Home Blog Page 267

दैनिक जनमत १५ ऑक्टोबर E पेपर

सीना कोळगाव ओव्हरफ्लो ,4 दरवाजे उघडले सीना नदीत विसर्ग सुरू

 

परंडा(दत्ता नरुटे) परंडा तालुक्यातील सर्वात मोठे   (5tmc)समजले जाणारे सीना कोळगाव धरण  बुधवार दि 14 रोजी अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी दोन टप्प्यात धरणाचे 4 दरवाजातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे 

 सीना कोळगाव धरणात नगर जिल्ह्यातील पाणी येते गेल्या महिनाभर नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे सीना नदीवरील नगर जिल्ह्यातील धरणे गेल्या महिन्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सीना कोळगाव धरण भरण्याचे आशा पल्लवित झाल्या होत्या अखेर आज धारण 100 टक्के भरले असून यातून खाली पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे परंडा ,करमाळा, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे गेल्या दोन वर्षात हे धरण भरले नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता 

13हजार हेक्टर होणार बागायती

सीना कोळगाव धरणतुन परंडा तालुक्यातील 8700 हेक्टर तर करमाळा तालुक्यातील3400 हेक्टर असे लागवडीलायक क्षेत्र 13000 च्या आसपास सिंचित होणार असून याचा फायदा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे  

 धरण  भरले पण नियोजनाचे काय?

सीना कोळगाव धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे परंतु त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे धरणातून विविध ठिकाणी पाणी सोडवे लागते यामध्ये परंडा तालुक्यातील आनाळा,करमाळा तालुक्यातील नेर्ले साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे त्यामुळे प्रशासनाने वाया जाणारे पाणी  या ठिकाणी सोडावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

दैनिक जनमत १४ ऑक्टोबर E पेपर

 

हाथरस येथील आरोपीना फाशी द्यावी,मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा- प्रविण धेंडे यांची मागणी

राहुल कांबळे तासगाव प्रतिनिधी दि.५
       आज तासगाव येथे उत्तरप्रदेश हातरस येथील दलित मुलीची सामुहिक बलात्कार करूण हत्या केल्या प्रकरणी आरोपींना फाशी द्यावी सदरच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून  भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच हाथरस विभागाचे जिल्हाधिकारी व व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सहआरोपी करावे या आग्रही मागणीसाठी तासगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या)वतीने तासगाव येथे निषेध व्यक्त करून तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे आरोपीना तात्काळ  फाशी देण्यात यावी या सह उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे व तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याना हि सह आरोपी करण्यात यावे आणि तेथील १२ गावातील लोकांनी आरोपिंच समर्थन केल्याने त्यांना ही सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना प.म.उपाध्यक्ष प्रमोद अमृतसागर यांनी उत्तरप्रदेशातील जातीयवादी भाजप सरकारचा व प्रशानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करूण अशा लोकांना आमच्या हवाली करा असे मत व्यक्त केले.
नेते भीमराव भंडारे यांनी ही उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते अर्जुन थोरात यांनी ही गप्प बसून चालणार नाही असे व्यक्त होत निंदनीय प्रकार असा निषेध केला समाज भूषण पुरस्कर्ते मिलिंद माने.व माजी नगरसेवक म्हाकू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली आहे अशा भावना व्यक्त केल्या.
      यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तालुका उपाध्यक्ष दिनेश डावरे, युवक तालुका अध्यक्ष जयेश कांबळे,तालुका कार्य अध्यक्ष सुहास कांबळे,तालुका सरचिटनिस संतोष लोंढे,जिल्हा युवक उपाध्यक्ष निलेश गवाळे,तालुका अपंग आघाडी अध्यक्ष हर्षवर्धन थोरात, युवक कार्य अध्यक्ष वैभव कांबळे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.त्यांच्याच पक्षाचे तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते आज उत्तरप्रदेशच्या हातरसच्या घटनेसंदर्भात आक्रमक होताना दिसत दिसत आहेत त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत