Home Blog Page 300

तात्या हे बरं नव्हं

मराठी चित्रपट सृष्टीत एक गाजलेले पात्र आहे. तात्या विंचू नावाचे स्वतः चा जीव पूर्णपणे गेलेला असताना मृत्युंजय मंत्र म्हणून जिवंत राहण्याचा त्याचा प्रयत्न. शेवट पर्यंत तो यशस्वी होत नाही. तसेच अलीकडे समाज माध्यमात वाईट हौसात राहणाऱ्या ला देखील तात्या नावाने संबोधले जाते त्याबाबतच्या चित्रफिती बक्कळ पाहायला मिळतात. जगातील सर्वात मोठी महासत्ता सध्या अमेरिका आहे. आणि महासत्ता राहण्यासाठी सदैव प्रयत्न अमेरिका करत असते. मात्र कोरोना च्या संकटापुढे या महासत्तेने गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या ३६८१७४ इतकी आहे तर मृतांची संख्या दहा हजारांच्या वर गेली आहे. तरी देखील या महासत्तेची खुमखुमी कायम आहे. भारतात वापरले जाणारे ने हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना साठी उपयुक्त आहे. भारताकडे त्याचा साठा मुबलक असल्याने ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून त्याचा पुरवठा करण्याची मागणी केली भारतानेही ती लागलीच मान्य केली. यानंतर आभार व्यक्त करताना ट्रम्प यांनी जर भारताने हे औषध दिले नसते तर भारताला  अमेरिकेने प्रत्युत्तर दिले असते अश्या प्रकारचे हे वक्तव्य आहे. जागतिक सत्तेच्या अनेक नाड्या हातात असल्याने अमेरिकेला ही घमेंड आली असावी. भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध चांगले आहेत. संबंध चांगले आहेत म्हणून धमक्या देणे बरे नव्हे. खरे तर सरकारकडून याला प्रत्युत्तर द्यायला हवे होते. जर भारत यावर गप्प राहिला तर आंतरराषट्रीय राजकारणात मोठी नाचक्की होऊ शकते. भलेही ताकदीने आपण कमी असू मात्र लाचार नाहीत हे अमेरिकेला दाखवून द्यायला हवे. चीन आणि अमेरिकेत ट्रेड वॉर नेहमीच चर्चेत राहिले आहे. कोरोना च्या बाबतीतही अमेरिका आणि चीन मध्ये तुलना होताना दिसत आहे. नवीन उत्पत्ती झालेला एखादा आजार. ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही अश्या विषाणूच्या प्रसारावर चीनने नियंत्रण मिळवले मात्र विषाणू नेमका कसा आहे त्याचा धोका कितपत आहे याचे ज्ञान असतानाही अमेरिकेसारख्या देशाला त्यावर नियंत्रण मिळवता न येणे हे दुर्दैव आहे. कोरोना चा मुकाबला करण्यास अपयशी ठरलेल्या अमेरिकेने जागतिक नेतृत्व करावे की नाही हाच आता संशोधनाचा भाग आहे. संकट समयी एखादा देश त्याचा सामना कसा करतो त्यावर मोजमाप झाल्यास अमेरिका यात खूप मागे पडल्याचे दिसत आहे. एकेकाळी ब्रिटन महासत्ता होते मात्र १९५६ साली सुवेझ कालवा आपल्याकडे वाईट पद्धतीने घेतला होता त्यानंतर ब्रिटनचे महासत्ता पद गेले होते. आता अमेरिका या संकटाचा कसा सामना करणार आहे यावरून पुढची दिशा ठरणार आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुस्थित ठेवण्याचे आव्हान सगळ्यांसमोर आहे. अश्या परिस्थितीत एका विकसनशील देशाला डीवचने त्याला धमकीवजा इशारा देणे अमेरिकेसारख्या देशाला शोभणारे नाही. येत्या काही महिन्यात अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. ट्रम्प त्याचे दावेदार मानले जातात मात्र संकटाचा सामना करण्याऐवजी धमक्या देत  ते बसले तर परिणाम वेगळे दिसू शकतात तूर्तास अमेरिकेने आपली शक्ती संकटाचा सामना करण्यासाठी खर्च करावी एवढेच

दैनिक जनमत ८ एप्रिल E पेपर

दैनिक जनमत ७ एप्रिल E पेपर

विझलेले दिवे आणि कोरोनाशी लढणारा माणूस


उमरगा (अमोल पाटील) :-  भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये कोरोना विषाणूने मानव या प्राण्यालाच लक्ष केल्याने हजारो लाखो माणसे कीड्या-मुंगी प्रमाणे मरण पावली . हे सबंध जगाविरुद्ध आ वासून उभा टाकलेलं महाभयंकर संकट. साक्षात मरण समोर दिसत असतानाही जातीय ,धार्मिक ,दैवीक, कर्मकांडाच्या भावना संवेदना बोथट होत जाव्यात असे वाटते . किमान जाता जाता माणुस म्हणून काहीकाळ जगण्याची संधी आपणास मिळाल्यास आपण ती स्विकारणार की उन्मत्त होऊन धर्माधंतेची दुधारी तलवार उराशी कवटाळनार हा प्रत्येकाच्या जागृत विवेकाचा भाग आहे .
          जागतिक स्तरावर पूर्वीपासूनच निरक्षर, गरीबी ,अप्रगत देशाची , पाटी आजही गळ्यात बांधलेल्या मटक्या सारखी लटकत आहे .भारतातील पारतंत्र्य ,अस्पृश्यता जरी नष्ट झाली असली तरी जागतिक स्तरावर आपल फारसं नावलौकिक झालेला नाही . अमेरिका, इटली ,चायना , रशीया सारख्या कित्येक बलाढय देशांनी या लहानशा विषाणू समोर गुडघे टेकले आहेत. लहान थोर आबालवृद्ध माणसे जिवाच्या आकांताने  शेवटची घटका मोजत असताना  कुठल्याच मंदिर, मस्जित, चर्च, गुरुद्वारातून कसलीही दैवीशक्ती बाहेर पडली नाही जी त्या विषाणूंचा नायनाट करेल .
         आजही विज्ञान ,विवेक ,वास्तव या त्रिसूत्री वरच संबंध जगाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते . प्रत्येक जीव वाचवण्यासाठी केली जाणारी धडपड त्यासाठी उभारण्यात येणारी यंत्रणा आणि परिस्थितीचे भान ओळखून राखलेला संयम आपणास पहावयास मिळतो. किमान या संकटामुळे तरी सबंध जगात विषाणू विरुद्ध माणूस असा लढा उभारल्याचे चित्र दिसत आहे .
 आज तरी जगाला फक्त अध्ययावत उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट सोई, सवोत्कृष्ट वैज्ञानिक, तज्ञ डॉक्टर, निर्भिड आरोग्य कर्मचारी ,कर्तव्यनिष्ठ सुरक्षा यंत्रणा यावरच माणसाचे भविष्य अवलंबून असल्याचे दिसते . आज पणत्या विझल्यानंतर तरी आपण आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून माणूस म्हणून माणसासाठी जगण्याची गरज वाटते.
         
—————-
मा. प्रधानमंत्री यांनी दोन्ही वेळेला केलेल्या आवाहना नंतर बाबा वाक्य प्रमाणम वृत्ती जोपासत अनेकांनी उत्सवी गोंधळ घातल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.देश अभूतपूर्व अशा आव्हानात्मक परिस्थितितून जात असताना विज्ञान तंत्रज्ञानावर स्वार होऊन हे सार घड़ल, घडवल गेल. हे क्लेशकारक आहे.समाजातील विवेकवादी लोकांनी आपल्या साइलेंट मेजॉरिटीचे रूपांतर लाऊड मेजॉरिटीत करणे आवश्यक आहे.
जनतेला या प्रसंगी भौतिक मदत व भावनिक मदत या दोहोंची गरज आहे. भावनिक आधार हा आपल्या आश्वासक,संयमित व विवेकी बोलण्यातून देता येणे शक्य आहे. शिवाय त्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची मदत घेता येऊ शकते.
त्यामुळे राज्यकर्त्यानी आपला सदसदविवेक आणि राज्य घटना समोर ठेऊन प्राधान्यक्रम ठरवायला हवा.शासनाच्या प्रत्येक कृतीतून  जनसामान्याना हे लोक कल्याणकारी राज्य असून आम्ही सर्वजण एक आहोत ,सुरक्षित आहोत ही भावना वाढीस लागली पाहिजे.


      — सुधिर कांबळे (सामाजिक शैक्षणिक अभ्यासक )
—————
थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा शुद्ध मूर्खपणा आहे… आणि पंतप्रधान सारख्या व्यक्तीने याबाबत लोकांना आवाहन करणे हा पंतप्रधानाच्या पदाला न शोभणारे व त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे…. एवढा पोरकट पंतप्रधान यापूर्वी झाला नाही…. या काळात लोकांना सरकारच्या सज्जते बाबत व लोकांनी घ्यायच्या काळजी बाबत बोलून लोकांचे मनोधैर्य वाढवणे व जबाबदारीची जाणीव करून देणे हि अपेक्षा असताना, आपले पंतप्रधान असे हास्यास्पद आवाहन करून, लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेऊन स्वतःचा इव्हेंट साजरा करणे हे शोभत नाही
मरकज प्रकरणावरून मुस्लिम समाजा बाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे… या बाबत मुख्यंत्र्यांनी केलेले आवाहन हे कितीतरी पोक्त व समंजस वाटले…
मुस्लिम समाजातील पुरोगामी लोकांनी पुढे येऊन याबाबत ठोस भूमिका घेऊन पुढे यावे व इतरांनी त्यांना साथ देवून समाजात दुही पसरवणाऱ्या प्रवृतिविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

           –  अॅड. सयाजी शिंदे , ( आपलघर सचिव नळदुर्ग )
————
   पोलीस व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ थाळ्या वाजविणे व दिवे लावण्यापेक्षा त्यांना या संकट समयी सुरक्षा कवच व अत्याधुनिक उपकरणे पुरविणे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावे हाच त्यांचा सन्मान असेल .
    करोना संसर्गामुळे समाजातील काही घटकानी धार्मिक तेढ निर्माण केली आहे, अशा संकट समयी इतके खालचे विचार या लोकांच्या मनात आलेच कसे, खोटे व्हिडीओ पोस्ट केल्याने सामाजिक वातावरण तात्पुरते दूषित झाले होते, परंतु भारतातील सर्वसाधारण जनता आजपर्यंत अशा लोकांना कधीही बळी पडली नाही व पडणार पण नाही सदर प्रकाराला मरकज चे आयोजक व त्यांना परवानगी देणारे पोलीस प्रशासन, गैरसमज पसरवनाऱ्या खोट्या बातम्या दाखवणाऱ्या वाहिन्या जबाबदार आहेत
       टी व्ही पाहणं सोडलं तर आपल्या भागात सामाजिक सलोखा आहे आणि पुढेही राहणार आहेच यात दुमत नाही आणि सर्वजण मिळून करोनावर मात मिळविण्यात यशस्वी होऊ यात शंका नाही, प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांची व नगरसेवकांची मिळून एक मध्यवर्ती दक्षता समिती स्थापन केली तर प्रशासनाला मदतच होईल.

           — बी .एम. मुजावर (सेवानिवृत्त शिक्षक उमरगा )
———–
अवघें जगाला करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संकटाशी सामना करावा लागत आहे. तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आपल्या देशात ही वैद्यकीय यंत्रना विविध आघाड्यांवर करोना बाधितांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लाॅकडाऊन मध्ये आणि कर्फ्यू मध्ये विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस,होमगार्ड,सैन्यदल कार्यरत आहे. मेडिकल ,अन्नधान्य  आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे यासाठी राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.हे सारं होत असतानाच देशातील काहीं मंडळी सोशल मीडियाचा उपयोग करून आणि काहीं नेते मंडळी विविध विधाने करीत दुही निर्माण करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील राठोडा येथे मुक्कामी हजार चे आसपास संख्येने उपस्थित राहून परिस्थिती धोक्यात आणली. उत्तरेत एका मुख्यमंत्र्यांनी रामनवमीला जमावबंदी १४४ कलम लागू असताना ही हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन मिरवणूकीने रामलल्ला ची पूजा पार पाडली. तिकडे तबलीकी मुस्लिम दिल्लीमध्ये मरकस मज्जीदीत हजारोंच्या संख्येने जगातून आणि देशभरातून जमून धार्मिक कार्यक्रम केला. नांदेड मध्ये शीख धर्मियांच्या मंडळींनी बंदी काळात गुरुद्वारात हजारोंच्या गर्दीने गुरुबानीचे पठण केले. पोलीसांकडून गुरुद्वारा प्रबंधक आणि कमिटीवर गुन्हे दाखल करण्यात आले. उपरोक्त तीन धर्म समुदाय यातून सुटले.
साधारणपणे हे दोषी असतानां  देशातील काहीं पक्ष आणि त्यांच्या समर्थक संघटना विशिष्ट पद्धतीने समाजमाध्यमाचा वापर करीत तसेच प्रभाव आणि मालकीच्या प्रसार प्रचार माध्यमाव्दारे या करोनाच्या आणिबाणीच्या काळात ही धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या कामी लागलेले आहेत अशी शंका येते. या अशा प्रसंगी विविध क्षेत्रात नकळतपणे बहुसंख्यांना आवडतील आणि सहज सोपे कार्यक्रम हाती देऊन अल्पसंख्य समाजावर धाक- दबाव – दडपण वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे दिसते.
देशावर जेव्हां संकट येते तेव्हां देश सर्व जाती धर्मासह प्रांतासह एकजूट असला पाहिजे आणि तसाच दिसलाही पाहिजे. भारतीय संविधाना प्रमाणे हा देश कुठल्याही  एका धर्माचा कधी नव्हता आणि भविष्यात असणार ही नाही.
*विसरा सारे भेदाभेद एकच असती कुराण-वेद*
या महात्मा गांधींच्या घोषणेप्रमाणे संख्येने बहुल असलेल्या समुहाने जातीभेद ,धर्म आणि वर्ण-वर्ग भेद न करता गुण्यागोविंदाने नांदता आले पाहिजे. असे मला अहिंसेचा मंत्र देणारे शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर जयंतीनिमित्त नम्रपणे आणि कळकळीने सांगावे वाटते.

— प्रा . किरण सगर (उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद )
———–
देशातील नागरिक एकसंघ असल्याचे व कोरोनाच्या कामी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे यासाठी दिवे लावणे हा एकमेव पर्याय आहे असे मला वाटत नाही.दिवे लावण्याचा इव्हेंट म्हणजे केंद्र सरकारची ढिलाई,यंत्रणांतील त्रुटी आणि निष्काळजीपणा होय. देशात कोरोना उपचारासाठी पुरेशी साधन सामुग्रीचा अभाव,सुरक्षित साधनाची कमतरता,आर्थिक नियोजनाचा अभाव याकडे जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष जाऊ नये त्यांचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा हा खरा प्रयत्न आहे.
    आपला देशात विविध जाती धर्मांचे लोक गुणा गोविंदाने राहातात.कोरोनाच्या पा२र्वभूमीवर दिल्लीमध्ये ‘तबलीग जमात’ यांच्या इस्तेमा पार पडला.या दरम्यान कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन  असताना या जमातीतील काही लोक देशभर फिरले यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला हे खरे आहे.यातील काहीनी   वेगळीच कृत्य केली. धर्मप्रसारक म्हणायचे की रोगप्रसारक म्हणायचे असा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे.परंतु या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत असल्याचे सोशेल मिडीयावरुन  जाणवते.परंतु या गोष्टीचा संबंध धर्माशी न जोडता.आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.अशावेळी धर्मापेक्षाही देशाचा कायदा मोठा असतो हे समजून घेणे महत्वाचे आहे.या एका घटनेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होणे हे खरे नाही.
     धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष तत्वाचे पालन करुन एकात्मता निर्माण करुन जातीय सलोखा राखणे.   देशातील सर्व नागरिकांनी केंद्रसरकार व राज्यसरकारच्या आदेशाचे पालन करुन संपूर्ण यंत्रणांना सहकार्य करुन त्यांचे मनोबल वाढविणे.                 कोरोनामुळे घाबरलेल्या जनतेला मानसिक दृष्टया सक्षम करुन प्रथमोपचार मिळवून देणे.    कुठल्याही अंधश्रध्दा पसरविणाऱ्या अफवानवार विश्वास ठेवता कामा नये.   विवेकाची साथ धरुन विज्ञाननिष्ठ बनावे.         
      आपण भारतीय आहोत. संविधान हा आमचा आधार आहे.तेव्हा देशावर आलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून करु या.कुठलाही भेदभाव नकरता माणूस म्हणून माणसाने माणसाला वाचवले पाहिजे हा माणूसकीचा धर्म पाळू या.द्वेष,मत्सर,कलह याला तिलांजली देवू या.सर्वांनी स्वयम् शिस्त व सुरक्षित अंतर ठेवून,शासन व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन घरीच बसू या,मीच माझा रक्षक! या भावनेतून काम करुन जे प्रत्यक्ष कामात आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगू  या.मी देशाच्या कामी येणार अशी भूमिका घेऊ आणि सहकार्य करु या!

            —प्रा.डॉ.महेश मोटे , (  जिल्हा कार्याध्यक्ष              महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती,उस्मानाबाद).

कोरोना आणि पाणीटंचाई दुहेरी संकटात नांदुर्गा

उस्मानाबाद :- कोरोना आणि पाणीटंचाईच्या दुहेरी संकटात नांदुर्गा ग्रामपंचायत सापडली असताना प्रशासनाने मात्र हात वर केल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
याबाबत माहिती अशी की, नांदुर्गा येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली तसा रीतसर प्रस्ताव ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे दिला. प्रशासनाकडून एक पथक पाहणीसाठी आले मात्र त्यांनी गावापासून ३००० फूट अंतरावर असलेल्या बोअरवेल वरून पाणी आणण्याचा सल्ला दिला मात्र त्यासाठी निधी नाही तुम्ही खर्च करा असे सांगून जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.  तसेच गावात १५ मार्च पासुन मुंबई पुणे अश्या ठिकाणाहून अनेक लोक मूळ गावी आल्याने पाण्यासाठी ते गावातील एका टाकी वर गर्दी करत आहेत यामुळे सोशल डिस्टन्सिंग ला खो बसत आहे. कोरोना आणि पाणी टंचाई या दोन्ही संकटात ग्रामस्थ सापडल्याने लोक चिंतेत आहेत. प्रशासनाने याची दाखल घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीस पकडले ! तेरच्या ग्रामीण रूग्नालयात दाखल केले !!

तेर(प्रतिनीधी) तालुक्यातील तेर येथे कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तीस पोलिसानी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले  आले आहे.  या बाबत माहिती अशी की दिल्ली येथे   तब्लिकी-ए-जमात या धार्मिक कार्यक्रम झाला होता कार्यक्रमाच्या ३ की.मी. परिसरातील मोबाईल नंबर पोलिसांनी शोधले होते. त्यात  उस्मानाबाद जिल्ह्यातील  एकूण   आठ नागरिकांचा तपास  जिल्हा प्रशासनाने सुरू केला होता.
दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात झालेल्या  धार्मिक कार्यक्रमानंतर अनेक नागरिक कोरोणा बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेतला जात आहे.अशा  एका व्यक्तीबधितामध्ये तेरच्या एकाचा  समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडे होती.
सदर व्यक्ती जो मोबाईल क्रमांक वापरतो तो त्याच्या आईच्या नावावर आहे. तो व्यक्ती दिल्ली वरून मुंबई आणि मुंबई वरून तेर येथे येत असल्याची माहिती प्रशासनाने तेर येथील यंत्रणेला दिली होती त्यानुसार सरपंच, पोलिस विभाग,तलाठी,पोलिस पाटील हे पाळत ठेऊन  होते.1 एप्रिलला संशयीत व त्याची पत्नी दूपारी आल्याचे पोलीसाना कळताच त्यानी त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रूग्नालयात  उपचारासाठी दाखल  केले आहे. तसेच घाश्याच्या स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.  खबरदारी म्हणून  पोलिसानी ग्रामीण रुग्णालय  परीसर बंदीस्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे ती व्यक्ती तब्लिकी-ए-जमात शी संबंधित नाही.