तासगाव ( राहुल कांबळे )
शरद पवार हे अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असून ते राज्यातील बहुजनांवर नेहमीच अत्याचार करण्याची भूमिका घेतात व भविष्यात तीच भूमिका कायम ठेवतील त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही ना कुठला अजेंडा नाही, व्हिजन नाही राज्यातील छोट्या मोठ्या समूहातील घटकांना अडकवायचे व आपल्या बाजूला वळवून त्यांच्यावर सतत अन्याय करायचा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राजकारण करायचे हे प्रकार पवार करीत आहेत तर शरद पवार हे महाराष्ट्रातील महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी जहरी टीका आम. गोपीचंद पडळकर यांनी केली आहे परंतु यासंदर्भातसांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मधून जोरदार पडसाद उमटत आहेत त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पडळकरांनी पवार साहेबांची जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे.व पडळकरांवर टीकेची झोड उठली आहे अशा वेळी मात्र महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय आर आर आबा पाटील यांना शरद पवार यांनी एवढे मोठे केले ग्रामीण भागातील एका छोट्या शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला राज्यातील सर्व मोठी पदे दिली त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही स्व आबांच्या कुटुंबीयांना कोणते अंतर दिले नाही.स्व.आबांचे कुटुंब आपले कुटुंब मानले, त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात सलग दोन वेळा आमदारकी दिली आहे तरीही त्यांच्या घरातून आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे सध्याचे तालुक्यातील सूत्रधार सर्वेसर्वा सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील, स्मिता पाटील- थोरात,राष्ट्रवादी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाटील तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष किंवा तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे कोणताही पदाधिकारी गप्प का आहेत याची उलट-सुलट चर्चा सध्या तासगाव शहरासह तासगाव तालुक्यात सुरू आहे सोशल मीडियावर एखादी निषेधाची पोस्ट वगळता कोणताही निषेध व्यक्त होताना दिसत नाही किरकोळ कामासाठी प्रसिद्धीसाठी धडपडणार्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस,व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यां स्वतःला पदाधिकारी म्हणवणाऱ्या कडून ही या मोठ्या वक्तव्याबद्दल कोणतीही निषेधाची प्रतिक्रिया आलेली नाही हा प्रकार सध्या तासगाव तालुक्यात सुरू आहे.ही सर्व मंडळी सध्या शांत कशी हा प्रसारमाध्यमांना पडलेला प्रश्न आहे खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने पत्रकार परिषद घेणे आवश्यक असताना व सदरच्या घटनेचा निषेध नोंदवणे आवश्यक असताना फक्त सोशल मीडियावर पत्रकबाजी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खास.शरद पवार यांच्यावर नितांत मनापासून प्रेम करणार्या सामान्य जनतेतून मात्र या सर्व नेत्यांबद्दल राग व्यक्त होत आहे.व राष्ट्रवादींच्या तासगाव, तालुक्यातील नेत्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर राज्यातून पडळकर यांच्यावर टीका सुरू होताच आपण भावनेच्या भरात बोललो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न पडळकर यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाचे ज्येष्ठ नेत्या बद्दल केलेले खालच्या पातळीवरचे वक्तव्य हे पडळकरणी स्वतःच्या मनाने केलेले आहे की त्याला बोलवता धनी कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे.
भाजपाने असे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या तोंडी घालून नवीन राजकारण सुरू केले आहे का ??
बेताल वक्तव्यामुळे आम. पडळकर जोमात तर तासगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कोमात
ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू
नळदुर्ग :- ट्रकच्या जोरदार धडकेत मोटर सायकलवरील दोघांचा मृत्यू झल्याची घटना 24 जून रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास आलियाबाद पुलाजवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद येथे कामाला असलेले उल्हास सोमवंशी(वय 30) व सागर पाटील (वय 28, दोघेही रा. आष्टाकासार ता. लोहारा) हे दोघे आपली चुलत बहिणीच्या लग्नाला औरंगाबादहून नळदुर्ग मार्गे आपली मोटर सायकल MH- 20 BP- 3381 वरून आष्टा कासार येथे निघाले होते त्यांची मोटर सायकल नळदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग शिवारातील आलियाबाद पुलाजवळ आली असता हैदराबादहुन सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रक क्रमांक MH-25 U- 4045 ने मोटर सायकलला जोरादार धडक दिली. त्यात उल्हास सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेले सागर पाटील यांना उपचारासाठी सोलापूरला घेऊन जात असताना रस्त्यातच मयत झाले. दरम्यान धडके नंतर पोबारा केलेला ट्रक अणदूर जवळ पोलिसांच्या मदतीने पकडल्याचे समजते, नळदुर्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु होती.
राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक- नितीन काळे
उस्मानाबाद -राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक असून
जनतेचा खरंच कळवळा असेल तर महाविकास आघाडी सरकारला इंधनावर लावलेले अधिभार शून्य करायला सांगा अशी खरमरीत टीका भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरु आहे. मात्र इंधन विक्री कमी झाल्याने सरकारचा कर महसूल आटला आहे. कर उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रासह देशातील महाराष्ट्र सरकार सह अनेक राज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवला आहे.
आंदोलन करणारी राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. अर्थ खाते त्यांच्याकडेच आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावला होता. ३१ मे च्या मध्यरात्रीपासून पुनः एकदा यांच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लीटर दोन रुपये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात आता पेट्रोलवर राज्य सरकारने लावलेला अधिभार प्रतिलिटरला १० रुपये १२ पैसे, तर डिझेलवरचा अधिभार प्रतिलिटरला ३ रुपये झाला आहे. राष्ट्रवादीला खरंच जनतेबद्दल कळवळा असेल तर त्यांनी आपल्या सरकारने पेट्रोल,डिझेलवर लावलेला अधिभार कमी केला तर पेट्रोल १० रुपयांनी व डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होईल.
ज्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे असे राष्ट्रवादीचे अनुभवी मंत्री इंधन दरवाढी बाबत का चुप्पी साधून आहेत ? पक्षाचे सरकार मध्ये सामील घटक याबाबत गप्प राहतात आणि स्थानिक कार्यकर्ते आंदोलन करतात यावरूनच हे आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक आहे हे स्पष्ट होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने पवित्र चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलाला अभिषेक
- वासुदेव हरी च्या जयघोषात केली विधिवत पूजा
पंढरपूर (दिनेश खंडेलवाल):-
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीस कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आज पवित्र चंद्रभागेचे पाण्याने स्नान घालण्यात आले.
“गंगा आली आम्हांवरी। संत पाऊलें साजिरीं।। तेथें करीन अंघोळी। उडे चरणरज धुळी। येती तीर्थावळी। पर्वकाळ सकळ।।पाप पळालें जळालें।भवदुःख दुरावलें।।”
या संत वचनाप्रमाणे पवित्र चंद्रभागा हे आम्हाला गंगेच्या समान असून पाप करणारे आहे अनेक संतांचे चरणस्पर्श झालेली अशा पवित्र चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने आज ग्रहण पर्वकाळात विठ्ठलाला ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना दोन्ही वेळेस चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने अभिषेक घालून विधिवत पूजा अर्चा करून परंपरे प्रमाणे सर्व विधी करण्यात आल्या.
कंकणाकृती सूर्यग्रहण लागण्यापूर्वी व ग्रहण मोक्षा नंतर विठ्ठल मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी घागर कळशी तांबे आदी घेऊन पवित्र चंद्रभागेत स्नान करून चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने विठ्ठलाला विधिवत पूजाअर्चा करून त्यानंतर विठ्ठलाचे अभिषेक करण्यात आले व आकर्षक असा पेहराव करून सायंकाळी विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यात आले कोरोना च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर बंद असले तरी भाविकांना दर्शन मिळण्यासाठी मंदिर समितीने नवीन मोबाईल ॲप सुरू केला आहे या माध्यमातून जेथे असेल तेथे २४ तास भाविक, वारकरी, भक्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेऊ शकतात भाविकांना सुलभ व सोईचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समिती सदैव तत्पर असल्याचेही समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल अजिंक्य गोडगे यांचा सत्कार
रोसा-
रोसा गावचे दैनिक जनमत चे प्रतिनीधी समीर सुदाम ओव्हाळ यांच्या हस्ते अजिंक्य अशोक गोडगे यांचा सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आरोग्य द्वारे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत परांडा तालुक्यातील रोसा येथील अजिंक्य गोडगे यांनी क्रमांक मिळवला असून यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे येथील अशोक गोडगे यां शेतकऱ्यांचा पुत्र असलेल्या अजिंक्य यांचा प्रथम शिक्षण परांडा परांडा येथे सरस्वती प्राथमिक विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण बार्शी येथे महाराष्ट्र विद्यालयात झाले वडाळा जिल्हा सोलापूर येथील लोकमंगल जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून पदवीचे तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम एस्सी बायोकेमिस्टीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले 2016 पासून ते पुणे येथे स्पर्धा परीक्षेचे तयारी करत होते चार वर्ष सतत मुलाखतीस ते पात्रही ठरले अखेर 2019 चे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदी शिफारस करण्यात आली आहे या यशाबद्दल रोसा ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे. यावेळी उपस्थित पत्रकार समीर ओव्हाळ हनुमंत मकसूद सुजित गोडगे पवन गोडगे अशोक गोडगे अजित गोडगे आदी उपस्थित होते
हरीश सूळ यांची उपजिल्हा अधिकारी म्हणून निवड.
अकलूज –
माळशिरस तालुक्यातील मोरोची गावचे सुपुत्र हरिष मोहन सूळ यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत २२ व्या क्रमांकाने उतीर्ण होत उपजिल्हा अधिकारी या पदावर निवड झाली .
निकाल लागला तेव्हा तो आपल्या शेतात उसाचे पाचट काढत होता तेव्हा त्याच्या मित्राचा फोन आला कि निकाल लागला आहे बघ म्हणून.त्याने पहिले असता तो २२ व्या क्रमांकाने उतीर्ण झाला होता.तो पळत घरी आला व आईला सांगितल्यावर ती आईच्या डोळ्यात पाणी आणून रडत होती.गेले पाच वर्ष्य यश त्याला हुलकावणी देत होते.
ई १० वी पर्यंत मोरोची गावात त्याचे शिक्षण झाले आहे त्यानंतर पुणे येथे बी.ई.मेक्यानिकल पर्यंतचे त्याने शिक्षण पूर्ण करून त्याने अथक प्रयत्नाने त्याने हे यश साध्य केले आहे.
तालुक्याचे आमदार राम सातपुते,मा.खा.रणजितसिंह निंबाळकर व भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सोपानराव नारनवर व मोरोची येथील जेष्ठ नेते व अध्यक्ष धनगर आरक्षण कृती समीती महाराष्ट्र राज्य हनुमंत (बापू)सूळ यांनी त्याचे अभिनंदन केले .
सलगरा दिवटी येथे प्रतिबंधित क्षेत्रात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप
सलगरा :- कोविड 19 या विषाणूचे संक्रमित ४ पॉजिटिव रुग्ण सलगरा (दिवटी.) येथे आढळून आल्याने तुळजापूर विधानसभा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्फत त्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत लोमटे यांच्या पुढाकाराने प्रतिबंधित क्षेत्रात जनतेच्या हितासाठी, निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असे मास्क , सॅनिटायझर , आर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारक शक्तिवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले , तसेच या गोळ्या खाण्याचे नियम अटी यांचे सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले . याप्रसंगी प्रशांत भुजंग मुळे , अनिल लोमटे , बळवंत गरड , स्वयंसेवक योगेश कुठार , मारुती मोरे ,आदी उपस्थित होते.


































