Home Blog Page 269

दैनिक जनमत १६ सप्टेंबर E पेपर

आवार पिंपरी येथील आरो प्लांट खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा घाट

मुदत संपत आल्याने सत्ताधारी कारभाऱ्यांचा डाव,

 ग्रामस्थांचा विरोध ,

परंडा (दत्ता नरुटे) परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथे गेल्या काही वर्षांपूर्वी गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याकरता मिळावे याकरता शासनाच्या निधीतून गावात आटो प्लॅन्ट बनवण्यात आला आज पर्यंत यावर ग्रामपंचायत चे नियंत्रण आहे. परंतु  आता ग्रामपंचायत ची मुदत संपत आल्याने गावच्या कारभार्यानी एका साप्ताहिकात जाहिरात देऊन त्या आरो प्लांट चालविन्यासाठी निविदा मागवल्या आहेत त्यामुळे गावातील नागरिक  याला विरोध करत असून आरो प्लांट ग्रामपंचायत च्या मार्फत चालवावा तो खाजगी करू नये त्यावर एक माणसाचे किंवा  खाजगी संस्थेचे वर्चस्व राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना  6 रुपयात एक घागरभर पाणी दिले जाते त्यामुळे नागरिकांनी अत्यल्प दरात  शुद्ध पाणी भेटत आहे ते पाणी फिल्टर एखाद्या खाजगी संस्थेला दिले तर ती संस्था लगेच त्या पाण्याचे दर वाढवणार ,पाणी योग्य प्रकारचे मिळणार की नाही याबाबत ही नागरिक शंका उपस्थित करत असून खाजगी करण झाल्यास शासनाच्या पैसाचा गैरवापर होणार नाही का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी गट विकास अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून हे खाजगीकरण होऊ देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे

दैनिक जनमत १५ सप्टेंबर E पेपर

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा- पालकमंत्री ना. जयंतराव पाटील

तासगाव प्रतिनिधी
 जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. रूग्णसंख्येची वाढ कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात जनता कर्फ्यू चालू असून हा सर्वांसाठी आहे. सर्वांनी आवश्कता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंतराव पाटील यानी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिका हद्दीतल व्यापारी व उद्योजक यांच्यासमवेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागातील भाजी विक्रेते आणि बाजार यामुळे होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने सुरूवातीला जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस विभाग गर्दीच्या ठिकाणी कडक भूमिका स्विकारेल. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोणीही एकत्रित येऊन गर्दी करू नये.
संपूर्ण जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा उद्यापासून कार्यरत होईल असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जनजीवन चालू राहील पण गर्दीच्या ठिकाणी भरणारे बाजार सर्व थांबविण्यात येतील. त्यासाठी कडक कारवाई करून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये जर अपयश आले तर लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल. येणाऱ्या काळात सर्वांनी कडकपणे नियमांचे पालन करावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या आलेल्या १४० ऑक्सिजन बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची पहाणी करून तेथे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या कोविड केअर सेंटरमधील १४० ऑक्सिजन बेडपैकी १२ व्हेंटीलेटर व हाय फ्लो नोझल ऑक्सिजन बेड् आहेत.
तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांच्या वॉर्डला भेट देवून रूग्णांशी संवाद साधून विचारपूस केली व मानसिक आधार दिला. त्याचबरोबर रूग्णालयाच्या विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारपासून १०दिवस जनता कर्फ्यू पाळावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन

– रूग्ण संख्या वाढली तरीही कोणीही घाबरून जाऊ नये

सांगली/ तासगाव प्रतिनिधी दि.
 सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच स्वत: बरोबरच कुटुंबियांना कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करावे, गर्दी करू नये. रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी रॅपीड ॲन्टीजन टेस्ट व आरटीपीसीआर तपासणीची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जरी रूग्ण संख्या वाढली तरी कोणीही घाबरून जावू नये. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबरपासून १० दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांच्या संपादकांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनावर सहजासहजी मात करता येऊ शकते. यासाठी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचाराखाली रहावे. प्रकृती स्थिर असल्यास होम आयसोलेशमध्येही रूग्ण बरा होऊ शकतो. घाबरून जाऊन आवश्यक नसताना कोविड हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्याचा आग्रह धरू नये. त्यामुळे गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता होण्यास अडचण निर्माण होईल. गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता व्हावी यासाठी रूग्णालयांनी गरज असेल त्यांनाच हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावे. जर प्रकृती स्थीर झाली असेल तर रूग्णांनी स्वत:हून हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घ्यावा. घाबरून जाऊन बेड अडवून ठेवू नये. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणीही एचआरसीटी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.