Home Blog Page 297

सांगली शहरात कोरोनाचा एक नवा रुग्ण जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती

तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
सांगली महापालिका क्षेत्रातील विजयनगर येथे राहणारा व सांगली शहरातील एका सहकारी बँकेत नोकरी असणारा एका इसमास निमोनिया चा त्रास जाणवू लागल्याने त्याला १७ एप्रिल रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान करत सदरचा रुग्ण ज्या विजयनगर भागात राहतो तो संपूर्ण भाग सिल केला आहे. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित २६ रुग्ण कोरोना बाधित होते. त्यापैकी २५ रुग्णांची अंतिम चाचणीही निगेटिव्ह आली असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला होता परंतु त्यातच सांगली शहरांमध्ये नवा कोरोना सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे त्या व्यक्तीच्या घरातील व इतर संपर्कात कोणी आला असेल त्यासाठी प्रशासनाकडून योग्य तपासणी सुरू आहे. त्यामुळे सांगली शहर व परिसर सील करून प्रशासनाने सर्व हालचाली गतिमान केल्या आहेत.

दैनिक जनमत १९ एप्रिल E पेपर

सोलापुरातील पाच्छा पेठेत नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 14 वर

सोलापूर -सोलापुरात कोरोना  पॉझिटिव रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.  आज शनिवारी दुपारी बारा   वाजेपर्यंत चे रिपोर्ट सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आले आहेत.  आज सोलापूर शहरातील पाच्छा  पेठ  येथे नव्याने    कोरोना पॉझिटिव    आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे .  कालपर्यंत तेरा रुग्णांची असलेली संख्या आता 14 वर   गेली आहे.
 शुक्रवारी रविवार पेठ येथील जोशी गल्ली परिसरातील एका पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना  झाल्याची खबर सोलापूरकरांना पर्यंत पोहोचली असतानाच आता शनिवारी   सोलापूर शहरातील पाच्छा पेठ    येथे नव्याने रुग्ण आढळला आहे.
 या रुग्णांवर सोलापूरचा सिविल  हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.  . सोलापूरकरांनी घाबरू नये आपल्या घरातच बसावे नेहमी हात स्वच्छ धुवावे व नेहमी तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरावे असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूरकरांना केले आहे.

दिलासादायक; उस्मानाबाद ‘त्या’ तिघांचे अहवाल निगेटिव्ह, आजपर्यंतचे सर्व स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह

उमरगा( प्रा.युसुफ मुल्ला) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना विषाणु्चे प्रादुर्भाव झालेले तीन  रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकासह सर्व व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १४ एप्रील पुर्वी पर्यंतचे सर्व चाचणी अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र १४ एप्रीलचे ५,  १५ एप्रील चे २ व १६ एप्रिल चे ७ असे एकुण  १४ जनांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते. या चौदा जणांच्या अहवालामध्ये ‘त्या’ तिन पॉजिटीव्ह रुग्णांचे परत घेण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल येणार असल्याने याकडे जिल्हयासह राज्याचे लक्ष लागले होते.
        पुणे येथे तपासणीसाठी स्वॅब पाठवल्यापासुन  साधारण दुसऱ्या दिवशी रात्री पर्यन्त चाचनी अहवाल प्राप्त होत होते . परंतु नंतर सोलापुर येथे तपासणीची सोय करण्यात आली.  मागील दि. १४ पासुन  दि .१७ पर्यन्त चे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते . सोलापुर येथे १० नवीन रुग्ण आढळल्या पासुन तपासणी साठी ताण वाढल्याने विलंब होत असल्याची चर्चा होत आहे .
आजपर्यंत एकुण १७१ जणांचे स्वाबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. कालपर्यंत १४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. रात्री उशीरा सर्व १४ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती मिळाली. ही वार्ता उमरग्यात वाऱ्यासारखी पसरली. ही माहीती समजताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उमरगा कोरोना हॉस्पिटलचे हे मोठे यश आहे. त्या रुग्णावर चांगल्या पध्दतीचे उपचार देण्यात आल्याने हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच या रुग्णांची आणखी एक चाचणी होणे बाकी आहे. त्याचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रुग्णांसाठी परीश्रम व काळजी घेणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.आर.पुरी, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. जगताप यांच्यासह त्या रुग्णांच्या संमंधीधीत इतर डॉक्टर, व्यवस्थेसाठी असणाऱ्या नर्स व इतर सहाय्यकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पंतप्रधान यांनी जाहीर केलेले लॉक डाऊन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे हे यश आहे.
मात्र  सोलापूर येथे नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने प्रशासन काय खबरदारी घेते याकडे लक्ष लागले आहे.

25 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नऊ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

   तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 10  रुग्ण गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.  या कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातून आलेल्या सर्वांची तपासणी चालू असून  त्यामधून 25 जणांचे अहवाल  आज शुक्रवारी दुपारी निगेटिव्ह आले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.   तर नऊ जणांचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नसल्याचेही ते म्हणाले.  सोलापुरात आज नव्याने कोणताही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही किंवा त्याच्या संख्येत वाढ झाली नाही.  मात्र जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर  सिविल हॉस्पिटल मध्ये तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
 सोलापूर च्या सिविल हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्ड मध्ये 494 जणांचे टेस्ट आज अखेर झाली आहे . त्यापैकी 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 473 जणांचा कोरोना निगेटिव अहवाल आला आहे . तर बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यामध्ये या आधीच एक तेलंगी पाछा पेठ येथील किराणा दुकानदार मृत झाला आहे.  मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एक व्यक्ती व खाजगी हॉस्पिटल मध्ये काम  करणाऱ्या महिलेच्या संपर्कातील  नऊ व्यक्ती असे एकूण दहा नवीन कोरोना   रुग्ण गुरुवारी दुपारी आढळल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले होते.  सोलापूर जिल्ह्यात कोरणा पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या बारा इतकी झाली आहे या आधी एक किराणा दुकानदार  मयत झाला असून 11 कोरूना पॉझिटिव रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 शुक्रवारी दुपारी 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ जणांचे अहवाल वेटिंग वर आहेत.  आज अखेर कोणताही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.  नागरिकांनी घाबरू नये आपल्या घरातच बसावे व जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

नवाळवाडीत दोन लहानग्यासह आईची आत्महत्या

जत/प्रतिनिधी :
नवाळवाडी ता.जत येथील विवाहितेने दोन मुलासह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरूवारी उघडकीस आली.
बेबीजांन इब्राहिम नदाफ (वय 32),जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी फिर्याद पोलीस पाटील अविनाश पाटील यांनी दिली आहे.
जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शवविच्छेदणासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात तिघांचे मृतदेह आणण्यात आले.मातेसह दोन मुलांसह आत्महत्येचा प्रकार घडल्याने नवाळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच लहान मुलांच्या मृत्यूमुळे हळहळही व्यक्त होत आहे.

नांदुरी येथे वीज कोसळून बैल ठार

खानापूर(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथे गुरुवारी दि.16 रोजी मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज कोसळून एक बैलाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या  दरम्यान झालेल्या पावसात येथील शेतकरी तुकाराम पांडू भोजू त्यांच्या  शेतामध्ये झाडाखाली  बांधलेल्या त्यांच्या बैलाचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.हा बैल दगवल्याने त्यांचे अंदाजे 50 हजारापर्यंत नुकसान झाले.या घटनेचा पंचनामा तलाठी शिंदे एस.एम,पोलीस पाटील नंदिनी मुळूक यांनी केला आहे.
कोरोनाच्या संकटात अगोदरच अडचणीत असलेल्या  शेतकऱ्याला याचा अजून आर्थिक मोठा फटका बसला आहे.तरी शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोलापूर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 व्यक्तींची होणार तपासणी,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

   सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ येथे आज दुपारी नव्याने 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले  आहेत.  या दहा कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांना  जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची सिविल हॉस्पिटल येथे चाचणी करून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ठेवले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.   दरम्यान पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्युनंतर कोरोना  रिपोर्ट पॉझिटिव आला   होता या दुकानदाराच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणीत सोलापूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला ही पॉझिटिव्ह आढळली होती.  या पॉझिटिव महिलेच्या ताब्यातील 22 जणांची तपासणी सिविल प्रशासनाने केली होती त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव आढळले आहे तर मृत्यू किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका नातेवाईकाचा ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सोलापुरातील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या 11 वर गेली आहे.  गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत नव्याने आज दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगितले आहे.
.10 पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 49 जणांचे रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे ते रिपोर्ट काय येणार याची धाकधुक जिल्हा प्रशासन व सोलापूर शहर जिल्हावासीयांना लागली आहे.  पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची सिविल प्रशासनामार्फत तपासणी झाली असून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ऍडमिट करण्यात आले आहेत.
.् सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठ केंद्रबिंदू मानून त्याच्या आजूबाजूचा एक किलोमीटर परिसर सील केलेला आहे.    जिल्हाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार   सील केलेल्या परिसरात दररोज सात हजार 261 घरांची तपासणी सुरू असून 46 हजार 429 जणांची तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले.   या तपासणी मोहिमेत 32 व्यक्तींना किरकोळ लक्षणे असल्याचे आढळले आहे तर दोन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहेत.
    स्थलांतरित परजिल्ह्यातील जे मजूर सोलापूर शहर जिल्ह्यात आले आहेत त्यांच्यासाठी निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली असून सोलापूर शहर जिल्ह्यात  65 निवारा केंद्र तयार करण्‍यात आले असून त्यामध्ये 5231 स्थलांतरित मजूर कामगार आहेत त्यांना मोफत पणे मेडिकल सुविधा जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
  पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईनुसार 2510 जणांवर प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून 233 जणांना अटक झाली आहे तर 7233 दुचाकी वाहने व इतर वाहने जप्त केले असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.