Home Blog Page 295

आम्हाला धान्य द्या, शिवसेना कार्यालयाबाहेर महिलांचा ठिय्या

उस्मानाबाद – आमच्याकडे रेशन कार्ड नाही आमची लेकरं बाळ उपाशी आहेत आम्हाला धान्य द्या अशी मागणी करत शहरातील अमृत नगर भागातील ३० ते ४० महिला जिल्हा शिवसेना कार्यालयाच्या बाहेर २ तास ठिय्या मांडून बसल्या होत्या.
याबाबत माहिती अशी की सध्या कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे.अनेकांच्या हाताला काम नाही. शहरात रोजी रोटी क मवण्यासाठी मजुरी, धुणीभांडी करणाऱ्या महिलांचे हाल होत आहेत. अश्याच काही महिला आम्हाला धान्य द्या या मागणीसाठी नगरपालिकेच्या जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर जमा झाल्या तिथे येण्या पूर्वी त्या खासदार ओमराजे यांच्या कडे गेल्या होत्या मात्र त्यांना तुम्ही नगरपालिकेकडे जा असे सांगण्यात आल्याने त्या शिवसेना कार्यालयासमोर आल्याचे उपस्थित महिलांनी  सांगितले. जमा झालेल्या महिलांना विचारले असता त्या आम्ही स्वतःहून आल्याचे सांगितले. आमच्याकडे रेशन कार्ड नाही. हा रोग आला नसता तर आम्ही काम करून खाल्लं असतं. रेशन देता येत नसेल तर उस्मानाबाद चालू करा आम्ही काम करून खाऊ असे महिलांचे म्हणणे होते. त्यानंतर नगरपालिकेतील कर्मचारी सांगळे आणि त्यांचे दोन सहकारी तिथे आले त्यांनी त्या महिलांची यादी बनवून त्यांचे आधारकार्ड व्हॉट्स अप वर पाठवण्यास सांगितले आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही आश्याना धान्य देण्याची ग्वाही दिली यानंतर महिला तेथून उठून आपापल्या घराकडे गेल्या.

https://youtu.be/oRU-bH5Nlsg

दैनिक जनमत २१ एप्रिल E पेपर

सांगली जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
 विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधीत झालेल्या व काल मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये  सदर रूग्णाच्या कुटुंबातील ५ व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी यांचे अहवाल सकाळीच प्राप्त झाले होते व ते निगेटीव्ह होते. रूग्णाच्या मुलाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून तो ही निगेटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य ११ जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते त्यांचेही अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून ते ही निगेटीव्ह आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
तर इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या २७ रूग्णांपैकी २६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

त्या तीन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह, लवकरच मिळणार डिस्चार्ज

उस्मानाबाद – जिल्ह्यात कोरोना पाॅझीटीव्ह आढळलेल्या रुग्णाचे अंतिम अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. त्या तीनही रुग्णांना आज दिनांक २० रोजी डिस्चार्ज देणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात २ एप्रिलला उमरगा तालुक्यातील बलसुर येथे  पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर लोहारा तालुक्यात एक आणि उमरगा येथे तिसरा रुग्ण आढळला होता. या तीनही रुग्णांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली ती निगेटीव्ह आल्याने  तूर्तास उस्मानाबाद जिल्हा कोरोना
मुक्त झाला असे म्हणता येईल.

मेडिकल दुकानांना ५५ औषधांचा साठा ठेवण्याचे निर्देश

दिल्ली –
देशात  आठ लाख पेक्षा अधिक मेडिकल दुकाने आहेत. त्यांना महत्वाच्या ५५ औषधांचा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्यात प्रतिजैविके, हृदयविकाराची औषधे यांचा समावेश आहे. या सर्व औषधांची गरज कोरोनाचा अती दक्षता  विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी होऊ शकतो. 
या औषधांमध्ये रक्तदाबाच्या उपचारात वापरण्यात येणारी
 एड्रेनालाईन, एट्रोलपाइन, एमियोडारोन, फेंटानिल, साल्बुटामॉल, सिप्लोफॉक्सिसीन, मेटरोनिडेजॉल  यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील सांगली शहरातील विजयनगर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
सांगली शहरातील विजयनगर, येथील न्युमोनिआचा रूग्ण असणाऱ्या एकाची कोरोना चाचणी  पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर व्यक्तीच्या राहत्या घरापासून १ कि.मी. त्रिजेचा परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिघाबाहेरील ५ कि.मी. त्रिजेचा परिसर बफर झोन केला आहे. ५५ ठिकाणी बॅरीगेटस् लावण्यात आले आहेत. सदर कोरोना बाधीत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या २७ व्यक्तींना आयसोलेशन / इंस्टीट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवून कोरोना चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोरोना बाधीत व्यक्तीवर १७ एप्रिल पासूनच मिरज सिव्हील येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तींने कोणत्याही प्रकारचा पदरेस प्रवास केलेला नाही. तसेच कोरोना पॉझीटीव्ह पेशंटच्या सानिध्यात आल्याचेही अद्यापपर्यंत निदर्शनास आलेले नाही. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम डिस्ट्रीक्ट रॅपीड रिसपॉन्स टीम मार्फत सुरू असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कंटेनमेंट झोन मध्ये महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेमार्फत ५० घरांमागे एक पथक नेमून पुढील १४ दिवस सर्व्हे करण्यात येणार आहे. बफर         झोन मध्येही घरोघरी सर्व्हे करण्यात येईल. फिवर क्लिनिक सुरू करण्यात आली असून मागणीनुसार अधिकची फिवर क्लिनिक सुरू करण्यात येतील. कंटेनमेंट झोन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक साधन सामुग्री देण्यात येत आहे. निर्जंतुकीकरणाची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. ज्या ठिकाणाहून वाहने प्रवेश करतील व बाहेर जातील अशा ठिकाणी वाहनांचेही सॅनिटायझेशन करण्यात येईल. महापालिकेमार्फत कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा देण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना बाधीत रूग्णाची प्रकृती गंभीर आहे. कोविड-१९ च्या प्रोटोकॉल नुसार ट्रिटमेंट सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

वादळी वाऱ्यासह पाऊस; सोलापूर ,उस्मानाबाद जिल्ह्यात मोठे नुकसान हिंगणीत द्राक्ष बाग भुईसपाट

सोलापूर – अवकाळी पावसाने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप येथे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले विजेचे पोलही कोसळले होते. तर उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथेही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हिंगणी (पा)येथील द्राक्ष  उत्पादक शेतकरी राजेंद्र गव्हाणे यांची द्राक्ष बाग वादळी वाऱ्या व मुसळधार पावसामुळे भुईसपाट झाली आंदाजे 8 ते 9 लाख रुपये नुकसान झाले आहे.
देशावर आलेले कोरोनाच संकट व वाढणारा संसर्ग लक्षात घेत देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.त्यामुळे द्राक्षसह सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत. एकिकडे कोरोनाच संकट व दुसरीकडे निसर्गाची मारा यामध्ये शेतकरी अडकला आहे.हिंगणी गावचे तलाठी मिलिंद सावंत,कृषी सहाय्यक विनोद जगदाळे,पोलीस पाटील सुर्यकांत पाटील यांनी द्राक्ष बागेत जाऊन पंचनामा केला.

पळसप येथे घरांचे झालेले नुकसान
वाघोली तालुका उस्मानाबाद येथे जलमय झालेली शेती

सोलापूर शहरातील कुमठा नाका इंदिरानगर परिसरातील 69 वर्षीय महिलेचा कोरोना ने मृत्यू जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

 सोलापूर – शहरातील कुमठा नाका इंदिरानगर परिसरातील 69  वर्षीय एका महिलेचा कोरोना आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुपारी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.  सदरची महिला कोरोना बाधित आढळली आहे.  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या महिलेचे निधन झाले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.   सोलापूर शहरात कोरोना आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या दोन इतकी झाली आहे तर अद्यापि 13 कोरोना   पॉझिटिव रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
. .. सोलापूर शहरातील तेलंगी पछा पेठ येथील एक किराणा दुकानदार सुरुवातीस कोरोना  पॉझिटिव्ह आढळला होता मात्र त्याचा अहवाल येण्याआधीच तो मृत झाला होता.  आता किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर इंदिरा नगर कुमठा नाका परिसरातील एका महिलेचाही कोरोना बाधित उपचाराने  मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  . सोलापुरात कोरोना बाधित तेरा रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डात उपचार घेत आहेत.   यापैकी 12 रुग्ण पाच्छा पेठ येथील आहेत,  तर एक रुग्णांना रविवार पेठ जोशी गल्ली येथील आहे.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात 718 व्यक्ती ऍडमिट होते त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 490 व्यक्ती या कोरोना निगेटिव्ह आढळल्या आहेत व आतापर्यंत 15 व्यक्ती या  कोरोना पॉझिटिव आढळले आहेत.  यापैकी  दोन पेशंट मृत झाले आहेत. कुमठा नाका इंदिरानगर परिसर शनिवारी रात्रीच्या सुमारास सिल करण्यात आला आहे.  महापालिकेचे आरोग्य पथक ही इंदिरानगर परिसरात जाऊन घरोघरी तपासणी करत आहे.  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या संपर्कातील आठ व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आल्याचे सांगितले आहे.  इतर व्यक्तींचाही शोध ही परिसरात सुरू आहे.

सांगली शहरात कोरोनाचा एक नवा रुग्ण जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती

तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
सांगली महापालिका क्षेत्रातील विजयनगर येथे राहणारा व सांगली शहरातील एका सहकारी बँकेत नोकरी असणारा एका इसमास निमोनिया चा त्रास जाणवू लागल्याने त्याला १७ एप्रिल रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान करत सदरचा रुग्ण ज्या विजयनगर भागात राहतो तो संपूर्ण भाग सिल केला आहे. इस्लामपूर येथील एकाच कुटुंबाशी संबंधित २६ रुग्ण कोरोना बाधित होते. त्यापैकी २५ रुग्णांची अंतिम चाचणीही निगेटिव्ह आली असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला होता परंतु त्यातच सांगली शहरांमध्ये नवा कोरोना सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे त्या व्यक्तीच्या घरातील व इतर संपर्कात कोणी आला असेल त्यासाठी प्रशासनाकडून योग्य तपासणी सुरू आहे. त्यामुळे सांगली शहर व परिसर सील करून प्रशासनाने सर्व हालचाली गतिमान केल्या आहेत.