तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण डिस्चार्ज
खासदार संजयकाका पाटील यांचे पुढाकाराने आणि प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या तासगांव येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन कोव्हिड केअर सेंटर येथून काल रात्री पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. विजय जाधव आणि त्यांचे सर्व डॉक्टर सहकारी व पॅरामेडिकलच्या टीम यांचे अथक प्रयत्नातून सदर पेशंट कोरोनामुक्त झाला.
सदर पेशंटचा स्वॅब काल रात्री निगेटिव्ह आल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार सर्व कारवाई करून पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, डॉ. विजय जाधव, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. विद्याधर कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील, नगरपालिकेचे अधिकारी आणि कोव्हिड सेंटरचे समन्वयक प्रताप घाटगे, माजी नगरसेवक भोला मानकर यांचे उपस्थितीत पेशंटना पुष्पगुच्छ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्याच आठवड्यात जनतेच्या सेवेत सदरचे कोविड हॉस्पिटल कार्यरत करण्यात आले होते सुरुवातीलाच एक दोन दिवसात डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्या थोडासा गैरसमज निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे संपला असून तासगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ विजय जाधव व त्यांची संपूर्ण शहरातील डॉक्टरांची टीम कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असून त्याचाच परिपाक म्हणून पहिला पेशंट पूर्णपणे पूर्ण मुक्त होऊन आपल्या घरी आपल्या कुटुंबांमध्ये परतला आहे. आज डॉक्टरांची टीम नुसते डॉक्टर बसून ते देव माणूस बनूनघ रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. या सर्व डॉक्टरांच्या टीमच्या हातून हे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत व आपला तालुका व तासगाव शहर लवकरच या सर्व आजारावर मात करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया.
तासगाव च्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सहा महिने मुदतवाढ
संचालक मंडळ बरखास्त होणार या चर्चेला तूर्ततरी पूर्णविराम
तासगाव प्रतिनिधी
तालुका येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २८/८/२०२० पर्यंत होती ती संपणार होती. त्यामुळे संचालक मंडळाने संचालक मुदतवाढ मिळावी यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता. त्याच कार्यासन अधिकारी यांनी संचालक मंडळ मुदतवाढीचा आदेश पारित क्रमांक कृबास ८२०/ प्र कृती १००/२१स दि.२१ सप्टेंबर २०२० चे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक २८/८/२०२० पासून पुढे सहा महिने म्हणजेच दि.२७/२/२०२० पर्यंत सामने कृषी उत्पन्न बाजार संगीता सर्व संचालक मंडळ मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातली माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अजित नारायण जाधव व सचिव चंद्रकांत हिंदुराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपणार असल्याने या संदर्भात संचालक मंडळास मुदतवाढ मिळणार का निवडणुका लागणार किंवा प्रशासकीय मंडळ स्थापन होणार याची उलट-सुलट चर्चा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात व तासगाव तालुक्यात सध्या सुरू होती. परंतु तासगाव कवठेमंकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांनी आपली ताकद पणाला लावून संचालक मंडळ सहा महिन्याची मुदत वाढवून दिल्या ची दबक्या आवाजात चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे निवडणूक होणार की प्रशासक मंडळ येणार या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.परंतु प्रशासक मंडळ आले तर आपली वर्णी लागावी यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आशेवर मात्र पाणी पडल्याची दिसत आहे.
आनंदाची बातमी; उजनी धरण १०० टक्के भरलं
महेश देशमुख (पिंपळनेर)
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले व सोलापुरसह पुणे, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज सकाळी १०.३० च्या दरम्यान १०० टक्के भरले असून शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे.भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक दौंडमधून २३९९६ व बंडगार्डन २२०५५ क्युसेक झाल्याने धरण १००.११ टक्के झाले. अजुनही दौड व बंडगार्डन विसर्ग मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे.
उजनी ने शंभरी पार केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखानदार, शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस सुरूच असून धरणातील पाणी बोगद्यातून ९००, कालव्यातून ३०० क्युसेक्स आणि सीना माढा योजनेसाठी २६२ क्युसेक्सने सोडण्यात येत आहे. संध्याकाळी चार वाजता कालव्यातून ६०० क्यूसेकनी पाणी सोडले जाणार आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने आज सकाळी अखेर शंभरीचा टक्का जवळ केला आहे.२०१८ मध्ये २७ ऑगस्ट ला, २०१९ मध्ये ७ ऑगस्ट ला तर यावर्षी ३१ ऑगस्ट ला धरणाने शंभरी पार केली. उजनी धरणातील पाण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.
—————–
मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण
उजनी धरण हे महाराष्ट्रातील जायकवाडी व कोयना धरणानंतर मोठे धरण असून, मृतसाठ्याबाबत सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० द. ल.घ. मी. (११८ टीएमसी) तर उपयुक्त साठवण क्षमता १५१७.१९ द. ल. घ. मी., मृतसाठवण क्षमता १८०२.८१ द. ल.घ. मी. उपयुक्त साठ्यापेक्षा(५३.५७ टीएमसी) मृतसाठा (६३.६५ टीएमसी) मोठे असलेले एकमेव धरण आहे. पाणलोट क्षेत्र १४८५६ चौ. कि. मी. असून, या धरणाखाली २९ हजार हेक्टर क्षेत्र, पुणे जिल्ह्यातील २५, सोलापूर जिल्ह्यातील २३ व नगर जिल्ह्य़ातील ३ गावे अशी एकूण ५१ गावे बुडाली आहेत.




































































