Home Blog Page 262

माणुसकी जपत या ‘आमदाराकडून’ ऊस तोडणी कामगारांची दिवाळी गोड

पस्तीस हजार कामगारांना दिला जागेवरच दिवाळी फराळ.


महेश देशमुख (सोलापूर)

शेकडो किलोमिटर वरून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यास अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत स्वता:च्या घरापासून राज्यातील साखर कारखान्याकडे जात असतात. ते ऐन सणाच्या काळात घर सोडतात त्यामुळे त्यांची दिवाळी ही ऊसाच्या फडावरच असते हि गोष्ट लक्षात घेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे आलेल्या ट्रक,टॅक्टर,बैलगाडी वरील सुमारे पस्त्तीस हजार ऊस तोडणी मजूरांना फराळाचे वाटप करत माणुसकी जपण्याचे काम केले आहे.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा सज्ज असून कारखान्याच्या वतीने माढा,पंढरपूर,माळशिरस,करमाळा,इंदापूर,परांडा ,मोहोळ या तालुक्यामध्ये नोंदी प्रमाणे ऊस तोडीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व ऊस तोडणी करणारे मजूर विविध भागात काम करत आहेत. त्यांच्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारख्यान्याने गेल्या आठ दिवसापासून कारखाना स्थळावरून ३० टनाची बुंदी व  १५ टन चिवडा बनवून तयार केलेला आहे.त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांचा खर्च आलेला असून गोरगरीब ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना २किलो बुंदी व १ किलो चिवडा यांचे पॅकींग तयार करून उसाच्या फडावरच काम करत असलेल्या ठिकाणी कारखान्यामार्फत पोहोच केले आहेत शुक्रवार पासून प्रत्येक वाहनाच्या टोळीवरील व बैलगाडीच्या ३५ हजार मजूरांना पॅकींग पोहोच करण्याचे काम झाले आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित आलेला आहे, यापुर्वी देखील अनेक उपक्रम करत आपली वेगळी ओळख या साखर कारखान्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली आहे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे यांनी सांगितले. आ.शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक ऊस तोडणी मजूर यांच्यासह विविध स्तरातुन होत आहे.

ऊस तोड मजूर सणासुदीच्या काळात स्वता:च्या घरापासून दूर राहत बाहेर जाऊन मजूरी करतात अशा कुटुंबांना, मुलाबाळांना दिवाळीमध्ये गोड काही तरी द्यावे हा विचार मनात ठेऊन कारखान्यामार्फत सोळा हजार कुटुंबांतील  मजुरांना  प्रत्येकी दोन किलो बुंदीचे लाडू व एक किलो चिवडा याचे पॅकिंग करुन  देण्याचे काम केले त्यामुळे त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळेल अशी भावना आ.बबनराव शिंदे व्यक्त यांनी केली .

दैनिक जनमत १५ नोव्हेंबर E पेपर

दैनिक जनमत १४ नोव्हेंबर E पेपर

स्वाभिमानी युवा मंचाच्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल १०१ जणांचे रक्तदान

 

कुर्डूवाडी दि.११(प्रतिनिधी)

स्वाभिमानी युवा मंचच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तब्बल १०१ रक्तदात्यानी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन लक्ष्मण पाटील,शशिकांत नरुटे,अभिजित सोलंकर,शिवराज पुकळे,महेश पाटणे,नंदकुमार गावडे ,भैय्या तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले सांगोला येथील रेवनील रक्तपेढीने करत संकलन केले.

यावेळी स्वाभिमानी युवा मंचचे मार्गदर्शक सत्यवान आबा हांडे, संस्थापक शुभम तोडकर,जिगर ग्रुपचे औदुंबर लेंगरे,मयुर वाघमोडे,रोहित सरक,धनाजी दोलतोडे-पाटील,विजय वाघमोडे,ओंकार कोयले,किरण वाघमोडे,रुशी गरड,सुरज लिंगे,लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.

मनसे विधी विभागाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी ॲड.मस्के…

सोलापूर दि.०७(प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी बार असोसिएशनचे सदस्य ॲड.अनंत आप्पाराव मस्के यांची निवड प्रदेश सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परंडा येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या याप्रसंगी ॲड अरूण लंबुगोड ॲड नंदकिशोर खरसडे ॲड अविनाश जाधव ॲड रियाज बागवान ॲड पवन मोरे ॲड स्वाती ठोसर ॲड रमेश चव्हाण ॲड गणेश फावडे ॲड अक्षय दोशी उपस्थित होते.

बार्शी येथील जाणीव फाउंडेशनच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मस्के उपाध्यक्ष वसंत हवालदार सचिव राणाप्रताप देशमुख पवन खरसडे संतोष मस्के उमेश साळुंखे राजाभाऊ नवगण संतोष पवार ज्ञानेश्वर मारकड किरण लुंगारे आदी उपस्थित होती

या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.हर्षवर्धन बोधले यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.