उस्मानाबाद – ११ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात कोव्हीड १९ ( कोरोना) चा रुग्ण आढळून आला आहे. त्यानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी परांडा तालुक्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत त्यानुसार तालुक्यात ठराविक आस्थापना चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार
शासकीय / निमशासकीय कार्यालये , पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा – या आस्थापना, सर्व बँका , दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा – या आस्थापना, अन्न , भाजीपाला , दूध, किराणा पुरविणा – या आस्थापना ( सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहतील ), दवाखाने , वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने ,विद्युत पुरवठा . ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने , प्रसार माध्यमे , मिडीया ,अत्यावश्यक सेवा देणा – या आय . टी . आस्थापना . चालू राहणार आहेत वरील सर्व आस्थापना सोडून बाकी सर्व आस्थापना १७ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेशा मध्ये म्हटले आहे.
परंडा तालुक्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश केवळ या आस्थापना सुरू राहणार
ग्रीन झोन उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव
उस्मानाबाद – ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबई येथून प्रवास करून आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. २ एप्रिल रोजी उमरगा तालुक्यात पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर आणखी दोन रुग्ण आढळले होते काही दिवसापूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते त्यानंतर जिल्हा ग्रीन झोन मध्ये गेला होता.
आमराईत बसला सावळा विठू आणि माता रुक्मिणी
मगरवाडी / प्रतिनिधी
आज संकष्टी चुतुर्थी निम्मित दि. १० मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास ३१०० रत्नागिरी हापुस आंब्यानी व आंब्याच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झाले.
आमराईत नटली विठू-रखुमाई
वैशाख संकष्टी चतुर्थी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आंब्याची नेत्रदीपक आरास करण्यात करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या 3100 हापूस आंब्याने श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे
श्री विठ्ठला प्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी बा…विठ्ठलाच्या चरणी श्री विठ्ठल भक्त हरीश बैजल (अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल) अजय सालुखे (उद्योगपती पुणे), उमेशभाई भुवा (सांगली) दीपकभाई शहा (सांगली) सुनील उंबरे (पंढरपूर) या भक्तांनी आंब्याची पूजा अर्पण केली आहे.
आटपाडी पोलिसांनी पकडला गुटख्याचा टेम्पो ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
आटपाडी दि.10(प्रतिनिधी):
कर्नाटकातून कराडला आयशर टेम्पोमधून सुमारे 14 लाख,52 हजार रुपये किंमतीचा गुटखा घेऊन जात असताना आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर पकडून कारवाई केली. 7 मे रोजी रात्री 2 वाजता ही घटना घडली. 9 मे रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटख्याच्या पोत्यांसह आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातून रेडझोन असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर कराडकडे गुटखा घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 46 बी एफ 4235) पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा,मेडिकल असा स्टिकर लावलेला होता. परंतु आरटीओचा परवाना नव्हता,अधिकृत पत्र काचेवर चिकटवले नव्हते. त्यामुळे दाट संशय आल्याने पोलीस शिपाई नाईक, घोरपडे, विशाल चव्हाण,देशमुखे व पोलीस मित्र यांनी कसून तपासणी केली. त्या टेम्पोच्या हौदात मागील बाजूस भुशाची पोती व त्यापुढील आतील बाजूस गुटख्याची पोती असल्याचे आढळून आले.टेम्पोचालक रूपचंद प्रेमचंद पांडे (वय 40,रा. महु,मध्य प्रदेश) याच्यासह 10 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो व 14 लाख,52 हजार, 288 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला.
परंतु हा गुन्हा नोंद होण्यास दोन दिवस उशीर लागला.महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारा गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मेघना समाधान पवार यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांच्या विविध नियमाखाली 9 मे रोजी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबले यांच्या सूचनेनुसार विटा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे व आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक खाडे, कराळे, पोलीस शिपाई देशमुखे, मोरे, अतुल माने या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
निर्णय प्रक्रियेतला सावळा गोंधळ? उस्मानाबादकरांच्या संयमाचा बांध फुटला?
उस्मानाबाद – आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला आणि किराणा समान खरेदीचा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने उस्मानाबाद करांच्या संयमाचा बांध फुटला असल्याची चर्चा आहे.
कोरोना च्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. केंद्र सरकारने रुग्ण संख्येवर रेड , ऑरेंज, आणि ग्रीन झोन तयार केले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. ग्रीन झोन चे श्रेय उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पाळलेल्या नियम आणि संयम दोन्ही मुळे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ चालू ठेवण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस ठरवले या निर्णयामुळे उस्मानाबाद शहरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. यात दोन व्यक्ती मध्ये अंतर ठेवण्याबाबत असणारा नियम पायदळी तुडवला गेला. शहरातील काळा मारुती परिसरात काही काळ वाहतूक कोंडीही झाली. हा सारा प्रकार एका निर्णयामुळे होत असेल तर जिल्हा प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जिल्हा प्रशासनाने तीन दिवस भाजी पाला विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दररोज भाजीपाला बाजारात विक्री करू शकत नाहीत परिणामी भाजी नाशवंत माल असल्याने ती खराब होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नियमांचे पालन व्हावे
कोरोना चा मुकाबला करण्यासाठी सरकार ज्या सूचना सांगत आहे त्याचे पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. आज उस्मानाबाद मध्ये झालेली गर्दी अनाठायी आहे. शासनाने आखून दिलेले नियम नागरिकांनी पाळावे असे आवाहन दैनिक जनमत च्या वतीने करण्यात येत आहे.



















































