, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात रंगावलीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुभदा पंडित, अल्पकाळातच वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणा-या डाॅ.प्रियंका चौरे, मागील दोन वर्षांपासून एक्स-ट्रिम फिटनेसच्या माध्यमातून महिलांना फिटनेसचे धडे देण्या-या मानसी डोलारे यांचा सत्कार जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. इंजिनियरींग पदवी घेवून अध्यापन करत करत राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणा-या जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचाही विशेष सत्कार एक्स-ट्रिम तर्फे करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अस्मिता कांबळे यांनी महिलांनी शरिराबरोबरच मनानेही कणखर असले पाहिजे असे प्रतिपादन केले. माया पानसे यांनी महिलांनी नाती तोडण्यापेक्षा ती जोडायला शिकले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. तर शुभदा पंडित यांनी आयुष्यात कलेला किती महत्त्व आहे हे सांगितले.
याच कार्यक्रमात डाॅ.प्रियंका चौरे यांचा महिलांतील स्थूलपणा, विविध आजार, पोषण आहार आणि व्यायाम या विषयावर मार्गदर्शनपर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना डाॅ.प्रियंका यांनी दैनंदिन जीवनातील आहार आणि व्यायामामाचे महत्त्व अतिशय सोप्या शब्दात सांगितले. महिलांना होणारे विविध आजार त्या मागची कारणे आणि उपायही त्यांनी सांगितले. त्वचारोग, केसांशी संबंधित समस्या आणि विशेष करून सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस विषयी त्यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्स-ट्रिमच्या संचालिका मानसी डोलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सरोज देवकुळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शबाना शेख, संगीता पाठक, प्रियंका पवार, रंजना पेठे आदींनी परिश्रम घेतले.

दैनिक जनमत ८ मार्च E पेपर

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

कळंब :– येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि २९ पासून चालू असलेले राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आज महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करून समारोप करण्यात आला.
     औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राष्ट्रसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि कौशल्याची जाणीव प्रशिक्षणार्थ्यांना करून देण्यात येत असते. यानुसार दि ०४ रोजी सकाळच्या सत्रात “घनकचरा व्यवस्थापन” या विषयावर विक्रम समुद्रे सहायक प्रकल्प अधिकारी नगर परिषद कळंब यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “आजची सामाजिक स्थिती आणि युवक” या विषयावर कळंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शन झाले. दि ०५ रोजी सकाळच्या सत्रात “बदलते पर्यावरण आणि आपली भूमिका” या विषयावर मोहेंकर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ बी वाय पाटील यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर मोहा येथील उद्योजक बालाजी मडके यांचे मार्गदर्शन झाले. दि ०६ रोजी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची “आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे” आयोजण करण्यात आले होते. यामध्ये १७७ जणांची आरोग्य तपासणी केली असून १८ कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. यासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद आणि उपजिल्हा रुग्णालय कळंब यांची सर्व टीमचे विशेष सहकार्य लाभले.
    राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत दि ०७ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. दि ०८ रोजी महिला दिन असल्याकारणाने आयोजक टीमने वक्तृत्व स्पर्धेचे सर्व नियोजन संस्थेतील महिला कर्मचारी आणि मुलींच्या ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका ज्योतीताई सपाटे आणि मोहेंकर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका मंगलताई ढेंगळे या उपस्थित होत्या. त्यांनीही महिला दिन, उद्योग आणि समाज याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी महापुरुषांविषयी विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सचिन सूर्यवंशी, गटनिदेशक अनिल आहेर, कार्यक्रम अधिकारी एस पी डोंगे, मुख्य लिपिक रवीचंद्र जगदाळे, शिल्पनिदेशक सचिन डोंगरे, शिल्पनिदेशिका कल्पना जाधवर, सर्व निदेशकवर्ग तसेच संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

वंदना धुमाळ-कदम यांचे कार्य ग्रामीण भागातील स्त्रियांना प्रेरणादायी

स्त्री ही आदीमाया शक्ती आहे ,सामर्थ्याची जननी आहे. पराक्रमाची प्रेरणा आहे. मोडका तोडका संसार उभा करणारी कुटुंबातील फार मोठा आधार आहे. संस्कारक्षम पिढी घडवणारे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे स्त्री आहे.प्रत्येक महापुरुषांच्या कार्यात सामर्थ्यशाली स्त्रीची समर्थ साथ असतेअसे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी माँसाहेबा जिजाऊ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात समर्थ साथ देणारी सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोडका तोडका संसार उभा करणारी माता रमाई ,मेरी झांशी नहीं दुंगी म्हणून इंग्रजासी लढणारी राणी लक्ष्मीबाई ,लोकमाता आहील्यादेवी होळकर आशा कितीतरी सामर्थ्यवान महिला होऊन  गेल्या.एकंदरीत स्त्री शक्तीचा महीमाच वेगळा आहे. हे आता समाजमनाने मान्य केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच एके काळी चुल आणि मुल इथपर्यंतच मर्यादीत असलेली स्त्री आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे आज सक्षमपणे काम करताना दिसतात.
यात ग्रामीण भागातील स्त्रिया देखील मागे नाहीत. हे वंदना धुमाळ-कदम यांच्या कार्यातून जानवते.
     वंदन किशोर धुमाळ-कदम यांनी बी.एस्सी.  पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सन २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वहाक म्हणून सेवेत रूजू होऊन आज यशस्वीपणे काम करताना दिसतात.सुरुवातीला परभणी आगारात नेमनुक झाली.काही काळ तेथे नोकरी करून त्यांनी तुळजापूर आगारात बदली करून घेतली. सध्या तुळजापूर आगारात गेली दहा बारा वर्ष झाली अविरतपणे सेवा करतात. आक्कलकोट तुळजापूर तालुक्याच्या सिमा रेषा जवळ तुळजापूर तालुक्यातील वागदरी हे त्यांच गाव .लोहारा येथील कदम घराने हे त्यांच माहेर आहे. वागदरी येथील त्या एकमेव वहाक म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पती किशोर धुमाळ यांचा जीप चालविण्याचा व्यवसाय.ओंकार आणि श्रीकार आशी दोन मुल त्याना आहेत.एक मुलगा औषध निर्माण शाखेत शिक्षण घेत असून दुसरा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.आपला संसारम सांभाळून त्या कामगार संघटनेतहीसक्रिय सहभागी आहेत. इंटक काँग्रेस या कामगार संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून सक्षमपणे नेतृत्व करतात. संसार, नौकरी सांभाळून  मिळलेला वेळ सामाजिक कार्यासाठी देतात. एकुनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०१७ मध्ये रत्नागिरी येते त्यांना राज्यस्तरीय  गुणीजन  कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेआहे.
  दि.०८ मार्च जागतिक माहिला दिनाच्या निमित्ताने त्यांना व आशा सर्व कर्तबगार महिना हार्दिक शुभेच्छा.

        

चालु बसचा नट बोल्ट निखळला.. बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला..

दहिफळ –  कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौर कडुन कळंब कडे जाणा-या गाडीचा चालु गाडी धावत असतानी नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले..व गाडीचा तोल जाऊ लागला.अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील घटना टळली.ब्रेक लाऊन गाडीवर ताबा मिळवला.
गाडीचा बिघाड झाल्याचे कळंब आगारला कळविले.रोजच्या सवयी प्रमाणे वरच्या वरी भागवा भागवीची उत्तरे आली…परंतु कळंब आगारामध्ये विशेष बस गाडीची देखरेख करण्यासाठी व्यवस्था असताना नट फिटींग,सर्विसींग का केली जात नाही? हा.प्रश्न पडतो.
ग्रामीण भागातील महत्वाची येण्या जाण्यासाठी सोय म्हणजे बस….लालपरी होय
कळंब आगार विभागामार्फत सोडण्यात येणा-या बसेस खास करुन ग्रामीण भागात सोडलेल्या गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत.कधी टायर फुटते,कधी ब्रेक फेल होते.कधील नट बोलट गळुन पडतात.अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

गौर मुक्कामी असणारी बस कळंबकडे दहिफळ मार्गे जात असताना गाडीच्या समोरील पाटेचा मुख्य नटबोलट तुटुन पडला.चालु गाडी असताना हि घटना घडली.बस चालक शिवाजी मते यांनी प्रसंगावधान ओळखुन गाडीवर ताबा मिळवला मोठा अनर्थ टळला.गाडीचा बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागेल.स्वतः बसचालक व कंडाक्टरने गावातील गॅरेजवर जाऊन लागणारे साहित्य आनुन गाडीचे पाटे निट बसवले.नट बोलट फिट केले.कळंब आगार नेमके काय करते?स्वतंत्र बसची दुरुस्ती करण्यासाठी फिटर विभाग आहे.शेकडो मॅकिनिक आहेत.तरी गाडीचा घोटाळा होतोच कसा हे कळायला मार्ग नाही.