Home Blog Page 263

इथेनॉल खरेदी किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळ समितीची मंजुरी

 

खासदार संजयकाका पाटील यांनी केले निर्णयाचे स्वागत

तासगाव  प्रतिनिधी

पंतप्रधान . नरेंद्रजी मोदी यांचे अध्यक्षतेखाली आर्थिक धोरणासंबंधी मंत्रीमंडळ समितीने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सन २०२०२१ या वर्षासाठी सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी किमतींमध्ये आजवरच्या इतिहासातील भरघोस वाढ करून नवीन धोरणास मंजुरी दिली आहे. यामुळे उस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले. या निर्णयांतर्गत तयार करण्यात आलेले धोरण हे आजवरच्या इतिहासातील सर्वसमावेशक आणि उस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांचेत समन्वय साधणारा निर्णय असून त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे, असेही मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार संजयकाका पाटील यावेळी म्हणाले, पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांचे अध्यक्षतेखाली आर्थिक धोरणासंबंधी मंत्रीमंडळ समितीने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सन २०२०२१ या वर्षासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये सी हेवी मोलॅसिस पासून तयार झालेल्या इथेनॉलची खरेदी किंमत प्रति लिटर ४३.७५ रु. वरून ४५.६९ रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे. बी हेवी मोलॅसिस पासून तयार झालेल्या इथेनॉलची खरेदी किंमत प्रति लिटर ५४.२७ रु. वरून ५७.६१ रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच उसाचा रस / साखर / साखर सिरप यांचेपासून तयार झालेल्या इथेनॉलची खरेदी किंमत प्रति लिटर ५९.४८ रु. वरून ६२.६५ रु. पर्यंत वाढविण्यात आले आहे. याचसोबत वस्तू व सेवा कर आणि वाहतूक शुल्क ही देय असणार आहे. राज्यातील स्थानिक उद्योगास चालना व योग्य संधी उपलब्ध होणेसाठी तेल विपणन कंपन्यांना वाहतुकीची किंमत, यासारख्या विविध बाबींचा विचार करून इथेनॉलला प्राधान्य हे राज्य आणि प्रदेशातील उत्पादन निर्मितीवर अवलंबून असेल.

यामुळे सर्व डीस्टीलरी धारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम असून मोठ्या संख्येने इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉल पुरवठा केला जाण्याची अपेक्षा असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही होणार आहे. केंद्र सरकार इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रम राबवीत आहे. ज्यामध्ये तेल विपणन कंपन्या १०% पर्यंत इथेनॉलमिश्रित पेट्रोल विकतात. हा कार्यक्रम आता संपूर्ण भारतात विस्तारित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी व कृषी क्षेत्राला चालना देणेसाठी हा निर्णय खूप महत्वपूर्ण मनाला जात आहे, असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सन २०१४ पासून सरकारने इथेनॉलच्या खरेदी किमतीबाबत अधिसूचित केले आहे. सन २०१८ साली पहिल्यांदाच इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलची वेगळी किंमत केंद्र सरकारने जाहीर केली. यामुळे इथेनॉल उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून सन २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटर असणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठा करारात १९५ कोटी लिटर इतकी मोठी भरीव वाढ दिसून आलेली आहे.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सूचनेनुसार भागधारकांना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाने “ईबीपी कार्यक्रमांतर्गत दीर्घकालीन आधारावर इथेनॉल खरेदी धोरण” तयार केलेले आहे. याकरिता सुरक्षा ठेव रक्कम ५% वरून कमी करून १% पर्यंत आणलेली आहे. यामुळे इथेनॉल पुरवठादारांना व्यवसाय करणे सुलभ होणार असून आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे उद्दिष्ट सध्या होण्यास मदत होणार आहे. साखर उत्पादनात साखरेच्या सातत्याने वाढलेल्या भावामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देय देण्याची क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांच्या थकबाकीत वाढ झालेचे आजवर दिसून आलेले आहे. यासाठीच देशात साखर उत्पादन मर्यादित ठेवून इथेनॉलचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. हा निर्णय नक्केच स्वागतार्ह आणि कृषी क्षेत्रासाठी दिलासादायक आहे.

दैनिक जनमत ३१ ऑक्टोबर E पेपर

 

कवठे एकंद ता.तासगाव येथील थकीत शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या वन टाइम सेटलमेंट या मागणीला महा विकास आघाडी सरकारकडून मुदतवाढ

सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा नंबर एक व दोन या संस्थेच्या संचालक मंडळ व सभासद यांच्या पाठपुराव्यास  यश

राहुल कांबळे/तासगाव प्रतिनिधी

कवठे एकंद ता. तासगाव येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा क्रमांक एक व दोन या संस्थेचे काही थकीत शेतकरी बांधवांना वन टाइम सेटलमेंट चा लाभ झालेला नव्हता कारण याची मुदत सन २०१९ रोजी त्याची मुदत संपली असल्याने वन टाइम सेटलमेंट ची मुदत वाढ मिळावी यासाठी सदरच्या संस्थेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, वसभासद हे गेले वर्ष ते दीड वर्ष सतत पाठपुरावा करत होते. कवठे एकंद येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने हे मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करून वन टाइम सेटलमेंट ची मागणी करण्यात आली होती.शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांचे महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन साधारणपणे दहा महिने पूर्ण झाले आहेत. सदरची मागणी पूर्ण व्हावी यासाठी तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांच्याकडे संस्थेच्या वतीने पत्र देऊन सदरच्या या प्रकरणात लक्ष घालण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. तसेच कृषी, सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या कवठेएकंद दौऱ्या दरम्यान पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने पत्र देऊन या वन टाइम सेटलमेंट साठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना जयंतराव पाटील साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून कवठे एकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठ्याच्या सभासद शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळवून दिला आहे.कवठेएकंद येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय शासनाच्या वतीने घेतला आहे. पालक मंत्री ना. जयंतरव पाटील  ना.डाॅ. विश्वजीत कदम व तालुक्याचे आमदार  सुमनताई आर आर पाटील यांना निवेदन देण्यात आल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घातले होते.संस्थेच्या या मागणीला शासनाने प्रतिसाद देऊन ओटीएस योजना लागू केली त्याबद्दल मंत्रीमहोदय व आमदारांचे कवठे एकंद येथील सिद्धराज पाणीपुरवठा संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. सदरची बातमी दैनिक जनमत चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी ही बातमी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशी योग्य आहे त्यासाठी लावून धरली आहे.यासाठी कवठे एकंद येथील शेतकरी बांधवांनी दैनिक जनमत चे आभार व्यक्त केले आहे. वन टाइम सेटलमेंट साठी मुदतवाढ मिळावी म्हणून सिद्धराज पाणीपुरवठा संस्था क्रमांक एक व दोन चे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ, चेअरमन डॉक्टर नरेंद्र खाडे, ज्येष्ठ नेते अशोक तात्या घाईल,रामभाऊ अण्णा थोरात, सूर्यकांत आप्पा पाटील, प्रवीण वठारे,बापू पाटील, अनिल पाटील, नागसेन कांबळे, अभिनंदन कोंगनोळे, प्रा विशाल चंदुरकर या सर्वांनी विशेष प्रयत्न केले होते.

मी अनुभवलेले राणादादा

मी उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सन २०१४-१५ वर्षी दुसऱ्या वर्षात शिकत होतो. एका काम निमित्त आम्ही आ.राणादादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात म्हणजे प्रतिष्ठान भवन येथे गेलो. तेथे दादांचे सोशल मीडिया प्रमुख असलेले इर्शाद काझी यांची भेट झाली. त्यांची फेसबुकवर आधीच मैत्री होती पण आज प्रत्यक्ष भेट झाली. चर्चेदरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले की दादा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फिस माफी साठी मुख्यमंत्र्यांना १०,००० सह्यांचे निवेदन देणार आहेत. आम्ही बोललो कि आपल्या कॉलेज मधून पण सह्या आम्ही घेतो. आम्ही कॉलेज मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सह्या घेतल्या. एवढंच नाही तर उस्मानाबाद व परिसरातील सर्व महाविद्यालयांना भेटी देवून १० हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविली आणि खऱ्या अर्थाने याच माध्यमातून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली.

त्यानंतर काही दिवसातच आमच्या बॅच मधला एक मित्र आमच्याकडे आला आणि म्हणाला कि मला राणादादांना भेटायचे आहे. मि राणादादांच्या स्वीय सहाय्यक यांच्या नंबर वर फोन केला त्यांनी आम्हाला शासकीय विश्रामगृह येथे भेटायला येण्यासाठी सांगितले. आम्ही लगेच तेथे गेलो. दादांनी विचारले तुमचे काही काम आहे का?  मि बोललो दादा हा मुलगा आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहे आणि बीड जिल्ह्यातील आहे. त्याच्या भावाची किडनी गेली आहे. बाहेर हॉस्पिटलला विचारले तर खर्च १५ लाख सांगत आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने एवढे खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही तुमची भेट घ्यायला आलो आहोत. आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दादांनी लगेच मुंबई येथे डॉ.तात्याराव लहाने यांना फोन केला आणि सगळा विषय सांगितला.

फोन झाल्यानंतर दादांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही डॉ.लहाने यांना त्वरित भेटा, त्यांना मी बोललो आहे. त्यांनी सांगितले कि ५ लाखापर्यंत खर्च येईल. दादांच्या एका कॉल मुळे १० लाख खर्च कमी येणार हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणीच आले. दादा बोलले कि रडू नका. आजच डॉ.लहाने डॉक्टरांना भेटा तसेच काही अडचण आली तर मला कॉल करा असे बोलत त्या मुलाला धीर दिला. कोणतीही ओळख नसताना आणि जिल्ह्याबाहेरील व्यक्तीसाठी राणादादांनी एवढं केलं याचेच आश्चर्य वाटले आणि ऐकलेले दादा आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. या घटनेमुळे दादांचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान देखील वाटला.

या भेटीमुळे दादांच आणि माझं नेता आणि कार्यकर्ता हे नातं आणखीन घट्ट झालं आणि हे आजतागायत ते अबाधित आहे. माझे मित्र मला दादांचा कट्टर कार्यकर्ता असे म्हणतात याचा मला खरंच गर्व आहे. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वानंद पाटील

मुंबईवरून सांगलीत परतलेल्या एसटी महामंडळाच्या ४२५ पैकी १०२ वाहक व चालकांना कोरोनाची लागण

तासगाव आगारातील २४ चालक – वाहक कोरोना बाधित

मुंबईत सेवेदरम्यान लागण तासगाव आगारात खळबळ

तासगाव प्रतिनिधी

     मुंबई येथे बेस्ट वाहतूक सेवेला मदत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक डेपोतून हजारो बसेस व हजारो वाहक व चालक यांना मुंबई येथे एसटी महामंडळाची सेवा बजावण्यासाठी पाठवले होते. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील ४२५  वाहक व चालक हे आपापल्या डेपोत परतले होते. परंतु या ४२५ पैकी १०२ वाहक व चालकांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

   यापैकी   तासगाव बस आगारातील तब्बल  २४ चालक आणि वाहकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी ४३ चालक – वाहकांच्या अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यापैकी चालक – वाहक मिळून तब्बल २४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. १८ चालक – वाहकांचे अहवाल निगेटिव्ह आले.

       दरम्यान एकाच दिवशी २४ कर्मचा-यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वजण मुंबई येथे वाहतूक सेवेसाठी गेले असताना कोरोनाची बाधा झाल्याने चालक आणि वाहकांत घबराट पसरली आहे.

       मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट च्या प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावणा-या चालक आणि वाहकांवर मोठा ताण आहे. तो कमी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातून प्रत्येकी दहा गाड्यासह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास पाठविण्यात आले होते. 

       तासगाव आगारातील ४५ चालक-वाहक मुंबईत सेवेसाठी गेले होते. ते परत आल्यानंतर सोमवारी ग्रामीण रुग्णालयात ४३ चालक आणि वाहकांची टेस्ट घेण्यात आली होती.

तर मुंबईहून सांगली जिल्ह्यात परतलेल्या ४२५ एसटी चालक व वाहक पैकी सांगली डेपो येथील ६, मिरज डेपो ६, इस्लामपूर डेपो ६, विटा डेपो १४, आटपाडी डेपो १५, जत डेपो १५, कवठेमहांकाळ डेपो १४, शिराळा डेपो १६, तर तासगाव डेपोतील २४ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने सांगली जिल्ह्यासह सर्व एसटी डेपो सह तासगाव डेपोत एकच खळबळ उडाली आहे.

तासगाव डेपोतील वाहक व चालक यांना पुन्हा आपल्या तासगाव डेपोत रुजू होण्यास परवानगी द्यावी या संदर्भात तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी मुंबई येथे एस टी महामंडळाच्या मुख्य अधिकारी यांची भेट घेतली होती हे विशेष होय. त्यासंदर्भात रोहित दादा पाटील यांनी परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते आजारी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती. परंतु महाराष्ट्रातील सर्व डेपोतील चालक-वाहकांना परत पाठवण्याच्या संदर्भात त्यांनी युवा नेते रोहित दादा पाटील यांना शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे‌. सांगली जिल्ह्यातील जे चालक व वाहक कोरोना बाधित आहेत त्यापैकी काही चालक-वाहक यांना रुग्णालयात दाखल केले आहे.तर काही चालक व वाहक यांना होम आयसोलेट केले आहे.