उस्मानाबाद – कोरोना च्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनीटायझर ला मोठी मागणी वाढली आहे. काही ठिकाणी भेसळ असलेले, अवैध सॅनीटायझर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले होते. चांगल्या प्रतीचे सॅनीटायझर मिळण्याची शाश्वती नागरिकांना नव्हती मात्र केंद्र आणि राज्य सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलत सॅनीटायझर उत्पादन करू इच्छिणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांना हात धुण्याची सोय नाही त्यांना सॅनीटायझर हा एक चांगला पर्याय आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन नव्या प्रकल्पांना अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन करण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकमंगल माऊली ली. लोहारा, नॅचरल शुगर रांजणी ता. कळंब, अॅडलर्स बायोएनर्जी गुरगाव ता. कळंब यांना सॅनीटायझर निर्मितीचे परवाने मिळाले आहेत.
हे परवाने देताना अन्न व औषध प्रशासनाने काही अटी आणि शर्ती ठेऊन सॅनीटायझर च्या उत्पादनास परवानगी दिलेली आहे. या उत्पादकांना ३० जून पर्यंत उत्पादन करण्याची परवानगी आहे. तसेच उत्पादन केलेल्या सॅनीटायझर ची कलबह्याता ( शेल्फ लाईफ) १२ महिन्यापेक्षा अधिक नसू नये. यासह पाच विविध प्रकारच्या अटी अन्न व औषध प्रशासनाने उत्पादकांना परवानगी देताना लावल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ प्रकल्पांना सॅनीटायझर उत्पादनाचे परवाने
गावातील अडी अडचणीबाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्यांना अवगत करावे – आ. राणाजगजित सिंह पाटील
अजिंक्य संस्थेच्या वतीने खडकी येथे ५०० मोफत मास्क वाटप
तुळजापूर:-
तालुक्यातील खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या वतीने कोरोना आजारापासुन नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून चेहर्यावर लावण्यासांठी मोफत मास्कचे वाटत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की संपूर्ण भारतात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला असून या आजारापासुन लोकांचा बचाव व्हावा म्हणून भारत सरकार, पोलिस प्रशासन,डॉक्टर व इतर कर्मचारी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. त्याच धर्तीवर अजिंक्य संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना कोरोना आजाराविषयी जनजागृती करून, त्या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून संस्थेने मोफत मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.सर्दी-खोकला यासारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. या आजाराला घालविन्यासांठी सर्वांनी घरातच बसुन शासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले. शेवटी राम जवान म्हणाले की संस्थेच्या वतीने खडकी ग्रामस्थांना आणखी सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र जवान,सिध्दु सुरवसे,किशोर जवान,अविनाश जवान,संतोष जाधव,ज्ञानेश्वर जवान,ईस्माईल पटेल आकाश जवान,दादाराव खोडके,हणमंत जवान.
त्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह
उस्मानाबाद – परदेशातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तूर्तास उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही.
जिल्ह्यात अमेरिका, दुबई, इटली अश्या देशातून नागरिक आले होते. त्यातील काहींनी स्वतः हून शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी केली होती तर काही जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून तपासणी करायला लावली होती. त्यांचे घश्याचे स्त्राव चाचणीसाठी एन आय व्हि पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर काल २२ मार्च रोजी त्यांचा चाचणी अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले आहेत. सध्या त्या १९ जणांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. वाशी -१, लोहारा-४, उमरगा – ९, तुळजापूर -२, उस्मानाबाद -२, मुरूम – १ अशी तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या आहे.
उस्मानाबाद शहरात ७९१५० रुपयांचे हॅण्ड सॅनीटायझर जप्त.
उस्मानाबाद – शहरात ७९१५० रुपयांचे हॅण्ड सॅनीटायझर जप्त करण्यात आले आहे. २० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनीटायझर ला बाजारात खूप मोठी मागणी आहे. यात भेसळ होण्याची शक्यता अगोदरपासूनच वर्तवली जात होती. पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले होते. २० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाने समता नगरमधील सिद्धांत मेडिकल मधील सॅनीटायझर पाहिले असता त्यात गडबड दिसून आली. या मेडिकल ला पुरवठा बार्शी येथून होतो. मात्र खरेदी केलेल्या पावत्या आणि उपलब्ध असलेले सॅनीटायझर यात तफावत होती.१०० मिली. आणि २५० मिली चे हे वेगवेगळे दोन नमुने आहेत.
दोन वेगवेगळ्या पॅकिंगच्या सॅनीटायझर चे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.














































