हाथरस येथील आरोपीना फाशी द्यावी,मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा- प्रविण धेंडे यांची मागणी
राहुल कांबळे तासगाव प्रतिनिधी दि.५
आज तासगाव येथे उत्तरप्रदेश हातरस येथील दलित मुलीची सामुहिक बलात्कार करूण हत्या केल्या प्रकरणी आरोपींना फाशी द्यावी सदरच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच हाथरस विभागाचे जिल्हाधिकारी व व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सहआरोपी करावे या आग्रही मागणीसाठी तासगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या)वतीने तासगाव येथे निषेध व्यक्त करून तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी या सह उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे व तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याना हि सह आरोपी करण्यात यावे आणि तेथील १२ गावातील लोकांनी आरोपिंच समर्थन केल्याने त्यांना ही सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना प.म.उपाध्यक्ष प्रमोद अमृतसागर यांनी उत्तरप्रदेशातील जातीयवादी भाजप सरकारचा व प्रशानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करूण अशा लोकांना आमच्या हवाली करा असे मत व्यक्त केले.
नेते भीमराव भंडारे यांनी ही उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते अर्जुन थोरात यांनी ही गप्प बसून चालणार नाही असे व्यक्त होत निंदनीय प्रकार असा निषेध केला समाज भूषण पुरस्कर्ते मिलिंद माने.व माजी नगरसेवक म्हाकू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली आहे अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तालुका उपाध्यक्ष दिनेश डावरे, युवक तालुका अध्यक्ष जयेश कांबळे,तालुका कार्य अध्यक्ष सुहास कांबळे,तालुका सरचिटनिस संतोष लोंढे,जिल्हा युवक उपाध्यक्ष निलेश गवाळे,तालुका अपंग आघाडी अध्यक्ष हर्षवर्धन थोरात, युवक कार्य अध्यक्ष वैभव कांबळे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.त्यांच्याच पक्षाचे तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते आज उत्तरप्रदेशच्या हातरसच्या घटनेसंदर्भात आक्रमक होताना दिसत दिसत आहेत त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
जिल्ह्याच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक
उस्मानाबाद ता. 4 ःमराठवाड्यासह जिल्ह्याच्या प्रलंबित विषयाच्या बाबतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी (ता. एक) रोजी बैठक घेतली.बैठकीमध्ये
कृष्णा-मराठवाडा प्रकल्प,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माती,स्वतंत्र विद्यापीठ निर्मीती,औद्यागिक वसाहतीचा विकास व तुळजापुर तिर्थक्षेत्र रेल्वेने
जोडण्याच्या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.बैठकीला आमदार प्रा.तानाजी सावंत,
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती.
कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा द्वीतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव नियामक मंडळाच्या 73 व्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी शिफारस करण्याचा ठराव मंजुर आहे. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत प्रकल्पास द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबतचा निर्णय होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच उपसा सिंचन योजना क्रमांक एक अंतर्गत दुधाळवाडी साठवण तलाव व उपसा सिंचन योजना क्रमांक दोन रामदरा साठवण
तलाव पर्यंतच्या कामाच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव तीन ऑगस्टच्या महामंडळाच्या पत्रानुसार शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुंषगाने फेरनियोजनाच्या प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव ऑगस्टमध्ये झालेल्या मंत्रीमहोदयाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंत्रीमंडळासमोर ठेऊन तो मंजुर करण्यात यावा अशीही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांच्याकडे करण्यात आली.विद्यापीठाबाबतही एक बैठक ऑगस्टमध्ये पार पडली होती,त्याचा संदर्भ देऊन त्या बैठकीत एका समितीची घोषणा करण्यात आली होती,त्याचे गठन होऊन त्या समितीकडुन तत्काळ अहवाल मागवुन घेण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.कौडगाव एमआयडीसीमध्ये भेलच्या प्रकल्पाव्यतिरिक्त नविन उद्योग येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक उद्योगांनाही प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वडगाव (सि) येथील औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मावेजा रुपये 43 कोटी रुपये तातडीने वितरीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी सांगितले.
या महत्वाच्या विषयाच्याबरोबरच तुळजापुरला तीर्थक्षेत्र म्हणुन देशाच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वेने जोडणे आवश्यक आहे. हा रेल्वेमार्ग मंजुर असला तरी
केंद्राकडुन या कामाबाबत म्हणावी अशी गती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यसरकारकडुन हिस्सा घालुन हा मार्ग तातडीने पुर्ण करण्यासाठी आवश्यक
त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी याबाबत सकारात्मक असल्याचे सांगुन सर्व
मागण्या पुर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वसन उपस्थित लोकप्रतिनिधीना दिल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यांनी दिली आहे.

















































































