Home Blog Page 274

तासगाव ते पाचवा मैल रस्ता रहदारी योग्य करा-संजय दादा पाटील

खराब रस्त्याचा संदर्भात तासगाव तालुका राष्ट्रवादी आक्रमक होण्याचा मार्गावर

तासगाव प्रतिनिधी १८
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तासगाव ते पाचवा मैल हा NH4-266 या रस्त्याचे एका बाजूने खुदाई काम सुरू असून दुसरी बाजू रहदारी साठी योग्य असणे गरजेचे असताना हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. परिणामी वाहतूक करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.म्हणून हा रस्ता रहदारी योग्य व्हावा यासाठी  तहसिलदार कल्पना ढवळे  यांना निवेदन दिले.
      दादांनी या रस्ताच काम पाहणाऱ्या अभियंता सौ. बारटक्के मॅडम यांना तात्काळ बोलावून घेतले व या रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेबद्दल विचारणा केली असता सात दिवसात हा रस्ता रहदारी योग्य करू असे बारटक्के  यांनी सांगितले …
      यावर सात दिवसात रस्ता रहदारी योग्य न केलेस कॉन्ट्रॅक्टर  रहदारीचा रस्ता करण्याचे बिल अदा करेल आणि  कार्यकर्ते रस्ता करून घेतील त्यापुढे ठेकेदार रद्द करणेची कार्यवाही करून घ्यावी   अशी सूचना राष्ट्रवादीचे नूतन कार्याध्यक्ष संजय दादा पाटील वडगांवकर यांचे वतीने देणेत आली आहे याबाबत मान बारटक्के मॅडम यांनी  तहसीलदार मॅडम यांच्यासमोर  याबाबत  हमी दिली आहे.
       यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत शेळके, निमणी उपसरपंच दिनकर पाटील, अनिल सदामते, चंद्रकांत लोंढे, मदन पाटील,डी ए पाटील, सुशांत पाटील,गणेश जाधव निमणी पाचवा मैल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

तासगाव शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, शहरात सोशल डिस्टन्सिंगचा पुरा फज्जा

तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व सर्व स्टाफ रस्त्यावर हजारो रुपये दंड वसूल

तासगाव प्रतिनिधी दि.१८
तासगाव संपूर्ण शहरांमध्ये सोशल डिस्टंसिंग चा पुरा फज्जा उडाल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळते,आजही तेपाहावयास मिळाले आहे.नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. शहरात कोरोनामुळे आतापर्यंत ७० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने व आत्तापर्यंत नऊ ते दहा जणांचा कोरोणा मुळे मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल करीत. ज्या भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे त्या भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे.आज अचानक तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज  पाटील, अधिकारी सर्व कर्मचारी सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, बागणे चौक  व एस.टी स्टँड चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, विटा नाका व सांगली नाका येथे दुचाकी स्वार,चार चाकी, , तसेच चालत फिरणारे विना मास्क नागरिकांच्या वर तासगाव नगरपालिकेच्या वतीने कर्तव्यदक्ष नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, श्वेता कुंडले कार्यालयीन अधिक्षक, धनश्री पाटील कर निरीक्षक, आस्थापना विभागाच्या प्रियांका भोसले, बागवान लेखापाल, सुरेश कुलकर्णी अंतर्गत लेखापरीक्षण, महादेव लुगडे, अनिल कोळी राजू काळे, राजू माळी , आयुब मनेर, संतोष गायकवाड, दिलीप घाडगे, उत्तम पवार, प्रवीण धाबुगडे, बनसोडे, स्वामी, अवताडे, . सध्या कोरणा चा प्रादुर्भाव तासगाव शहरांमध्ये वाढताना दिसत आहे मार्च महिन्यामध्ये एकही रुग्ण नसणारे तासगाव शहर आज सत्तरीच्या पुढे कोरोना बाधित रुग्णांची संख्या तासगाव शहरात आहे खरं वास्तविक कोरोनाचा  प्रादुर्भाव शहरासह तालुक्यात व सर्व जिल्हाभर वाढत असताना नागरिकांनी सुद्धा एक आपली राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी मास्क वापरणे व हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे आत्ता काळाची गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. सदरच्या तासगाव नगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईच्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही अशी कारवाई सतत होणे आवश्यक आहे महिन्यापूर्वी ही कारवाई केली त्यानंतर तासगाव प्रशासन शांत होते त्यानंतर पुन्हा नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव नगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांनी उचलले पाऊल ते अभिनंदनास पात्र आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.तासगाव नगरपालिकेच्या कारवाई वेळी तासगाव पोलिसांनी सहकार्य केले आहे. सध्या तासगाव पोलीस प्रशासन शांत राहण्याची भूमिका घेत आहे. परंतु नगरपालिका प्रमाणे पोलिस प्रशासनाने सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत सावंत्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके,उपनिरीक्षक विश्राम मदने, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे, गुप्ताचे वंडे दादा व सर्व स्टाफ पोलीस यांनीही तातडीने पावले उचलून शहरात ज्याप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये आक्रमकपणे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्याप्रमाणे इथून पुढे त्या पद्धतीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे. तासगावकर नागरिकांनीही नगरपालिकेस व पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.

गोरगरिबांच्या काळजातला श्रीमंत गेला… कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे निधन..

 पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या पन्नास वर्षापासून लाखो कुटुंबांना आधार देणारा आधारवड कोसळला !  पांडुरंग परिवारातील प्राणतत्व  नाहीसे झाले !  पंत गेले… !
या तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील संत प्रवृत्तीचे लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांचे काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले .
लाखो कार्यकर्त्यांचा आधारवड कोसळला.
 आज सकाळपासून पंढरपूरकरच नव्हे तर पंढरपूरचे अवकाश देखील रडत आहे . पंढरपूरकरांनी आपल्या घरचा माणूस गमावला आहे अशा दु:खवेगामध्ये  प्रत्येक जण  शोकाकुल आहे.
 कार्यकर्त्यांचा भावना अनावर झाल्या आहेत.
त्यांच्या जाण्यापेक्षाही ते या पद्धतीने गेले …. त्यांचे अंत्यदर्शनही आम्ही घेऊ शकत नाही या भावनेने कार्यकर्ता व्याकुळ झाला आहे.
 त्यांच्यावरील पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आहेत , अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे .
 सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या  राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्यांना एकदाच  राज्यस्तरावरील सत्तेत बसण्याची संधी आली त्यातही त्यांनी हे महामंडळ नफ्यामध्ये आणून आपल्या निरपेक्ष कार्याची प्रचिती दिली होती .
सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती .  अडचणीमध्ये – तोट्या मध्ये असलेले उद्योग फायद्यामध्ये आणून ते सभासदांचे आधारस्तंभ म्हणून  पुढे करण्याची त्यांची ख्याती होती.
 आज त्यांनी नव्याने उभे केलेले केलेला पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक ,  भीमा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले युटोपियन  शुगर , कर्मयोगी विद्यानिकेतन ,  त्यांच्या सहकार्याने उभे राहिलेले दामाजी साखर कारखाना आणि तालुक्यातील 50 हून अधिक सोसायटी,  दूध संघांचे जाळे हे आज हजारो हजारो लोकांना रोजगार देत आहेत .
आपल्या कारकिर्दीत पाच वेळा आमदार किची टर्म भूषविणाऱ्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही याचा प्रत्येकाला मनाला चटका लागला आहे..

कृष्णाकाठावरिल गावांसाठी यंत्रिक बोटींचे लोकार्पण

पलूस (विशाल कांबळे)
    डॉ. विश्वजीत कदम यांनी या दिलेल्या यांत्रिक बोटीमुळे प्रशासनाला एक मौलिक मदत झाली आहे. ख-या अर्थाने महापुर येवूच नये यासाठी आम्ही शासन स्तरावर योग्य खबरदारी घेत आहोत. आताच्या सध्याच्या पाण्या संदर्भामध्ये त्यांनी प्रशासन पाण्याचे नियोजन कसे करत आहे. याची माहिती दिली. विश्वजीत कदम हे डॉ. पतंगराव कदम यांच्या झंजावंताप्रमाणे काम करत आहेत. पुढील ५० वर्षामध्ये या मतदार संघाचा ते प्रतिनिधी म्हणुन काम करतील यात शंका नाही. असे विचार ना. जयंत पाटील यांनी औदुंबर येथे व्यक्त केले.
       औदुंबर (ता. पलुस) येथे डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी मधुन ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या सौजन्याने  यांत्रिक बोटीचे ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील कुटूंबीयांच्या हस्ते या बोटींचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
       या लोकार्पण सोहळ्यावेळी ना. जयंत पाटील पुढे म्हणाले आमच्या मंत्रीमंडळामध्ये तरूण मंत्री असल्यामुळे त्यांचा अधुनिकते कडे कल आहे. ही विचारण सरणी राज्याच्या दुष्टीने विधायक स्वरूपाची आहे. विश्वजीत कदम यांनी पुढचा काळ ओळखुन २५ वर्षे टिकतील आशा वेगवान, कमी जागेत, कमी पाण्यात चालणा-या बोटी लोकार्पण केल्या आहेत. त्यांनी चांगल्या दर्ज्यासाठी वेगळा विचार करून परदेशातुन या बोटी मागविल्या आहेत. त्यांनी या बोटी दिल्या बद्दल शासनाच्या वतिने आभार मानतो. या सर्व बोटींची १ तासात १ हजार लोकांना पुरात बाहेर काढण्याची क्षमता आहे.
       स्वागत व प्रास्ताविक करताना विश्वजीत कदम म्हणाले  २०१९ साली कृष्णेच्या महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट दुर्घटना झाली. यात अनेकांची जिवीत हानी झाली. महापुर सदृश्य काळामध्ये आशा प्रकारची दुर्घटना होवु नये यासाठी कृष्णाकाठा वरिल गावामध्ये या बोटी वापरण्यात येणार आहे. २०१९ साली  च्या महापुरामध्ये ज्यांनी ज्यांनी अभुतपूर्व काम केले. त्यांच्या बद्दल मी कतृज्ञता व्यक्त करतो.
       कोरोनामुळे जगतिक मंदी, तसेच देशात राज्यात अार्थिक अडचण आहे. त्यामुळे गत वर्षी आलेल्या महापुरानंतर शासनाने जाहीर केलेली कर्ज माफी, व नियमित कर्ज परत फेड करणा-या शेतक-यांमा  कर्ज माफीची  जाहीर केलेली रक्तम मिळणार यात शंका नाही. पण मंदीच्या सावटामुळे थोडा उशीर होईल.
        याप्रसंगी खा. संजय काका पाटील आ. मनसिंगराव नाईक, अरूण लाड, महेंद्र लाड, जि. प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुड्डी, ए. डी. पाटील, आनंदराव मोहिते, गिरीष गोंदिल,  संग्राम पाटील, यासह तालुक्यातील अनेक मान्यवर, नागरिक उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवुन व मास्कचा वापर करून करण्यात आला. सरपंच अनिल विभुते यांनी आभार मानले.

औदुंबर (ता. पलुस) येथे डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी मधुन कृष्णाकाठावरिल गांवांच्यासाठी यांत्रिक बोटीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना जयंत पाटील, सह ना. विश्वजीत कदम, व इतर मान्यवर

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजना आजपासून सुरु होणार -जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील

तासगाव प्रतिनिधी
 :म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तना दरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झालेनंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरीक्त पाणी वाहून गेले होते. त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सूचीत केले होते. त्यानुसार जलसंपदा विभागामार्फत याबाबत कार्यवाही करणेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता मा. मंत्री महोदयांनी म्हैसाळ योजना आज दि. १७ ऑगस्ट २०२०  पासून कार्यान्वित करुन योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरणेबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या. यामध्ये साधारणपणे २.५० टि.एम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील ३० मोठे तलाव, ५०पाझर तलाव व ५० बंधारे भरण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सदर योजना आज दि. १७ ऑगस्ट २०२० पासून कार्यान्वित होत आहे.

दरोडा टाकुन पळुन जाणारा पिक-अप पोलीसांनी पकडला

पोलीस कारवाईत ४५ शेळ्यासह पिक-अप जप्त

परंडा:-
परांडा पोलिस हददीतील भूम तालुक्यातील मौजे तांबेवाडी शिवारातील राजु बाबासाहेब मस्तुद यांचेसह कुटुंबास मारहान करुन कुटुंबातील सर्वांना बांधुन त्यांच्या मालकिच्या शेळ्या बोकड व पाटी असे एकुन ४५ शेळ्या व घरातील सोन्याचे दागीने, तसेच रोख रक्कम असे मिळुन‌ एकुण सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन घेऊन जाणारा बोलेरो पिक-अप आज मयरात्रीच्या सुमारात भुम पोलीस स्टेशनचे स.पो.नि. साळवे साहेबांसह कर्मचाऱ्यांनी पकडुन परंडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला.
याबात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की तांबेवाडी शिवारातील बाबासाहेब मस्तुद यांच्या मालकीच्या ४५ शेळ्यासह घरातील सोन्याचे दागीने,रोख रक्कम सॅमसंग कंपणीचा मोबाईल असे मिळुन एकुण सहा लाख दोन हजार सहाशे रुपयांची चोरी करुन पळुन जाणारा पिक-अप भुम पोलीसांनी पकडुन परांडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला पिक अप क्र. एम एच २५. ए.जे.०२११ व चोरी झालेल्या ४५ शेळ्या, बोलेरो पिक-अपसह चालकास परांडा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेल्या आढळुन आलेल्या वस्तु जप्त करण्यात आल्या असुन चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम व मोबाईल मिळुन आलेला नाही. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.बनसोडे, पोलीस कर्मचारी अमोल वाघमारे, पोलीस औंट पोस्ट जवळा नि चे बिट अंमलदार सदाशिव काळेवाड, अविक्षित काटवटे, एम.डी.काळसाईन, सुधिर अंकुश माळी यांनी भेट देवुन पंचनामा करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी राजु बाबासाहेब मस्तुद यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन परांडा पोलीस स्टेशनमध्ये दिपक अर्जुन माळी रा.तेर ता.जि.उस्मानाबाद, रमेश उद्धव चव्‍हाण, नागेश काळे, बिभीषन नाना काळे, तोब्या पारधी, बापू चव्हाण सर्व‌ रा.पारधी पिढी ता.जि. उस्मानाबाद,मामा उर्फ आप्पा सोपान काळे,कल्याण दत्ता काळे रा कोरेगाव भुम रोड यांचेविरुंध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालक वगळता सर्व आरोपी फरार असुन आरोपींचा शोध सुरु असुन पुढील तपास परांडा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. ससाने हे करत आहे

महाजनको ला स्वातंत्र्य दिनाचे वावडे?

 

ध्वजवंदन न करण्या इतपत अधिकाऱ्यांची मजल!

उस्मानाबाद – आज देशभरात ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव एम आय डी सी मध्ये असलेल्या महाजेनेको च्या कार्यालयात साधे ध्वजवंदन टाळत स्वातंत्र्यदिन साजरा न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

याबाबत माहिती अशी की कौडगाव एम.आय. डी.सी. मध्ये महजेनेको अंतर्गत ५० मेगा वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे. या कार्यालयात साधारण २० कर्मचाऱ्यांचा राबता आहे. ध्वजवंदन करण्यासाठी ध्वजस्तंभ देखील उभारण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता मात्र ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी किंवा साधे ध्वजारोहण करण्यासाठी कोणीही फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाचे वावडे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत कौडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईकवाडी यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देखील केली असून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

काय आहे तक्रार

सामाजिक कार्यकर्ते विश्वास नाईकवाडी यांनी प्रशासनाकडे ईमेल द्वारे ही तक्रार केली आहे.

शासकीय ठिकाणी ध्वजारोहण न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्याबाबत …15 ऑगस्ट 2020 रोजी देशभर शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. पण कौडगाव पो.अंबेजवळगे ता.जि. उस्मानाबाद येथे  महाराष्ट्र शासनाच्या महाजेनको  अंतर्गत चालू असलेल्या 50MW सौरऊर्जा प्रकल्पात ध्वज स्तंभ असताना सुद्धा ध्वजारोहण करण्यात आलेलं नाही.जवळपास 20 शासकीय अधिकारी आणि कर्मचारी रोज या ठिकाणी उपस्थित असतात मात्र आजच्या दिनी या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाही.आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन करण्यास या सर्वांनी असमर्थता का दर्शवावी याची सखोल चौकशी होऊन त्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी.