सोलापूर -सोलापुरात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत चे रिपोर्ट सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आले आहेत. आज सोलापूर शहरातील पाच्छा पेठ येथे नव्याने कोरोना पॉझिटिव आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे . कालपर्यंत तेरा रुग्णांची असलेली संख्या आता 14 वर गेली आहे.
शुक्रवारी रविवार पेठ येथील जोशी गल्ली परिसरातील एका पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची खबर सोलापूरकरांना पर्यंत पोहोचली असतानाच आता शनिवारी सोलापूर शहरातील पाच्छा पेठ येथे नव्याने रुग्ण आढळला आहे.
या रुग्णांवर सोलापूरचा सिविल हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले. . सोलापूरकरांनी घाबरू नये आपल्या घरातच बसावे नेहमी हात स्वच्छ धुवावे व नेहमी तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरावे असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूरकरांना केले आहे.
सोलापुरातील पाच्छा पेठेत नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 14 वर
दिलासादायक; उस्मानाबाद ‘त्या’ तिघांचे अहवाल निगेटिव्ह, आजपर्यंतचे सर्व स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह
उमरगा( प्रा.युसुफ मुल्ला) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना विषाणु्चे प्रादुर्भाव झालेले तीन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकासह सर्व व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १४ एप्रील पुर्वी पर्यंतचे सर्व चाचणी अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र १४ एप्रीलचे ५, १५ एप्रील चे २ व १६ एप्रिल चे ७ असे एकुण १४ जनांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते. या चौदा जणांच्या अहवालामध्ये ‘त्या’ तिन पॉजिटीव्ह रुग्णांचे परत घेण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल येणार असल्याने याकडे जिल्हयासह राज्याचे लक्ष लागले होते.
पुणे येथे तपासणीसाठी स्वॅब पाठवल्यापासुन साधारण दुसऱ्या दिवशी रात्री पर्यन्त चाचनी अहवाल प्राप्त होत होते . परंतु नंतर सोलापुर येथे तपासणीची सोय करण्यात आली. मागील दि. १४ पासुन दि .१७ पर्यन्त चे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नव्हते . सोलापुर येथे १० नवीन रुग्ण आढळल्या पासुन तपासणी साठी ताण वाढल्याने विलंब होत असल्याची चर्चा होत आहे .
आजपर्यंत एकुण १७१ जणांचे स्वाबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. कालपर्यंत १४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. रात्री उशीरा सर्व १४ जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती मिळाली. ही वार्ता उमरग्यात वाऱ्यासारखी पसरली. ही माहीती समजताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उमरगा कोरोना हॉस्पिटलचे हे मोठे यश आहे. त्या रुग्णावर चांगल्या पध्दतीचे उपचार देण्यात आल्याने हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच या रुग्णांची आणखी एक चाचणी होणे बाकी आहे. त्याचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रुग्णांसाठी परीश्रम व काळजी घेणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.आर.पुरी, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. जगताप यांच्यासह त्या रुग्णांच्या संमंधीधीत इतर डॉक्टर, व्यवस्थेसाठी असणाऱ्या नर्स व इतर सहाय्यकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पंतप्रधान यांनी जाहीर केलेले लॉक डाऊन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे हे यश आहे.
मात्र सोलापूर येथे नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्या दृष्टीने प्रशासन काय खबरदारी घेते याकडे लक्ष लागले आहे.
25 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नऊ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती
तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 10 रुग्ण गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातून आलेल्या सर्वांची तपासणी चालू असून त्यामधून 25 जणांचे अहवाल आज शुक्रवारी दुपारी निगेटिव्ह आले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तर नऊ जणांचे अहवाल अद्यापही प्राप्त झाले नसल्याचेही ते म्हणाले. सोलापुरात आज नव्याने कोणताही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही किंवा त्याच्या संख्येत वाढ झाली नाही. मात्र जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर सिविल हॉस्पिटल मध्ये तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सोलापूर च्या सिविल हॉस्पिटल मधील आयसोलेशन वार्ड मध्ये 494 जणांचे टेस्ट आज अखेर झाली आहे . त्यापैकी 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 473 जणांचा कोरोना निगेटिव अहवाल आला आहे . तर बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत . त्यामध्ये या आधीच एक तेलंगी पाछा पेठ येथील किराणा दुकानदार मृत झाला आहे. मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एक व्यक्ती व खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या महिलेच्या संपर्कातील नऊ व्यक्ती असे एकूण दहा नवीन कोरोना रुग्ण गुरुवारी दुपारी आढळल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले होते. सोलापूर जिल्ह्यात कोरणा पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या बारा इतकी झाली आहे या आधी एक किराणा दुकानदार मयत झाला असून 11 कोरूना पॉझिटिव रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ जणांचे अहवाल वेटिंग वर आहेत. आज अखेर कोणताही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरू नये आपल्या घरातच बसावे व जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
नवाळवाडीत दोन लहानग्यासह आईची आत्महत्या
जत/प्रतिनिधी :
नवाळवाडी ता.जत येथील विवाहितेने दोन मुलासह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरूवारी उघडकीस आली.
बेबीजांन इब्राहिम नदाफ (वय 32),जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी फिर्याद पोलीस पाटील अविनाश पाटील यांनी दिली आहे.
जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शवविच्छेदणासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात तिघांचे मृतदेह आणण्यात आले.मातेसह दोन मुलांसह आत्महत्येचा प्रकार घडल्याने नवाळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच लहान मुलांच्या मृत्यूमुळे हळहळही व्यक्त होत आहे.
नांदुरी येथे वीज कोसळून बैल ठार
खानापूर(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथे गुरुवारी दि.16 रोजी मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज कोसळून एक बैलाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेल्या पावसात येथील शेतकरी तुकाराम पांडू भोजू त्यांच्या शेतामध्ये झाडाखाली बांधलेल्या त्यांच्या बैलाचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.हा बैल दगवल्याने त्यांचे अंदाजे 50 हजारापर्यंत नुकसान झाले.या घटनेचा पंचनामा तलाठी शिंदे एस.एम,पोलीस पाटील नंदिनी मुळूक यांनी केला आहे.
कोरोनाच्या संकटात अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला याचा अजून आर्थिक मोठा फटका बसला आहे.तरी शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोलापूर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 व्यक्तींची होणार तपासणी,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ येथे आज दुपारी नव्याने 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या दहा कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची सिविल हॉस्पिटल येथे चाचणी करून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ठेवले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. दरम्यान पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्युनंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला होता या दुकानदाराच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणीत सोलापूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला ही पॉझिटिव्ह आढळली होती. या पॉझिटिव महिलेच्या ताब्यातील 22 जणांची तपासणी सिविल प्रशासनाने केली होती त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव आढळले आहे तर मृत्यू किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका नातेवाईकाचा ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सोलापुरातील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या 11 वर गेली आहे. गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत नव्याने आज दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगितले आहे.
.10 पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 49 जणांचे रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे ते रिपोर्ट काय येणार याची धाकधुक जिल्हा प्रशासन व सोलापूर शहर जिल्हावासीयांना लागली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची सिविल प्रशासनामार्फत तपासणी झाली असून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ऍडमिट करण्यात आले आहेत.
.् सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठ केंद्रबिंदू मानून त्याच्या आजूबाजूचा एक किलोमीटर परिसर सील केलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सील केलेल्या परिसरात दररोज सात हजार 261 घरांची तपासणी सुरू असून 46 हजार 429 जणांची तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले. या तपासणी मोहिमेत 32 व्यक्तींना किरकोळ लक्षणे असल्याचे आढळले आहे तर दोन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहेत.
स्थलांतरित परजिल्ह्यातील जे मजूर सोलापूर शहर जिल्ह्यात आले आहेत त्यांच्यासाठी निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली असून सोलापूर शहर जिल्ह्यात 65 निवारा केंद्र तयार करण्यात आले असून त्यामध्ये 5231 स्थलांतरित मजूर कामगार आहेत त्यांना मोफत पणे मेडिकल सुविधा जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईनुसार 2510 जणांवर प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून 233 जणांना अटक झाली आहे तर 7233 दुचाकी वाहने व इतर वाहने जप्त केले असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
सोलापूरात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह
–
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे.एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत.या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या रिपोर्ट नुसार सविस्तर सांगायचे झाल्यास, 16 एप्रिल गुरुवारच्या दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार म्हणजे आता दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार ज्या दहा व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत त्या पैकी नऊ कोरोना पॉझिटिव व्यक्ती या खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या संपर्कातील आहेत. या नऊ व्यक्ती तेलंगी पछा पेठ परिसरातील आहेत. तर दहावा कोरोना पॉझिटिव व्यक्ती हा मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कातील असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
.ती प्रथम कोरोना पॉझिटिव आढळलेली महिला तसेच त्यांच्या संपर्कातील आता दुपारी आलेल्या इतर दहा व्यक्ती असे एकूण अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात आहेत. त्यामुळे कोणीही घाबरू नये घरातच राहावे मास्कचा वापर करावा व आपले हात वारंवार साबणाने धुवावेत हे काही शंका व काही लक्षणे दिसत असल्यास जिल्हा आरोग्य प्रशासनास तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्ण आहेत. आत्ताच्या आलेल्या रिपोर्टनुसार दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या इतर संपर्कातील व्यक्तींचाही जिल्हा प्रशासन शोध घेणार आहे त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासनास आरोग्य प्रशासनास महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
या सर्वाच्या शेवटी सांगायचे झाले असल्यास खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करणारी जी महिला नर्स पॉझिटिव्ह आढळली आहे त्याच्या संपर्कातील 22 पैकी नऊ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
व हे सर्व व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील आहे.
कोरोना पॉझिटिव्ह या सर्व व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहेत कोणीही घाबरू नये अफवा पसरू नये आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल- ऍड.प्रकाश आंबेडकर
तासगाव (राहुल कांबळे)
लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन येत्या 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉक डाऊनला विरोध केला.लॉक डाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची पाळी येईल. अशी भीती या कामगारांना वाटली आणि त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला. या अगोदर ही शासनाला आपण विनंती केली होती की शासनाकडे अन्नधान्याचा साठा प्रचंड प्रमाणात आहे. दोन महिन्याचे अन्नधान्य मोफत वाटले असते तरी चालले असते, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची सुरुवात वांद्रे येथे झाल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. शासनाने कृती करण्याऐवजी आम्ही 21 दिवसांमध्ये कोरोना कसा थांबवला त्याचे ते गुणगान करीत राहिले. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा,मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही किंवा तसा खुलासाही झाला नाही. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे जागे व्हा आणि कामाला लागा अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली.
दरम्यान, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी अशाच कामगारांनी सरकार विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनावरील नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ आता गुजरातमध्येही लॉक डाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. असे उठाव देशभर होणार असल्याचे संकेत प्रकाश आंबेडकरानी काही तास उलटत नाही तोच सुरत मध्ये आंदोलन झाल्याने आता हा इशारा प्रत्यक्षात रस्त्यावर दिसून आला आहे.



























