Home Blog Page 268

दैनिक जनमत ६ ऑक्टोबर E पेपर

जिल्ह्याच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

उस्मानाबाद ता. 4 ःमराठवाड्यासह जिल्ह्याच्या प्रलंबित विषयाच्या बाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी (ता. एक) रोजी बैठक घेतली.बैठकीमध्ये
कृष्णा-मराठवाडा प्रकल्प,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माती,स्वतंत्र विद्यापीठ निर्मीती,औद्यागिक वसाहतीचा विकास व तुळजापुर तिर्थक्षेत्र रेल्वेने
जोडण्याच्या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.बैठकीला आमदार प्रा.तानाजी सावंत,
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती.
कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा द्वीतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव नियामक मंडळाच्या 73 व्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा ठराव मंजुर आहे. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत प्रकल्पास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबतचा निर्णय होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत दुधाळवाडी साठवण तलाव व उपसा सिंचन योजना क्रमांक दोन रामदरा साठवण
तलाव पर्यंतच्या कामाच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव तीन ऑगस्टच्या महामंडळाच्या पत्रानुसार शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुंषगाने फेरनियोजनाच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रीमहोदयाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंत्रीमंडळासमोर ठेऊन तो मंजुर करण्यात यावा अशीही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांच्याकडे करण्यात आली.विद्यापीठाबाबतही एक बैठक ऑगस्टमध्ये पार पडली होती,त्याचा संदर्भ देऊन त्या बैठकीत एका समितीची घोषणा करण्यात आली होती,त्याचे गठन होऊन त्या समितीकडुन तत्काळ अहवाल मागवुन घेण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.कौडगाव एमआयडीसीमध्ये भेलच्या प्रकल्पाव्यतिरिक्त नविन उद्योग येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक उद्योगांनाही प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वडगाव (सि) येथील औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मावेजा रुपये 43 कोटी रुपये तातडीने वितरीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले.
या महत्वाच्या विषयाच्याबरोबरच तुळजापुरला तीर्थक्षेत्र म्हणुन देशाच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वेने जोडणे आवश्यक आहे. हा रेल्वेमार्ग मंजुर असला तरी
केंद्राकडुन या कामाबाबत म्हणावी अशी गती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यसरकारकडुन हिस्सा घालुन हा मार्ग तातडीने पुर्ण करण्यासाठी आवश्यक
त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी याबाबत सकारात्मक असल्याचे सांगुन सर्व
मागण्या पुर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वसन उपस्थित लोकप्रतिनिधीना दिल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यांनी दिली आहे.

दैनिक जनमत ४ ऑक्टोबर E पेपर

कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

सलगरा (दि.) – प्रतिनिधी

 राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक काक्रंबा येथे शिवसेनेच्या वतीने भाजप केंद्र सरकारने घातलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णया विरोधात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या फोटोला कांद्याचा माळा घालण्यात आल्या तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर हा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या गाड्या उस्मानाबाद जिल्ह्यात कुठे ही फिरू देणार नाही असा इशारा दिला तसेच यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण यांनी बोलताना स्थानिक आमदार हे केंद्रीय कृषीमंत्री यांना कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी पञ लिहण्याचे धाडस दाखवतील का? असा खडा सवाल यावेळी विचारला या आंदोलनाचे निवेदन स्विकारण्यास मंडळअधिकारी कुलकर्णी,तसेच तलाठी पवार हे उपस्थित होते. ह्या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,युवासेना जिल्हा चिटणीस लखन कदम परमेश्वर,शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना काक्रंबा गणप्रमुख कालिदास सुरवसे, काक्रंबा जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर, भारत पाटील, उमेश खांडेकर, शाम माळी, शहाजी नन्नवरे, बालाजी पांचाळ, किसन देडे, हंगरगा शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, राजेंद्र म्हंकराज, शाहूराज लोखंडे, सचिन सोनवणे, सोमनाथ सुरवसे, दिपक भिसे, सिंदफळ सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्राम कारभारी, नंदगाव सोशल विभागप्रमुख जितेंद्र माने, अक्षय काळे, स्वपनिल जटाळ, राम घोगरे, विनोद साबळे, नितेश माने, प्रवीण क्षीरसागर, तसेच या आंदोलनास भिम आण्णा सामाजिक संघटनेने देखिल लेखी पञ देऊन पाठींबा दिला यावेळी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे, अशोक जाधव, किशोर साठे, दत्ता भाजे, युवराज भिसे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. व शेतकरी वर्ग काक्रंबा ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते .

मराठा आरक्षण; २ ऑक्टोबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तर ५ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय तहसील समोर आंदोलन

उस्मानाबाद : सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मराठा समाजाने आता राज्यस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरासमोर दि. २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करून आंदोलनाची सुरवात होणार असल्याची माहितीची मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात २ दिवसापूर्वी मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली होती
. तर काल नाशिक येथे छत्रपती संभाजीराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षेखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्येही मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातही होणारे आंदोलनराज्यस्तरीय बैठकितील धोरणाप्रमाणे होणार आहेत. त्या नुसार आता २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, या बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्च्याने अधिकृत रित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी व शासनाला देण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात तालुकास्तरीय समन्वयक यांची निवड करण्यात येणार आहे.
तसेच हे आंदोलन होत असताना “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या प्रमाणे सोशल नियमावलीचे पालन करून तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टंसीग चे पालन करून सर्व आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे.