तेरमध्ये वृध्द कोरोनाचा बळी ;एकाला डिस्चार्ज संख्या 34 वर
तेर प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 65 वर्षीय वृध्द इसमाचा गुरुवारी कोरोना संसर्गाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी आता पर्यंत कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाची संख्या 34 वर गेली आहे
तेर येथील 65 वर्षीय वृद्ध इसमाचा 3 आँगस्ट रोजी कोरोना पाँझिटीव्ह अहवाल आला होता उपचारादरम्यान या रूग्णाची प्रकृती चिंताजनक बनली होती अखेर गुरुवार दि.13 रोजी उस्मानाबाद येथे मृत्यू झाला
दरम्यान 1 आँगस्ट रोजी कोरोना पाँझिटीव्ह रूग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना महामारीचा फैलाव सुरू झाल्यापासून तेर येथील 32 रूग्णाची नोंद झाली आहे 2 रूग्ण तेरचे रहिवासी असले तरी ते सध्या उस्मानाबादेत वास्तव्य करून असल्याने तेर ची कोरोना रूग्णाची संख्या 34 वर गेली आहे
पार्थ पवारांना आजोबांनी फटकारलं मात्र आजोळची भक्कम साथ
उस्मानाबाद – महाराष्ट्रात ज्येष्ठ नेतृत्व आणि तरुण नेतृत्व यांच्यात घर्षणाचा काळ सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सी.बी.आय. चौकशीची मागणी करणारे पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आजोबा शरद पवार यांनी इममॅच्युअर म्हणता फटकारले आणि त्यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नसल्याचे सांगत वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.मात्र पार्थ पवार यांच्या आजोळच्या मंडळीनी मात्र पाठराखण केली आहे. भाजपचे युवा नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट लिहीत पार्थ पवार यांचे समर्थन केले आहे.
ही आहे पोस्ट
“तुम्ही जन्मजात लढ्वय्या आहात हे मी लहानपणापासून पहात आलोय.मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत कसं लढायचे ते चांगले ठाऊक आहे”.
यातून राजकीय संकेत नाहीत
मल्हार पाटील यांनी केलेली पोस्ट कोणतेही राजकीय संकेत दर्शविण्यासाठी नसून त्यांची आजोळाची मंडळी त्यांच्यामागे भक्कमपणे उभी आहे हे सांगण्यासाठी असल्याचे मल्हार पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जवळचे नातेसंबंध
पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि मल्हार पाटील यांचे आजोबा डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. पार्थ पवार यांच्या भूमिकेला सर्वात आधी आजोळातून सर्वप्रथम समर्थन मिळत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर तासगावात खा. संजय काका पाटील यांची पालिकेत आढावा बैठक
तहसीलदार,पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी व नगराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती
तासगाव प्रतिनिधी
कोरणा संसर्ग सध्या तासगाव शहरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेत शहरातील व तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाची तातडीची बैठक बोलावली होती यामध्ये प्रामुख्याने तासगाव च्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, मुख्याधिकारी गणेश शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर माळी नगराध्यक्ष डॉ.सावंत उपनगराध्यक्ष सौ. दिपाली पाटील राष्ट्रवादी गटनेते बाळासाहेब सावंत यांची उपस्थितीत पार पडली.यावेळी तासगाव शहरात कोरोना विषाणूचा वाढते संक्रमण यावर चर्चा करण्यात आली व त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला योग्य सूचना करण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काशीपुरा गल्ली येथे रेपिस्ट सुरू आहे ते मोठ्या प्रमाणात करण्याची करण्यात यावी भागांमध्ये बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत तर अनेक जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. मुस्लिम मोहल्ला येथे तातडीने रॅपिड टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.तासगाव शहरांमध्ये तातडीने आरोग्य सेविकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे शहरांमध्ये सर्व भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी सातत्याने औषध फवारणी करण्याची आवश्यकता आहे ज्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन आहे. त्या भागातमधील नागरिक बिनधास्तपणे शहरांमध्ये फिरत असतात त्याच पोलिस प्रशासनाने अटकाव करण्याची गरज आहे. तर व जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या वर नगरपालिका प्रशासनाने लक्ष ठेवण्याची नगरपालिकेच्या माध्यमातून गरज आहे नगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ५५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची तातडीने तपासणी करणे आवश्यकता आहे ग्रामीण रुग्णालय येथे स्टाफ कमी आहे तेथे वाढ करण्यासाठी योग्य त्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे आहे तसेच शहरातील बोथरा हॉस्पिटल हे सुसज्ज करण्यासाठी करण्याची गरज आहे तासगाव शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असून लोकप्रतिनिधी पत्रकार यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे पण हे होताना दिसत नाही नगरपालिकेची गॅस दाहीणी सध्या सुरू असून ते पूर्णवेळ कार्यरत राहण्यासाठी जादा व्यक्तींची नियुक्ती करण्याची गरज आहे अंबुलन्स २४ तास सतर्क ठेवणे व त्यासाठी खासगी दवाखान्याची अंबुलन्सची मदत घेणे आवश्यक आहे.यावेळी तासगाव नगरपालिकेचे नगरसेवक गायकवाड सर यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यावेळी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर रविकांत पाटील यांच्याशी संपर्क करून तासगाव मध्ये सुरू करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन योग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात यावी, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्या बरोबर प्रशासनाने नेहमी समन्वय साधणे गरजेचे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल शिंदे, सत्ताधारी भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते,नगरसेवक दत्ता रेंदाळकर,बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजीत माळी, तानाजी पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष खंडू कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, स्वच्छता प्रभारी अधिकारी प्रताप घाडगे, राजू काळे, राजू माळी, आयुब मणेर, महादेव लुगडे, इत्यादी उपस्थित होते.
जि. प.सदस्य प्रवीण माने यांनी केले गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन
इंदापूर ( शशिकांत सोनटक्के)
पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती
व विद्यमान सदस्य प्रवीण माने हे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी इंदापूर तालुक्यात प्रसिद्ध आहेत त्याचाच एक प्रत्येक आज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आला. आपल्या जिवाभावाचा माणूस म्हणून
आज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक आधार आधारवड कै. शिवाजी बाबुराव गायकवाड वय 85.यांचे बावडा येथे दिनांक 31जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले .या कुटुंबाचे सांत्वन करणे व कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी सकाळी 11.30वा जता त्यांच्या घरी भेट दिली
आणि कै. गायकवाड कुटुंबातील
मुलगा बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सांत्वन
केले व त्यांना भक्कम आधाराचे आश्वासन दिले .
यावेळी. रेडा ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वाघ उपस्थित होते
खासदारांच्या गावभेटीतील ती व्यक्ती पाॅझिटीव्ह























































