Home Blog Page 279

दैनिक जनमत १७ जुलै E पेपर

स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

तासगाव प्रतिनिधी
 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सार्वत्रिक सामाजिक दबाव निर्माण करावा. मास्क अनिवार्यपणे वापरावा. या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने, अनावश्यकपणे गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊन हा अंतिम पर्याय राहील असे सांगून जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. ताप, सर्दी, खोकला, डायरिया, स्नायूदुखी, मानसिक गोंधळलेली स्थिती आदि लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.  50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रूग्णांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असणारा रूग्ण तपासणीसाठी त्यांच्याकडे आल्यास त्वरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलकडे संदर्भित करावा. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतील आणि पुढील दुष्परिणाम टाळता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांमधील हलगर्जीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील. तथापी हा पर्याय अंमलात आणावा लागू नये यासाठी प्रत्येकाने मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक या भावनेतून कोरोनाला हरविण्यासाठी दक्षता घ्यावी. बँका, बेकरी, दुकानदार यांनी त्यांच्याकडे होणाऱ्या गर्दीचे नियत्रंण करावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील पीपीई किट व अन्य संरक्षक सामग्रीचा वापर अनिवार्यपणे करावा. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी स्वत:चे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर घेऊन मॉनिटरींग करावे. ऑक्सिजनची पातळी ९२ च्या खाली आल्यास त्वरीत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध झाले असून सांगली, विटा, कवठेमहांकाळ येथे शासकीय रूग्णांलयामध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोन मध्येही याचा वापर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आयसीएमआरची परवानगी असणाऱ्या खाजगी लॅबला ही कोरोना तपासणीची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठीचे शुल्क २२०० रूपये व घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास २८०० रूपये शुल्क शासनाने निश्चित केले आहे. कोविड हॉस्पीटल मिरज येथे आयसीयु बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे तर भारती हॉस्पीटल येथेही क्षमता वृध्दी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल्सही कोविड-19 उपचारासाठी घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या विविध सण, उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, लोक जमा होणार नाहीत याबाबत संबंधित घटकांना सूचित करण्यात आले असून यास विविध घटकांनी सहमती दर्शविल्याचे सांगितले. तसेच अफवा पसरविणाऱ्या जवळपास ११ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा काळ अत्यंत संवेदनशिल आहे, त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत बिघाडी? सत्यजित तांबे यांचा शिवसेना – राष्ट्रवादीला घरचा आहेर

उस्मानाबाद – महाराष्ट्र विकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारने सुरू केलेल्या महा जॉब्स पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या जाहिरातीत काँग्रेसच्या मंत्र्यांचा फोटो न वापरल्याने समाज माध्यमात पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, #महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान देण्यात येत नसल्याचे सांगत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात तांबे यांनी केलेल्या पोस्ट नंतर नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे.

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीसंदर्भात न्यायालयात जाणार – अमोल पांढरे

उस्मानाबाद प्रतिनिधी
राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या संदर्भात शासनाने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे या विरोधात राज्यातील सरपंच आणि आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार जत तालुक्यातील कुरनूर चे सरपंच अमोल पांढरे यांनी राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती न करता सद्यस्थितीत ग्रामपंचायतीमध्ये असणारे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करत राज्य शासनाने निर्णय बदलावा अन्यथा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा राज्य शासनाला दिला आहे
कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनाच पुढील निवडणुका होईपर्यंत मुदत वाढवून देण्याऐवजी, सरकारने आता ग्रामपंचायतवरती प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विशेष म्हणजे हा प्रशासक संबंधित गावातीलच कोणीतरी असणार आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे…हे प्रशासक पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार आहेत. त्यामुळे सहाजिकच पालकमंत्री हे तेथिल सत्ताधारी गटाच्या स्थानिक आमदारासाठी सोयीच्या असलेल्या व त्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच प्रशासक म्हणून नियुक्त करणार….हे उघड आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेसमोरही एक आवाहंन निर्माण केले जाणार असून, लोकशाहीवरती प्रश्नचिन्हं निर्माण होणार आहे. तसेच यामध्ये जे विद्यमान सरपंच आहेत. ज्यांनी कोरोनाच्या या काळात स्वत्ःचा जीव धोक्यात घालून गावची सेवा केली आहे. त्यांना कोणीही विचारणार नाही. म्हणजे सरकारने या सरपंचांना अक्षरशः तू कोण ? कोणत्या गावचा ? असा प्रश्नंच विचारला आहे. त्यामुळे आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल. अशी भुमिका कुडनूरचे सरपंच अमोल पांढरे यांनी मांडली आहे.
दुस-या बाजूला ज्यांचे कोरोनाच्या काळात शून्य योगदान आहे. अशा लोकांना प्रशासक म्हणून नेमले तर गाव संकटात येण्यास वेळ लागणार नाही. कारण सध्या गावात जमावबंदी असतानाही सरपंच होण्यासाठी लोक अनेक ठिकाणी घोळका करुन राजकारणाच्या गप्पा हाणत आहेत. विद्यमान सरपंच नाराज असून, इतर पुढारी आपआपल्या परीने प्रशासक आपलाच व्हावा, यासाठी कोरोनाविरुद्दची लढाई विसरुन फिल्डिंग लावत आहेत. राडेबाजी, कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. त्यातच ज्या ठिकाणी शिवसेनेचे पालकमंत्री आहेत आणि स्थानिक आमदार भाजपाचे आहेत. तिथे या नियुक्त्या कशा होणार ? हे एक न उलगडणारे कोडेच आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच आणि सदस्यांनाच मुदतवाढ देवून हा विषय संपवावा अन्यथा विद्यमान सरपंच आणि सदस्य आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच या सरपंच आणि सदस्यांची नाराजी देखिल सरकारला परवडणार नाही. हे सरकारने लक्षात घ्यावे.

उस्मानाबाद जिल्हा कोरोना ४०० पार

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४०० पार झाली आहे. त
दि. 14 जुलै 2020. सकाळी : 10:00.
*दि. 12/07/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून जे स्वाब नमुने  वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आलेले होते व पेंडिंग होते ते 98 रिपोर्ट्स काल रात्री उशिरा
,  प्राप्त झाले  असून ते खालीलप्रमाणे आहेत.
-13 पॉजिटीव्ह.
-03 rejected.
-16 अनिर्णित.
-66 नेगेटिव्ह.
* पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती.
*उस्मानाबाद तालुका-07.
*80 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*10 वर्षीय मुलगा, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*38 वर्षीय महिला रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
*14 वर्षीय मुलगी रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*53 वर्षीय महिला, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*35 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*25 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली उस्मानाबाद.

*वाशी तालुका -03.
*71 वर्षीय पुरुष रा तेरखेडा.
*20 वर्षीय पुरुष रा. पार्डी.
*18 वर्षीय  पुरुष रा. पार्डी.

*तुळजापूर ता. -03.
*29 वर्षीय पुरुष रा सावरगाव.
*45 वर्षीय महिला रा. सावरगाव.
*53 वर्षीय पुरुष रा. तुळजापूर.

*दि. 13/07/2020 रोजी बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व तेथेच उपचार घेत असलेले 03 रुग्ण,
खालीलप्रमाणे.
*35 वर्षीय पुरुष रा. भूम (सोलापूर येथे उपचार ).
*50 वर्षीय पुरुष रा. परांडा (सोलापूर येथे उपचार ).
*53 वर्षीय पुरुष (बार्शी, येथे ).

*दि. 13/07/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून तात्पुरते कारागृह उस्मानाबाद येथील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत.
*06 कारागृह कर्मचारी.
*11 कारागृह बंदी.

*त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

*जिल्यातील एकूण रुग्णांची संख्या -418.
*आजपर्यंतचे डिस्चार्ज -250.
*एकूण मृत्यू -17.
*उपचाखालील रुग्ण -151.

*वरील माहिती दि. 14/07/2020 
सकाळी 9:0 वाजेपर्यंत ची आहे.

पंढरी पोलिसांच्या रखवालीतून आरोपीचे पलायन

  • खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी;उपचारासाठी नेले असता घडला प्रकार

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील पोलिसांच्या रखवालीत  असलेला आरोपीस  उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले  होते. आरोपीने पहाटे शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने शौचालयाच्या खिडकीतून पलायन केले संबंधित आरोपी हा स्वतःच्या पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली सबजेल मध्ये होता. सदरची घटना घडतात शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील आरोपी शिवाजी नाथाजी भोसले (वय५५) त्याने शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास छातीमध्ये दुखत असल्याचे कारण सांगितलेने त्यास उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते पहाटे सहा ते सव्वा सहाच्या सुमारास आरोपी शिवाजी भोसले याने शौचालय व बाथरूमला जाण्याचा बहाणा करून शौचालयात गेला त्याठिकाणी असलेल्या खिडकीच्या काचा त्याने काढून बाजूला ठेवल्या व खिडकीतून बाहेर आला आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून उपचाराच्या ठिकाणी असलेल्या कंपाऊंड भिंतीवरून उडी मारून परिसरात उगवलेल्या झाडाझुडपात अंधाराचा फायदा घेवून पळून गेल्याने गोंधळ उडाला यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शंका आल्याने त्यांनी शौचालयाचे दार वाजवले व बाहेर जाऊन पाहतात तो काय आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले एखाद्या सिनेमातील दृश्य प्रमाणे सदरच्या आरोपीने नियोजनबद्ध पलायन केल्याचा प्रसंग निर्माण झाल्याचे दिसत असले तरीही हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील असल्याने पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिवाजी भोसले याच्यावर गुन्हा र. नं. ३८०२०१६  मध्ये स्वतःच्या पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केल्याच्या आरोपाखाली भादवी कलम ३०२ नुसार सबजेलमध्ये होता. मात्र पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याने पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुजित जाधव यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून त्याचा गुन्हा र. नं. ५७४२० भादवी कलम २२४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत असून हा आरोपी कोणाला दिसल्यास ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.