Home Blog Page 301

दैनिक जनमत २७ मार्च E पेपर

गावातील अडी अडचणीबाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्‍यांना अवगत करावे – आ. राणाजगजित सिंह पाटील






उस्मानाबाद:- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबविण्यासाठी ग्रामस्तरावर कोरोना सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. अनेक गावांमध्ये सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून चांगले काम करण्यात येत आहे. या कक्षाच्या माध्यमातून बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती कळविणेआजारी व्यक्तींची माहिती कळविणेगावांमध्ये औषधेकिराणाभाजीपालापिण्याचे पाणीलाईट या सुविधांच्या उपलब्धते बाबत देखील काही अडचणी आहेत का याबाबींचा दैनंदिन आढावा घेऊन माहिती  प्रशासनाला कळविणे अभिप्रेत आहे. 
परंतु अशा गंभीर परिस्थितीत देखील काही गावांमधून सहाय्यता कक्षाचे कर्मचारी गावी येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या भयावह परिस्थितीत सर्वांनी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. कोरोना सहाय्यता कक्षातील कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या बिकट परिस्थितीत गावातील अवैद्य धंद्यात वाढ होत असल्याच्या देखील तक्रारी ग्रामस्थांकडून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहायता कक्षाच्या सदस्यांनी गावातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी बाबत संबंधित तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दररोज  Whatsapp अथवा ई मेल द्वारे अवगत करण्याबाबत आदेश देण्याचे आ. राणाजगजित सिंह पाटील साहेब यांनी सूचित केले होते.
या अनुषंगाने आज झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्स मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना सूचित केले आहे. त्यामुळे गावातील अडी अडचणी बाबत सहाय्यता कक्षाच्या कर्मचार्‍यांना अवगत करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी ग्रामस्थांना केले आहे व याउपरही अडचणी दूर न झाल्यास ८८८८६२७७७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

अजिंक्य संस्थेच्या वतीने खडकी येथे ५०० मोफत मास्क वाटप


तुळजापूर:-

तालुक्यातील खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या वतीने कोरोना आजारापासुन नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून चेहर्‍यावर  लावण्यासांठी मोफत मास्कचे वाटत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की संपूर्ण भारतात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला असून या आजारापासुन लोकांचा बचाव व्हावा म्हणून भारत सरकार, पोलिस प्रशासन,डॉक्टर व इतर कर्मचारी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. त्याच धर्तीवर अजिंक्य संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना कोरोना आजाराविषयी जनजागृती करून, त्या आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून संस्थेने मोफत मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच हा आजार संसर्गजन्य असल्याने जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.सर्दी-खोकला यासारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. या आजाराला घालविन्यासांठी सर्वांनी घरातच बसुन शासनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले. शेवटी राम जवान म्हणाले की संस्थेच्या वतीने खडकी ग्रामस्थांना आणखी सोय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र जवान,सिध्दु सुरवसे,किशोर जवान,अविनाश जवान,संतोष जाधव,ज्ञानेश्वर जवान,ईस्माईल पटेल आकाश जवान,दादाराव खोडके,हणमंत जवान.

दैनिक जनमत २५ मार्च E पेपर

त्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह

उस्मानाबाद – परदेशातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तूर्तास उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही.

जिल्ह्यात अमेरिका, दुबई, इटली अश्या देशातून नागरिक आले होते. त्यातील काहींनी स्वतः हून शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी केली होती तर काही जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून तपासणी करायला लावली होती. त्यांचे घश्याचे स्त्राव चाचणीसाठी एन आय व्हि पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर काल २२ मार्च रोजी त्यांचा चाचणी अहवाल जिल्हा रूग्णालयाला  प्राप्त झाले आहेत. सध्या त्या १९ जणांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. वाशी -१, लोहारा-४, उमरगा – ९, तुळजापूर -२, उस्मानाबाद -२, मुरूम – १ अशी तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या आहे.

उस्मानाबाद शहरात ७९१५० रुपयांचे हॅण्ड सॅनीटायझर जप्त.

उस्मानाबाद –  शहरात ७९१५० रुपयांचे हॅण्ड सॅनीटायझर जप्त करण्यात आले आहे. २० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनीटायझर ला बाजारात खूप मोठी मागणी आहे. यात भेसळ होण्याची शक्यता अगोदरपासूनच वर्तवली जात होती. पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले होते. २० मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाने समता नगरमधील सिद्धांत मेडिकल मधील सॅनीटायझर पाहिले असता त्यात गडबड दिसून आली. या मेडिकल ला पुरवठा बार्शी येथून होतो. मात्र खरेदी केलेल्या पावत्या आणि उपलब्ध असलेले सॅनीटायझर यात तफावत होती.१०० मिली. आणि २५० मिली चे हे वेगवेगळे दोन नमुने आहेत.
दोन वेगवेगळ्या पॅकिंगच्या सॅनीटायझर चे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.  

पत्रकार विठ्ठल एडके यांच्या घरावर दगड फेक करून जीवे मारण्याची धमकी

वैराग प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील झरेगाव येथील रहिवासी ग्रामसेवक गिरीधर रंगनाथ येडके आणि त्यांचे वडील रंगनाथ लक्ष्मण एडके यांनी त्यांच्या उस्मानाबाद हद्दीतील शेतीत वाळूचा साठा केला होता याबाबत उस्मानाबाद येथील माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या बातम्या तूच छापायला लावल्या म्हणून गिरीधर एडके आणि त्याचे इतर तीन साथीदार यांनी शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता दैनिक  जनमत चे उपसंपादक विठ्ठल एडके यांच्या घरासमोर आदल्या उडवून घरावर दगडफेक केली आणि पुन्हा वाळूच्या बातम्या छाप असेल तर जीवे मारू अशी धमकी देत शिवीगाळ केली, याबाबत विठ्ठल एडके यांनी ग्रामसेवक गिरीधर रंगनाथ येडके, कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के, गणेश नामदेव सोनटक्के, आणि प्रदीप रावसाहेब एडके यांच्याविरोधात वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,

अधिक माहिती अशी की झरेगाव येथील रहिवासी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामसेवक असलेले गिरधर रंगनाथ एडके यांनी भोगावती नदी मधील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची उत्खनन करून वाळूचा साठा केला होता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे तक्रार दाखल केली होती यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक माध्यमात वाळू चोरी आणि वाळूचा साठा याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या ही बातमी विठ्ठल एडके यांनीच माध्यमांना दिली असा गैरसमज करून अफवा पसरवण्यात आल्या तसेच शुक्रवारी सदर वाळूसाठी याचा लिलाव झाला, या आनंदाप्रीत्यर्थ शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल एडके यांच्या शेतातील घरासमोर येऊन गिरीधर रंगनाथ एडके, कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के, गणेश नामदेव सोनटक्के आणि प्रदीप रावसाहेब एडके यांनी घरासमोर 50 आल्या उडवल्या यावेळी विठ्ठल एडके यांच्या घरावर दगडफेक केली तसेच यापुढे वाळूच्या बातम्या छापल्या असता जीवे मारू अशी धमकी देत शिवीगाळ केली मात्र पत्रकार विठ्ठल एडके यांची वस्ती शेतातील असल्याने सायंकाळी आठ वाजता कोणीच नव्हते यामुळे आई पत्नी मुले भावजी हे सर्वजण पत्र्यावरील दगड पडत असल्याने भायभीत झाले होते
पत्रकार विठ्ठल एडके यांच्या घरावर झालेली दगडफेक वेळी घराच्या बाहेर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ कळला अन्यथा मारहाण होण्याची शक्यता होते या घटनेचा जाब कोतवाल राजकुमार पोपट सोनटक्के यांना शनिवारी सकाळी विचारले असता पत्रक विठ्ठल एडके यांचे बंधू रवींद्र एडके यांना मारहाण केली तसेच तुला काय करायचे ते कर मी बघायला समर्थ आहे अशी धमकी दिली या  प्रकरणामुळे  विठ्ठल एडके यांनी  वैराग  पोलीस ठाणे येथे  चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे

शासकीय कर्मचाऱ्यांनी एखाद्या पत्रकाराच्या घरी जाऊन आल्या वाजवणे आणि घरावर दगडफेक करणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास उडत चालला आहे

महाराष्ट्र शासन व प्रशासनाला साथ द्या व सुरक्षित रहा – आ. सुमनताई पाटील

तासगाव – महाराष्ट्र शासन व प्रशासनाला साथ द्या व सुरक्षित रहा असे आवाहन आ. सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे संपूर्ण जगात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले आहे आपल्या देशात सुद्धा या वायरस ची काही लोकांना लागन झाली आहे परंतु नागरिकांनी घाबरून न जाता याचा प्रसार होऊ नये त्यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे जर ताप,डोकेदुखी, सर्दी, घसा दुखणे, सततचा खोकला होत असेल तर तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन औषध घेणे आवश्यक आहे व्हायरसचा
प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी महाराष्टातील महा विकास आघाडीच्या सरकारने जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत त्यामध्येना गरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये धार्मिक स्थळे येथे गर्दी करू नये, गरज
नसताना प्रवास करू नये, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम सध्यातरी स्थगित ठेवावेत किंवा टाळावेत, त्याचप्रमाणे शासनाने शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर केले आहे.गर्दीचे ठिकाण असणारे मॉल व बजार बंद करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे लहान मुले व ज्येष्ठ वयस्कर मंडळी यांनी शक्यतो घरी थांबावे बाहेर पडू नये कोरोना आजार मला करून होईल ही भीती मनातून काढून टाकावी हे संकट राष्ट्रीय
आपत्ती आहे त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता व्यक्तिगत जबाबदारीचे भान ठेवावे व सदरच्या संकटावर मात करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.विषाणूची साथ आटोक्यात यावी यासाठी आपले महाराष्ट्र शासन व प्रशासन
सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे सर्व डॉक्टर्स रात्र- दिवस मेहनत करून देशसेवा करीत आहेत. त्यांना व पोलीस प्रशासनाला साथ देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तरी उद्या सर्वांनी घरी थांबून स्वतःबरोबर आपल्या कुटंबाची काळजी घ्यावी शिस्त
पाहताना आपल्या बरोबरच समाजाचा व देशाचा विचार करावा असे मी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून कळकळीचे आवाहन करीत आहे.’ असे आमदार सुमनताई पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहेआम