Home Blog Page 282

तासगावातील राज्य मार्ग वरील हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

  • वाघापूर येथील अॅडमिट महिलेच्या संपर्कातून लागण  अर्धे तासगाव सिल होण्याची शक्यता शहरात  प्रंचड खळबळ

तासगाव प्रतिनिधी/राहुल कांबळे

     तालुक्यातील वाघापूर येथील एका २२ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी तिच्यावर सावळज व तासगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातून तासगाव येथील ‘त्या’ हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सावळज व तासगाव येथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
     याबाबत माहिती अशी, पनवेलमधून आलेले   आमणापूर (ता. पलूस) येथे क्वारंटाईन झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ६ जणांपैकी मूळची वाघापूर येथील २२ वर्षीय एक महिला आपल्या गावाकडे (वाघापुरला) आली. त्याठिकाणी तिला अंगदुखी व कणकण जाणवू लागल्याने प्रथम तिला सावळज येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी तिला गूण न आल्याने नंतर तिला तासगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

     उपचारादरम्यान तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तिचा स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आला होता. तपासणीनंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामळे आमणापूर, वाघापूर, सावळज व तासगाव येथे खळबळ उडाली.

     यानंतर बाधित महिलेच्या दसंपर्कातील ३० जणांचे स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आले होते. याशिवाय राजापूर येथील बाधित पुरुषाच्या संपर्कातील लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच तालुक्यातील अन्य काही लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. कालपासून संबंधित लोकांचे अहवाल प्रलंबित होते.
      त्यातील ५५ लोकांचे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. पैकी 50 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर तासगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातील  पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
      दरम्यान, तासगाव येथील ‘ते’ हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या पाच पैकी ब्रदर व सिस्टर यांना मंगळवारीच संध्याकाळी  मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे: तर इतर तिन कर्मचारी कोण आहेत याची माहिती प्रशासनाकडून लवकरच प्राप्त होईल..काल संध्याकाळी हॉस्पिटल मधून दोन जणांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. एकूणच तासगाव शहरात एकाच वेळी पाच कोऱना बाधित रुग्ण आढळल्याने तेंही बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे संपूर्ण तासगावकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण पाचजणांमुळे निम्मे तासगाव सिल होण्याची शक्यता आहे..

दैनिक जनमत १ जुलै E पेपर

त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी ७ व्यक्ती पॉझिटिव्ह

  •  प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाहन ड्रायव्हर, चॅनल कॅमेरामन, राजकीय पक्षाचा अध्यक्षासह बँकेचे संचालकांचा समावेश)

  • पंढरपुरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता)

पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपुरातील त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  वाल्याने पंढरपूरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता असून आषाढी एकादशीचा महापूजेला अवघे काही तास उरले असताना पंढरपूरात नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान त्या रुग्णांची तपासणी करणारे पंढरपूरच्या तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. पंढरपूरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे तर शहर व तालुक्यातील मिळून एकूण संख्या १७ आहे.
मात्र प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन ड्रायव्हरचा समावेश  असल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये मुंबईहून चित्रीकरण करण्यासाठी आलेला एका चॅनल कॅमेरामन चा समावेश असल्याचे समजते. पंढरपुरातील एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील पाच जणांना समावेश आहे या सर्वांचे काल स्वॅप घेण्यात आले होते.
त्यातील अहवाल आल्यानंतर हे  धक्कादायक वास्तव समोर आले आहे . सुदैवाने या पाचही जणांना सध्या प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून गरज असेल तरच बाहेर पडावे, तोंडाला मास्क लावावा,सॅनिटायझरचा  वापर करा,  सोशल डिस्टंसिंग पाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पंढरपूर शहराच्या प्रदक्षिणा मार्गावर कोरोनाचा सापडला पहिला रुग्ण

  • रुग्ण परिसरात घबराट, परिसर केले सील
  • आषाढी यात्रेच्या तोंडावरच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
  • ठाण्याहुन करकंब येथे आलेला एक जण सापडला पॉझिटीव्ह
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नियोजनाच्या तयारीत असताना आज शहरातील स्थानिक व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्याचबरोबर तालुक्यातील करकंब येथे एक रुग्ण पॉझिटिव आल्याचे समजतात प्रशासन सतर्क झाले आहे.
शहरातील बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका  व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला आहे.तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. बेलीचा महादेव मंदिर परिसर सील करण्यात आले आहे.
ठाणे येथून करकंब मध्ये आलेल्या एका रुग्णास कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले असून या व्यक्तीला सध्या वाखरी येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे.
कोरोनाचा चाचणीसाठी एकूण ४७ जणांचे स्वॅब घेतले होते.त्यापैकी आज ३९ अहवाल प्राप्त झाले असून २ अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत त्या पैकी एक व्यक्ती पंढरपूर स्थानिक तर एक  करकंब येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.तर ३६ अहवाल  नेगिटिव्ह आले आहेत.व १ निकृष्ट दर्जा आणि ८ अहवाल अजून प्रतेक्षित आहेत.
प्रदक्षिणा मार्गावरील हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे.
 प्रशासनाने पॉझिटिव रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व थेट संपर्कातील लोकांच्या संपर्कात आलेले व्यक्तींचा शोध घेतला असता थेट संपर्कात ५१ जण मिळून आले तर इतर संपर्कातील ९४ असे मिळून १४५ जणांचा समावेश आहे या सर्वांना क्वाॅरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी दिली.

कल्याण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

परंडा:- योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 306 व्या पुण्यतिथीनिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

दि. 26 जुन ते  3 जुलै या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत. यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार नसून दूर दृष्य श्राव्य माध्यमातून सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत . तसेच मंदिरामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी नाही .त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारा होणार आहेत.

पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातून होणार आहेत . कल्याण स्वामी मठ परंडा या फेसबुक पेजवर या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे .या फेसबुक पेजला लाइक करून कीर्तन ,प्रवचन हे कार्यक्रम पाहता येतील . तसेच सामुहिक दासबोध पारायणाचे  आयोजन करण्यात आले आहे .सर्व भक्तांनी दासबोध पारायण आपल्या घरी करायचे आहे .यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव  ‘पारायण आपल्या घरी प्रवचन कीर्तन आपल्या दारी ‘ या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे

पुण्यतिथी उत्सवात  स. भ. दतात्रय रत्नाळीकर , स .भ  दामोदर रामदासी,  स. भ . डॉ  मंजुषा कुलकर्णी यांची प्रवचन सेवा होणार आहे . तसेच स. भ. प्रिया सुरवसे -पवार , स. भ .कु मृण्मयी लांडगे , हभप संजयानंद महाराज झानपुरे , स. भ..हनुमंत बुवा ग्रामोपाध्ये ,  हभप रामभाऊ महाराज
निंबाळकर,  स. भ. गणेश बुवा रामदासी , स. भ.  चि. ओंकार वैद्य  ,   स. भ. कु.  सायली देवधर यांची कीर्तने होणार आहेत. 

शुक्रवार दि. 3 जुलै रोजी  सकाळी 10.30 वा  मिरज येथील वेण्णा स्वामी मठाचे मठपती स. भ. कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे . गुलाल पुष्पवृष्टीसह उत्सवाची सांगता होणार आहे . दर वर्षी होणारा परंडा – डोमगाव पायी सोहळा  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे .

समर्थ भक्तांनी या सर्व कार्यकमांत सहभागी व्हावे.

कोरोना उपचारासाठीची औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय
  • खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीवर नियंत्रण

मुंबई, दि.२५:  राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राजयातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह संवादातील ठळक मुद्दे असे:
कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत समिती नेमण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा ऑगस्टमध्ये नियोजीत आहे. मात्र हे विद्यार्थी परिक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे.
शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यपुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्याची येत्या दोन दिवसात नियुक्ती केली जाईल.
ग्रामीण भागात आशा वर्कर ७४ प्रकारचे विविध कामे करतात त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा वर्कर आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवी शकतात. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रीसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.
राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.
मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.