परंडा तालुक्यात सीना काठी बिबट्या सदृश प्राण्याचा वावर
- पिठापुरी येथील खरात वस्तीवर केला कोंबड्यावर हल्ला
पाच कोंबड्या केल्या फस्त
परंडा ( दत्ता नरुटे)
परंडा तालूक्यातील पिठापुरी च्या खरात वस्तीवर बिबटयाने धुमाकुळ घालत 8 ते 9 कोंबडया मध्य रात्री फस्त केल्या आहेत
कोंबडयाचा अवाज आल्याने ग्रामस्थांनी घरा बाहेर येऊन पाहिल्यास बिबट्या सारखा दिसत असल्याचा दावा केला असुन ऊसाच्या फडात दडून बसला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असुन परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .
या प्रकरणी परंडा पोलिसांना फोन वरून माहिती दिल्याने तात्काळ वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक बाजीराव साळुंके , प्रमोद कांबळे , दशरथ साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अज्ञात वन्य प्राण्याच्या पायाचे ठश्याचे फोटो आधिकाऱ्यांना पाठविले असुन ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परंडा ,माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे
रात्री 12 च्या सुमारास कोंबड्या ओरडण्याचा आवाज आल्याने मी उठून बाहेर आलो असता वाघासारखा दिसणारा प्राणी दिसला त्याने आमच्या 8 ते 9 कोंबड्या खाल्ल्या आहेत सकाळी वन विभागाचे कर्मचारी यांनी शेतातील ठसे पाहिले असून ते ठसे कशाचे आहेत हे समजले नाही अशी प्रतिक्रिया समाधान खरात यांनी दै जनमत शी बोलताना दिली
वासनांध भोंदू महाराजांने भक्तावरच केला बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार,पोलिसात गुन्हा दाखल
इटकळ ( दिनेश सलगरे ):- वासनांध भोंदू महाराजांने भक्तावर बळजबरीने अनैसर्गिक संभोग केल्याची घटना घडली पोलिसात गुन्हा दाखल होईल म्हणून वासनांध भोंदू महाराज पळून जात असतांना अखेर इटकळ पोलिसांनी तब्बल पन्नास किलोमीटर पर्यंत पाटलाग करून अखेर या वासनांध भोंदू महाराजांच्या मुसक्या बांधल्या.अधिक माहिती अशी की मौजे इटकळ येथे तीन महिन्यापूर्वी एक फिरस्ता वासनांध भोंदू महाराज आला व गांवापासुन जवळच असलेल्या महादेव मंदिरात आश्रयास थांबला अंगात भगवे वस्त्र गळ्यात रुद्राक्षा च्या माळा व डोक्यावर भल्या मोठ्या जटा असा पेहराव असलेला हा वासनांध महाराज खरा साधू च वाटू लागला पण म्हणतात ना “भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ” या उक्ती प्रमाणे या भोंदू महाराजांची विकृत वृत्ती जागृत झाली.दिवसभर गांजा ची नशा अंगात ठेऊन मदमस्त झालेला हा सोंग घेतलेला दिगंबर नामदेव गिरी महाराज खरा खुरा साधू नसून वासनांध असल्याचे खरे रूप उघडकीस आले.चारच दिवसापूर्वी आणदूर येथील एक गरीब भक्त महादेवाची भक्ती करता यावी व देव रुपी साधू महाराजांची ही सेवा घडावी म्हणून आला होता.मात्र मंगळवार दि.7 जुलै च्या रात्री वासनांध दिगंबर नामदेव गिरी महाराज यांनी अंगाला तेल लाऊन मालिश करण्यास सांगितले त्या प्रमाणे सेवा करणारा भक्त ( पुरुष) या महाराजांचे अंग मालिश करू लागला त्या नंतर विकृत मनोवृत्ती असलेल्या या वासनांध महाराजाने भक्तांवरच बळजबरीने अनैसर्गिक संभोग केला.वेदनेने व्याकुळ झालेला भक्त अन्याय केलेल्या या वासनांध महाराजांस शिक्षा व्हावी यासाठी इटकळ पोलीस चौकी गाठली व घडलेली घटना सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते व पत्रकार केशव गायकवाड यांना सांगितले.तात्काळ पोलीस महादेव मंदिराकडे गेले पण फिर्याद दाखल होईल या भीती पोटी वासनांध दिगंबर गिरी महाराज सकाळी 11 च्या सुमारास मंदिरातून फरार झाला होता.मग सहाय्यक राजाभाऊ सातपुते व त्यांचे सहकारी यांनी वासनांध महाराजा चा शोध घेऊ लागले तेव्हा हा दिगंबर गिरी महाराज तुळजापूर ते बार्शी कडे पायी पायी जात होते त्या वेळी पोलिसांनी त्या वासनांध महाराजांस ताब्यात घेतले व इटकळ औट पोस्ट येथे आणले अन्याय ग्रस्त भक्तांची रीतसर फिर्याद घेऊन वासनांध दिगंबर नामदेव गिरी यांच्या अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी भा.दं.वि.कलम 377 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे हे करीत आहेत.
आवार पिंपरीत आणखी दोन पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क
परंडा (दत्ता नरुटे) परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाली होती त्याच्या कुटूंबासह संपर्कातील 5 जणांचे स्वाब सोमवारी दि 6 रोजी लातूर ला तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आवार पिंपरी सह तालुक्यात खळबळ माजली आहे
आवार पिंपरीत शुकशुकाट
आवार पिंपरी येथील एका तरुणाचा शनिवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पूर्ण गाव सील करण्यात आले आहे गावात रुग्ण सापडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावातील नागरिक सकाळी 9 वाजताच गाव सोडून शेतात जात आहेत ते सायंकाळी 6 च्या नंतरच परतत असल्याने गावात दिवशभर शुकशुकाट पहावयास मिळत आहे गावकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही परिस्थितीत गावाबाहेर पडू नका ,विनाकारण चौकात गप्पा मारणे सोडा या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत असून 9 लाच शेतात जात आहे त्यामुळे प्रशासनाला मदत मिळत आहे
तासगावच्या डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करा अमोल काळे यांची मागणी
- कोरोनाबाधित महिलेवर उपचार केल्याचे प्रकरण ; तहसीलदारांना निवेदन
तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील वाघापूर येथील कोरोनाबाधित महिलेला स्वतःच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करुन घेऊन दवाखान्यातील स्टाफच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल काळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तासगाव येथील डॉ. सचिन पाटील यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाघापूर येथील एका कोरोनाबाधित महिलेला आपल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर चार दिवस उपचारही केले. या चार दिवसांत संबंधित महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. मात्र डॉ. सचिन पाटील यांनी याबाबत आरोग्य विभागाला कळवले नाही.
दरम्यानच्या काळात दवाखान्यातील अनेक कर्मचारी या पीडित महिलेच्या संपर्कात आले. दुर्दैवाने त्यानंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच दवाखान्यातील चौघांना कोरोनाची लागण झाली.
डॉ. सचिन पाटील यांच्या बेफिकीरीमुळे शहरात कोरोनाची साखळी वाढत गेली. तालुक्यात यापूर्वी कोरोनाचे रुग्ण कमी होते. मात्र डॉ. पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रशासनाला १० दिवस शहर बंद ठेवावे लागले. याचा त्रास व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे डॉ. सचिन पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. डॉक्टरांच्या बेफिकीर वागणुकीमुळे हॉस्पिटलमधील एकूण स्टाफ पैकी चार जणांना कोणाची लागण झाली आहे. याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टरांचे आहे. त्यांच्यावर कारवाई करणे बाबत अनेक प्रसारमाध्यमातून मागणी करण्यात आली होती. दैनिक जनमत चे प्रतिनिधींनीही याबाबतीत या विषयावर प्रकाश टाकला होता. सर्वात महत्त्वाचे सदस्य डॉक्टरांनवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने संकेत दिले होते. परंतु यामध्ये राजकीय हस्तक्षेपही झाल्याची चर्चा सध्या तासगाव शहरांमध्ये सुरू आहे. याबाबतीत पोलीस अधिकारी राजकीय दबावाला बळी पडल्याची उघड चर्चा तासगाव शहरात सुरू आहे. यामुळे तासगाव संपूर्ण शहरा वेठीस धरण्यात आले आहे. यामुळे तासगाव शहरातील संपूर्ण नागरिक संतप्त झाले आहेत.त्यामुळे कारवाई होण्याबाबत जनतेतून जोरदार मागणी होत आहे तसेच राजकीय कार्यकर्तेही चर्चा करीत आहेत तर काही कार्यकर्ते उघडपणे कारवाईची मागणी करत आहेत. यामध्ये शहर शिवसेना व तालुका शिवसेना आघाडीवर आहे.
निवेदनावरसेना तालुकाप्रमुख अमोल भैया काळे, केशव वाघमोडे, संदीप माळी, बाळासाहेब महाडिक, पृथ्वीराज माने, अभिजित पवार यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत:































































