कुर्डुवाडीत “टिपू सुलतान”यांना अभिवादन..
कुर्डुवाडी दि.२० (प्रतिनिधी)
म्हैसूरचे राजे थोर स्वातंत्र्यसेनानी हजरत शेरे-ए-हिंद टिपू सुलतान जयंती कुर्डुवाडी शहरासह विस्तारित भागात ठीकठिकाणी शामियाने उभी करून उत्साहात साजरी करण्यात आली समाजसेवक रफीक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला सर्वप्रथम हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस बालगोपाळांकडुन पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रेहान सय्यद अय्युब सय्यद फैजान तांबोळी आयान सय्यद तोहीद सय्यद आयान शेख अनिकेत इंगोले यांच्यासह आर.एस फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
तासगाव चे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर भाविकांसाठी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुले
श्री गणपती पंचायतन ट्रस्टचे विश्वस्त डॉ.आदिती पटवर्धन सुहास शिंदे सुशील थोरबोले यांची प्रमुख उपस्थिती
तासगाव प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे नियमांचे पालन करून नागरिकांसाठी खुले करण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रार्थना स्थळे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुली झाली आहेत. यामध्ये तासगावचे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी श्री गणपती पंचायत देवस्थानचे वतीने मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट व आकर्षक रांगोळी काढून तासगावच्या गौरी हत्तीच्या व पारंपारिक ढोल ताशा च्या गजरात श्रींची महाआरती करून श्री गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे सर्व भाविकांना दर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत घेता येईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भक्तांना सनी टायझर दिले जात आहे मास्कचा वापर करावाच लागेल अन्यथा मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल डिस्टंसिंग चा वापर करून श्री गणपतीच्या दर्शनाचा लाभ भाविकांसाठी दिले जाणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक सुशील थोरबोले यांनी दिली आहे.यावेळी श्री गणपती पंचायतन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ.आदिती पटवर्धन, सुहास शिंदे,श्री चे सेवक अथर्व जोशी, ऍड. राजेंद्र जोशी, अनंत जोशी, प्रवीण माळी,गिरीश रेंदाळकर, हर्षल कीर्तकर,राजू पाटील, सौरभ जोशी, शिवप्रसाद पैलवान, प्रशांत पैलवान, अनिकेत माळी, सुधीर माळी, सर्व पुजारी मंडळी व श्री चे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ महिन्यानंतर श्री गणेश मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले असल्याने भाविकांच्या मनामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.
माणुसकी जपत या ‘आमदाराकडून’ ऊस तोडणी कामगारांची दिवाळी गोड
पस्तीस हजार कामगारांना दिला जागेवरच दिवाळी फराळ.
महेश देशमुख (सोलापूर)
शेकडो किलोमिटर वरून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यास अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत स्वता:च्या घरापासून राज्यातील साखर कारखान्याकडे जात असतात. ते ऐन सणाच्या काळात घर सोडतात त्यामुळे त्यांची दिवाळी ही ऊसाच्या फडावरच असते हि गोष्ट लक्षात घेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे आलेल्या ट्रक,टॅक्टर,बैलगाडी वरील सुमारे पस्त्तीस हजार ऊस तोडणी मजूरांना फराळाचे वाटप करत माणुसकी जपण्याचे काम केले आहे.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा सज्ज असून कारखान्याच्या वतीने माढा,पंढरपूर,माळशिरस,करमाळा,इंदापूर,परांडा ,मोहोळ या तालुक्यामध्ये नोंदी प्रमाणे ऊस तोडीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व ऊस तोडणी करणारे मजूर विविध भागात काम करत आहेत. त्यांच्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारख्यान्याने गेल्या आठ दिवसापासून कारखाना स्थळावरून ३० टनाची बुंदी व १५ टन चिवडा बनवून तयार केलेला आहे.त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांचा खर्च आलेला असून गोरगरीब ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना २किलो बुंदी व १ किलो चिवडा यांचे पॅकींग तयार करून उसाच्या फडावरच काम करत असलेल्या ठिकाणी कारखान्यामार्फत पोहोच केले आहेत शुक्रवार पासून प्रत्येक वाहनाच्या टोळीवरील व बैलगाडीच्या ३५ हजार मजूरांना पॅकींग पोहोच करण्याचे काम झाले आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित आलेला आहे, यापुर्वी देखील अनेक उपक्रम करत आपली वेगळी ओळख या साखर कारखान्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली आहे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे यांनी सांगितले. आ.शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक ऊस तोडणी मजूर यांच्यासह विविध स्तरातुन होत आहे.
ऊस तोड मजूर सणासुदीच्या काळात स्वता:च्या घरापासून दूर राहत बाहेर जाऊन मजूरी करतात अशा कुटुंबांना, मुलाबाळांना दिवाळीमध्ये गोड काही तरी द्यावे हा विचार मनात ठेऊन कारखान्यामार्फत सोळा हजार कुटुंबांतील मजुरांना प्रत्येकी दोन किलो बुंदीचे लाडू व एक किलो चिवडा याचे पॅकिंग करुन देण्याचे काम केले त्यामुळे त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळेल अशी भावना आ.बबनराव शिंदे व्यक्त यांनी केली .

































































