कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील एक समृद्ध व आघाडीचे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राने भयाण अशा संकटात सापडलेल्या शेतकरी,हातावर पोट असलेले घटकांना एक नया पैशाचे आर्थिक पॅकेज दिले नाही याचा निषेध करण्यासाठी व लॉकडाउन मुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना ५०००० हजार कोटींची पॅकेज देण्यात यावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र देशातील एक प्रगत राज्य असताना सरकार शेतकऱ्यांना,बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना दिलासा देण्यासाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्याने ,झोपेचे सोंग घेतलेल्या ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.आंदोलन करताना सर्वांनी मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्री.सुरेशभाऊ देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, उपनगराध्यक्ष श्री.अभय इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, श्री.खंडेराव चौरे, गटनेते युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण पाठक, नगरसेवक अभिजित काकडे, गजानन नलावडे, संदीप कोकाटे, प्रल्हाद धत्तुरे, नामदेव नायकल, गणेश मोरे आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशन कार्ड नसलेले नागरिकांना कसलीच मदत मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.उस्मानाबाद जिल्हा परिषदेने अशा १०००० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला होता.त्याबाबत सरकारकडे परवानगी मागितली असता एक महिना वेळ घालवला व अचानक कोणतंही कारण न देता प्रस्ताव नामंजूर केला.सरकारच्या या निर्णयामुळे सदर १०००० कुटुंब गेली १ महिना मदतीपासून वंचित राहिली आहेत याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.
राज्यकर्ते उठता बसता छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करतात मात्र प्रत्यक्षात कारभार करताना महाराजांच्या तत्वांना तिलांजली देतात.गोरगरिबांना मदत करायची सोडून पैसा नसल्याचा खोटा आव आणतात. अशा सरकारला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का ?? असा सवाल यावेळी जेष्ठ नेते सुरेशराव देशमुख यांनी उपस्थित केला.
सरकारने येत्या कांही दिवसात जर याबाबत ठोस निर्णय घेऊन शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगार वर्गाला आर्थिक मदत केली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिला.
“महाराष्ट्र देशातील आघाडीचे व आर्थिक दृष्ट्या समृद्ध राज्य आहे.एकट्या मुंबई महापालिकेकडे ८० हजार कोटी रुपये पडून आहेत.दिल्ली सरकार रिक्षा व टॅक्सी चालक,कामगारांना ५००० रुपये देते,कर्नाटक सरकार धोबी,नाभिक बांधवाना ५००० रु देते तर फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना २५००० रु देते,आंध्रप्रदेश सरकार शेतकऱ्यांना १७५०० रु मदत करते मात्र महाराष्ट्र सरकार एक नया पैसा मदत करत नाही हे अत्यंत दुर्दैवी असून हे खपवून घेतले जाणार नाही.सरकारने राज्यातील शेतकरी,बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पडून असलेल्या ८० हजार कोटींपैकी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे.”
– राणाजगजीतसिंह पाटील
शेतकरी, बारा बलुतेदार व असंघटीत कामगारांना ५० हजार कोटींची पॅकेजसाठी भारतीय जनता पार्टीचे आंदोलन. मुंबई महापिलकेकडे पडून असलेल्या ८० हजार कोटींतुन सदर पॅकेज द्या..! -राणाजगजीतसिंह पाटील
कोरोनाने जिल्हाभर पसरले पाय प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग वाढत चालला आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. त्यात परंडा १, वाशी१, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असे नविन रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी सकाळी शिराढोण येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचा रुग्ण असल्याने धोका वाढत चालला आहे.
तुळजापुरात १०० बेडचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय..! आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेवरून तुळजापूर नगरपरिषद घेणार पुढाकार..
उमरगा शहरात एका रुग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह
उमरगा – शहरात एक रुग्ण पाॅझिटीव्ह आढळून आला आहे. तो रुग्ण पुणे येथून आला असून त्याच्यावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण उमरगा शहरातील एस. टी. कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण उमरगा तालुक्यात आढळून आला होता त्यानंतर आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली होती. त्याच्यासह इतर दोघांवर उपचार करून त्यांना कोरोना मुक्त केले होते. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मुंबई पुणे या ठिकाणावरून येणाऱ्यांची संख्या वाढली त्यातील काही जण कोरोनाबधीत आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे.
सांगली जिल्ह्यात शुक्रवारपासून जिल्हा अंतर्गत एसटी धावणार
तासगाव प्रतिनिधी
सांगली जिल्हांतर्गत एसटीची वाहतूक शुक्रवार (ता.२२) पासून सुरु होत आहे. त्याचे तपशीलवार नियोजन करण्याचे काम एसटी विभागाने सुरु केले आहे. एका आसनावर एक प्रवाशी या पद्धतीने प्रवास केला जाईल. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची माहिती जाहीर केली.
एसटी थांबली की सारं जग थांबल्यासारखं वाटलं. लाल परी रस्त्यावर धावायला लागली की आपलं जग धावायला लागतं. ही लाल परी गेल्या ६० दिवसांपासून बंद आहे. तीची चाकं थांबली आहेत… मात्र आता “हात दाखवेन, पण एसटीनंच जाईन’, असं म्हणणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. एसटीचा स्टार्टर आता लागणार आहे. चाकं पुन्हा धावू लागणार आहे. सिंगल बेल, डबल बेलचा आवाज घुमणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तसे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक शंभर टक्के बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रांर्गत आणि परराज्यातही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गावांना जोडणारी, महानगरांकडे धावणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी एसटी आता पुन्हा धावणार आहे. अर्थात, खूप कडक नियमांसह ती धावेल. त्यात एसटीमध्ये प्रवेश करताना हातावर सॅनिटायझर घ्यावे लागणार आहे. एरवी एसटीची प्रवासी क्षमता ही ५२ ते ५५ इतकी असायची. ती आता निम्म्यावर येईल. एकाच आसनावर एकालाच बसता येईल. त्यामुळे मला “विंडो सीट मिळेल का?’ अशी चिंता करण्याचे कारणच नाही.
अर्थात, या नियमामुळे एसटीचे भारमान एरवीच्या सरासरी भारमानापेक्षा खूपच खाली येणार हे निश्चित आहे. त्यामुळे दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अधिकारात आहेत. त्याबाबत कोणते आदेश येतात, याकडे लक्ष असेल.
असे असतील नियम
* केवळ जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु होणार
* एसटीत येताना हातावर सॅनिटायझर
* एका आसनावर एकच प्रवासी बसणार
* एसटीत बसताना मास्कची सक्ती असणार
* स्थानकावर लोकांना अंतर ठेवून बसवले जाणार
* प्रवाशांच्या संख्येनुसार एसटीचे वेळापत्रक ठरणार
आटपाडी तालुक्यात कोरानाचे आणखी नविन दोन रुग्ण
आटपाडी दि.२१(प्रतिनिधी):
आटपाडी तालुक्यात बुधवार दि. 20 रोजी कोरोनाचे आणखी नवीन दोन रुग्ण सापडले आहेत.तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे.आटपाडी नजीकच्या गोंदीरा येथील मरगळेवस्ती व पिंपरी बुद्रुक या गावातील प्रत्येकी एक रुग्ण आहेत.सांगली जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी सहा रुग्णांची भर पडली आहे.
आटपाडी शहराच्या दक्षिणेकडील गोंदीरा भागातील मरगळेवस्ती येथील 65 वर्षे वयाची व्यक्ती मुंबई(ठाणे)हून दि.17 मे रोजी आली. घराशेजारी झोपडीमध्ये ती व्यक्ती क्वारंटाईन झाली होती. परंतु सार्वजनिक ठिकाणी फिरू लागल्याने शाळेमध्ये क्वारंटाईन होण्यास विनंती करूनही त्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे शाळेमध्ये लवकर क्वारंटाईन होणेबाबत प्रशासनाने नोटीस दिली. दुसऱ्या दिवशी दि.१८ रोजी रात्री ८.३० वाजता राजारामबापू हायस्कूल येथे क्वारंटाईन केले.त्यास वेगळी खोली देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 रोजी सकाळी थोड्या प्रमाणात खोकला येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मिरज येथील कोरोना सेंटरमध्ये पाठवले.बुधवार दि.20 रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरी बुद्रुक येथील अकोल्याहून आलेल्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यात बुधवारी नवीन सहा रुग्णांची भर पडली असून कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईहून आलेल्या दोन व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेली एक व्यक्ती, मिरज येथील भारतनगर हडको कॉलनीतील एक महिला यांच्यासह आटपाडी तालुक्यातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आटपाडी ग्रामपंचायत हद्दीत दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सज्ज झाले आहे. तहसीलदार सचिन लंगुटे,गट विकास अधिकारी मधुकर देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, पोलीस व तालुका प्रशासन सतर्कतेने प्रतिबंधक उपाय राबवित आहे.
बाहेरगावाहून आलेले नागरिकच कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी कोणाशीही संपर्कात न येता योग्य त्या सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.प्रशासनाने ठरवून दिलेले नियम जर पाळले तर कोणालाही कोरानाची लागण होणार नाही,त्यामुळे सर्वांनी आपली,आपल्या कुटुंबीयांची व आपल्या गावाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही घाबरून जाऊ नये,कोरोना संदर्भात कोणतीही आपणास अडचण आल्यास कधीही आपण मेसेज किंवा फोन करा असे आवाहन आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे.
नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांचे तासगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन
तासगाव( राहुल कांबळे)
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व आटपाडीचे नेते स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात किती आहे ते धनगर समाजातील तरुणांचे हृदयसम्राट भारतीय जनता पक्षाचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे जात असताना तासगाव मध्ये विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तासगाव तालुक्यातील मौजे नेते यांची राजकीय व सामाजिक कामातून वैयक्तिक नाळ जोडलेले नेते अरुण भाऊ खरमाटे, डॉ विवेक गुरव, भीमराव भंडारे, मनीषा मस्के, इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधला व पाच मिनिटे तासगावमध्ये थांबण्याची विनंती केली त्या विनंतीस मान देऊन आमदार पडळकर यांनी तासगाव मध्ये थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठा आमदार गोपीचंद पडळकर यांचा अरणगाव खरमाटे व डॅ. गुरव यांच्या असते सत्कार करण्यात आला. या छोटेखानी सत्कार आतून एवढेच जाणवले की बहुजन समाजातील एका छोट्या नेत्याला संघर्षातून एका मोठ्या पक्षाने आमदारकी देऊन बहुमत करण्यात आला त्यासाठी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या पक्षाचा अजेंडा व झेंडा बाजूला ठेवून त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला हे विशेष होय. यावेळी राजू मस्के, सुलेमान तांबोळी, योगेश कांबळे, शेखर पावशे, अमित देवकुळे,. विलासराव शिंदे सर, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.





































