तासगाव( राहुल कांबळे)
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व आटपाडीचे नेते स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात किती आहे ते धनगर समाजातील तरुणांचे हृदयसम्राट भारतीय जनता पक्षाचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे जात असताना तासगाव मध्ये विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तासगाव तालुक्यातील मौजे नेते यांची राजकीय व सामाजिक कामातून वैयक्तिक नाळ जोडलेले नेते अरुण भाऊ खरमाटे, डॉ विवेक गुरव, भीमराव भंडारे, मनीषा मस्के, इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधला व पाच मिनिटे तासगावमध्ये थांबण्याची विनंती केली त्या विनंतीस मान देऊन आमदार पडळकर यांनी तासगाव मध्ये थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठा आमदार गोपीचंद पडळकर यांचा अरणगाव खरमाटे व डॅ. गुरव यांच्या असते सत्कार करण्यात आला. या छोटेखानी सत्कार आतून एवढेच जाणवले की बहुजन समाजातील एका छोट्या नेत्याला संघर्षातून एका मोठ्या पक्षाने आमदारकी देऊन बहुमत करण्यात आला त्यासाठी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या पक्षाचा अजेंडा व झेंडा बाजूला ठेवून त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला हे विशेष होय. यावेळी राजू मस्के, सुलेमान तांबोळी, योगेश कांबळे, शेखर पावशे, अमित देवकुळे,. विलासराव शिंदे सर, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांचे तासगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन
रावळगुंडवाडीत ३ लाख ७१ हजाराचे चंदन जप्त उपविभागीय पोलीस कार्यालयाची धडक कारवाई
जत/प्रतिनिधी:
रावळगुंडवाडी ता जत येथे १०६ किलोच्या चंदनाच्या झाडाची तोडून विक्रीसाठी नेत असताना उपविभागीय पोलिस आधिकारी यांच्या पथकाने पकडून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांना पोलिसांच्या खबऱ्या मार्फत माहीती मिळाली होती की, रावळगुंडवाडी गावमध्ये यल्लाप्पा लक्ष्मण माने रा.रावळगुंडवाडी ता. जत जिल्हा सांगली हा त्याचे रहाते घरी असले शेळया बांधणेकरीता पत्र्याचे सेडनेटमध्ये बेकायदा बिगर परवाना कोठूनतरी चोरुन चंदनाचे लाकडाचे तुकडे प्लॅस्टीकच्या पोत्यात भरुन त्याची चोरुन विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक श्री.सुभाष कांबळे, पोलीस नाईक विजय कालीदास अकुल, पोलीस नाईक सुनिल अशोक व्हनखंडे, पोलीस नाईक, वाहीदअली
जबरदस्त मुल्ला असे स्टाफसह रवाना होवुन बातमी प्रमाणे खात्रीकरुन आरोपी नामे यल्लाप्पा लक्ष्मण माने वय-४३ वर्षे रा. रावळगुंडवाडी ता.जत जिल्हा सांगली यास ताब्यात घेवून यातील एकुण मुददेमाल
३,७१,०००/- रुपये किंमतीची चंदनाची लाकडयांची तुकडे पोत्यात भरुन ठेवलेले एकुण १०६ किलो वजनाचे चंदन जप्त केले.
मा.पोलीस अधीक्षक श्री.सुहेल शर्मा,मा. अप्पर पोलीिस अधीक्षक मनिषा दुबुले मा.उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत श्री.दिलीप जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व उपनिरीक्षक सुभाष कांबळे,विजय कालीदास अकुल,सुनिल अशोक व्हनखंडे, वाहीदअली जबरदस्तअली मुल्ला यांनी खात्री केला मुददेमाल व आरोपीची माहिती दिली त्यानंतर उपविभागाकडील पोलीस स्टाफ गजंद्र नरसु भिसे, सागर नारायण पाटील, विठठल रामण्णा माळी, परमेश्वर नाना ऐवळे,
सुरेश व्हन्नाप्पा माळी, अशोक सुर्यवंशी, कांतीलाल हिप्परकर, गोविंद चव्हाण अनिल तुकाराम चव्हाण अशांनी तात्काळ घटनास्थळी येवुन सदरची कारवाई केली आहे. नमुद आरोपीस अटक करणेत आलेली आहे. पुढील तपास जत पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक विनायक शिंदे करीत आहेत.
बँक म्हणते सोनतारण ठेवून कर्ज घ्या ! किसान क्रेडिट कार्डची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला बँकेचा अजब सल्ला
इटकळ ( प्रतिनीधी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजनेला हरताळ फासण्याच काम बँका करीत असल्याचे दिसून येत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजेनेला अनुसरून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यासाठी नवी योजना आणली आहे. मात्र संबधित बँकेकडून शेतकऱ्यांना याचा लाभ न देता हरताळ फासत उडवा उडवी चे उत्तरे दिली जात आहेत.त्यामुळे बँकेत जाऊन शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येत आहे. मौजे शिरगापुर येथील शेतकरी विनायक जाधव यांनी या योजनेचा लाभ घेण्या साठी मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थी असल्याने त्यांचे मानधन तुळजापूर येथील कॅनरा बँक शाखा येथे जमा होत असल्याने त्यानुसार शेतकरी विनायक जाधव यांनी बँकेला किसान क्रेडिट कार्डची ऑन लाईन मागणी केली. बँकेचा किसान क्रेडिट कार्ड साठी संपर्क साधावा म्हणून एसएमएस आल्याने ते बँकेत जाऊन त्याची चौकशी केली असता.बॅंकेने ते देण्यास नकार दिला. किसान सन्मान योजनेचा मानधन ज्या बँकेत जमा होते. त्या बँकेकडे क्रेडिट कार्ड मागणी करणे आवश्यक असताना ही विनायक जाधव यांनी आशिष कुमार भूतान जॉइंट जनरल सेक्रेटरी भारत सरकार यांचे ६ फेब्रुवारी २०२० चे सर्क्युलर ची प्रत देऊन त्या नुसार तुम्ही मला या योजने चा लाभ द्यावा असे लेखी स्वरूपात मागणी केली. बँकेने त्यांना तुमचे गाव आमच्या क्षेत्रात येत नाही तसेच आपण कृषी सोने तारण कर्ज घेऊ शकता असे बँक शाखाधिकारी यांनी लेखी स्वरूपात दिले.आणि तुम्ही उगीच लेखी माहिती घेऊ नका तुमची चौकशी होऊन तुमच्यावर कारवाई होईल असे सांगितले.केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.जर कोणी बँकेकडे लेखी स्वरूपात माहिती मागितली तर मराठी भाषा अनिवार्य असतांना ही शेतकऱ्याना इंग्लिश मध्ये माहिती दिली जाते ती माहिती शेतकरी तरी वाचणार कस आणि माहिती मराठीतुन द्यावी म्हणून शेतकऱ्यानी बँकेकडे अर्ज केला तर बँक शाखाधिकारी एक महिन्याने मराठीत माहिती देऊ असे सांगतात. या अशा बँकेच्या मनमानी कारभारमुळे शासनाच्या शेतकऱ्यासाठी योजलेल्या योजेनेला हरताळ फासले जात असुन अगोदरच शेतकरी सतत येणाऱ्या संकटाने मोडकळीस आला आहे. तो उध्वस्त होताना दिसत आहे. यासाठी सर्व पक्षीय लोक प्रतिनधींनीही अधिक लक्ष घालावे अशी मागणी विनायक जाधव यांनी केली आहे. तसेच या संबंधी विनायक जाधव यांनी निवेदाद्वारे जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून बँकेला शासनाच्या योजनेची अंमबजावणीसाठी प्रवृत्त करावे.अशी मागणी शेतकरी विनायक जाधव यांनी केली आहे.
आटपाडी तालुक्यात कोरोनाने खाते खोलले! जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20
आटपाडी दि.19 (लक्ष्मणराव खटके):
आटपाडी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने खाते खोलले आहे.आटपाडी शहरामध्ये हा रुग्ण सापडला आहे.
आटपाडी येथे 29 वर्षाचा युवक दि.13 रोजी दिल्ली येथून पत्नी व तीन वर्षीय मुलगी समवेत आला होता.त्यामुळे त्यांना आटपाडी येथे एका लॉजवर कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.लक्षणे आढळल्याचे व किरकोळ ताप आल्यावरुन त्याला तपासणीसाठी पाठवले व मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्याचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो कोविंड 19 पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्याची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तो राहत असलेल्या लॉजपासून पाचशे मीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे.
आटपाडी तालुका आतापर्यंत कोरोनामुक्त राखण्यामध्ये प्रशासनाने मोठी जबाबदारी पार पाडली होती. परंतु गावाकडे येणारे लोंढेच्या लोंढे व त्यातून कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढत असतानाच आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. तहसीलदार सचिन लंगुटे, आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम,आरोग्य कर्मचारी गणेश राक्षे, आबासाहेब हाके तसेच प्रशासकीय व आरोग्य विभागाने तो राहत असलेल्या लॉजवर माहिती घेतली. पोलिस यंत्रणा आणखी सतर्क झाली असून संचारबंदीबाबत उपाययोजना करीत आहे.
दरम्यान,आटपाडी शहर आजपासुन विशिष्ट अटींवर सुरू करण्यात येणार होते.मात्र रात्री हा अहवाल समजताच वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता आटपाडी शहर पूर्णपणे बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला.
सांगली जिल्ह्यात 20 कोरोनाबाधित रुग्ण
आटपाडीसह सांगली जिल्ह्यात काल दोन रुग्ण सापडले. कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता. या व्यक्तीचा इस्लामपूर येथे स्वाब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला.कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात उपचाराखालील कोरोणाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे.
राजकीय आकसापोटी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाकारला, प्रस्ताव नामंजूरच करायचा होता तर त्यासाठी १ महिना वेळ का लावला ?- आ. सुजितसिंह ठाकूर
उस्मानाबाद – जिल्हा परिषदेने स्वनिधीतून जिल्ह्यातील १०००० गरजू कुटुंबाना धान्याचे किट देण्याचा निर्णय घेतला होता व याबाबत शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.त्यावर २० दिवस कसलाच निर्णय घेतला जात नाही, पुन्हा याबाबत निर्णय घ्या असा हायकोर्टचा आदेश आल्यावर तो प्रस्ताव नाकारला जातो,मात्र उस्मानाबादचे अनुकरण करून असाच प्रस्ताव पाठवणाऱ्या बीड जि.प ला मात्र पाच दिवसात मंजूरी दिली जाते.हे पाहता केवळ राजकीय आकसापोटी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाकारला आहे हे स्पष्ट होत असल्याचा आरोप करत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी प्रस्ताव नामंजूर करायचा होता तर त्यासाठी एक महिन्याचा वेळ का घेतला ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाकारणाऱ्या सरकारने बीड जि. प च्या प्रस्तावाला का मंजुरी दिली ?असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्हा परिषद स्वनिधीतून ही मदत करणार होती तर त्याला मंजुरी देण्यास सरकारला नेमकी काय अडचण होती ? हे जनतेसमोर आलं पाहिजे.सरकारने याबाबत निर्णय घेण्यासाठी १ महिन्याचा कालावधी घालवला त्यामुळे भयाण अशा संकट काळी जिल्ह्यातील १०००० गरजू कुटुंब गेली महिनाभर मदतीपासून वंचित राहिले याला जबाबदार कोण ? असा सवाल आ.ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाकारला जातो तर दुसरीकडे आमच अनुकरण करून नंतर प्रस्ताव सादर करणाऱ्या बीड जिल्हा परिषदेला तातडीने मंजुरी दिली जाते.हे अत्यंत दुर्दैवी असून भयाण अशा संकट समयी शासन राजकीय हेतूने सापत्न वागणूक देऊन गोरगरिबांना मदतीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप आ.ठाकूर यांनी केला आहे.
लॉकडाउन मुळे सर्व व्यवहार व कामकाज ठप्प झाल्याने हातावर पोट असलेल्या वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे.अशात यातील अनेकांकडे रेशन कार्ड उपलब्ध नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे.राज्य सरकार व केंद्र सरकार च्या मदतीपासून वंचित राहणाऱ्या या वर्गाला दिलासा देण्यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेवरून उस्मानाबाद जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील किमान १०००० रेशनकार्ड नसलेल्या व उपजीविकेचे कसलेच साधन नसलेल्या गोरगरिब कुटूंबाना स्वनिधीतून धान्याचे किट देण्याचा निर्णय घेतला होता.
आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत २५ एप्रिल व ७ मे असा दोन वेळा पत्रव्यवहार करून विनंती केली असता याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून आ.पाटील यांनी सध्याच्या अभूतपूर्व अशा संकटात राज्यातील इतर जिल्हा परिषदांना देखील याच पद्धतीने उपक्रम राबवण्याबाबत आदेश देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना
विनंती केली होती.वास्तविक पाहता सरकारने याबाबत निर्णय घेतला असता तर सध्याच्या परिस्थितीत,राज्यातील जिल्हा परिषदांनीअशाप्रकारे मदत केल्याने सरकारचा भार हलका होण्यास मदत झाली असती.परंतु गंभीर संकटकाळात सुद्धा सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुचवलेल्या रास्त उपाययोजनांकडे राजकीय चष्म्यातून पाहत आहे हे दुर्दैवी असल्याचे आ.ठाकूर यांनी म्हटले आहे.
एकीकडे शासन तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे म्हणत जनतेला दिलासा देण्यासाठी मदत ही करायची नाही आणि दुसरीकडे जिल्हा परिषद स्वनिधीतून मदत करायला तयार असताना त्यांना देखील परवानगी द्यायची नाही. अशा संकटकाळी सरकारच हे वागणं अनाकलनीय असल्याचे सांगत आ.ठाकूर यांनी सरकारवर सापत्न वागणूक देत असल्याचं सांगत,राज्यातील महाआघाडीचे सरकार राजकिय आकसबुद्धीने वागत असल्याने जिल्ह्यातील १०००० गोरगरिबांना मदतीपासून वंचित रहावे लागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
शोकाकुल वातावरणात पुळुज येथे शहीद धनाजी होनमाने यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मगरवाडी / प्रतिनिधी
पुळुज(ता.पंढरपूर)येथील भूमीपुत्र व पोलिस उप निरीक्षक धनाजी तानाजी होनमाने (वय२९)हे रविवार दिनांक १७ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पोयरकोटी-कोरपर्शी जंगलात नक्षलवादी यांच्या बरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले.शहीद धनाजी होनमाने यांच्या पुळूज या जन्मगावी सोमवार (दि १८)रोजी उपस्थित राहून राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री व सोलापूर चे पालक मंत्री मा ना दत्तात्रय भरणे व यशवंत माने व तसेच पंढरपूर चे आ.भारत(नाना)भालके यांनी शहीद धनाजी होनमाने यांच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून दर्शन घेतले.धनाजी यांना जि.प्र शाळेच्या पटांगणात अग्नी देण्यात आली या वेळी उपस्थितीनी आई,वडील व भाऊ यांच्याबरोबरच कुंटुंबाचे सांत्वन केले.व यावेळी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुंटुंबीयास १ कोटी,३८ लाख आर्थिक मदत,आई वडीलांना पेंशन व कुंटुंबातील एक जणास शासकीय सेवेत समावेश घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आ.यशवंत माने,आ.भारत भालके यांनी जाहीर केले.यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,सोलापूर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,प्रातधिकारी सचिन ढोले,तहसीलदार वैशाली वाघमारे ,उप विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पोलिस निरीक्षक किरण अवचर, उमेश परिचारक, सतिश जगताप, राजाराम बाबर अनेकांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी इतर मान्यवर, अधिकारी वर्ग व ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाॅकडाऊनमुळे पुणे येथून गावाकडे येणाऱ्या पती पत्नीचा अपघाती मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ३ कोरोना पाॅझिटीव्ह
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ३ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. यात कळंब तालुक्यातील २ आणि भूम तालुक्यातील एकाचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हि धोक्याची घंटा आहे. यापूर्वी एकूण सात रुग्ण आढळून आले होते त्यातील ३ जण यातून मुक्त झाले होते. गेल्या आठवड्यात परंडा तालुक्यात एक आणि कळंब तालुक्यात तिघे आढळून आले होते. आज कळंब तालुक्यातील दोघे जण बाधित आढळून आल्याने कळंब तालुका हॉटस्पॉट बनला आहे. ३ पैकी दोन महिला आहेत तर एक पुरुष आहे. दोन महिलांचे सासरे मुंबई येथे कोरोनाने दगावले होते. तर भूम येथील व्यक्ती मुंबई येथे दवाखान्यात काम करत होता.



























