उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारविरोधात एकत्र येत तक्रार देऊनही अद्याप पर्यंत ग्रामसेवकाची बदली न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, मानेवाडी येथील एकूण सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मानेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री दीपक होळकर यांच्या मनमानी कारभार व ग्रामपंचायत मधील सदस्यास विश्वासात न घेणे, ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेबद्दल ग्रामस्थांना माहिती न देणे, सर्व सामान्या नागरिकांची आडीअडचणी सोडवत नाहीत उलट उद्धट बोलणे, सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून मौजे मानेवाडी येथील गावठाण मध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून त्याची परस्पर विक्री करणे, त्यांच्या ठरलेल्या वाराप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये न येणे दहा पंधरा दिवसाला एकदा येतात, रूजू झाल्यापासून एकदाही राष्ट्रीय सणाला न येणे ,दाखला व सही घेण्यासाठी तुळजापूर ला व त्याच्या मुळ गावी उस्मानाबादला जावे लागते, ग्रामसेवक दिपक होळकर यांना गावच्या विकास कामात जराही रस नाही, अश्या आशयाच्या तक्रारीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहे. तसेच मानेवाडी येथे बेकायदेशीर प्लाॅट पाडुन विक्री केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर कार्यवाहीचा आहवाल आला आसता त्याच्यावर कारवाई ही केली नाही उलट संबधित ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे या संदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यापासून गटविकास आधिकारी प्रशांतसिग मोरोड याना चार ते सहा वेळेस अर्ज करूनही कारवाई तर नाहीच त्याची बदली ही केली अशी सदस्यांची तक्रार आहे निवेदनावर शहाजी ज्ञानोबा हाक्के, महावीर रामा सगट, स्वाती सुरेश माने, विजया शिवाजी देवकर, शालुबाई शरणाप्पा बर्वे, कविता तुकाराम हाके या सर्व या सदस्यांच्या सह्या आहेत.
मानेवाडी ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसेवकाविरूद्ध तक्रार; दखल घेईना प्रशासन
गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशापध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई
तासगाव प्रतिनिधी
लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमिका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी यावर्षी ६० ते ६५ टक्के गणेशोत्सव मंडळानी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली.
३० बेडचे ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन सहित हॉस्पिटल कार्यान्वित, खासदार खासदार संजय काका यांच्या प्रयत्न सह सर्वपक्षीय कृती समितीस यश
तासगाव :-
सध्या तासगाव शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण जोरदारपणे सुरू आहे दिवसेंदिवस कोरोणा बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे याची चिंता तासगावकर नागरिकांना भेडसावत आहे त्यामुळे तासगाव शहर 23 ऑगस्ट ते १.सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊन करण्याचे सर्वपक्षीय कृती समितीने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते त्याअनुषंगाने तहसीलदार मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक तासगाव यांना त्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले होते. त्या संदर्भात खासदार संजय काका पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या समवेत नगरपालिका येथे बैठक आयोजित केली होती यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार कल्पना ढवळे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व नगराध्यक्ष डॉक्टर सावंत व सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते यावेळी तातडीने 30 बेडचे हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करणे व 200 बेडचे महिला तंत्रनिकेतन तासगाव येथील हॉस्पिटल चार चार ते पाच दिवसात सुरू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केली होती.त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे तीस ,बेडचे ऑक्सिजन सहित तातडीने हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तासगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी व कोरोणा बाधित रुग्णांनी याची दखल घ्यावी, हे सर्व अंशता यश सर्वपक्षीय कृती समितीचे आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करू नये यासाठी व्यापारी असोसिएशन यांनी तहसीलदार यांची भेट घेतली होती त्या अनुषंगाने आज तातडीने सर्वपक्षीय कृती समितीला बैठकीसाठी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी समितीच्या सदस्यांना पाचारण केले होते यावेळी त्यांनी कृती समितीस सर्व गोष्टी व हॉस्पिटल संदर्भात माहिती नमूद केली आपण सध्या लाॅक डाऊन आमरण उपोषण थांबवण्याची विनंती केली त्या विनंतीवरून सर्व कृती समितीच्या सदस्यांनी एकमताने मान्यता दिली व हे सदरचे आंदोलन लाॅक डाऊन स्थगित करण्यात आल्याचे घोषित केले यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिवसेनेचे शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, राहुल शिंदे, विशाल शिंदे, डॉ. विवेक गुरव, रवींद्र साळुंखे यांनीकाही मुद्दे उपस्थित केले त्याचे समाधान तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी केले होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अर्जुन थोरात, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, राष्ट्रवादीचे खंडू कदम, राजू मुल्ला व सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.सुरुवातीच्या काळात सर्व पक्षीय कृती समिती स्थापन झाली त्यामध्ये तासगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सामील होते. परंतु आज या बैठकीकडे बैठकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वात महत्त्वाचे उद्या कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या कारणावरून तासगाव येथे २३० बेडचे तातडीचे हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात महा विकास आघाडीचे आरोग्य राज्यमंत्री व इतर काही मंत्री यांची तासगाव मध्ये तातडीची बैठक व पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
*तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे*
सांगली महापालिकेने एका आठवड्यात उभारले १२० खाटांचे अद्ययावत कोविड रुग्णालय
आज लोकार्पण, आयुक्त नितीन कापडणीस यांची संकल्पना
सांगली- प्रतिनिधी
करोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा व बाधितांवर यशस्वी उपचार करता यावेत, यासाठी सांगली महापालिकेच्यावतीने तब्बल १२० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून अवघ्या सात दिवसात उभारलेल्या या रुग्णालयाचे उद्या गुरुवारी लोकार्पण करण्यात येत आहे.
नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, मुख्य अभियंता आप्पा हलकुडे व शाखा अभियंता वैभव वाघमारे यांच्या टीमने रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करुन या रुग्णालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. या रुग्णालयात मनपा क्षेत्रातील रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनपा क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालयात खाटाच मिळत नसल्याची ओरड होत असतानाच नितीन कापडणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाचे कोविड रुग्णालय उभारण्याचे शिवधनुष्य उचलले होते. त्यासाठी सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर सांस्कृतिक भवनाची जागा निश्चित करुन प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात केली होती. या कोविड रुग्णालयात १०० ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था असून २० खाट हे कोविड संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कोविड रुग्णालयात मनपा कर्मचारी २४ तास तैनात राहणार असून १४ फिजिशन, सात मानसोपचार तज्ञ, २४ निवासी वैद्यकीय अधिकारी व ठराविक तासाला २२ जीएमएम वार्ड बॉय, लॅब व एक्स- रे टेक्निशियन, सहा स्वच्छता कर्मचारी व एक स्वच्छता निरीक्षक यासह २४ तास ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सज्ज असणार आहे. या रुग्णालयातील कोविड रुग्णांची केंद्र व राज्य शासनाच्या सर्व संकेतस्थळावर नोंद राहणार आहे. या रुग्णालयासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व विविध सामाजिक संस्था- संघटना यांनी रोख स्वरुपात आठ लाख रुपयांची, तर १५ लाख रुपये किंमतीची वस्तूरुपी मदत केली आहे. मनपाचे सर्व सदस्यही आपले मानधन देण्याच्या विचारात असून अधिकारी- कर्मचारी व शिक्षकांनी आपला एक दिवसाचा असा १८ लाख रुपयांची मदत या रुग्णालयासाठी देऊ केली आहे. या रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. याशिवाय या रुग्णांची भोजन व्यवस्थाही मोफतच असणार आहे. या पत्रकार बैठकीस आदिसागर सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शशिकांत पाटील व सचिव अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते.































































