Home Blog Page 286

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, उमरगा येथील ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. बेडगा तालुका उमरगा येथील ६० वर्षीय वृद्धाचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी आणण्यात येणार होते मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात एकूण ६२ रुग्ण आढळून आले होते त्यातील ५० जणांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

तासगाव आगारातील महिला अधिकारी यांना टिकटॉक व्हिडिओ बनवणे पडले महागात

  •  विभाग नियंत्रकांची तातडीने निलंबनाची कारवाई 

तासगाव प्रतिनिधी दि.२९
      तासगाव आगाराच्या महिला अधिकारी सौ मीना पाटील वाहतूक नियंत्रक यांना  टिकटॉक व्हिडिओ बनवणे महागात पडले आहे. संबंधित व्हिडिओ कृष्णाकाट युट्युब चॅनेल वरून ‘व्हायरल’ झाल्यानंतर लगेच दुपारी साप्ताहिक ‘जनतांडव’ने  हे  वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते. वायरल व्हिडिओची व सदरच्या बातमीची विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दखल घेत सौ मीना पाटील यांच्या वर निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ताम्हणकर यांनी दिली.
यासंदर्भात सौ मीना पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
परंतु सदरचा व्हिडिओ हा त्यांनी घरी बसून तयार केला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्यांचे पती एसटी महामंडळाच्या तासगाव आगारांमध्ये कार्यरत असून ते एका मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी आहेत. एस टी महामंडळ मध्ये सध्या दोन-तीन संघटना कार्यरत असताना त्यांच्यातील अंतर्गत मतभेद हे जग जाहीर असतात अशातच त्यातील मतभेदांमुळे हा प्रकार पुढे आल्याची चर्चा एसटी महामंडळाचे कर्मचारी दबक्या आवाजात करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात दैनिक जनमत चे प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उघड बोलण्यास नकार दिला आहे लवकरच या संदर्भात संघटनेच्यावतीने खुलासा करण्यात येईल असे सांगितले आहे. परंतु अशा वरिष्ठांनी एका अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे तासगाव आगारा सह सांगली जिल्ह्यातील एसटी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात एकच खळबळ माजली आहे. तर या कारवाईची उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे.

तासगाव आगाराच्या वाहतूक निरीक्षक सौ मिना पाटील यांच्यावर टिक टॉक व्हिडिओ बनवण्याच्या कारणास्तव विभाग नियंत्रकांनी तातडीने निलंबनाची कारवाई केलेली आहे. यासंदर्भात त्यांनी हा टिक टॉक व्हिडीओ ऑफिसमध्ये तयार केला आहे का? कारण लॉक डाऊन मुळे एसटी महामंडळाचे कामकाज गेले दोन महिने पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे डेपो बंद असताना व्हिडिओ कसा बनविला किंवा त्यापूर्वी त्यांनी बनवला होता काय.. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे आहे. व सदरचे अधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता ही वरिष्ठ अधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे. अशी चर्चा सध्या तासगाव आगारातील ड्रायव्हर, कंडक्टर व कर्मचारी दबक्या आवाजात नाव न छापण्याच्या अटीवर करीत आहेत.

दैनिक जनमत २९ मे E पेपर

अखेर तीर्थक्षेत्र पंढरपूर, गोपाळपूर सह तालुक्यात मुंबईहुन कोरोना पोहोचला

  • सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही भाग सिल
  • पंढरपूर शहर-2,तालुक्यात-3 रूग्ण पाॅझीटीव्ह

पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या तीर्थक्षेत्र पंढरपूर व गोपाळपूर येथे तसेच तालुक्यातील उपरी ,करकंब  याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह चे एकूण पाच रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  नाही म्हणता म्हणता अखेर पंढरपूर शहर  तसेच पंढरपूर पासून तीन किलोमीटर वर असलेला गोपाळपूर तसेच उपरी आणि करकंब येथे कोरोनाचे रूग्ण सापडताच शहर व परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेवर याचा ताण वाढला आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे मागील आठवड्यात मुंबईहून आलेली व्यक्तीला गावातील शाळेत क्वाॅरंटाईन केले होते तो  रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तीर्थक्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या व्यक्तीच्या संपर्कात आलेले व क्वाॅरंटाईन असलेले एकूण ५१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रशासनाने पाठवले होते त्या व्यक्तीचा अहवाल रिपोर्ट आज प्राप्त झाला असून एकूण ५१ व्यक्तींपैकी ४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर उपरीतील एक महिला, गोपाळपूर येथील एक महिला, पंढरपूर येथील दोन आणि करकंब येथील एक असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून एका  अहवालाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
पंढरपूर शहरातील दोन रुग्ण आढळून आल्याने पंढरपूरकरांची चिंता वाढली असून सतर्क राहण्याची गरज आहे. आज एकूण पाच कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यापैकी पंढरपूर, गोपाळपूर,उपरी येथील व्यक्ती मुंबई येथून आलेले होते तर करकंब येथे पुणे येथून आलेला व्यक्ती कोरोना झाल्याचे माहिती आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली
कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरातील नागरिकांची चिंता वाढली असून प्रशासनाच्या नियमानुसार नागरिकांनी प्रत्येक अर्ध्या तासाला हात धुणे तोंडाला मास्क लावणे वेळोवेळी टायगर चा वापर करणे या नियमांचे पालन आता तंतोतंत करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई येथून आलेले व्यक्तींना वाखरी येथील एम आय टी मध्ये होम क्वाॅरंटाईन  करण्यात आले होते तर पंढरपूरच्या एका व्यक्तीला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात क्वाॅरंटाईन केले असल्याची माहितीही यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.



पंढरपूरशहरातील हा भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने केला सिल– पंढरपूर शहरातील सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक ते शिवाजी चौक ते सावरकर चौक असा हा संपूर्ण चौरस एरिया सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सील करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांनी विनाकारण किंवा कोणत्याही बहाण्याने बाहेर पडू नये घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावेअसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सोनी पाटगाव ता. मिरज येथील रहस्यमय खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश

  • मृत व्यक्ती विक्रम पवार चिंचणी ता. तासगाव येथील*

राहुल कांबळे तासगाव/श्रीकांत कुकडे मिरज
दि.२४/५/२०२० रोजी सकाळी ८ वाजता च्या सुमारास नामदेव पाटील रा पाटगाव, ता मिरज येथील शेती लगत असलेल्या म्हसोबा ओढ्याच्या पात्रात झुडपांमध्ये पुरुष इसम अंदाजे वय ३५ संशयास्पद रित्या मृत अवस्थेत मिळून आला होता यावरून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता या गंभीर गुन्ह्यांचे अनुषंगाने पोलिस अधीक्षक श्री सोहेल शर्मा अप्पर अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा यांनी कोणाचे घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मयत व्यक्तीची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिल्या होत्या त्याप्रमाणे या शाखेकडे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी,उपनिरीक्षक अभिजीत सावंत व इतर कर्मचारी यांनी दोन पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना करून रवाना केल्या होत्या.घटनेच्या परिसरा भेट देऊन घटनास्थळाचे परिसराच्या तील गावे जिल्ह्यातील सीमाभागातील पोलीस ठाण्याचे अभिलेखा वरील मिसिंग पडताळून मयताचे फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु ठोस माहिती मिळाली नाही.मयता बाबत पोलीस नाईक सागर लवटे यांना त्यांच्या खास बातमी दाराकडून बातमी मिळाली की सदर चा खून हा अनैतिक संबंधातून झालेला असून मयत व्यक्तीचे नाव विक्रम मोहन पवार राहणार चिंचणी ता. तासगाव असे समजले सौ. सारिका सुरेश माने मयत व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध होते सौ सारिका माने रा.पाटगाव हिने व युवराज पाटील पाटगाव या दोन्ही आरोपीने काठीने जबर मारहाण करून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. सदरच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण ठाणे कडे रिपोर्टरने देण्यात आला आहे सदरच्या गुन्हा उघडकीस आणण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत सावंत,उपनिरीक्षक प्रदीप चौधरी,पोलीस नाईक सागर लवटे,बिरोबा नरळे,निलेश कदम, जगन्नाथ पवार, संजय कांबळे, दरिबा बंडगर, संदीप गुरव,संदीप नलवडे,अनिल कोळेकर, संतोष गळवे,सुधिर गोरे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, सुनील लोखंडे, चेतन महाजन गौतम कांबळे, सुप्रिया साळुंखे,सीमा तोडकर, विमल नंदगावे, ज्योती चव्हाण चालक शंकर पाटील यांनी सहभाग घेतला होता या खुन्याचा तपास लवकरात लवकर उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम यांनी या सर्व टीमचे अभिनंदन व कौतुक केले आहे

तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील गारपिटीमुळे झालेल्या द्राक्ष बागेची ना. जयंतराव पाटील यांची पाहणी

  • आमदार श्रीमती सुमनताई पाटील व जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती
  • दुर्घटना झालेला कुटुंबास शासनाच्यावतीने मदतीचा धनादेश सुपूर्द

तासगाव प्रतिनिधी दि.
रविवार दिनांक २५ रोजी तासगाव तालुक्यातील वासुंबे, मतकुणकी येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कथा जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील साहेब व आ.सुमनताई पाटील यांनी प्रचंड गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या दोन्ही गावासह तासगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.महाविकास आघाडी सरकार कायम बळीराज्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याच्या बांधावर पोहचल्यानंतर सदरच्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकल्या नंतर ना.जयंत पाटील  यांनी व्यक्त केली आहे.
तसेच,वासुंबे मतकूणकीत वादळी वाऱ्याने संजय शिरतोडेंच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या ५ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. सदरच्या दुःखद कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदतीचा धनादेश तासगाव कवठेमंकाळ च्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तासगाव च्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल शिंदे, माजी पंचायत समिती सभापती एडके, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब एडके, राष्ट्रवादीचे नेते ना. जयंतराव पाटील यांच्या कट्टर समर्थक युवा नेते खंडू पवार,तासगावचे मंडल अधिकारी प्रवीण माळवे, तालुका कृषी अधिकारी,तलाठी पतंगअण्णा माने, मतकुणकी च्या तलाठी कल्पना लोणकर, वासुंबे गावातील ग्रामपंचायतचे सदस्य माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे व वादळामुळे द्राक्ष शेतीचे प्रचंड नुकसान झाले असे सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी काही शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली व्यथा मांडत असताना स्वतःला हुंदका आवरता आला नाही अक्षरशा सदरचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी अविनाश काका पाटील, आमदार सुमन ताई पाटील यांनी सदरच्या शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तर ना जयंतराव पाटील यांनी निश्चितपणे आमचे सरकार नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहील मी स्वतः लक्ष घालून मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना संपूर्ण माहिती देऊन तातडीने काय करतायेत येते का.. हे पाहून घेतो.. त्यामुळे वासुंबे मतकुणकी,व तासगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात ६ नवे कोरोना बाधित

उस्मानाबाद
– उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांचि संख्या ६ ने वाढली आहे. आज उमरगा येथे ३ परंडा येथे १ तर जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे २ रुग्णांचे अहवाल होकारात्मक आले  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात एकूण ४७ रुग्णांचे अहवाल आले आहेत. त्यातील ३५ जणांचे नकारात्मक तर ६ जणांचे अनिर्णित तर ६ जणांचे होकारात्मक आले आहेत.
सहापैकी उस्मानाबाद शहरातील एक रुग्ण देशपांडे स्टॅन्ड, जोशी गल्ली येथील असून, सोलापूर रिटर्न आहे. दुसरा धुता येथील 30वर्षीय महिला असून मुंबई रिटर्न आहे. तर उमरगा तालुक्यातील तीन पैकी दोन उमरगा शहरातील आहेत तर एक केसर जवळगा येथील आहे. परंडा येथील एक रुग्ण कुक्कड गाव येथील आहे.