Home Blog Page 276

दैनिक जनमत ८ ऑगस्ट E पेपर

दैनिक जनमत ७ ऑगस्ट E पेपर

दैनिक जनमत ६ ऑगस्ट E पेपर

तासगाव शहरातील व्यापारी असोसिएशनने व्यापारपेठ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत चालू ठेवण्याचा घेतला निर्णय

तासगाव प्रतिनिधी
सध्या जगासह भारत देशामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सांगली जिल्हा मध्ये हे कोरणा बाधित रुग्ण संख्या एका आठवड्यापूर्वी फारच कमी होती. परंतु एक आठवड्यात सांगली जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. तर तासगाव शहरांमध्ये रुग्णांची संख्या एक महिन्यापूर्वी फक्त चार होती. परंतु एकाच आठवड्यात रुग्णाची संख्या पंचवीस च्या घरात गेली आहे परवा दिवशी आठ, काल पुन्हा सहा रुग्ण तर आज एक रुग्णाची भर पडलेली आहे. ज्यादा रुग्ण कोरोणा बाधित आढळल्याने तासगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तासगाव शहरालगत वासुंबे येथे एक तर परवा दिवशी एक काल एक तर आज पुन्हा वासुंबे दत्त कॉलनी परिसरातील एक असे एकूण चार  कोरोणा बाधित रुग्ण दगावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून तासगाव शहरातील व्यापारी असोसिएशनने आपली सर्व दुकाने आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत तासगाव शहर व तालुका मिळून कोरोणा बाधित रुग्णांची  संख्या ही शंभराकडे कडे जात असून लवकरच तो पूर्ण होईल असे सध्याचे तर वातावरण दिसत आहे तरी नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग व सॅनीटायजर चा वापर करणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे वयस्कर मंडळी व लहान मुलांनी घरी हमने जरुरीचे झाल्यास आहे. एकंदरीत तासगाव शहरांमध्ये सर्वांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात महत्त्वाचे कोरोना रुग्णाचे रुग्णाचे निधन झाल्यानंतर सदरचे रुग्णाचे शव हे नातेवाईकांच्या कडे दिले जाते नाही. प्रशासनाच्या वतीने मयत रुग्णावर अंत्यसंस्कार केले जातात अशी प्रशासनाची भूमिका असते परंतु तासगाव मध्ये काल कोरोना बाधित मयत रुग्णाला तासगाव येथील स्मशानभूमीत दफन केल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने तासगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत तासगाव नगरपालिकेने हात वर केले चे चित्र दिसत आहे. तासगाव नगरपालिकेच्या वतीने कायद्यानुसार दफन केल्याची माहिती दिली आहे. हे असे घडलेच कसे याबाबतीत तासगाव शहरातील नागरिकांच्या मध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी तासगावकर नागरिक करीत आहेत. सदर सर्व गोष्टीवर तासगावच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अनिल माळी, बि.डी.ओ. दीपा बापट इत्यादी लक्ष ठेवून आहेत

क्वारंटाईन नेत्यांची खासदारांच्या भेटीदरम्यान उपस्थिती!

उस्मानाबाद – तालुक्यातील पाडोळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता त्या कारणाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गावास भेट दिली मात्र या भेटी दरम्यान रुग्णाचा नातेसंबंध असलेल्या तसेच जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य सभापती आणि सध्या होम  क्वारंटाईन असलेल्या गावातील बड्या नेत्याने उपस्थिती लावल्याने गावात भीतीदायक वातावरण आहे. विशेष म्हणजे याच भेटीत गावातील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असल्याने आरोग्य विभाग जनजागृती करत आहे की नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता “आम्ही बाधिताच्या संपर्कातील १६ व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.”
तसेच घडलेल्या प्रकाराबाबत गावातील जागरूक नागरिकांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना अवगत केल्याची माहिती दैनिक जनमतशी बोलताना दिली. उस्मानाबाद  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी दायित्वाच्या भूमिकेतून गाव भेटी देत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांचे वाटप करत आहेत.परिस्थितीचा आढावा घेत आहेत मात्र या भेटीदरम्यान अनावश्यक गर्दी वाढत असल्याने पुढील धोका वाढत आहे. 

उस्मानाबादच्या तरुणाने बनवला यु व्ही डीस‌इनफेक्टन्ट बॉक्स

उस्मानाबाद – देशात आणि राज्यात कोरोना चा धोका वाढलेला आहे. स्वच्छतेचे महत्व गेल्या काही दिवसात वाढलेले आहे. कोविड -१९ मुळे लोकांच्या दैनंदिन गरजांमध्ये बदल घडवून आणले  आहेत जसे  की मास्क , हॅन्ड सानिटीझर वापरून आपले हात स्वच्छ करणे . बाहेरून घरी  आलं की प्रत्येक गोष्टीच निर्जंतुकीकरण करणे  हे पहल काम. अशा काळात प्रत्येक गोष्ट धुणे किंवा निर्जंतुकीकरण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही  त्याने कोविड -१९ चा धोका वाढू शकतो ही  गोष्ट टाळण्यासाठी उस्मानाबादच्या अभिषेक पतंगे नामक  मराठी होतकरू तरुणाने एक्स लॅब्स यु व्ही सि डिसइन्फेकशन युनिट नावाचा एक बॉक्स बनवला आहे . यु व्ही सि लाईट बॅक्टरीया व व्हायरसेस च्या डी एन ए वर परिणाम करते आणि त्याला ९९.९९% पर्यंत मारून टाकते याची तपासणी प्रयोग शाळेत ही केली गेली आहे . अवघ्या ५ ते १० मिनिटामध्ये  कुठल्याही वस्तूच निर्जंतुकीकरण होतं असा त्यांनी दावा केला आहे . यामध्ये दैनंदिनीच्या वस्तू जस कि चाव्या ,पाकीट,मास्क तसेच मोबाईल , लॅपटॉप , पिशवीत असलेली फळे , भाज्या ,दुधाच्या  पिशव्या , खेळण्या , कुरियर्स, मेकअप चे सामान  अशा सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण होते . या  प्रॉडक्ट चा उत्पादन पुण्यामध्ये होत आहे .याचा वापर दवाखाने ,हॉटेल्स ,दुकाने ,औषधाची दुकाने ,शाळा व ऑफिसेस, सलून  अशा विविध  ठिकाणी करू शकतो . बी. ई. इले्ट्रॉनिक्स  शिकलेल्या अभिषेक ने उत्पादन बनवून या काळात काही तरुणांना रोजगार दिला आहे. हा बॉक्स इतर निर्जंतुकीकरण करणाऱ्या बॉक्स पेक्षा स्वस्त असल्याचा दावा पतंगे यांनी केला आहे.