Home Blog Page 291

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथेल धनंजय होनमाने शहीद पुळुज गावा सह पंढरपूर तालुका हळहळला

मगरवाडी  / प्रतिनिधी
 भामरागड तालुक्यातील  पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात
नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील क्युआरटी पथकातील पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने (वय26) हे आज हुतात्मा झाले. हुतात्मा धनंजय होनमाने यांचे गावातील एका मुलीशी विवाह ठरला होता. सुट्टीवर आल्यानंतर पुढच्या महिन्यात विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तानाजी होनमाने  यांचे शेतकरी कुटुंब आहे. त्यांना विकास आणि धनंजय होनमाने ही दोन मुले. धनंजय हा लहानपणापासूनच हुशार होता. पोलिस खात्यामध्ये भरती होवून देश सेवा करण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो तीन वर्षापूर्वी क्युआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी भरती झाला. धोरला भाऊ विकास हा उच्चशिक्षण घेत आहे. वडील तानाजी होनमाने आणि आई पुळज येथेच शेती करतात. अत्यंत हालाखीमध्ये धनंजयने आपले प्राथमिक शिक्षण पुळूज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले.
त्यानंतर तो पोलिस खात्यामध्ये भरती झाला.धनंजय हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार होता. त्यांच्या मृत्युने त्यांच्या आई वडीलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अलीकडेच लग्न ठरले होते. गावातील मुलीशी विवाह देखील पुढच्या महिन्यात होणार होता.
कर्तव्यावर असताना आज भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला.या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पुळूज गावावर शोककळा पसरली.

टाकळी(बें) येथे ५३ जण क्वारंटाईन

पाडोळी ( प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथे पुणे, मुंबई,  सोलापूर ,औरंगाबाद या शहरात अडकलेल्या व्यक्तींना शासनाने आपापल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या पट्टीने वाढली आहे.
    पहिल्या लॉकडाऊन पासून बाहेर गावाहून टाकळी(बें) गावात दाखल झालेल्याची संख्या २६५ इतकी झाली आहे. तर आज रोजी ५३ व्यक्ती हे क्वारंटाईन मध्ये आहेत. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत ही क्वारंटाईन लोकांची व्यवस्था करत नसल्याने अनेक लोक हे आपापल्या परीने स्वतःच्या शेतात क्वारंटाईन होत आहेत. जिल्हा परिषद शाळेत २५ व्यक्ती क्वारंटाईन असून २८ व्यक्ती हे शेतात क्वारंटाईन आहेत. या पुढे ही बाहेर येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथील ग्रामपंचायतने वेळीच दक्ष राहून शक्य होईल तेवढ्या व्यक्तींना येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करावे ,क्वारंटाईन व्यक्तीची पिणेचे पाणी, सांडपाणी, सुलभ शौचालय आदी बाबीची संपूर्ण व्यवस्था करावी अशी सुजाण नागरिकांतून मागणी होत आहे., कारण अधून मधून पाडोळी(आ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी येत असतात, अश्यामध्ये फक्त शाळेत क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीची तपासणी केली जाते मात्र शेतात असलेल्या व्यक्तीची तपासणी होत नाही आणि शेतात राहत असलेले व्यक्ती हे अनेकांच्या संपर्कात व सोशल डिस्टन्स ठेवत  नसल्याची चर्चा पूर्ण गावभर होत आहे, त्यामुळे टाकळी(बें) गावास कोरोनाचा धोका नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायतने बाहेर गावाहून येणाऱ्याची संख्या ओळखून क्वारंटाईन व्यक्तीची जिल्हा परिषद शाळेत पूर्ण व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

जत नागरपरिषदेला उशिरा सुचलेले शहाणपण ; कोरोना संदर्भात दोन महिन्यानंतर लावली मीटिंग

जत /प्रतिनिधी:
कोरोना महामारी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जत नगरपरिषदेच्या वतीने आज ४ वाजता जी मीटिंग बोलावली आहे हे जत नागरपरिषदेला उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा गंभीर आरोप जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेता विजय ताड यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील अशी एकमेव नगरपरिषद असेल की जी विरोधी पक्षनेता आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन काम करत आहे. कोरोना महामारी मध्ये सध्या जगात यावर शासन गंभीर होऊन महाराष्ट्रासह देश लॉकडाउन चा सामना करत आहे पण जतची नगरपरिषदचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा हुकूमशाही पद्धतीने भोंगळ कारभार करीत आहे.
लॉकडाउन २२ मार्च पासून चालू झाले आहे तेंव्हा पासून कोणत्याही नगरसेवकाला नगरपरिषदच्या वतीने कोणकोणत्या उपाय योजना करत आहे याबाबत कधीही मिटिंग न घेता मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी मिळून जत मधील जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग चालू केला आहे
नगरपरिषदेच्या वतीने केलेली औषध फवारणी ही केवळ दिखावा करून जनतेचे दिशाभूल करत या औषधाने साधे जंतू सुद्धा मेला नाही यामधून केवळ लाखोंची मलई खाण्याचा उदयोग सत्ताधारी मंडळी करीत असल्याचा आरोप ही ताड यांनी केला.



जत नगरपरिषदेने कोरोना संदर्भात आज ४ वाजता जी घेतलेली बैठक हा केवळ दिखावा असल्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज या बैठकीवर बहिष्कार टाकत आहे अशी माहिती विरोधी पक्षनेता विजय ताड यांनी ही दैनिक जनमत शी बोलताना दिली .


अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रतिकारशक्ती वाढविणारे आर्सेनिकम अल्बम 30 हे होमिओपॅथी औषध उपलब्ध करून द्या.–आ.राणाजगजीतसिंह पाटील



उस्मानाबाद –
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाचे हजारो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील काळात देखील याच पद्धतीने काम करावे लागणार आहे.त्यामुळे या सर्व आघाडीवर लढणाऱ्या बांधवांची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.आयुष मंत्रालयाने प्रतिकारशक्ती वाढीसाठी ‘Arsenicum Album 30’ या होमिओपॅथी औषधाची शिफारस केली आहे.जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी ‘Arsenicum Album 30’ औषध उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.
कोविड-१९ वर मात करण्यासाठी विविध स्तरावर आपण लढा देत आहोत. दि.१४मे  रोजी कळंब शहरातील एक महसुल कर्मचारी कोविड-१९ विषाणुने बाधीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु तो रुग्ण कोणाच्या संपर्कामुळे बाधीत झाला हे अद्दयाप स्पष्ट नाही. अशा उद्भवलेल्या आपतकालीन परिस्थितीत आपणास  दैनंदिन काम करावे लागणार आहे व त्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढविणेही गरजेचे असल्याचे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कोविड-१९ चा सामना करण्यासाठी भारत सरकारच्या  आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदीक उपचारांसह प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी होमिओपॅथी औषधांबाबत माहिती देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पोलीस खाते व राज्यातील अनेक ठिकाणी तसेच जगभर ‘Arsenicum Album 30′ या प्रतिबंधात्मक औषधांचा प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी उपयोग करण्यात येत असल्याची माहिती आ.पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.
या अनुषंगाने आ.पाटील यांनी  संबंधित तज्ञ डॉक्टर व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता सर्वांनी  प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी ‘Arsenicum Album 30′ हे होमिओपॅथी औषध योग्य असल्याचे मत व्यक्त केलं आहे.त्यांनी आपल्या पत्रासोबत आयुर्वेद, योग्य व प्राकृतिक चिकित्सा, युनानी व होमिओपॅथी (आयुष) मंत्रालय, भारत सरकारचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेले पत्र पाठवले असून दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देणाऱ्या नामांकीत उत्पादकांकडूनच हे औषध घेण्यात यावे असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाभरात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस,आशा सेविका, पोलीस, महसूल, शिक्षक नगर विकास आणि ग्रामविकास आदी विभागाच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी प्रती कुटुंबसंख्या सरासरी ५ प्रमाणे गृहीत धरुन पहिल्या टप्प्यात १५००० कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ च्या निधीमधून Arsenicum Album 30′ हे होमिओपॅथी औषध उपलब्ध करून देण्याची मागणी आ.पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे

सी एस सी केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ;आर्थिक मदत देण्याची मागणी

खानापूर(बालाजी गायकवाड)कोरोनाच्या संकटाने सी एस सी केंद्र बंद असल्याने केंद्रचालकांवर उपसमारीची वेळ आली आहे.त्यांना जगणे मुश्किलीचे झाले आहे. आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  सी एस सी केंद्रचालक शासनाचे सर्व प्रकारचे उपक्रम,विविध सेवा ,शेतकऱ्याचे विविध योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करतात.शेतकऱ्यांचा विमा भरणे,आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवणे,किसन क्रेडीड कार्ड अश्या केंद्रासरकरच्या व राज्यसरकारच्या  अनेक योजना लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे 23 मार्च पासून केंद्र बंद अवस्थेत आहेत.केंद्र बंद असल्याने त्यांच्यावर उत्पन्नचा स्रोत बंद झाला आहे.केंद्राचालक हे सुशिक्षित बेरोजगार आहेत.ते या सी एस सी केंद्राच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागवत होते परंतु कोरोनाच्या महामारीने केंद्र बंद झाली आहेत.या केंद्रावर वर अवलंबून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता परंतु केंद्र बंद झाल्याने त्यांची परिस्थिती अवघड झाली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . अनेक केंद्राचालकांचे केंद्र हे खाजगी मालकीच्या जागेत असल्याने त्यांना  जागेचे भाडे भरणे सुद्धा त्यांना कठीण झाले आहे.
    तरी शासनाने याची दखल घेत केंद्राचालकांना मदत करावी,आमच्यावर आलेली उपासमारीची वेळ आणखीन सुगम्य न होऊ देता आम्हाला मदत करावी. अशी मागणी उस्मानाबादचे जिल्हाधिकरी दिपा-मुधोळ मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आम्ही आजपर्यंत शासनाच्या अनेक योजना उपक्रम राबण्यासाठी कार्य केले यापुढील काळात शासनाचे मोठ्या उमेदीने उपक्रम योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहुन शासनाला सहकार्य करू  आम्हला आर्थिक मदत करावी असे मत उस्मानाबाद व्हीएलइ संघटनेचे अध्यक्ष अमितकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या महामारीस घाबरुन न जाता दक्ष राहुन प्रतिकार शक्ती वाढवा आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन


उस्मानाबाद –
१४ मे रोजी कळंब तालुक्यामध्ये ३ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले आहेत, या अनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सकाळी कळंब येथे भेट देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते व नागरिकांबरोबर चर्चा केली.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परीषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, कळंबचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व इतर अधिकारी उपस्थीत होते.
कळंब तालुक्यातील मौजे पाथर्डी येथील दाम्पत्य यांना कोरोनाची बाधा मुंबईत झाली असावी असा प्राथमीक अंदाज जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून व्यक्त करण्यात आला आहे. परंतु कळंब शहरातील रुग्णाला कोणाच्या संपर्कातून प्रादुर्भाव झाला आहे,
हे समजत नसल्याने अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे असे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कळंब शहराप्रमाणे जिल्ह्यातील इतर भागात मुंबई- पुण्यावरुन आलेल्या लोकांची संख्या जवळपास लाखाच्या पुढे आहे. त्यातील काही जण लक्षण दाखवत नसले तरी कोरोनाबाधीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकांक्ष रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसुन येत नसल्याने ते बाधीत आहेत किंवा नाही हे सहज रित्या समजु शकत नाही. अशा परिस्थितीत Covid-19 होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
केंद्राच्या आयुष (AYUSH) मंत्रालयाने आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, व युनानी उपचारा बाबतच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. प्रतिकार शक्ती वाढवावी लागणार या अनुषंगाने नजीकच्या काळात आपल्याला याबाबत ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.
कळंब शहरातील व तालुक्यातील नागरिकांसह जिल्हावासीयांना आवाहन करण्यात येत आहे कि, कोरोनाचे संकट अजून गंभीर झालेले आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्याला आपली दिनचर्या काळजी पूर्वक पूर्ण करावी लागणार आहे. आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, फेस मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे असुन, अशा गंभीर परिस्थीतीत उस्मानाबाद जिल्हयातील जनतेने घाबरुन न जाता दक्ष राहुन प्रतिकार शक्ती वाढवीण्यावर भर देण्याचे अवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना फटका परंडा तालुक्यात अवकाळी चा तडाखा

परंडा प्रतिनिधी-
 परंडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शुक्रवारी( दि 15 ) दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीस आलेली पिके ,फळबागा आदींचे मोठे नुकसान झाले आहे
 कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील
लॉकडाऊन,जिल्हाबंदी,बंद असलेले लिलाव ,कोणत्याच शेतमाला नसलेले बाजारभाव यातच काय भर कमी होती ते मेघगर्जनेसह होत असलेला वादळी पाऊस याच वादळी पावसात वाऱ्यामुळे कपिलापुरी ,आवार पिंपरी सह परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झले आहे  कपिलापुरी येथील महादेव  पाटील यांची उत्पादन देणारी लिंबोनी बाग भुईसपाट झाली आहे.२ एकर क्षेत्रावर असलेल्या लिंबोनी बागेतील उत्पादन देणारी तब्बल २५ झाडे जमीन दोस्त झाली आहेत.६ वर्षांपासून आलेली ही बाग सुसाट सुटणाऱ्या वादळी वाऱ्या पुढे तग धरू शकली नाही परिणामी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून  नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे