Home Blog Page 299

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने बसवली निर्जंतुकीकरण यंत्रणा

उस्मानाबाद :- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात  प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने बसविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते या निर्जंतुकीकरण यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. या निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हयपोक्लोराइड   या औषधाची  फवारणी करणारी यंत्रणा जनकल्याण समितीने स्वखर्चातून उभारली आहे. याचा उपयोग रुग्णालयात प्रवेश करणारे डॉक्टर्स रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा उपयोग होणार आहे. यावेळी जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर आदिनाथ राजगुरू कार्यवाह एडवोकेट श्रीकृष्ण मसलेकर प्राचार्य एमडी पाटील सतीश राजेनिंबाळकर शंकर पांढरे आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांकडील मालाची माहिती थेट ग्राहकाला तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

उमरगा -अमोल पाटील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संबंध देश, राज्य तथा तालुक्यामध्ये शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे .वर्षानुवर्ष दुष्काळ, अतिवृष्टी ,गारपीट ,रोगराई अशा अडचणींना सातत्यपूर्ण सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांना या कोरोणा विषाणूमुळे निर्माण झालेल्या संचारबंदी परिस्थिती शेतात उत्पादित केलेला माल वाहतूक बंद असल्याने व व्यापारी कमी किमतीला माल घेत असल्याने असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
       तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून शेतामध्ये भाजीपाला ,फळे याचे उत्पादन घेऊन त्यातून काही नफा कमावता येतो का या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना व्यापारी मात्र पीळून खात आहेत . कुणाची कलिंगड, कुणाची फुले ,तर अनेकांची द्राक्षे, फळभाज्या उठाव नसल्याने जागेवर वाळत असल्याचे  चित्र आज मितीला निर्माण झाले आहे .अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडून यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे .तर अनेकांनी अनुदानाची मागणी केली आहे.
     उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा .गरजवंत ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल मिळावा शेतकरी व ग्राहका मधील दुवा असणारा व्यापारी दोन बोक्या तील भांडणात माकडाच्या भूमिके प्रमाणे मलीदा सातत्यपूर्ण स्वतःच लाटत राहतो . याला आळा घालण्यासाठी तसेच संचार बंदीच्या काळामध्ये अनेकजण गरजवंत लोकांना विविध माध्यमातून धान्याचे किट ,भाज्या, फळे इत्यादी माध्यमातून मदत करताना दिसत आहेत . तो माल खरेदी करताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास त्याला योग्य भाव मिळतो व घेणाऱ्याला चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध व्हावा हा उद्देश समोर ठेवून उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला आहे . या तयार करण्यात आलेला यादी मध्ये कृषी खात्यामार्फत सर्व शेतकऱ्या जवळील उपलब्ध मालाची माहिती गोळा केली जाते तसेच शेतकऱ्यांचा संपर्क क्रमांक, गाव, मालाची प्रत, इत्यादी बाबी त्यात उल्लेख केल्या जातात व ती यादी व्हाट्सअप ग्रुप, सोशल मीडिया, ग्रामीण भागातील शेतकरी गटे विविध शासकीय  व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे  ग्रुप, कृषी सेवक यांचे व्हाट्सअप ग्रुप यांच्यामार्फत व्हायरल केली जाते . ज्यामुळे आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या मालाची माहिती सर्व नागरीक, गरजवंत ,व्यापारी ,हॉटेलचालक, गरजवंतांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्था तथा शासनामार्फत मदत करणाऱ्या एजन्सिज यांना ही माहिती जाते व या माध्यमातून शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकाला ताजा भाजीपाला फळे उपलब्ध होतील .
अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्राहकांनी प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेल्या या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सहकार्य व्हावे हीच माफक अपेक्षा .
       
—————
आज अखेर माझा बळीराजा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक संकटांना तोंड देत आलेला आहे. त्यातच सध्या जगामध्ये कोवड १९ हा विषाणू थैमान घातलेला आहे. या विषाणूला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने लॉक डॉउन व संचारबंदीसारखी उपाययोजना करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडील फळे व भाजीपाला यासारखे नाशवंत उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांमार्फत शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या फळे व भाजीपाला याबाबत माहिती संकलित केली असून  सदरील माहिती व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था आज गरजवंतांना मदत करीत आहेत, या सामाजिक संस्थांनी जर शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी केल्यास शेतकर्यांचा होणारा नुकसान टाळुन शेतकरी सुखावला जाईल. 


— सुनील जाधव 
(तालुका कृषी अधिकारी, उमरगा )

कोरोना बद्दल निबंध स्पर्धेतून जनजागृती ; आरळी ग्रामपंचायतीचा उपक्रम

उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील आरळी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबवत कोरोना आजाराची जनजागृती केली आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतीने कोरोना सहाय्यता समितीची स्थापना केली. त्याअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी चौथी ते आठवीचा ‘अ’ आणि ९ वी ते बारावी  ‘ब’ गट असे दोन गट करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माझी भूमिका हा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन घेण्यात आली. घरी बसून विद्यार्थ्यानी निंबंध लिहून व्हॉट्स अप च्या माध्यमातून आ आयोजकांकडे पाठवण्यात आले.  या माध्यमातून विद्यार्थ्याना घरी तर बसावेच लागले मात्र स्वतः ची निबंध लिखाणाच्या कलेला वाव मिळाला सोबतच कोरोना या भयंकर विषाणू बद्दल जनजागृती देखील झाली. आणि प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देखील मिळाले. असे अनेक हेतू या उपक्रमातून आयोजकांनी साधले आहेत. ११ एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये  प्रणव पौळ , करण गाडे,  सानिया पठाण,जोया सय्यद, किरण गाडे, प्रतिभा नीचळ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ही ऑनलाईन  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा आरळी आणि जिल्हा परिषद शाळा कदमवाडी येथील शिक्षकांनी आपले योगदान दिले.

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

माडग्याळ:-सनमडी ता. जत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  प्रकरणी एका शिक्षकावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलीने नराधम शिक्षकाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी संशयित शिक्षक सतिश अंकुश कांबळे( वय 38) रा.सनमडी यांच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात  पोक्सो कायद्यानुसार  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबधीत शिक्षक जत जवळ एका  प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक असल्याचे समजते.तसेच तो शिक्षक सनमडी गावाचा माजी उपसरपंच होता व सध्या त्याची पत्नी गावाची ग्रामपंचायत सदस्य आहे.
     पोलीसांनी दिलेली व घटनास्थळ वरून अधिक माहिती अशी , पीडित मुलगी ही अल्पवयीन असून दिनांक 09 एप्रिल रोजी दुपारी अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसल्याचे संधी साधून शिक्षकांने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेतील पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून शिक्षक सतिश कांबळे यांनी मुलीच्या घरी जाऊन तिला आपल्या घरी येण्यास सांगितले त्यावेळी मुलीने नकार दिला त्यावेळी मुलीला धमकावून घरी घेऊन गेल्याचे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर घरात कोणी नसल्याने मुलीने येथे का बोलावले असे विचारले असता त्यांनी तिला जबरदस्तीने झोंबाझोंबी करून बलात्कार केला. .
      यानंतर ही संबंधित शिक्षकाने  11 एप्रिल रोजी गच्चीवर पापड काढण्यासाठी गेलेल्या मुलीला धमकी देत परत बोलावले असता मुलीचे भाऊ आल्याने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. मुलीचे आई वडील मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवत आहेत.     
       नराधम शिक्षकाने घरी कोणी नसल्याचे संधी साधून अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षक  सतिश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.
   उमदी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकावर   बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तो शिक्षक फरारी झाला. उमदी पोलिसांनी त्या शिक्षकाचा सनमडी परिसरात  शोध घेतला. पण तो शिक्षक सापडला नाही.
 
            नात्याला व शिक्षकी पेशाला काळिमा


संबधीत मुलगी व त्या नराधम शिक्षकाचे नाते भावकितील होते. पेशाने शिक्षक व गावचा माजी उपसरपंच असल्याने नात्याला व शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे काम त्यांनी केले.

             मिटवण्याचा प्रयत्न फसला
दि.11 शुक्रवारी दुपारी घटना घडल्यानंतर अनेकांनी मिटवण्याचा प्रेयत्न केला परंतु तो प्रेयत्न फसला अखे र संध्याकाळी गुन्ह्याची नोंद उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली.

बार्शी तालुक्यातील बावी आ येथील कमान काम कोसळून अपघात, तिघांचा मृत्यू

बार्शी – तुळजापूर रस्त्यावर बावी (आ) येथील प्रवेशद्वाराजवळ एका कमानीचे काम सुरु असताना कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

महेश भारत डोळज (२७ वर्षे) रा वैराग, विकास सुग्रीव वाळके ( ३२) रा. मानेगाव, दिपक संग्राम घोलप (३२) वर्षे रा दडशिंगे अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. याबाबत माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी  भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

दरम्यान, लॉकडाऊन काळात खाजगी कमानीचे काम कसे सुरु होते, तसेच झालेल्या घटनेला जबाबदार कोन व बार्शी तालुका पोलिस यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले द्राक्ष झाले मातीमोल ;वेळेत मालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावतोय

उमरगा( प्रा. युसुफ मुल्ला ): कोरोनाचे संकट देशासह ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम होत आहे. जिवनावश्यक वस्तु सोडून इतर दुकाने बंद झाले आहेत. संकट इतके मोठे आहे की येणाऱ्या काळात संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात विक्रीसाठी नेण्यास मुभा आहे. परंतु कोरोनाच्या भितीने व्यापारी द्राक्षाचे उठाव करण्यासाठी सध्या येत नाहीत. परिणामी अनेक दिवसापासुन कष्ठाने पिकवीलेली बाग शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत नासाडी होत आहे. देश एकीकडे कोरानाशी लढतो आहे परंतु शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय. यासाठी योग्य नियोजन झाल्यास शेतकरी जगेल अन्यथा शेतकऱ्यांचा भविष्यकाळ अंधारातच आहे.
——————
सद्यस्थितीत देशावर आलेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आणि अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्षे व कलिंगड यासह फळबागा, भाजीपाला उत्पादनात शेतकऱ्यांना सर्वाधीक फटका बसत आहे. राज्यात संचारबंदी असल्याने बाजारपेठ ठप्प आहेत. लाखों रुपये खर्च करून जोपासलेले पीक मातीमोल होत आहे. द्राक्ष बागा जागेवरच झडून जात असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका हा कायम दुष्काळग्रस्त राहणारा तालुका असल्याने सातत्याने शेती व्यवसाय हा अडचणीचा ठरत आहे. प्रतिवर्षी कोणत्यान कोणत्या कारणाने आर्थिक संकट ओढावले असतेच उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकऱ्यांनी पाच एकर क्षेत्रात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करत द्राक्षांची बाग फुलविली असून अधूनमधून होणाऱ्या वातावरणातील बदलाने किड रोगांचा प्रादुर्भाव होत होता. पदरमोड करून औषधी फवारणी व खतांचा मारा करून तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष यासह फळबाग जपली. ऐन काढणीच्या काळातच कोरोना आजाराचे देशावर आलेल्या संकटात सद्यस्थितीला बागेकडे खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने तयार झालेला माल झाडावरच सडुन व नासुन जात आहे. लहान लेकराप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करीत द्राक्षांच्या बागेची देखभाल केली. आतापर्यंत द्राक्ष बागेसाठी सात लाख रुपये इतका खर्च झाला आहे. वेळेत मालाचा उठाव होत नसल्याने संपूर्ण बागेतील द्राक्षे वेलावरच खराब झाले असून परिपक्व झालेले जमिनीवर पडून नासाडी झाली आहे.शासनाने फळ बागायतदारांकडे लक्ष दिल्यास नैसर्गिक व आपत्ती कालिन स्थितीने निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
अवघ्या दहा मिनिटांसाठी आलेल्या अवकाळी वारा व पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्यात कोरोना च्या संसर्गामुळे बाजारपेठ बंद असल्याने बाहेरून येणारे व स्थानिक व्यापारी द्राक्ष बागेकडे येण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. बाजारपेठा बंद पडल्याने शेतातच मालाची माती होत आहे. घडलेल्या घटनेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देऊन आधार देण्याची गरज आहे.
—————-
सद्यस्थितीत चांगल्या पद्धतीने माल लागला असून अंदाजे पंधरा ते सोळा लाखांचे उत्पन्न होण्याची आशा होती. या मालाचा वेळेवर उठाव न झाल्यास कर्जाच्या ओझ्याखाली जगणे अवघड होईल. निसर्गाच्या व संकटाच्या काळात इतके कष्ट करूनहि हातात काहीच येत नसल्याने संबंधित विभागाने नुकसानीचे पंचनामे करून प्राप्त अहवाल शासनाकडे पाठवून आर्थिक मदत मिळवून द्यावी.
धनराज सुर्यवंशी, नारंगवाडी
—————