Home Blog Page 265

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार !

 

उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी; त्यांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज व उद्या दोन दिवसाच्या उस्मानाबाद जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत. 

खा.शरद पवार यांनी कालच उस्मानाबाद जिल्हा दौरा केला आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना  मदत करणेबाबत ठोस असे कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ना.फडणवीस कोणती आक्रमक भूमिका घेतात याबाबत जिल्हावासीयांत उत्सुकता लागली आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबाद येथे मुक्कामी असणार असून जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या शिंगोली येथील निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत हे विशेष! त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे पण असणार आहेत. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेली परिस्थिती निदर्शनास आणून तातडीने मदत करावी यासाठी मुख्यमंत्री ना.ठाकरे यांच्याकडे दोन वेळेस आग्रही मागणी केली. परंतु त्यांनी अजूनही कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. तसेच खा.पवार साहेब यांनी जिल्हा दौऱ्यावर करूनही मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अनुषंगाने डॉ. पाटील यांच्या  निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सरकार विरोधात  काय ‘खलबते’ होतात याबाबत उत्सुकता लागली आहे.

दैनिक जनमत १८ ऑक्टोबर E पेपर

 

तासगाव येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रूट मार्च

राहुल कांबळे/ तासगाव प्रतिनिधी

सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक श्री दिक्षितकुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांचे मार्गदर्शनाखाली अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव विभाग,पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी नवरात्र/दुर्गामाता उत्सवचे अनुशंगाणे तासगांव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता सकाळी.१०.३० ते ११.४० वा पर्यंत छ.शिवाजी महाराज पुतळा,एस.टी.स्टॅण्ड चौक, गणपती मंदिर सिध्देश्वर चौक, सराफ कटटा, बागवान चौक, मुस्लिम मोहल्ला , माळी गल्ली, विटा नाका, चिंचणी नाका, खाटीक गल्ली,बागवान चौक, बागणे चौक,वंदेमातरम चौक,सिध्देश्वर मंदिर,गणपती मंदिर,शनी मंदिर, छ.शिवाजी महाराज पुतळा असा रुट मार्च घेण्यात आलास रूट मार्चकरिता तासगांव पोलीस ठाणेकडील ४ अधिकारी व २७ कर्मचारी व ३० होमगार्ड तसेच पोलीस मुख्यालयाकडील दंगल नियंत्रण पथकाचे ९ कर्मचारी उपस्थित होते.सदर रुटमार्च दरम्यान  उपविभागीय अधिकारी तासगांव अश्विनी शेंडगे यांनी गणपती मंदीर येथे रुटमार्च मधील सर्व अधिकारी व कर्मचारी ब्रिफींग करतांना नवरात्र सण व उत्सब दरम्यान बंदोबरतसाटी जावे लागते कोविड-१९ चे अनुषंगाने स्वत:ची काळजी घेण्यात तसेच बंदोबस्त चोख करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या.नवरात्र/दुर्गामाता उत्सब चे अनुशंगाणे शासनाने निर्गमित केलेले नियमावली प्रमाणे/नियमास अधिन राहून सण साजरा करणेबाबत तसेच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

शिराळा येथील बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करा शेतकऱ्यांची मागणी

 

        परंडा :-     परंडा तालुका येथिल अतिवृष्टी ने  शिराळा येथिल बंधार्याच्या पश्चिम बाजुने सिना नदीचे पात्र खचुन बंधार्याचे मोठे नुकसान झालेले आहे. त्या मुळे सिना उजनी बोगद्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शिराळा उपसा सिंचन योजनेच्या व बंधार्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती चिंचनाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शिराळा, लोणी.वडणेर,देवगांव,आवारपिंपरी,कपिलापुरी, वागेगव्हाण,आसु , लोहारा या गावातील शेतकऱ्यांचे भविष्यातील शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. अतिव्रूष्ठिच्या पाण्यामुळे बंधारा फुटल्याने उजनी बोगद्यातून  येणारे पाणी शिराळा बंधार्यात थांबनार नाही .त्या मुळे शिराळा उपसा सिंचन चालू करण्यास आडथळा येणार आहे .तसेच बंधार्यातील पाण्यावर अवलंबून आनेक शेतकऱ्यांनी लाखो रु खर्च करुण पाईपलाईन केलेल्या आहेत.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस ,द्रक्ष ,बोर,केळी ,दाळिंब व इतर पिके घेतली आहेत  बांधार्याची बाजु तुटल्याने शेती सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील बांधार्याची तत्काळ दुरुस्ती करुण भविष्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या मनस्तापासून शेतकऱ्यांची सुटका करावी आश्या मागणीचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांनि अनिलकुमार हेळकर यांना  देण्यात आले. या निवेदनावर लोणी,आसू,वडणेर,नालगावमधील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

तासगाव शहरला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक नागरिकांचे पुराच्या पाण्याने लाखो रुपयांचे नुकसान

साठेनगर परिसराला फटका गरीब नागरिकांचे संसार उघड्यावर प्रशासनाने तातडीने मदत करण्याची नागरिकांची मागणी

राहुल कांबळे/तासगाव

तासगाव शहर व तालुक्यातील तालुक्याला गेले  चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने त्यातच बुधवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत थांबला नाही २४ तास सतत पाऊस पडल्याने तासगाव शहरातील अनेक घरांमध्ये दुकान मध्ये पावसाचे पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यातच गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात कापून त्याला कधीही एवढा महापूर आला नाही तो आज महापूर आल्याने ओढ्यालगत अनेक नागरिकांच्या संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत कारण पूर्वी लोंढे तलाव भरला तरच का पूर आला पाणी येत असे परंतु यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दोन महिन्यापूर्वीच तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने  मुसळधार पाऊस पडल्याने  प्रथमच अनेक वर्षात कापूर ओढ्याला महापूर पाहावयास मिळाला आहे. तासगाव शहरातील वरचे गल्ली भागातील साठे नगर परिसर येतो हा शहरातील शेवटचा टोक असल्याने आजूबाजूला शेती असल्याने हे पुराचे पाणी रात्री दोन वाजता येतील रहिवासी परिसरात राहणाऱ्या पाच ते सहा घरात शिरले तेथील घरे ही साधी व मातीची असल्याने दोन ते तीन घरे पुराच्या पाण्याने जमीनदोस्त झाली परंतु यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही सतर्क नागरिकांनी तेथील नागरिकांना बाहेर काढले यामध्ये शीला विष्णू वाघमारे यांच्या म्हशीचे दोन रेडके वाचवण्यात यश आले तर एक म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली घर पडल्याने व म्हैस वाहून गेल्याने शीला वाघमारे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर अंतराम मोरे यांचे घर कापूर ओढ्यातील पात्रालगतअसल्याने पुराचे पाणी पंधरा ते वीस फूट पाणी आल्याने ४०० कडबा  पुराच्या पाण्यात वाहून गेला तर सहा धान्याची पोती पुराच्या पाण्याने भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच अंताराम मोरे,शहाजी देवकुळे, इंदाबाई रास्ते, दौलत देवकुळे, तानाजी देवकुळे, रमेश देवकुळे,प्रकाश देवकुळे, सुधाकर वाघमारे, पद्मिनी देवकुळे यांच्या पैकी कोणाची तरी घराची भिंत पडली आहे तर कोणाचे छपराच्या घरांचे नुकसान झाले येथील काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे , आयुब मनेर यांनी साठे नगर येथे धाव घेतली व तेथे प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली तर स्थानिक नगरसेवक सुभाष देवकुळे यांनी कोणतीही मदत न करता पाऊस पडला आहे नुकसान होणारच, पावसापुढे आपल काय चालतंय का,अस होणारच  असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने येथील माता-भगिनींच्या रोषाला नगरसेवक सुभाष देवकुळे यांना सामोरे जावे लागले, मत मागायला पुन्हा दारातच येऊ देत बघतोच असे तेथील नागरिक व्यक्त करीत होते.नगरपालिका प्रशासन व देवकुळे यांच्यावर तिथल्या नागरिकांना आपला राग व्यक्त केला आहे परंतु साठे नगर भागातील मतदारांनी एक तर्फी निवडून दिलेल्या तासगाव नगरीचे प्रथम नागरिक डॉक्टर विजय सावंत यांनी मात्र या गरीब साठेनगर कडे साधे फिरकले नाहीत किंवा त्यांच्या नुकसानीची कोणतीही चौकशी केली नाही हे विशेष आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या सौ मनीषा म्हस्के,राजू म्हस्के, सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली पुंडेकर  यानी सकाळी सहा वाजताच साठे नगर येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून माता-भगिनींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.सकाळी आठ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत यांना साठे नगर येथे झालेल्या नुकसानीची माहिती समजताच शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष खंडू कदम व युवानेते अभिजीत पाटील यांना सोबत घेऊन साठे नगर येथे धाव घेत तेथील नुकसानीची पाहणी केली व तेथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी सकाळी सात वाजता तिचा जागर न्यूज चॅनेल चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांच्या समस्या आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचे काम केले तर वस्तुस्थिती नगरपालिका प्रशासनाच्या समोर आणण्याचे काम केले आहे.येथील साठे नगर परिसरातील सर्व नागरिक मोलमजुरी करणारे आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी चे प्रस्ताव तासगाव नगरपालिका दाखल केलेले आहेत त्या प्रस्ताव अनेक प्रस्ताव हे पेंडिंग आहेत परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याएवढे प्रस्ताव मंजूर आहेत पण त्यापैकी काही हातावर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्ताव मंजूर असून त्यापैकी काही हप्ते न मिळाल्यामुळे  घरे अर्धवट स्थितीत आहेत. आज  कापूर ओढ्याला आलेल्या पुरामुळे व इतर सर्व घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांची तातडीने सर्वेक्षण करून नगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेतून सदरच्या सर्व नागरिकांचे तातडीने प्रस्ताव मंजूर करून त्यांचे संसार उभा करण्याची गरज आहे. यासाठी गट तट  न पाहता सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी एकत्र येऊन साठे नगर येथील गरीब नागरिकांचे घरे बांधून पुन्हा संसार उभा करण्याची पूण्य करावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत अन्यथा नगरपालिके समोर घरकुल मंजूर होईपर्यंत उपोषण करण्याची आणि माघार न घेण्याची जणू शपथच येथील नागरिक व्यक्त करीत होते.यावेळी माजी नगरसेवक महाकू मोरे, मधुकर देवकुळे, प्रकाश देवकुळे इ. उपस्थित होते.दुपारी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने ज्या नागरिकांची घराचे नुकसान झाले होते. ज्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्या नागरिकांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व शिक्षण मंडळाच्या शाळेत राहण्याची व्यवस्था नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या वतीने केली होती हे विशेष होय. यावेळी प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे,आयुब मनेर,महादेव लुगडे ,राजू माळी, राजू काळे इ. नी नुकसानग्रस्त नागरिकांचे योग्य नियोजन केले होते. सर्वात महत्त्वाचेतासगाव नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने लक्ष घालून या भागातील सर्व नागरिकांचा पुन्हा सर्वे करून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल प्रस्ताव दाखल करून घेण्यात यावेत व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून द्यावीत व सदरच्या नागरिकांना शासनाचा योजनेचा फायदा करून द्यावा अशी मागणी होत आहे. हे लवकरात लवकर नाही झाले तर साठेनगर मधील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निरा नरसिंहपूर येथे भीमा व नीरा नदीला आलेल्या पुराची केली पाहणी

निरा नरसिंहपुर 

निरा व भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे व गोर गरीब नागरिकांचे  कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेली पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाअध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, इंदापुर तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समिती बिडिओ विजय परिट, इंदापुर.पि.आय नारायण सारंगकर, कृषी अधिकारी रुपनवर, या सर्वांच्या उपस्थितीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निरा नरसिंहपूर येथे पुर परिस्थितीची पाहणी केली. नीरा व भीमा नदीकाठी पुराची पाहणी करुन निरा नरसिंहपुर परिसरामधील सर्व शेतकरी असो कामगार  मजूर असो  ज्यांच्या ज्यांच्या  घरांमध्ये पुराचे पाणी गेलेले असेल व पाण्यामुळे अनेक प्रकारे नुस्कान झालेली असेल त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश या वेळी पदाधिकाऱ्यांना व महसूल अधिकारी यांना दिले. 

निरा नरसिंहपूर येथील सर्व पूरग्रस्त ग्रामस्थ व उपस्थित राहून प्रत्येकाने आपापल्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या या अडचणी राज्यमंत्री  दत्तात्रेय भरणे यांना यावेळी सांगितल्या यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुढे म्हणाले की पुराच्या पाण्याने अथवा पावसाने ज्या शेतकऱ्यांचे मोटारी पाईपलाईन अथवा शेतातील पिके घरातील सर्व काही पाण्याने वाहून गेली असतील त्यांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश दिले यातून एकही शेतकरी पंचनामा करण्याचा न राहता कामा नये असे या वेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या

सीना कोळगाव ओव्हरफ्लो ,4 दरवाजे उघडले सीना नदीत विसर्ग सुरू

 

परंडा(दत्ता नरुटे) परंडा तालुक्यातील सर्वात मोठे   (5tmc)समजले जाणारे सीना कोळगाव धरण  बुधवार दि 14 रोजी अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी दोन टप्प्यात धरणाचे 4 दरवाजातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे 

 सीना कोळगाव धरणात नगर जिल्ह्यातील पाणी येते गेल्या महिनाभर नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे सीना नदीवरील नगर जिल्ह्यातील धरणे गेल्या महिन्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सीना कोळगाव धरण भरण्याचे आशा पल्लवित झाल्या होत्या अखेर आज धारण 100 टक्के भरले असून यातून खाली पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे परंडा ,करमाळा, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे गेल्या दोन वर्षात हे धरण भरले नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता 

13हजार हेक्टर होणार बागायती

सीना कोळगाव धरणतुन परंडा तालुक्यातील 8700 हेक्टर तर करमाळा तालुक्यातील3400 हेक्टर असे लागवडीलायक क्षेत्र 13000 च्या आसपास सिंचित होणार असून याचा फायदा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे  

 धरण  भरले पण नियोजनाचे काय?

सीना कोळगाव धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे परंतु त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे धरणातून विविध ठिकाणी पाणी सोडवे लागते यामध्ये परंडा तालुक्यातील आनाळा,करमाळा तालुक्यातील नेर्ले साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे त्यामुळे प्रशासनाने वाया जाणारे पाणी  या ठिकाणी सोडावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे