Home Blog Page 259

दैनिक जनमत ८ डिसेंबर E पेपर

सर्वपक्षीय जनआंदोलन संघर्ष समितीचा कडकडीत बंद राहणार भाजीपाला, दूध व मेडिकल सुविधांना वगळण्यात येणार

 

उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) –  केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता जे तीन कृषी कायदे लागू केले आहेत. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मात्र या बंद दरम्यान दूध, भाजीपाला व मेडिकल या सुविधांना वगळण्यात आले आहे.
 महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना तसेच विविध पक्ष संघटना व शेतकरी संघटनांनी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला व्यापक पाठबळ देण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान व महाराष्ट्र आदी राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले असून सुरुवातीला केंद्रसरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत देखील त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे, अश्रू धुराच्या‌नळकांड्या फोडीत लाठीहल्ला करीत अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही निराधाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मताचा विचार न करता, त्यांना विश्‍वासात न घेता व न जुमानता ही विधेयके मंजूर केलेली आहेत. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील व जमिनीच्या तुकड्यावर आपली गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याबरोबरच भारतीय अन्न महामंडळ देखील निष्क्रिय केले जाईल व अन्नसुरक्षा कायदा, रेशन व्यवस्था मोडीत काढली जाईल ही रास्त भीती देखील त्यांच्या मनामध्ये आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांची सन्मान जनक संवाद करण्याचे दायित्व देखील हे सरकार पार पाडत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची संवाद साधावा व शेतकरी विरोधी संमत केलेले तीन्ही कायदे  तात्काळ मागे घ्याव्यात यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांच्यावतीने दि.८ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनात उतरून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी दि.७ डिसेंबर रोजी छत्रपती हायस्कूल येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून या बैठकीस प्रा. अर्जुन जाधव (स्वराज इंडिया), सतीशकुमार सोमाणी (शिवसेना) भाई धनंजय पाटील, संभाजी गायकवाड (शेकाप), नितीन बागल (राष्ट्रवादी काँग्रेस), राजाभाऊ शेरखाने,   ॲड. जावेद काझी, मेहराज शेख(काँग्रेस आय), कॉम्रेड पंकज चव्हाण(भाकप), कृष्णा जगताप, अमोल घोगरे, बाळासाहेब बरकसे, शिवदास पवार, हनुमान हुंबे, आर.जे. बोबडे, आशिष पाटील, ॲड. तानाजी चौधरी, दिनेश चौगुले (संभाजी ब्रिगेड) व अरुण निटूरे (राष्ट्रीय बहुजन किसान पार्टी) आदीसह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

पोलीस कर्मचाऱ्यांस भरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

 

टेंभूर्णी (प्रतिनिधी):- पुणे सोलापूर हायवे रोडवरील वरवडे येथील टोल नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांस भरधाव टेम्पोने ठोकरल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे रा. बार्शी असे मयत पोलीस कर्मचार्यांचे नाव आहे

सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्यावर टेम्भुर्णी च्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस नाईक चोबे यांनी हात केला होता, यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने चोबे यांना ( रविवार ) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

टेम्पो क्रमांक ( MH 04, HD- 0170 ) हा हैदराबाद हुन मुंबईला मेडिसीन घेऊन निघाला होता. टेम्पो चालक आरोपी नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा.परळी वैजनाथ, जि. बीड ) यास अटक करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे, महामार्ग पोलिस निरीक्षक रामेश्वर पडवळकर, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनस्थळी भेट दिली.

यात चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो आणि चालकास ताब्यात घेण्यात आले असून भा द वी कलम ३०४(२) नुसार टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

सावळजजवळ भिषण स्फोट, एकाचा मृत्यु, तीन गंभीर जखमी

स्फोटाने तासगाव पूर्व भाग हादरला,मृत व जखमींचा आकडा वाढण्याची भीती.!!

वायफळे/प्रतिनिधी

सावळज ता.तासगाव येथील सावळज व बस्तवडे गांवच्या हद्दीच्या सिमेवर असणाऱ्या पटवर्धन खोरा या डोंगर पठारावर जमीन सपाटीकरण कामासाठी जिलेटीन कांडी उडविण्यासाठी आणलेल्या दोन ट्रक मधील काँम्प्रेसर पेट घेतल्याने एकाचा मृत्यू तर तिनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये प्रतिक हणमंत स्वामी, रा.नागज ( वय वर्षे 22 ) हे मयत झाले असुन जखमी उपेंद्र यादव रा.उत्तर प्रदेश व अन्य दोन असे एकुण तीन जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींच्यानुसार अनेकजणांचा ( पाच ते सहा ) म्रुत्यु व गंभीर असल्याची शक्यता व्यक्त होत होती.तासगाव नगरपरिषदच्या अग्निशमन विभागाकडुन आग विझवण्याचे काम सुरू होते.या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की जवळपास 15 ते 20 किमीचा परिसर हादरून गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण होते.

   प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,सावळज व बस्तवडे हद्दीच्या सिमेवर सावळजच्या पश्चिम बाजुस पटवर्धन खोरा याठिकाणी श्री. संभाजी चव्हाण,रा. सिध्देवाडी यांनी सुमारे १७७ एकर डोंगरपठार जमीन काही महीन्यापुर्वी खरेदी केली आहे. त्या डोंगरावर जमीन सपाटीकरण करण्याचे काम चालू आहे.या ठिकाणी डोंगर फोडण्यासाठी दोन ट्रक मधुन काँम्प्रेसर द्वारे होल मारून जिलेटीन कांड्या त्यात घालून स्फोट करीत होते.यातील एका ट्रकचा काँम्प्रेसर व रेडिएटर गरम होऊन डिझेल टाकीने पेट घेतला तसेच लागुनच असलेल्या शेजारील ट्रकचा पेट घेतला.यातील जिलेटीन स्फोटके पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की यामुळे तासगाव पुर्व भाग हादरला.या स्फोटापासुन शंभर मिटर परिसरात मानवी शरीराचे भाग हात,पाय,वगैरे छिन्नविच्छिन्न पडले होते.जखमींना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.घटनास्थळी शेकडो बघ्यांची गर्दी झाली होती.मयत व जखमीचे नातेवाईकांचा आक्रोश सुन्न करणारा होता.सावळज परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

    याठिकाणी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे,पोलीस उप अधिक्षक आश्विनी शेंडगे,पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी मंडल अधिकारी वसंत पाटील,गावकामगार तलाठी पोपट ओमासे, एन आर पाटील ,पोलीस पाटील दत्तात्रय पाटील उपस्थित होते. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त होता.

*चौकट*

सावळजमधील या डोंगरपठारावर सहा महिन्यापासून जमीन सपाटीकरण चालू आहे. त्यासाठी भुसुरूंगस्फोट करण्यात येत होते. त्यामुळे परिसरातील सावळज,बस्तवडे, बिरणवाडी या गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत, शेतजमिनीत घेण्यात आलेल्या कुपनलिकेचे पाणी गेले आहे. यासंबंधातील तक्रार तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्या कडे अनेक वेळा ग्रामस्थांनी केली होती. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. ही जमीन नेमकी कुणाची व ती कुणाच्या नावे आहे व या ठिकाणी सपाटीकरण करून घेण्यापाठीमागील नेमके कारण काय??याची कुजबुज उपस्थित ग्रामस्थांमधून होती.सुरुंग स्फोटाद्वारे करण्यात येणारे हे सपाटीकरण इतकी गंभीर बाब प्रशासनच्या का लक्षात येऊ नये?वेळीच प्रशासनाने यात लक्ष घातले असते तर ही दुर्घटना घडली नसती.या घटनेस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.

जमीन मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ग्रामस्थांची मागणी

  डोंगरपठारावर मोठ्या संख्येने भुसुरूंगस्फोट करण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली आहे का ? यासाठी सेफ्टि किट वापरण्यात आले होते का ? या ठिकाणी इतके दिवस बिनबोभाट होत असलेल्या नियमबाह्य कामकाजावर  वरदहस्त कुणाचा? याची चर्चा ग्रामस्थांतुन कुजबुज सुरू होती.

कुर्डुवाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 

कुर्डुवाडी/ प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रमामाता बौद्ध महिला मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सभापती शिलाताई रजपूत माजी नगरसेविका जयश्री माने सविता जगताप रुक्मिणीबाई रजपूत जयश्री झींगळे सीमा रजपुत आदी उपस्थित होत्या.

कुर्डुवाडीत रिपाइंच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कुर्डूवाडी/(प्रतिनिधी)  

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांचा सहभाग लाभला कुर्डुवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)गटाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्त संकलन बार्शीच्या राम भाई शहा रक्तपेढी मार्फत करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री माने यांच्या हस्ते करण्यात आले .

प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला 

यावेळी आकाश जगताप माजी नगरसेवक अमरकुमार माने ॲड.हरिश्‍चंद्र कांबळे प्रा.आशिष रजपूत पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.जी नाना ओहोळ  पप्पू भीसे वसीम मुलाणी स्टेट बँक मॅनेजर कांबळे साहेब बंडू भोसले राजेंद्र वजाळे अमित ओहोळ विशाल पप्पू जगताप शहर कार्याध्यक्ष नितीन खंडागळे शरद शिंदे नामदेव भोंग आनंद रजपूत अर्जुन गाडे शिवाजी डांगे श्यामराव कांबळे,मनसे शहर उपप्रमुख गणेश चौधरी गोरख शिंदे श्रीमंत वाळके संजय तुपारे रामचंद्र डांगे हर्षद मुलाणी शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे  संजय सरवदे रोहन झिंगळे बबन जगताप गणेश समदाडे उपस्थित होते

रक्तदात्यांसाठी व मान्यवर सत्कार मूर्तींसाठी कोरोना  पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक तज्ञ डॉ.मोहसिन मकनू यांच्या वतीने अर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचे २०० व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले, तसेच रिपाइंच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना वाफेची मशीन व कप सेट देण्यात आले

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड तालुका संघटक विशाल मोरे अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष इम्रान शेख अखिल पानवाले शहर उपाध्यक्ष सुरज कांबळे रियाज शेख जावेद शेख कृष्णा गोरे राकेश शिंदे पप्पू थोरात यांनी परिश्रम घेतले.

बिबट्याने घेतला महिलेचा बळी, भीतीचे वातावरण

 करमाळा प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने आज करमाळा तालुक्यात दुसरा बळी घेतला असून अंजनगाव येथील महिला जयश्री शिंदे वय 25 शेतातील लिंबोणीच्या बागेतील लिंबे वेचण्या गेली असता बागेत दडून बसलेला नरभक्षक बिबट्या ने सदर महिलेच्या गळ्याचा घोट घेऊन तिच्या शरीरापासुन  वेगळे केले.उरलेले मुंडके त्याच ठिकाणी टाकून शरीराचा उरलेला भाग घेऊन बिबट्या पसार झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी सातच्या सुमारास घडली

याच बिबट्यांनी तीन तारखेला कुंदेवाडी तालुका करमाळा येथे एका युवकाचा बळी घेतला होता

अत्यंत क्रूरपणे हा बिबट्या मनुष्य प्राण्याचा बळी घेऊन त्याचे रक्त पिऊन उरलेली डेड बॉडी तसेच टाकून पसार होत आहे

या नरभक्षक बिबट्यांनी आष्टी जिल्हा बीड येथे तीन जण ठार केल्याची माहिती आहे आणि दोन मिळून असे पाच जणांचा बळी घेतल्यानंतर मनुष्यप्राण्याच्या रक्ताची चव लागल्यामुळे तो येणाऱ्या काळात अनेक बळी घेईल अशी भीती व्यक्त होत आहे

या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने तीन पिंजरे लावले असून 40 कर्मचारी  आहेत वेळ प्रसंगी आता या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारा अशी मागणी जनतेतून होत आहे

या नरभक्षक बिबट्या बरोबरच करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे एक बिबट्या फिरत असून आज त्यांनी एडवोकेट प्रमोद जाधव यांना दर्शन दिली हा बिबट्या मात्र नर्भक्षक नसून तो शेळ्या बोकड असे पाळीव प्राणी लक्ष करत आहे

त्याच बरोबर आज मागि परिसरात बागल कुटुंबियांच्या शेतातून एक मादी बिबट्या व त्याच्या बरोबर बिबट्याचे पिल्लू फिरत असताना महिलांनी पाहिले पण या बिबट्याच्या आणि मनुष्य प्राण्यावर हल्ला न करता ती मादी पोथरे शिवारात गेली  सुजित बागल यांनी ही माझी व पिल्लू बघितल्याचा पुराव्यासह दावा केला आहे

तीन तारखेला कुंदेवाड केलेली शिकार व आज अंजन डॉ येथे केलेली शिकार या दोन्ही ठिकाणात केवळ दहा किलोमीटरचा अंतर आहे

आज रात्री हा बिबट्या झरे खडकेवाडी या परिसरातून पुढे उमरड करीतच करेल असे वन खात्याचा अंदाज आहे

काल दुपारी उमरेड मध्ये या बिबट्याचे काही नागरिकांना दर्शन झाले होते

करमाळा तालुक्यातील त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत वस्तीवर राहणारे शेतकरी मोठे-मोठे ॲटम बॉम्ब उडवून आवाज निर्माण करून आपण स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहेत

वन खाते वन खात्याचे अधिकारी केवळ प्रसिद्धी व नौटंकी करण्यात मग्न आहेत गेली पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात फिरत होते शेतकऱ्यांनी नागरिकांनी तक्रारी केल्या यावेळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा बिबट्या नसून इतर प्राणी असल्याचा दावा करून उपाययोजना करण्यास टाळाटाळ केली

दोन वर्षांपूर्वी उंदरगाव येथे पकडलेला बिबट्याचे वेळीसुद्धा गावकरी टाहो फोडून सांगत होते का बिबटे आहे पण वन खाते म्हणायचे हा बिबट्या नाही शेवटी योगायोगाने बिबट्या जाळ्यात सापडल्यामुळे वन खात्याचे अधिकारी तोंडावर पडले होते

आता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नौटंकी बंद करून उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे