अज्ञात वाहनाने दिली धडक, शिक्षिकांचा जागीच मृत्यू
राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी होणार का आमदार ?
- शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंदबागेत शेट्टी यांची पवारांबरोबर चर्चा
नळदुर्ग शहरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ
नळदुर्ग :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या माऊली नगर भागातील एक हॉटेल व्यवसायिक हा बारा दिवसापूर्वी अक्कलकोट येथे आपल्या सासरवाडीला गेला होता. सासरवाडी तुन आपल्या मूळ गावी नळदुर्गला परत आल्यानंतर तो गेल्या सहा-सात दिवसापासून तापाने आजारी होता. त्यानंतर त्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता त्या ठिकाणी डॉक्टरने त्याला शहरातीलच एका लॅब मध्ये जाऊन विविध टेस्ट करण्याची सूचना केली होती त्यानुसार त्यांनी काही टेस्ट केले होते. औषधोपचार व टेस्ट करून सुद्धा ताप कमी होत नसल्याने त्याच्या घरच्या लोकांनी त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याची त्याठिकाणी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याची रिपोर्ट 15 जून रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, डॉ एम एम शेख, डॉ. यशवंत नरोडे, नगरसेवक नय्यर पाशा जाहगीरदार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे जी.वी.शाचे धनंजय वाघमारे, विजय सगर यांनी रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी केली व हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन सील करण्यात आले त्याचबरोबर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 9 लोकांना तुळजापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. व रुगण आढळलेल्या माऊली नगर भागाला सील करण्यात आले. याकरिता मुनीर शेख, खलील शेख, राजाभाऊ सुतार, खंडू शिंदे, फुलचंद सुरवसे यांनी परिश्रम घेतले. यापूर्वी मुलतान गल्ली येथे 1 बौद्धनगर येथे 3 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा शहरात आणखी 1 रुग्ण आढळून आल्याने शहरातील रुग्णांची संख्या 5 झाली आहे विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसात चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने. शहरात खळबळ उडाली आहे.
रक्तावाचून कुणालाही जीव गमवावा लागेल,हे होऊ द्यायच नाही -सुभाष सातपुते
आटपाडी दि.१४( प्रतिनिधी):
रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने रक्तदान करायलाच हवे असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमीत्त करण्यात आला.कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोना बाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे.राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणारा रक्तपेढीमधे रक्तसाठा अल्पप्रमाणात आहे.रक्तदान ही काळाची गरज आहे.कारण विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी रक्त तयार करता येता येणार नाही. त्यामुळे रक्तपुरवठ्यच्या तुटवडावर मात करण्यासाठी आज भरारी ग्रुपच्या वतीने शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने अंबर हाॅल कोथरूड़ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कोरोना काळातील सर्व सोशल डिस्टनसचे नियम पाळुन 158 रक्तदात्यानी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
सर्व रक्तदात्याना मास्क,सेनिटाइझर व ‘अर्सेनिक अल्बम 30 या होमाओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर नियोजित शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवण्यात आली होती. या रक्तदान शिबिरामधे 27 नविन रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले.या शिबिरात पोलिस,युवक-युवती व नागरिक यानी आवर्जून सहभाग नोंदविला.सदर शिबिरास पोलीस अधिकारी राऊत साहेब, काशीद साहेब, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर साहेब, सिडकोचे करण शिंदे साहेब , डॉ. प्रीतम संचेती, फॅबटेक उद्योग समूहाचे सुनिल रूपनर, आम्ही सांगलीकरचे अध्यक्ष अरुण कदम, आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन भरारी ग्रुपच्या या कार्याचे कौतुक केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भरारी ग्रुपचे शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस,विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे ,संतोष इंगळे,महेश कदम,नामदेव शेलार, रविंद्र कोथेरे,वृषाली राजहंस, शुभदा भोसले, स्वाती टकले आदी पदाधिकारीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन भरारी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यानी केले होते.































































