Home Blog Page 271

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारपासून १०दिवस जनता कर्फ्यू पाळावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

– रूग्ण संख्या वाढली तरीही कोणीही घाबरून जाऊ नये

सांगली/ तासगाव प्रतिनिधी दि.
 सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच स्वत: बरोबरच कुटुंबियांना कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करावे, गर्दी करू नये. रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी रॅपीड ॲन्टीजन टेस्ट व आरटीपीसीआर तपासणीची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जरी रूग्ण संख्या वाढली तरी कोणीही घाबरून जावू नये. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबरपासून १० दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांच्या संपादकांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनावर सहजासहजी मात करता येऊ शकते. यासाठी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचाराखाली रहावे. प्रकृती स्थिर असल्यास होम आयसोलेशमध्येही रूग्ण बरा होऊ शकतो. घाबरून जाऊन आवश्यक नसताना कोविड हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्याचा आग्रह धरू नये. त्यामुळे गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता होण्यास अडचण निर्माण होईल. गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता व्हावी यासाठी रूग्णालयांनी गरज असेल त्यांनाच हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावे. जर प्रकृती स्थीर झाली असेल तर रूग्णांनी स्वत:हून हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घ्यावा. घाबरून जाऊन बेड अडवून ठेवू नये. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणीही एचआरसीटी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.

दैनिक जनमत ९ सप्टेंबर E पेपर

दैनिक जनमत ८ सप्टेंबर E पेपर

तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण डिस्चार्ज

खासदार संजयकाका पाटील यांचे पुढाकाराने आणि प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन कोव्हिड केअर सेंटर येथून काल रात्री पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. विजय जाधव आणि त्यांचे सर्व डॉक्टर सहकारी व पॅरामेडिकलच्या टीम यांचे अथक प्रयत्नातून सदर पेशंट कोरोनामुक्त झाला.
सदर पेशंटचा स्वॅब काल रात्री निगेटिव्ह आल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार सर्व कारवाई करून पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला.  यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, डॉ. विजय जाधव, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. विद्याधर कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील, नगरपालिकेचे अधिकारी आणि कोव्हिड सेंटरचे समन्वयक प्रताप घाटगे, माजी नगरसेवक भोला मानकर यांचे उपस्थितीत पेशंटना पुष्पगुच्छ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्याच आठवड्यात जनतेच्या सेवेत सदरचे कोविड हॉस्पिटल कार्यरत करण्यात आले होते सुरुवातीलाच एक दोन दिवसात डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्या थोडासा गैरसमज निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे संपला असून तासगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ विजय जाधव व त्यांची संपूर्ण शहरातील डॉक्टरांची टीम कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असून त्याचाच परिपाक म्हणून पहिला पेशंट पूर्णपणे पूर्ण मुक्त होऊन आपल्या घरी आपल्या कुटुंबांमध्ये परतला आहे. आज डॉक्टरांची टीम नुसते डॉक्टर बसून ते देव माणूस बनूनघ रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या सर्व डॉक्टरांच्या टीमच्या हातून हे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत व आपला तालुका व तासगाव शहर लवकरच या सर्व आजारावर मात करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया.

तासगाव च्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सहा महिने मुदतवाढ

संचालक मंडळ बरखास्त होणार या चर्चेला तूर्ततरी पूर्णविराम

तासगाव प्रतिनिधी
तालुका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २८/८/२०२० पर्यंत होती ती संपणार होती. त्यामुळे संचालक मंडळाने संचालक मुदतवाढ मिळावी यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता. त्याच कार्यासन अधिकारी यांनी संचालक मंडळ मुदतवाढीचा आदेश पारित  क्रमांक कृबास ८२०/ प्र कृती १००/२१स दि.२१ सप्टेंबर २०२० चे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक २८/८/२०२० पासून पुढे सहा महिने म्हणजेच दि.२७/२/२०२० पर्यंत सामने कृषी उत्पन्न बाजार संगीता सर्व संचालक मंडळ मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातली माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अजित          नारायण जाधव व सचिव चंद्रकांत हिंदुराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपणार असल्याने या संदर्भात संचालक मंडळास मुदतवाढ मिळणार का निवडणुका लागणार किंवा प्रशासकीय मंडळ स्थापन होणार याची उलट-सुलट चर्चा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात व तासगाव तालुक्यात सध्या सुरू होती. परंतु तासगाव कवठेमंकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांनी आपली ताकद पणाला लावून संचालक मंडळ सहा महिन्याची मुदत वाढवून दिल्या ची दबक्या आवाजात चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणूक होणार की प्रशासक मंडळ येणार या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.परंतु प्रशासक मंडळ आले तर आपली वर्णी लागावी यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशेवर मात्र पाणी पडल्याची दिसत आहे.