Home Blog Page 287

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार – शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे.


 

मगरवाडी  / प्रतिनिधी
विधानपरिषदेचे भाजपा समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतेच पंढरपूरात महाविकास आघाडीच्या विरोधात आपल्या दारासमोर उभारुन आंदोलन केले आहे राज्य सरकारवर टिका केली आहे.हा प्रकार म्हणजे वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे अशी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.एकीकडे केंेद्र सरकार राज्य शासनाच्या वाट्याचे विविध करापोटी संकलीत झालेले हजारो कोटी रुपये अडकावून  ठेवत आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यांना देण्यात येणार्‍या अर्थिक पॅकेजमध्ये महाराष्ट्राबाबत भेदभाव करीत आहे.त्याच वेळी राज्यातील भाजपा समर्थक नेते मंडळी मुख्यमंत्री निधीस मदत करण्याचे आवाहन करण्याऐवजी पीएम.केअर्स फंडास मदत करा असे आवाहन करुन या संकटकाळात देखील राजकारण करीत आहेत.असे असताना आता महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने हसू करुन घेतले असून आ.परिचारक यांनी त्यांच्या आंदोलानबाबत जनतेत काय प्रतिक्रिया आहेत याचा कानोसा घेतला तर ते पुन्हा अशा प्रकारच्या आंदोलनाच्या भानगडीत देखील पडणार नाहीत अशीच प्रतिक्रिया यावेळी संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
    केंद्र सरकारने कोरोनाचा देशभरात फैलाव रोखण्याासठी वेळीच उपायोजना केली असती तर आज देशात गोरगरीब लोकांचे हाल झाले नसते हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हजारो किलोमीटरची पायपीट करीत लाखो कामगार घराकडे परतत होते तेव्हा त्यांना दिलासा देण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले होते.मार्च महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 लाख 80 हाजर कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली पण त्यातील दमडीही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली नाही.राज्यातील शेतकरी तयार शेतीमाल घरात पडून असल्याने मोठया संकटात सापडला अशा संकटकाळात केंद्राने हमी भाव खरेदीचा विस्तार करणे गरजेचे असताना यात केंद्र शासन अपयशी ठरले.मुंबई हे जगातील 3 क्रमांकच्या अर्थिक केंद्र आणि 2 कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे.या शहरातून लाखो कोटी रुपयांचे उत्पन्न केंद्र सरकारला प्राप्त होते पण मुंबईसाठी ठोस अर्थिक मदत देण्यास केंद्राने हात आखडता घेतला.राज्यातील शेतकर्‍यांसह दुग्धव्यवसायीक,इतर छोटे मोठे स्वयंरोजगार करणारे व्यवसायीक आदींना थेट अर्थिक मदत करण्याची गरज असताना महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला या बाबत आ.परिचारक यांनी चकार शब्द काढण्यास तयार नाहीत.आ.परिचारक यांनी राज्य शासनाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला नाही अशी टिका करीत आहेत.त्यांनी एकदा भाजपा सरकारच्या काळात करण्यात आलेल्या फडव्या कर्जमाफीचा आढावा घ्यावा आणि शेतकर्‍यांच्या प्रतिक्रीयाही जाणून घेतल्या तर त्यांचा भ्रम दूर होईल.कोरोना मुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना नव्याने कर्ज देण्यासाठी स्वत राज्य शासनाने हमी देण्याचा निर्णय घेतला आहे व तशा सुचना बॅँकाना देण्यात आल्या आहेत.तर शेतकर्‍यांना बांधावरच बियाणे व इतर आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा यासाठी ठोस उपायोजना केल्या आहेत.राज्यासह पंढरपूरातही हजारो परप्रांतिय कामगार अडकून पडल्यामुळे वास्तव्यास होते त्यांच्या प्रवासखर्चासह सर्व व्यवस्था राज्य शासनाने केली तर पंढरपूरातील जवळपास एक हजार मजुरांरान तामीळनाडूकडे रेल्वेद्वारे पाठविण्यात स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घातले होते. 
              राज्यातील सामान्य जनतेला वैद्यकिय उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागू नये म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करुन राज्यातील सर्वच केशरी कार्ड धारकांचा आता यात समावेश करण्यात आला आहे.त्याच बरोबर सर्वसामान्य छोट्या व्यवसायीकांसाठी राज्य शासन ठोस उपायोजना करीत असून संकटकाळात केवळ राजकारण म्हणुन विरोध आंदोलन करुन महाराष्ट्र बचावाच्या नावाखाली भाजपा समर्थख चमकोगीरी करीत आहेत.महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मुंबई महानगराची आंतराष्ट्रीय कनेक्टिीव्हीटी याचा विचार केला तर कोरोनाचा प्रसार राज्यात कशा प्रकारे झाला याचे संदर्भ विरोधकांच्या लक्षात येतील.सर्वांना सोबत घेवून चालणारे हे महाविकास आघाडीचे सरकार असून कोरोनामुळे महाराष्ट्रच काय तर सार्‍या जगावर संकट घोंगावत असताना भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले आंदोलन म्हणजे किळसवाण्या राजकारणाचा प्रकार आहे अशी जहरी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केली आहे.यावेळी साईनाथ अंभगराव ,सुधीर अंभगराव, महावीर देशमुख, रवी मुळे यादी उपस्थित होते.

रमजानच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीत रविवारचा जनता कर्फ्यू रद्द- नगराध्यक्षा भोसले

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरांमध्ये मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने रविवारी असणारा जनता कर्फ्यू हा रद्द करण्यात आल्याची माहिती पंढरपूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.  साधनाताई भोसले यांनी दिली. कोरोनाच्या  पार्श्‍वभूमीवर शहरात सोमवार ते शनिवार  सकाळी नऊ ते पाच या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनी आपली अस्थापना दुकाने उघडी ठेवावीत त्याचबरोबर रविवारी शहरात जनता कर्फ्यूचे पालन करण्यात यावे असे असताना मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सनानिमित्त त्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ उघडे ठेवण्यात येणार असून रविवारचा जनता कर्फ्यू रद्द केला आहे. पुढील रविवारी आजचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष भोसले यांनी दिली. दरम्यान  पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाण्याची पातळी कमी झाली  असून शहरावर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.  पाण्याच्या नियोजनासाठी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रविवारपासून घेण्यात आला होता परंतु रमजान सणाच्या निमित्ताने हा निर्णय ही दोन दिवस पुढे घेत एक दिवसाआड पाणीपुरवठा हा दोन दिवसानंतर सुरू केला जाईल व सणानिमित्ताने शहरवासीयांना दररोज दोन दिवस पाणी नेहमी प्रमाणेच येणार असल्याची माहितीही यावेळी नगराध्यक्षा यांनी दिली दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

तासगाव शहरातील मोकाट डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची आक्रमक मागणी; पागा गल्ली येथील नागरिकांनी दिले मुख्याधिकार्‍यांना निवेदन

तासगाव प्रतिनिधी दि.(राहुल कांबळे)
तासगाव शहरात लॉक डाऊन सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. सध्या शहरांमध्ये नागरिक व व्यापार यांच्या वतीने लॉक डाऊन ची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे होत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार हॉटेल, शाकाहारी व मांसाहारी खानावळी, वडापाव सेंटर, ज्युस सेंटर संपूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शहरातील डुकरांना कोणतेही खराब खरकटे पदार्थ खाण्यासाठी मिळत नाहीत त्यामुळे सदरची शेकडो मोकाट डुकरे शहरात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत ती नुसती फिरत नसून ती लोकवस्तीत काय खाण्यासाठी मिळत आहेत का यासाठी भटकत आहेत. नागरिकांच्या कडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या अंगावर जात आहेत अशी सध्या अवस्था आहे. सध्या विटा नाका एसटी स्टँड चौक पागागल्ली, सांगली नाका, भिलवडी नाका, काशीपुरा गल्ली, तासगाव पोलीस लाईन, पटवर्धन मळा,येथे मोकाट डुकरांचा अक्षरशा धुमाकूळ मांडला आहे. यापूर्वी शहरातील हॉटेल, शाकाहारी व मांसाहारी खानावळ व ज्यूस सेंटर सुरू असताना राहिलेल्या शिल्लक अन्न व खरकाटे डुकरांच्या मालक गोळा करत व त्यांच्या दुकानात खायला घालत होते सध्या त्यांना ते मिळत नसल्यामुळे डुक्कर मालकांनी आपली डुकरे मोकाटपणे लोकवस्ती सोडून दिलेले आहेत मध्यंतरी सामन्यापूर्वी मोकाट डुकरांचा हा मुद्दा तासगाव शहरातील पत्रकार बांधवांनी लावून धरला होता परंतु नगरपालिकेतील सत्ताधारी एका बड्या नेत्यांच्या संपर्कात असलेल्या डुकरांच्या मालकाने सर्व डुकरे पकडून घेऊन जात असताना राजकीय वजन वापरून सदरची सर्व मोकाट डुकरे सोडण्यास भाग पाडले होते. त्याचा गंभीर परिणाम म्हणून सध्या सर्वच भागांमध्ये रहिवाशी वस्तीत सर चे मोकाट फिरत आहेत व नागरिकांना त्रास देत आहेत. नागरिकांच्या दारामध्ये विस्टा टाकत आहेत. यासंदर्भात आज पागा गल्ली तासगाव येथील संतप्त नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध न झाल्याने प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे यांना सदरचे निवेदन देण्यात आले तरी या भागातील नगरसेवकांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तसेच एक आठवड्यामध्ये सदर मोकाट डुकरांचा बंदोबस्त झाला नाही तर या भागातील सर्व नागरिक नगरपालिका समोर उपोषणास बसणार आहेत. याप्रकरणी तासगाव येथील काही पत्रकारांनी प्रभारी आरोग्य अधिकारी श्री प्रताप घाडगे यांची भेट घेतली असता यासंदर्भात आम्ही प्रशासनाच्यावतीने तातडीने पाऊले उचलून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत तर नगरसेवक ऍड बाळासाहेब गुजर यांनी या मोकाटपणे लोकवस्तीत डुकरे फिरणाऱ्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन निवेदन देणाऱ्या व उपस्थित पत्रकार बांधवांना दिले आहे. सर्वात महत्त्वाचे या सर्व डुक्कर मालका पैकी एक बहादर आपली राजकीय ताकद पुन्हा वापरण्याची शक्यता आहे.त्याने जर तसे करण्याचा प्रयत्न केला तर नगरपालिकेने सदरच्या त्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची ही मागणी संतप्त नागरिक यांच्याकडून होत आहे.

जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह मुरूम येथे नव्याने आढळला रुग्ण

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे अहवाल होकारात्मक आले आहेत. तर ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत तर ४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने रेड झोन मध्ये वाढ होत आहे.

दशहरा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक आरास

पंढरपूर (प्रतिनिधी):-
अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आद्यपीठ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आज दशहरा दिनाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा येथे सुंदर आकर्षक अशा द्राक्षांची  विलोभनीय अशी सजावट करण्यात आली आहे. *”तें तीर्थांचें माहेर। सर्व सुखाचें भांडार।।”*
या संत ओवि प्रमाणे सर्व सुखाचे भांडार ज्याच्या चरणी आहे त्या विठ्ठलाचे दर्शन सध्या कोरोना व लाॅकडाऊन मुळे होत नसल्याने व मंदिर बंद असल्याने भाविकांसाठी मंदिर समितीने द्राक्षाची केलेली आरास सादर केली आहे.  या द्राक्षांची सजावट पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील कृष्णा देशमुख यांच्या वतीने अर्पण  करण्यात आली असून या सजावटीमध्ये द्राक्षांचे घड व द्राक्षवेली चा उपयोग केला असल्याने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे.  ही सजावट मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

पत्नीच्या बदनामीचा राग मनात धरून सरकोली येथे डोक्यात दगड घालून युवकाचा खून घटनेतील आरोपी अटकेत

पंढरपूर(प्रतिनिधी):-   पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावांत आपल्या पत्नीची बदनामी केल्याचा राग मनात धरून गावातीलच आरोपी विनोद लक्ष्‍मण भोसले यांने संतोष सुरेश कापणे हा झोपलेला असताना त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला खूनाच्या या प्रकाराने सरकोली परिसरात एकच  खळबळ उडाली.
22 मे च्यारात्री पावणेअकराच्या सुमारास सदर घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व  तपासाची चक्रे फिरवली
 या घटनेची पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी आरोपी विनोद लक्ष्मण भोसले राहणार सरकोली याने एक वर्षापूर्वी संतोष सुरेश कापणे (वय 32) राहणार सरकोली याचे विरोधात आपल्या पत्नीची बदनामी केली म्हणून मनात राग धरून होता एक वर्षापासून तो मयत संतोष यास बदनामीचा  जाब विचारत असे परंतु संतोष त्याला कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या मनात बदला घेण्याची वृत्ती निर्माण झाली व त्याने घरासमोर झोपलेल्या संतोष सुरेश कापणे याच्या डोक्यात मोठा दगड घालून खून  केला.
 संतोष याचा दूधाचा  व्यवसाय असून पहाटे त्याला झोपेतून उठवण्यासाठी आई त्याच्याकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला.
सदर घटनेची माहिती गावांमध्ये पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी बदनामी व पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली  असून यातील आरोपी विनोद लक्ष्मण भोसले यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

                               मयत

तासगांव शहराला कचरा मुक्त शहर म्हणून 3 स्टार नामांकन शहर स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व आभार – मुख्याधिकारी गणेश शिंदे

(राहुल कांबळे तासगाव)
                   तासगांव नगरपरिषदेने स्वच्छतेत सातत्य ठेवत शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर स्थान मिळवले आहे. काल केंद्रशासनाने कचरा मुक्त शहर म्हणून तासगांव शहरास 3 स्टार नामांकन बहाल केले. हे यश आपल्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे लाभले आहे. शहरासाठी अहोरात्र झटणार्‍या पालिका कर्मचारी, पदाधिकारी, आणि सर्वात महत्त्वाचे सर्व तासगांवकर नागरिक, संस्था, मंडळे, शाळा व पत्रकार आदी. आपल्या सर्वांचे या लोकचळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या योगदानामुळे शहराला देशपातळीवर अभिमानास्पद यश प्राप्त झाले आहे.
                    स्टार रेटींग आणि शहर स्वच्छतेसाठी तासगांव नगरपरिषद चे सर्व पदाधिकारी, मान्यवर, कर्मचारी, सर्व विभाग, सफाई कर्मचारी, पत्रकार, शाळा, कॉलेज, शिक्षक, विद्यार्थी, सर्व संस्था, असोशिएशन, तरुण मंडळे, संघटना, महिला बचत गट, आणि सन्माननीय सर्व तासगांव शहर व उपनगरातील नागरिक, स्वच्छतादूत, स्वच्छ शहर अंमलबजावणी कक्ष आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन..!
                  या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा हा जीवनाचा संस्कार ठरवून योगदान दिलेल्या  प्रत्येक तासगांवकर नागरिकाचे अभिनंदन व आभार….!

मा.गणेश शिंदे
(मुख्याधिकारी तासगांव नगरपरिषद, तासगाव)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड दल कामावर रुजू करा – खा. ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद –
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्परतेने सेवा देत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभे राहून अनावश्यक फिरणान्यांवर कारवाई करत असताना सेवा बजावत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा रिक्त जागांचा आलेख मोठा आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ताण येऊ लागला आहे. 
पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्हयातील होमगार्ड यांना कामावर रुजू करून घेतल्यास लॉकडाउन काळात होमगार्डना रोजगार उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न मिटेल व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. जिल्हयातील जास्तीत – जास्त होमगार्ड कर्मचारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामावर रुजू करून घेण्यात यावे. याबाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रा द्वारे जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे यांच्या कडे करण्यात आली आहे.