Home Blog Page 303

पत्रकार विठ्ठल एडके यांच्या घरावर दगड फेक करून जीवे मारण्याची धमकी

वैराग प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील रहिवासी ग्रामसेवक गिरीधर रंगनाथ येडके आणि त्यांचे वडील रंगनाथ लक्ष्मण एडके यांनी त्यांच्या उस्मानाबाद हद्दीतील शेतीत वाळूचा साठा केला होता याबाबत उस्मानाबाद येथील माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या बातम्या तूच छापायला लावल्या म्हणून गिरीधर एडके आणि त्याचे इतर तीन साथीदार यांनी शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता दैनिक  जनमत चे उपसंपादक विठ्ठल एडके यांच्या घरासमोर आदल्या उडवून घरावर दगडफेक केली आणि पुन्हा वाळूच्या बातम्या छाप असेल तर जीवे मारू अशी धमकी देत शिवीगाळ केली, याबाबत विठ्ठल एडके यांनी ग्रामसेवक गिरीधर रंगनाथ येडके, कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के, गणेश नामदेव सोनटक्के, आणि प्रदीप रावसाहेब एडके यांच्याविरोधात वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

अधिक माहिती अशी की झरेगाव येथील रहिवासी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामसेवक असलेले गिरधर रंगनाथ एडके यांनी भोगावती नदी मधील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची उत्खनन करून वाळूचा साठा केला होता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे तक्रार दाखल केली होती यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक माध्यमात वाळू चोरी आणि वाळूचा साठा याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या ही बातमी विठ्ठल एडके यांनीच माध्यमांना दिली असा गैरसमज करून अफवा पसरवण्यात आल्या तसेच शुक्रवारी सदर वाळूसाठी याचा लिलाव झाला, या आनंदाप्रीत्यर्थ शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल एडके यांच्या शेतातील घरासमोर येऊन गिरीधर रंगनाथ एडके, कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के, गणेश नामदेव सोनटक्के आणि प्रदीप रावसाहेब एडके यांनी घरासमोर 50 आल्या उडवल्या यावेळी विठ्ठल एडके यांच्या घरावर दगडफेक केली तसेच यापुढे वाळूच्या बातम्या छापल्या असता जीवे मारू अशी धमकी देत शिवीगाळ केली मात्र पत्रकार विठ्ठल एडके यांची वस्ती शेतातील असल्याने सायंकाळी आठ वाजता कोणीच नव्हते यामुळे आई पत्नी मुले भावजी हे सर्वजण पत्र्यावरील दगड पडत असल्याने भायभीत झाले होते
पत्रकार विठ्ठल एडके यांच्या घरावर झालेली दगडफेक वेळी घराच्या बाहेर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ कळला अन्यथा मारहाण होण्याची शक्यता होते या घटनेचा जाब कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के यांना शनिवारी सकाळी विचारले असता पत्रक विठ्ठल एडके यांचे बंधू रवींद्र एडके यांना मारहाण केली तसेच तुला काय करायचे ते कर मी बघायला समर्थ आहे अशी धमकी दिली या  प्रकरणामुळे  विठ्ठल एडके यांनी  वैराग  पोलीस ठाणे येथे  चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे

शासकीय कर्मचाऱ्यांनी एखाद्या पत्रकाराच्या घरी जाऊन आल्या वाजवणे आणि घरावर दगडफेक करणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास उडत चालला आहे

महाराष्ट्र शासन व प्रशासनाला साथ द्या व सुरक्षित रहा – आ. सुमनताई पाटील

तासगाव – महाराष्ट्र शासन व प्रशासनाला साथ द्या व सुरक्षित रहा असे आवाहन आ. सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे संपूर्ण जगात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे आपल्या देशात सुद्धा या वायरस ची काही लोकांना लागन झाली आहे परंतु नागरिकांनी घाबरून न जाता याचा प्रसार होऊ नये त्यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे जर ताप,डोकेदुखी, सर्दी, घसा दुखणे, सततचा खोकला होत असेल तर तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन औषध घेणे आवश्यक आहे व्हायरसचा
प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी महाराष्टातील महा विकास आघाडीच्या सरकारने जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत त्यामध्येना गरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये धार्मिक स्थळे येथे गर्दी करू नये, गरज
नसताना प्रवास करू नये, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम सध्यातरी स्थगित ठेवावेत किंवा टाळावेत, त्याचप्रमाणे शासनाने शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर केले आहे.गर्दीचे ठिकाण असणारे मॉल व बजार बंद करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे लहान मुले व ज्येष्ठ वयस्कर मंडळी यांनी शक्यतो घरी थांबावे बाहेर पडू नये कोरोना आजार मला करून होईल ही भीती मनातून काढून टाकावी हे संकट राष्ट्रीय
आपत्ती आहे त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता व्यक्तिगत जबाबदारीचे भान ठेवावे व सदरच्या संकटावर मात करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.विषाणूची साथ आटोक्यात यावी यासाठी आपले महाराष्ट्र शासन व प्रशासन
सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे सर्व डॉक्टर्स रात्र- दिवस मेहनत करून देशसेवा करीत आहेत. त्यांना व पोलीस प्रशासनाला साथ देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तरी उद्या सर्वांनी घरी थांबून स्वतःबरोबर आपल्या कुटंबाची काळजी घ्यावी शिस्त
पाहताना आपल्या बरोबरच समाजाचा व देशाचा विचार करावा असे मी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून कळकळीचे आवाहन करीत आहे.’ असे आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहेआम

लाल परीची सेवा अचानक बंद, प्रवाशांचे हाल

उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्व सूचना न देता उस्मानाबाद आगाराने बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
 एस टी बस सेवा ही अत्यावश्यक सेवे पैकी एक आहे. ही सेवा अचानक बंद केल्याने महत्वाच्या कामानिमित्त उस्मानाबाद शहरात आलेल्यांचे मोठे हाल झाले. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी जिल्हा बंद चे आदेश दिले होते त्यात बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले नव्हते तरी देखील बस सेवा बंद करण्यात आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने तसेच  मुंबई पुणे या ठिकाणाहून काही नागरिक गावाकडे  येत आहे त्यांना गावी जाण्यासाठी एकमेव बस सेवेचा आधार आहे.
 याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी शिंदे यांना विचारले असता, याबाबत परिवहन विभागाकडून कुठले आदेश आले नाहीत मात्र गर्दी कमी असल्याने आम्ही गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवासी आल्यास त्यांच्यासाठी बस सोडण्यात येईल, तसेच उद्या दि २३ रोजी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याचे सांगितले.

उस्मानाबाद शहरात आता १२ हॅण्ड वॉश पॉइंट्स – नगराध्यक्ष राजेनिंबाळकर

उस्मानाबाद – कोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका पुढे सरसावली आहे. नागरिकांना वैयक्तिक स्वछता राखता यावी यासाठी शहरात आता १२ हॅण्ड वॉश पॉइंट्स ठरवण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी दिली.
उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे  मोठी बाजारपेठ व सर्व सरकारी कार्यालये आहेत यामुळे शहरामध्ये होणारी मोठी  गर्दी लक्षात घेता कोरोना व्हायरस च्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद मध्ये  येणारे प्रवासी तसेच शहरातील स्थायी नागरिक यांचे हात धुण्यासाठी  एकूण बारा ठिकाणे उपलब्ध करणार असा उत्कृष्ठ व लोकोपयोगी निर्णय उस्मानाबाद नगर परिषद व नगराध्यक्ष  मकरंद  राजेनिंबाळकर यांनी घेतला.
हात धुण्याची बारा ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत.
नगर परिषद उस्मानाबाद, बस स्टँड, तुळाजा भवाणी शॉपिंग सेंटर,  जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत (सेंट्रल बिल्डिंग), आरक्षण क्र.73, देशपांडे नाका भाजी मंडई, नेहरू चौक , साठे चौक बाजार मैदान, बार्शी नाका,दर्गा देवस्थान समोर या पैकी कोणत्याही ठिकाणी गेल्यावर आपण आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

तो कोरोनाचा रूग्ण नाही; यंत्रणेची बेफिकीरी उघड पुण्याहून आल्याने गावकर्‍यांनी तपासणीची केली जबरदस्ती



उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रूग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र तो रूग्ण कोरोनाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगीतले. 
याबाबत माहिती अशी की, हा रूग्ण गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड येथे कामानिमीत्त नातेवाईकांकडे गेला होता.समुद्रवाणी येथे गावी परतल्यानंतर केवळ ती व्यक्ती  पिंपरी चिंचवड आणि पुणे येथून प्रवास करून आल्याने त्यांना समुद्रवाणी येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले असता डॉक्टरांनी उस्मानाबाद येथे त्यांना पाठवले. मात्र उस्मानाबाद येथे जिल्हा रूग्णालयात कोरोना वार्डच बंद असल्याने त्यांना काही काळ ताटकाळत उभे रहावे लागले. यातून जिल्हा आरोग्य यंत्रणेची बेफिकीरी दिसून आली. केवळ ढिसाळ यंत्रणेमुळे त्या रूग्णाला ताटकाळत उभे रहावे लागले अशी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यात त्यांना यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले गेले . तसेच आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही आढवा घेतला  त्यांनाही यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका आलेल्या रूग्णाने शासकीय यंत्रणेचा कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार उघड केला आहे. मात्र अनाहुतपणे घडलेले हे मॉक ड्रील जिल्हा यंत्रणेला धडा शिकवून जाणारे आहे. त्या रूग्णाची तातडीने तपासणी न करणार्‍या डॉक्टरांवर काय कारवाई होते हे आता पहावे लागणार आहे. खरच त्या व्यक्तीला जबरदस्तीने दवाखान्यात पाठवण्यात आले आहे का याची माहिती समुद्रवाणी येथील जबाबदार नागरीकांना विचारली असता त्यांनी ते काल पुण्याहून आले आहेत. थोडीशी सर्दी आणि खोकला त्यांना होता मात्र तपासणीसाठी तयार नसल्याने त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांनी दवाखान्यात पाठवले आहे असे गावकर्‍यांनी सांगीतले. तसेच त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसताना समुद्रावानी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाला उस्मानाबाद येथे का पाठवले असा प्रश्न विचारला जात आहे.
ती व्यक्ती ठिकठाक- जिल्हा शल्यचिकीत्सक 
समुद्रवाणी येथून आलेली व्यक्ती ठिकठाक असून त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. ते पिंपरी चिंचवड येथून प्रवास करून आल्याने त्यांना नातेवाईकांनी जबरदस्तीने दवाखान्यात पाठवले होते. त्यांची तपासणी केली आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणे न आढळल्याने त्यांना गावी पाठण्यात येणार आहे. लक्षणे नसल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची गरज नसल्याचे तसेच आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी कुचराई न केल्याचे  जिल्हा शल्यचिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगीतले.