Home Blog Page 272

आनंदाची बातमी; उजनी धरण १०० टक्के भरलं

महेश देशमुख (पिंपळनेर)
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले व सोलापुरसह पुणे, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज सकाळी १०.३० च्या दरम्यान १०० टक्के भरले असून शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे.भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक दौंडमधून २३९९६ व बंडगार्डन २२०५५ क्युसेक झाल्याने धरण १००.११ टक्के झाले. अजुनही दौड व बंडगार्डन विसर्ग मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे.

उजनी ने शंभरी पार केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील  उद्योगधंदे, कारखानदार, शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस सुरूच असून धरणातील पाणी बोगद्यातून ९००, कालव्यातून ३०० क्युसेक्स आणि सीना माढा योजनेसाठी २६२ क्युसेक्सने सोडण्यात येत आहे. संध्याकाळी चार वाजता कालव्यातून ६०० क्यूसेकनी पाणी सोडले जाणार आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने आज सकाळी अखेर शंभरीचा टक्का जवळ केला आहे.२०१८ मध्ये २७ ऑगस्ट ला, २०१९ मध्ये ७ ऑगस्ट  ला तर यावर्षी ३१ ऑगस्ट ला धरणाने शंभरी पार केली. उजनी धरणातील पाण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.

—————–

मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण

 उजनी धरण हे महाराष्ट्रातील जायकवाडी व कोयना धरणानंतर मोठे धरण असून, मृतसाठ्याबाबत सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० द. ल.घ. मी. (११८ टीएमसी) तर उपयुक्त साठवण क्षमता १५१७.१९ द. ल. घ. मी., मृतसाठवण क्षमता १८०२.८१ द. ल.घ. मी. उपयुक्त साठ्यापेक्षा(५३.५७ टीएमसी) मृतसाठा (६३.६५ टीएमसी) मोठे असलेले एकमेव धरण आहे. पाणलोट क्षेत्र १४८५६ चौ. कि. मी. असून, या धरणाखाली २९ हजार हेक्टर क्षेत्र, पुणे जिल्ह्यातील २५, सोलापूर जिल्ह्यातील २३ व  नगर जिल्ह्य़ातील ३ गावे अशी एकूण ५१ गावे बुडाली आहेत.

दैनिक जनमत ३१ ऑगस्ट E पेपर

उणीदुणी काढण्यापेक्षा सामुदायिकपणे कोरोना विरोधात हातात हात घालून काम केले पाहिजे -अमोल कदम

तासगाव प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी चार दिवसापूर्वी तासगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुमनताई आर पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला व त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी तोफ डागून एकच खळबळ माजवून दिली. विशेष म्हणजे या मागणीला काँग्रेस पक्ष,शिवसेना,शे.का.प. स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही. प्रहार संघटना इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावर सह्या केलेले आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच काल आरपीआय आठवले गट चे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे यांनीही पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर टीका करत तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांची उघडपणे पाठराखण केली आहे.
या सर्व टीकाटिपणी व उनी दुनी संदर्भात संभाजी ब्रिगेड चे तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शिवश्री अमोल कदम यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तासगाव शहरासह तालुक्यात जास्तीचा होताना दिसत आहेत रोजच्या रोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तासगाव शहरात आतापर्यंत २३ कोरोना  बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि आज मितीस रोज शहरात दहापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. उद्यापासून (रविवार) एक आठवडा तासगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोणा बाधित रुग्णांना सांगली येथे बेड मिळत नाहीत व उपचाराअभावी काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सर्वात महत्त्वाचे सर्वच राजकीय पक्षांनी आपण स्वतः काय केलं किंवा इतरांनी काय केलं या खोलात न जाता सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तासगाव शहरांमध्ये तातडीने कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी  व्हेंटिलेटर व अक्सिजन सहित ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर कसे सुरू होईल यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासदार संजय काका पाटील हे सध्या कोविड हॉस्पिटल उभारणी संदर्भात प्रयत्न करताना दिसत आहेत.सध्या महाराष्ट्र मध्ये तीन पक्षाचे महा विकास आघाडीचे सरकार असून पक्षाच्या पदाधिकारी व आमदार सुमनताई पाटील यांनी आपली ताकद पणाला लावून कोविड  हॉस्पिटल तातडीने सुरू करण्यासाठी आपले योगदान देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा  भविष्यात ही जनता कोणत्याच पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांना माफ करणार नाही. राहता राहिला राजीनामा मागणे हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मामला असतो त्यामुळे कोणत्या पक्षाचे  अध्यक्ष अथवा ज्येष्ठ राज्य पातळीवरील नेतेमंडळी अशी टीकाटिपणी करण्यास कधीच परवानगी देत नाहीत.

पत्नीसह सासुवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दोघींचा पडला मुडदा

 परंडा:-( दत्ता नरुटे )चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या तर  सोडविण्यास गेलेल्या सासुची देखील हत्या करण्यात आल्याची घटना परंडा तालूक्यातील  सरणवाडी येथे दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .
 या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सणवाडी येथिल हरिश्चंद्र जाधव याचे लग्न सारीका हिच्याच्या १७ वर्षा पुर्वी झाले होते त्याना समाधान मुलगा व ऋतुजा मुलगी असे दोन आपत्ये आहेत .
मागील ३ ते ४ वर्षा पासुन हरिश्चंद्र जाधव हा पत्नी सारीकाच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत असल्याने गेल्या ७ ते ८ माहिण्या पासुन सारीका ही आई वडिला कडे पुणे येथे राहत होती . तर मुलगा , समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे राहत होते .
मुलांना पुणे येथे घेऊन जान्या साठी सारीका ही आई लक्ष्मी सह दि २८ रोजी सरणवाडी येथे आली होती मुलांना पाठविण्याच्या कारणा वरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात भांडणे झाली या वेळी हरिश्चंद्र जाधव याने पत्नी सारीका च्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला  भांडण सोडवीण्या साठी सासू लक्ष्मी गेली असता त्यांच्या वर देखील  कुऱ्हाडीचे हल्ला केला या मध्ये सारीका व लक्ष्मी  दोघी जागीच ठार झाल्या .
मयत लक्ष्मी यांचा मुलगा राहुल दादा क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्या विरूध्द परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.निरिक्षक  सय्यद हे करीत आहेत

डोमगाव येथे कोरोना रुग्णांची संख्या ७ वर

रोसा(समीर ओव्हाळ )
कोरोना चा संसर्ग  दिवसेंदिवस वाढत असून परंडा तालुक्यातील डोमगाव येथे कोरोना ने एन्ट्री केले असून येथे ७ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंडा तालुक्यातील कोरोना चा प्रभाव रोखण्यासाठी महसूल तसेच आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून तरीदेखील परंडा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरूना रोगाची संख्या वाढत आहे परंडा तालुक्यातील डोमगाव येथे आज पर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला  नव्हता  मात्र दिनांक 23 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याच बरोबर 27 ऑगस्ट रोजी पाच व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे एकाच घरातील सात व्यक्ती पॉझिटिव निघाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेजारी-पाजारी गावातील लोकांना  या गावात जायचे की नाही जायचं हा प्रश्न पडत आहे. डोंमगाव ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
   गावातील ग्रामस्थांनी आपली व आपल्या कुटुंबाची कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे नेहमी मास्क चा वापर करून दररोज हात साबणाने स्वच्छ धुवावेत कामानिमित्त बाहेर पडल्यास विनाकरण कुठल्याही वस्तूला हात लावू नका प्रशासनाने दिलेल्या अशा सर्व नियमांचे आपण काटेकोर पालन केले तर आपण नक्कीच कोरोना पासून दूर राहू यामुळे आपल्या कुटुंबाला व आपले गावाला कायम स्वरूपी कोरोना पासून दूर राहण्यास नक्कीच मदत होणार घाबरू नका काळजी घ्या असे ग्रामसेवक बालाजी कांबळे जनमत बोलताना सांगितले